Archive

Archive for जानेवारी, 2010

माझा मराठाचि ‘ब्लॉगू’ कवतुके!

31/01/2010 5 comments
माझा मराठाचि ‘ब्लॉगू’ कवतुके!
आजच्या ३१ जानेवारी २०१० च्या रविवार महाराष्ट्र टाईम्स मध्ये
तेजस्विनी हुलसूरकर ह्यांचा लेख वाचा
प्रवर्ग: Uncategorized

मराठी पण, जवळ यायला हवे आहे !

22/01/2010 3 comments
नुकताच आपण मराठी लिहीणाऱ्या ब्लॉगर्स चा मेळावा घेतला. त्यातील एक महत्वाचा ठराव होता की,
“मराठी साहित्य आजपर्यंत दृक्‌, श्राव्य आणि लिखीत स्वरूपात उपलब्ध होत आले. बदलत्या माहितीतंत्रज्ञानाच्या युगात ब्लॉगच्या रूपाने या तीनही अंगांचा समावेश असलेला अतिशय परीणामकारक वाङमय-प्रकार प्रसृत झालेला आहे. जगभरातून अदमासे वीस हजाराहून अधीक लेखक नियमितपणे या माध्यमातून मराठी भाषेचे वैभव वाढवत आहेत. या मायमराठीला यथाशक्ती, यथामती समृद्ध करणार्‍या उपक्रमाला आपल्या कौतुकाच्या थापेची अपेक्षा आहे.
मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाने  या साहित्यप्रकाराची विशेष दखल घ्यावी व आपल्या अध्यक्षीय भाषणात ’ब्लॉगिंग’ द्वारा चाललेल्या या लेखनयज्ञाचा आवर्जून उल्लेख करावा ही आग्रहाची विनंती.”
त्या निमित्ताने आम्ही श्री. संजय भा. जोशी, मुख्य कार्यकारी व्यवस्थापक, ८३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१० ह्यांना व्यक्तीश: भेटलो व त्यांनी , आपण अपेक्षिला होता त्या पेक्षा अधिक  चांगला प्रतिसाद दिला. ते सर्व आपणास कालांतराने महिती होईलच.
त्या साठी त्यांनी काही माहिती मागवलेली आहे व ती आम्ही पुरवत आहोच. त्या महितीच्या  संदर्भात  महिती देत असतांना श्री. प्रसन्न जोशींनी एका टिपणावर मत मागवले होते.
मी माझे मत देतांना म्हणले होते.
“……. ब्लॉगिंगचे फायदे- तुम्ही ब्लॉगिंग मराठीत करा किंवा अन्य कुठल्याही भाषेत, तुम्हाला स्वत:ला ओळख मिळाल्याचा आनंद गवसेल…..
ह्यातील ’ अन्य कुठल्याही भाषेत’  इथे अप्रस्तुत   वाटते “
त्याला प्रसन्नजींनी उत्तर दिले होते,
“apan Marathi bloggers aslo tari anya bhashebabat duswas karnyache karan nahi. Tyamule ‘Blogging Marathit kara kinwa anya kuthlyahi bhashet….’ ya vakyat khataknuasarkhe kahi nahi. Shivay, apan Marathi ase mhantana Puneri pramanit marathi manto. Pan aapli koknatali govyatali, khandeshatli, vaidarbhiya yanchi bhasha Marathichya jawal janari asli tari tyanchya bhashechee vegli olakh aahech ki! Kokani sahitya aani Marathi sahitya asa waad aahech. Pan mhanun te hi aaple Marathi janach aahet. Ha artha majha tya vakyat abhipret aahe. Shivay, je Marathi jana englishmadhe blogging kartat tyanna apan savatra manannar ka? Aaple paradeshastha Marathi jan bhale Marathit blogging karat astil, pan tyanchee mule ata WESTERN jhaleli aahet. Pan, jar tee peedhi Marathi vishwashi samaras hot asel, tar keval English bhasha te boltat mhanun tyanna aaplyat ghyaycha nahi ka?
Majha mate, aapla Marathi blogger bana ha sweekarnara-INCLUSIVE asawa.
त्याला माझे उत्तर असे आहे…..
इथेच नेहमी आमचा वैचारीक गोंधळ उडतो ! एकूण हे म्हणणे म्हणजे एखाद्या राजकारण्या सारखे झाल्या सारखे वाटते !.
