Archive
दुसरा मराठी ब्लॉगर्स मेळावा, मुंबईत…९ मे २०१०
पुणे येथे यशस्वीरित्या संपन्न झालेल्या पहिल्या ब्लॉगर मेळाव्यानंतर दुसरा ब्लॉगर मेळावा तुमच्या, आमच्या, सर्वांच्या – आपली मुंबई येथे आयोजित होतो आहे. रविवार, दिनांक ९ मे २०१० रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळात हा ब्लॉगर मेळावा संपन्न होईल. एकमेकांशी ओळख करून घेऊन स्नेहबंध आणखी घट्ट करावे या उद्देशाने हा ब्लॉगर मेळावा आयोजित होतो आहे. केवळ प्रस्थापित ब्लॉगर्सच नव्हेत तर ज्यांना मराठी ब्लॉग सुरू करायची इच्छा आहे अशा भावी मराठी ब्लॉगर्सचे व ब्लॉग वाचकांचेही या मेळाव्यात स्वागत आहे.
मुंबईच्या कानाकोपर्यातून व मुंबईबाहेरूनही ब्लॉगर्स/वाचक उपस्थित राहतील असे गृहीत धरून भेटीसाठी दादर, मुंबई हे मध्यवर्ती ठिकाण निवडले आहे. आपली उपस्थिती मोठ्या संख्येने नोंदवून आपण हा ब्लॉगर मेळावादेखील यशस्वी कराल याची खात्री आहे.
आपल्या उपस्थिती संख्येनुसारच भेटीचे नेमके स्थळ निश्चित करता येईल. आपल्या उपस्थितीची संमती म्हणून इच्छुक ब्लॉगर्स/वाचकांनी या पोस्टखालील प्रतिक्रियांमधे आपले नाव, ब्लॉगचे नाव (वाचक अथवा भावी ब्लॉगर असल्यास ब्लॉगचे नाव आवश्यक नाही), संपर्कासाठी ईमेल पत्ता द्यावा.कृपया नोंद घ्यावी: नाव नोंदणीची अंतिम तारिख ७ एप्रिल २०१० आहे.
या नाव नोंदणीसाठी एक गुगल डॉकही तयार करण्यात आले आहे. http://spreadsheets.google.com/ccc?key=0AlwmOqlYyppgdGxuaTdNY1JEZXZ6c3VDVDM4ZU1NeGc&hl=en हा त्या डॉकचा दुवा आहे. येथेदेखील नाव नोंदणी करता येईल.
या ब्लॉगर्स मेळाव्याची माहिती जास्तीत जास्त मराठी ब्लॉगर्स व वाचकांना मिळावी म्हणून खाली दिलेली विजेट कॉपी पेस्ट करून आपल्या ब्लॉगवर लावा.
वाचक अथवा भावी ब्लॉगर (http://www.mogaraafulalaa.com/2010/03/blog-post_29.html) ही लिंक आपल्या ईमेलमधून आपल्या स्नेह्यांना पाठवू शकतील.
आपल्या शंका, सूचना व सल्ले खालील ईमेल पत्त्यावर अवश्य पाठवा:
रोहन चौधरी – chaudhari.rohan@gmail.com
महेंद्र कुलकर्णी – kbmahendra@gmail.com
कांचन कराई – mogaraafulalaa@gmail.com
धन्यवाद,
आपले ब्लॉगर मित्र,
रोहन चौधरी, महेंद्र कुलकर्णी व कांचन कराई
वाचक अथवा भावी ब्लॉगर (http://www.mogaraafulalaa.com/2010/03/blog-post_29.html) ही लिंक आपल्या ईमेलमधून आपल्या स्नेह्यांना पाठवू शकतील.
