नाशिक-त्र्यंबकेश्वर,संस्कार भारती_ निवासी शिबीर
नाशिक – त्र्यंबकेश्वर_ संस्कार भारती_ निवासी शिबीर
खरे तर हे शिबीर गेल्या महिन्यात २४ ते २६ जानेवारी २०१० ला पार पडले व त्यासंबंधीचा पोस्ट खरे तर मी कधीच टाकायला हवा होता. परंतू दिनांक २४ लाच माझ्या डिजीटल कॅमेऱ्यात अचानक बिघाड झाला , त्याचे शटरच चालू होत नव्हते! मला तर वाटले होते की त्या दिवशी चे घेतलेले शॉट्स बहुदा ’धारातीर्थी’ पडलेले असणार ! पण काल कॅमेरा दुरुस्त होऊन आला व त्या दिवशी घेतलेले शॉटस शाबूत होते , व म्हणूनच ही पोस्ट टाकू शकतोय !
हे शिबीर संस्कार भारतीच्या नेहमीच्या वर्गांना व कार्यक्रमाला जे येतात त्यांचे साठी असते ! दर शनिवारी दुपारी एका शाळेत आम्ही जमतो व व्यक्ती चित्रणाचा सराव करतो. तर दर रविवारी निसर्ग चित्रणासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच ठरविलेल्या जागी जावून निसर्ग चित्रण करतो. माझे आता हे सहावे वर्ष आहे पण मला खाडा माहित नाही. अगदिच ठरविलेल्या जागी जाता आले नाही तर वा जेथे असेन तेथे जवळच्या एखाद्या जागी जाऊन हजेरी लाऊन येतोच येतो !
यंदा आम्ही २३ ला दुपारी निघालॊ.२३, २४ व २५ ला त्र्यंबकेश्वरच्या ( शेगाव ) भक्ती निवासात राहीलो. व २६ ला सकाळी नाशिकच्या गंगाकांठी चित्रण करून दुपारी पुण्या कडॆ रवाना झालो. मात्र छायाचित्रे २४ चीच काही शाबूत राहीलीत ती येथॆ देत आहे. आमच्या बरोबर श्रीयुत संदीप यादव हे पुण्याचे प्रसिध्द तरुण चित्रकार तिन्ही दिवस होते. तर २५ तारखेला नाशिकचे तरुण चित्रकार श्रीयुत प्रफुल्ल सावंत होते.
२४ तारखेचॆ प्रात्यक्षिक श्रीयुत संदीप यादव ह्यांनी दिले, त्याचे काही फोटो व व्हिडियो क्लिप्स मी घेऊ शकलो तेव्हढेच येथे देऊ शकत आहे. २५ तारखेचे पात्यक्षिक श्रीयुत प्रफुल्ल सावंत ह्यानी त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्ता वर दिले होते.
.
.
ह्याच मंदिराचे लॅंडस्केप काढत आमच्या शंकांचे निरसन करीत ते पूर्ण केले
.
.
ह्याच मंदिराचे पेन ने मी काढलेले स्केच
.
आम्ही सारे प्रात्यक्षिक बघण्यात तल्लीन झालॊ होतो.
.
.
संस्कार भारतीचे नाशिक शिबीर २४ ते २६ जानेवारी २०१० श्री. संदीप यादव,प्रसिध्द जलरंग चित्रकार, व्हॅल्यू स्केच कसे काढायचे समजावत आहेत
.
.
संस्कार भारतीचे नाशिक शिबीर २४ ते २६ जानेवारी २०१० श्री. संदीप यादव,प्रसिध्द जलरंग चित्रकार, व्हॅल्यू स्केच कसे काढायचे समजावत आहेत व जलरंगास सुरुवात कएली आहे.
.
.
संस्कार भारतीचे नाशिक शिबीर २४ ते २६ जानेवारी २०१० श्री. संदीप यादव,प्रसिध्द जलरंग चित्रकार, व्हॅल्यू स्केच कसे काढायचे समजावत आहेत व जलरंगास सुरुवात केली आहे. अधून मधून शंकांचे निरसन सुध्दा !
‘
.
संस्कार भारतीचे नाशिक शिबीर २४ ते २६ जानेवारी २०१० श्री. संदीप यादव,प्रसिध्द जलरंग चित्रकार, व्हॅल्यू स्केच कसे काढायचे समजावत आहेत व जलरंगास सुरुवात केली आहे वॉश देऊन झाला आहे.
.
प्रवर्ग: माझे छंद
नासिक त्र्यंबकेश्वर, लॅंडस्केप, व्हॅल्यु स्केच, संस्कार भारती
अप्रतिम काका.. स्केच खुपच छान आलं आहे.. “जर माझ्या कॅमेराने अवसान घातकी पणा केला नसता तर ?” .. खरंच आम्हाला अजून खूप चांगले फोटोज बघता आले असते.
अप्रतिम स्केच!! आणि फोटो पण सुंदर आहेत..
काका,अप्रतिम स्केच…..जरा ब्लॉगर सम्मेलनाविषयी सोडून पोस्ट टाकल्याबद्द्ल welcome back….hee hee…i m just kidding….please no गैरसमज
पेंटिंग एकदम छान! ऑफिसात आहे त्यामुळे व्हिडीओ पाहू शकले नाही त्यावर अभिप्राय नंतर कळवते.
छान स्केचेस आहेत. जलरंगातले चित्र विशेष आवडले.
फार दिवसांनी ब्लॉगवर मराठी ब्लॉगर्स मेळावा सोडून काही तरी छान दिसले. नाहीतर गेल्या डझनभर पोस्ट त्याच मेळाव्याच्या.
काका कधी येते भारतात असे वाटतेय हे स्केचेस आणि व्हिडिओ पाहिल्यावर…… मागे एकदा आजीच्या बिल्डिंगमधल्या रहाळकर आजोबांनी मला ३ तास बसवून ठेवले होते असेच..करायचे काहिच नाही फक्त आजोबा कसे रंगवताहेत चित्र ते पहायचे…… ८१ व्या वर्षी आजोबांनी जेव्हा चित्रकला बंद केली तेव्हा त्यांचं सगळं साहित्य मला दिलेय….आजही ते आशिर्वाद म्हणून मी जपुन ठेवलय…. आज त्यांची आठवण झाली!!!
आता आले की तुमच्याबरोबर येणार स्केचेस पहायला….हरकाम्या गडी म्हणून ठेवा पण मी येणारच!!!
आजोबांनी तुला दिलेले व तू जपून ठेवलेले चित्रकलेचे साहित्य बघायची इच्छा आहे !
(डोळे अजुन विस्फारलेले आणि आ अजुन वासलेला) अप्रतिम, निव्वळ अप्रतिम… चित्रकाराला मनापासुन शुभेच्छा… आणि तुम्ही ह्याबाबतित लिहल्याबद्दल धन्यवाद 🙂
kaka.. thank you for this post !!!
best drawing
आभारी आहे !
Amazing