कोकणी मराठी वादाचे खरे तर काहीच कारण नाही. कालच आपल्याच मुख्य मंत्र्यांनी टॅक्सीवाल्यांच्या संदर्भात, मुंबई साठी, हिंदी व गुजराती ह्यांची गणना स्थानिक भाषा म्हणून केलीच ना ! कोणाच्या दबावाखाली ? केवळ मतांच्या गणितात वरचढ राहीलेत म्हणून ? की साठ टक्के लोक मतदानासाठी बाहेर न पडता मिळालेली सुट्टी मजेत घालवायला बाहेर पडले म्हणून ? हा राज कारणाचा विषय आहे तेव्हा तो सोडणेच ठीक !
आम्हा मराठी वाल्यांना इतर कुठल्याही भाषे बाबत कधीच दुस्वास नव्हता व नाही ही !. आमचा प्रयत्न आहे तॊ आपली मूळ जी मराठी मातृभाषा आहे तिचे अस्तित्व जतन करण्या साठी फक्त धडपड ! कशाला, फार दूर नकॊ जायला आधल्या पिढीतले मराठी वाङमय कींवा अगदी घरातली बोली व आताच्या पिढीतील जर तपासले तर काय दिसेल ?..विषयातील फरक मी समजू शकतॊ पण भाषेचा बाज शब्दांसह का बदलावा ?
ब्रिटीश अमदानीत अनेक पाद्री इथे येवून मराठी शिकले व मराठीतून लिखाणही केले पण एखाद्या रे.टिळकां खेरीज बाकीच्यांचे लिखाणाला मराठीचा सुगंध येत होता का? कारण भाषा ही नुसती भाषा कधीच नसते तर त्यातून त्याचे मराठीपण दिसते व ते असणे हे ही महत्वाचे असते. जे मराठी लोक इंग्रजीतून लिहितात त्यांची ओळख वाचक मराठी म्हणूनच ठेवतो की तो काय लिहीतो ह्यावर ?
महाराष्ट्रातील इतर भागातील मराठी भाषा ही मराठीच आहे त्यात दुमत असण्याचे काहीही कारण नाही . मग तसे म्हणाल तर दर बारा कोसावर भाषा बदलते ! प्रत्येक भाषेचा एक बाज असतो. तो जो पर्यंत टिकला जातॊ, त्या त्या भाषेतून जो पर्यंत तो सुगंध भरलेला असतो तो पर्यंत ती भाषा, ती माणसे व पर्यायाने तो प्रांत टिकून रहातॊ. जेव्हा आम्ही भारताच्याही बाहेर जातॊ तेव्हा भारतातील कुठलीही भाषा आपल्याला सर्वात जवळची वाटते कारण तेथे मग आम्ही भारतीय असतो…. पण इथेच शेजारील माणूस मराठी असला तरी आम्ही जेव्हा हिंदी किंवा अन्य भाषेत एकमेकाशी बोलतो त्याला काय म्हणायचे ?
मला एक प्रसंग चांगला आठवतॊ , संस्कार भारतीच्या सुवर्ण महोत्सवाचा समारंभ पुण्यात चार वर्षापुर्वी संपन्न झाला. देशभरातले २५०० कलाकार मंडळी येथे जमा झाली होती. त्या सर्वांची त्यांच्या त्यांच्या प्रादेशिक पोषाखात शोभा यात्रा काढली गेली होती. सगळ्यात जास्त शोभा कोणाची झाली असेल तर ती आमची ! ना आम्ही आमची भाषा टिकवतोय, ना पोषाख, ना महाराष्ट्रीयत्व ….सगळंच सोडलंय व त्याची ना आम्हाला खंत वा खेद ! उलट त्यासाठी आम्ही आमचीच पाठ थोपटून घेतोय ! हो आम्ही आमच्याच मराठी भाषेबाबत आग्रही आहोत असे आम्ही म्हटले तर त्यात आम्ही काय चुकीचे करीत आहोत? असे म्हणायला आम्हाला का कमी पणा वाटावा ?
रहाता राहीला प्रश्न परदेशस्थांचा. हे माझे वैयक्तीक मत आहे कोणाला पटत असेल वा कोणाला नसेलही…. जो पर्यंत तेथील माणूस आपली भाषा व खरे तर त्या मागील आपला विचार टिकवून असेल तो पर्यंत तो जी , जशी मोडकी तोडकी मराठी भाषा वापरेल त्या मराठीचा सुगंध खपवून घेतला जाईल नव्हे आम्हाला ती आवडेलही कारण त्याला इथल्या मातीचा सुगंध जाणवेल ! पण आपण म्हणालात तसे WESTERN  विचारांचे इंग्रजाळलेले ’ वाघिणीचे दूध शुध्द मराठी त असले तरी ते आमच्या पचनी पडेल हे संभवत नाही ! कारण मग वर उल्लेखलेला पाद्री व ह्याच्यात कुठलासा फरक राहीलेला असेल ? मात्र .. Pan, jar tee peedhi Marathi vishwashi samaras hot asel, tar …हे आपले शब्द खरोखरीच आश्वासित करणारे आहेत व तसेच ते जर मराठी विश्वाशी समरस होतील तर भाषा ही फक्त एक औपचारीकता राहील !
जेव्हा आम्ही मराठी ब्लॉगर्स ना एकत्र आणायचे म्हणतॊय तेव्हा मला मराठी मने, मराठी विचार, मराठी पण, जवळ यायला हवे आहे !
प्रवर्ग: अवांतर