आपल्या शंका, सूचना व सल्ले खालील ईमेल पत्त्यावर अवश्य पाठवा:
रोहन चौधरी – chaudhari.rohan@gmail.com
महेंद्र कुलकर्णी – kbmahendra@gmail.com
कांचन कराई – mogaraafulalaa@gmail.com
धन्यवाद,
आपले ब्लॉगर मित्र,
रोहन चौधरी, महेंद्र कुलकर्णी व कांचन कराई
स्काय डाइव्हींग !
गुरूवार ना आज !
ब्लॉगचे पुनरुज्जीवन
हा ब्लॉग मी फार पुर्वी चालू केला होता. उद्देश हाच होता की संस्कार भारतीच्या कार्यक्रमांची माहिती सर्वांना व्हावी. काही एक कारणाने हा ब्लॉग पुढे बंद पडला. आता आपण येत्या २७ तारखे पासून प्रत्येक शनिवारी कोथरूड मध्ये वस्तु व व्यक्ती चित्रणाचा वर्ग सुरू करीत आहोत . तेव्हा त्या व इतर संबधित विषयाची माहिती घेणे व चर्चा करण्या साठी ह्या ब्लॉगचे पुनर:जीवन करीत आहोत, ज्यास्तीत ज्यास्त सख्येने ह्या वर्गा वर येऊन त्याचा लाभ घ्यावा.
आज गुडी पाडवा आहे. इतका छान मुहूर्त असतांना अजून काय हवे? तेव्हा हा ब्लॉग आजच्या सु- मुर्हूतावर पुन्हा सुरू करीत आहे.
संस्कार भारती, पुणे
ग्लोबल पॅगोडा
ग्लोबल पॅगोडा
आज मी तुम्हाला मुंबई जवळ गोराई खाडीतील एसेल वर्ड च्या अगदि शेजारी निर्माण होत असलेल्या एका विशाल पॅगोडाच्या कामावर घेऊन जात आहे. मागे माझ्या एका मैत्रिणीने मला ह्या कामाची माहिती दिली होती. इथे आचार्य सत्यनारायण गोयंका ह्यांचे द्वारा शिकविल्या जाणाऱ्या विपश्यने साठी विशाल ध्यान कक्षेचे निर्माण होत आहे. इथे यायला दोन मार्ग आहेत. भायंदर वरून गोराई बीच, एसेल वर्ड च्या मार्गाने रस्त्याने येता येते, या मार्गावर अनेक ठीकाणी मिठागरे आहेत व त्याचे पांढरे स्वच्छ डोंगर जातायेतांना पहाताना खूप सुंदर दिसतात. दुसरा मार्ग कांदिवली – बोरीवली मार्गावरील गोराई खाडीतून फेरी बोटीतून थेट पॅगोडा – एसेल वर्ड ला पोचता येते. मी मात्र मला जवळच्या दुसऱ्या फेरीच्या मार्गाने जाणेच पसंद केले.
गेल्या एक तपाहूनही अधिक काळ हे निर्माण कार्य चालू आहे. हे काम पूर्ण पणे भक्तांनी दिलेल्या दानातून चालू आहे. त्या कामाची छायाचित्रे व चलत चित्रे मी दाखवणार आहेच पण स्थूल मानाने कल्पना यावी म्हणून काही आंकडे वारी देतोय. ह्याची एकूण उंची आहे २९४ फूट. तळाशी ह्याची रचना अष्ट्कोनी असून प्रत्येक बाजू १२० फूट आहे. आतला गाभारा वर्तूळाकृती असून व्यास २७९ फूट आहे.तर आतील गाभाऱ्याची उंची आहे ८६ फूट. अष्ट्कोनाचे समोरा समोरील कोनांचे अंतर ३३७ फूट तर बाजूंचे अंतर ३११ फूट आहे.
आता हे छायाचित्रे पहा.
१) हे फेरी बोटीतून दिसणारे पॅगोडाचे प्रथम दर्शन !