संकलन स्नेह-मेळाव्याचे


खरोखरीच कालचा स्नेह मेळावा हा आम्हा मराठी ब्लॉगर्स च्या एकुण कालखंडात सुवर्ण अक्षरांनी लिहीला जावा नव्हॆ लिहिला  जाईल हे काल उपस्थित असलेल्या अनेकांनी भेटून व त्यांच्या चेहेऱ्या वरील भावावरून सहज रित्या समजून येत होते. जे कोणी येऊ शकले नाहीत ते चुटपुटले, त्यांनी नंतर आपली हळहळ ही व्यक्त केली. पण अनेक जण जे स्नेह मेळाव्याला उपस्थित होते ही बघा त्यांनी केलेली काही चतुर्वैसत्यम वर्णने. मी इथे फकत त्यांना संकलीत केलॆ आहे.

सुरेश पेठे


इथे ऑर्कुट वरील फोटोची लिन्क

अनिकेत

पंकज

विक्रांत देशमुख

प्रभास गुप्ते


वैभव

हरेकृष्णजी

नीरजा पटवर्धन


अभिजित पेंढारकर
Media मंच , मधॆ वाचा
विनायक पाचलग चा लेक …… मेळाव्यानंतर..

तन्वी मस्कत हून इतरांच्या डोळ्यातून पहात !

म्हणूनच ठरवलं की मी आज जे वर्णन करणार आहे ते म्हणजे ह्या कार्यक्रमा मागिल पडद्या मागच्या हालचाली.

खरी ह्याला सुरुवात झाली ती माझ्या दावणगिरी डोस्यावरील पोस्ट वरून अनिकेत, अजय, तन्वी, अपर्णा ह्यांच्या भांडणावर मी एका कवितेतून उत्तर दिले तेव्हा पासून !


त्यावरून मी एकदा सहज म्हणून अनिकेत ला फोन केला. तेव्हाच आम्ही एकमेकाशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आपण दोघेच का आपण सगळ्यांनाच बोलावू या ना, एखादी पोस्ट टाकूया त्या साठी !  त्याची सम्मती कळली व लगेच  मी एक पोस्ट तयार करून व पु. ल. देशपांडे उद्यान ही जागा ही ठरवून टाकली. आणि १७ जानेवारी हा दिनांक कायम केला. अगदि सुरुवाती पासून प्रतिसादांचे रतीब सुरू झाले, सुरुवातीला हा  कट्टा बनतोय की काय शंका आली. परंतू नंतर मात्र प्रत्येकाला त्याची निकड आहे ह्याची जाणीव झाली व नंतर प्रतिसादांचा तर अक्षरश: पाऊस पडला. ही च ती पोस्ट ज्यावर १२१ प्रतिक्रिया नोंदविल्या गेल्यात.