२) इथून तुमची प्रत्येक ठीकाणी तपासणी सुरू होते
३) थोडेसे बागेतून हिंडत गेल्यावर काही पायऱ्या चढून वर आले की प्रदक्षिणा मार्गाने आपण पॅगोडाचे समोर येऊन पोहोचतो. ह्या आहेत मुख्य पायऱ्या. थोड्या पायऱ्या चढून उजवीकडे गेले की कार्यालय, व चित्र कक्षा आहे. ती आवर्जून पहायला हवीच. येथे अतिशय सुंदर पेंटींग्स संपूर्ण बुध्दाचे चरीत्र उलगडून दाखवतात. ही सर्व चित्रे सुप्रसिध्द चित्रकार श्रीयुत वासूदेव कामतांनी काढलेली आहेत.
४) हा गाभाऱ्यात शिरण्याचा मार्ग.
५) ही दर्शनी लाकडी दरवाज्या वरील कोरीव काम.
६) ह्या छायाचित्रात गाभाऱ्याचा अगदि थोडा भाग आहे, जेव्हढा माझ्या कॅमेरा पकडू शकला !
७) बाहेरील भागाच्या भिंतींवर अशी सुवचने आहेत.
८) एक नमुन्याचा स्तंब, असे सगळेच अजून व्हायचे आहेत.
९) हे मी तिथेच बसून काढलेले लॅंडस्केप…कसं वाटतंय?
काही मुव्हीज
१)
२)
मराठी ब्लॉगर्सचा मेळावा मुंबईत ?
आजचा दिवस माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. आज मी ’ काय वाट्टेल ते ’ लिहिणारे श्रीयुत महेंद्र कुलकर्णी व ’ नेटभेट.कॉम ’ चे सलील चौधरी ह्यांचे समवेत गांठ भेट घेऊन जवळजवळ दोन अडिच तास अंधेरीच्या मॅक्डोनॉल्ड मध्ये मनसोक्त गप्पा मारल्यात. दोन्ही व्यक्ती मला प्रचंड आवडल्यात. मराठी ब्लॉगर्स ना दोघेही चांगलेच सुप्रसिध्द आहेत त्यामुळे त्यांची ओळख पेक्षा आम्ही एकमेकांना ओळखण्यासाठी आजची भेट उपयुक्त ठरेल ह्यात मला संदेह नाही.
.
मागे मी व अनिकेत समुद्र एका दावणगिरी डोसाच्या ’वासा’ मुळे एकत्र काय भेटलो व त्याचे रूपांतर पुढे मराठी ब्लॉगर्स चा मेळावा प्रचंड उत्साहात पुण्यात घडण्यात झाले होते हे सर्वांना ज्ञात आहेच. त्याच वेळी श्री. महेंद्रजींनी तसा तो मुंबईत घडवून आणण्याबद्दल ईच्छा व्यक्त केली होती. आज आम्ही त्यावरही बोललो. कुणी सांगावे कदाचित पुण्यापेक्षाही मोठा, मराठी ब्लॉगर्सचा मेळावा मुंबईत घडविण्याचे ’त्या ’ च्या मनात असावे व मुंबईचे मराठी ब्लॉगर्स ते तितक्याच तत्परतेने मनावर घेतील ह्यात मला शंका नाही.
.
मागिल वेळी बऱ्याच जणांना पुण्यातील मेळाव्याला मनात असूनही उपस्थित रहाता आले नव्हते. शिवाय ’ मराठी मंडळी’ ह्या आपल्या संकेत स्थळाचे उदघाटन गेल्या एक तारखेला अंतराळातल्या अंतराळात झाल्यामुळे, पुन्हा एकत्र जमण्यातील आनंद अनेकांना घेता आलेला नव्हता. तेव्हा ही संधी आता आपल्याला मुंबईकर मिळवून देतील अशी माझी प्रबळ ईच्छा आहे व ती लवकर फलद्रुप होवो अशी ’त्या’चे पाशी प्रार्थना करतो..
अलीकडील टिप्पण्या