मग एकदा अनिकेत ची गांठ घेतलीच ….. आपल्या ब्लॉगर्स मधला हा पहिला भुणभुणणारा भुंगा मी प्रत्यक्ष पाहिला व  पकडला !! तो पर्यंत मी मेळाव्याला येतोय म्हणणाऱ्यांची गर्दी वाढू  लागलेली होती. आम्हाला आणखीन सहाय्यकांची जरूर लागणार असे फक्त मनात विचार येण्याचा अवकाश.. विक्रांत, भुंगा, पंकज  असे ….नव्या दमाचे सहाय्यक बाह्या सरसावून पुढे आले. मग काय गेल्याच शनिवारी ९ जानेवारीला आम्ही बालगंधर्व च्या कॅंटीन मधे जमलो. अजून नवे तीन सहकाऱ्यांची प्रत्यक्ष गाठ व साथ मिळाल्यावर आमची अशी ही ” हम पाच ” ची पंचकडी तयार झाली !
सर्व कार्यक्रमाची रूपरेषा  मिनिट तू मिनिट आखून लिहून घेतली. ऐन वेळी कुठलीही गडबड होऊ द्यायची नाही. एव्हढा मोठ्ठा जमाव ( आम्हाला , निदान मलातरी तशी स्वप्ने पडू लागलेली होती ) जमणार तेव्हा कार्यक्रम वेळेवरच सुरू हवा हा कटाक्ष होता. जमावाला कंटाळा वाटू नये त्याचे आत तो संपवणे हेही बंधन कारक होते. शिवाय मधल्या काळात तॊ वाहवत जाणार नाही हे पहाणे तितकेच निकडीचे झाले. फोटॊ, विडीयो वगैरे प्रत्येक बारिकसारीक गोष्टीची आंखणी झाली. कामे वाटून घेतलीत. व सर्व कार्यक्रम सफाईदार पणॆ पार पडावा अशी इच्छा मनी धरली.
आता मात्र मी एकटा वा आम्ही पाचच नाहीत आपण सर्व आता आमच्या  बरोबरीने आहात. एव्हढॆच सांगेन की नजीकच्या कालावधीत आपण खूप  काही महत्वाचे व दूरगामी परिणाम घडवणारे निर्णय घेणार आहोत त्यासाठी तयारीत रहा..

माझे मनोगत

आजचा मराठी ब्लॉगर्स चा स्नेह मेळावा अतिशय सुनियोजित पणे व दिमाखात पार पडला. ६१ जणांची उपस्थीती होती.  आजच्या मेळाव्याचा एक आयोजक ह्या नात्याने मी माझे खालील  मनोगत प्रास्ताविकात मांडले.

अधिक माहिती व फोटो उद्या पोस्ट करतो.

माझे मनोगत


१)  मराठीतून ब्लॉग लिहीणाऱ्यांचा एक स्नेह मेळावा भरवावा ह्याबाबत मनात कल्पना येताच मी अनिकेतशी बोललो. तो ही माझ्या मताशी सहमत आहे हे बघीतल्यावर मी लगेच एक पोस्ट तयार करून ब्लॉगवर टाकली. त्यावेळी त्याला इतका मोठा प्रतिसाद मिळेल ही कल्पनाही आमचे मनात नव्हती. पण मिळालेल्या प्रतिसादावरून अश्या मेळाव्याची आवश्यकता आहे हे  आता जाणवते. आज आपण मोठ्या संख्येने जमून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

शिवाय जगभरातील मराठी ब्लॉगर्स चे डोळे आजच्या मेळावाच्या यशस्वीतेकडे लागून राहीलेलॆ आहेत. काहींची नावे घेतलीत तर ती अप्रस्तुत ठरू नये जसे अनुजा व तन्वी मस्कत, रोहन चौधरी, भाग्यश्री आदि अमेरिकेतून, तर अजून एक भाग्यश्री इंदूर हून, अगदि मुंबई, नागपूर, कोल्हापूर,नाशिक, औरंगाबाद, सांगली ते फलटण पर्यंत सर्व दूर पसरलेले आहेत.  आज ह्या मेळाव्याला  निरनिराळ्या  क्षेत्रातील अनेक प्रतिष्टीत व्यक्ती उपस्थित आहेत. मेडीया व वर्तमान पत्रांनीही ही कल्पना उचलून धरली आहे. मी इथे उपस्थीत असलेल्या या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत करतो.

२)  मध्यंतरीच्या काळात अनेक जणांनी अनेक अपेक्षा वर्तवल्या आहेत. मात्र आज आपण येथे प्रामुख्याने जमा झालॊ आहोत ते एकमेकांच्या व्यक्तीश: ओळखी करून घेण्या साठी.  कारण आत्ता पर्यंत आम्ही भेटत आलो ते आंतर्जालावर पोस्ट नाहीतर कॉमेंटसच्या रूपाने ! त्या नंतरच आपल्याला काय काय करता येईल हे आपण पहाणार आहोत.

३)  आपणा पुढेही अनेक अडचणी आहेत. सर्व प्रथम आपण असे किती जण ब्लॉग्स लिहीतो. आपले ब्लॉगचे विषय काय काय आहेत?  कुठल्या कुठल्या संकेत स्थळांवर आपण  ब्लॉगस लिहीतो. अशी एक सर्वकश  यादी  बनविणे हे आपले सर्वात प्रथम काम असेल व त्यासाठी आपणा सर्वांनी ती ती माहीती पुरवणे ही आपल्या पुढील कामाची प्राथमिकता असेल.

४)  अश्या ब्लॉगची सुविधा आपणा पर्यंत पोहोचवणारे कोण कोण आहेत व त्यांचा तौलनीक अभ्यास. त्यातील असलेल्या सुविधा वा कमतरता. मराठी टाईपिंग च्या सुविधा त्यातील आपल्याला येणाऱ्या अडचणी.इत्यादि वर चर्चा करून निघणाऱ्या मार्गांबाबत विचार करणे.

५)  तसेच, अनेक ब्लॉगर्स  अत्यंत अभ्यासपूर्ण लिखाण करतात. अश्या ब्लॉगर्स च्या ब्लॉग मधून निर्माण होणाऱ्या वाङमयाला साहित्य संमेलनातून काही प्रोत्साहन मिळू शकते का व त्याचे छापील रूपांतरा बाबतची शक्यता व संबधितांशी वार्तालाप. अश्या वाङ्मयातील होणाऱ्या चौर्यकर्मा बाबत काय करता येईल ह्याबाबत विचार वगैरे.  मी येथे फक्त अश्या काही समस्यां व मुद्यांचा अगदि ओझरता परामर्श घेतला आहे आपल्यातील चर्चेतून त्यांचे समग्र दर्शन व त्यावरील उपाय ह्याचा उहापोह होईलच.

६)  त्या साठी आपण सारे एकत्र आलो व संघटीत बनलो तर ब्लॉगर्स च्या अडचणींवर संघटीत पणाने मात करणे शक्य होईल. तेव्हा ह्या आजच्या मेळाव्याच्या रूपाने जमलेल्या सर्वांना मी आवाहन करीत आहे की सर्वांनी  संघटीत सामना करण्यासाठी एक होऊया.

७)  त्यासाठी लवकरच आंतरजालावर एक ग्रुप स्थापन करू. म्हणजे त्या ग्रुपच्या व्यासपीठावर  जगभरातील मराठी लिहीणारे ब्लॉगर्स सखोल चर्चा करू शकतील. तसेच ठराविक कालाने आजच्या सारखेच पुन्ह: पुन्हा एकत्र जमून चर्चा विनिमय करून सर्वानुमते निर्णयही घेऊ शकु व त्याचा सतत पाठपुरावा करू शकू. मराठी ब्लॉगर्स  साठी काहीतरी ठोस करण्याची इच्छा मनात बाळगुया. अशी उत्कटता व पारदर्शकता हेच आपले प्रमुख उद्दीष्ट असायला हवे.

जय महाराष्ट्र ! जय भारत !

सुरेश पेठे

पुणे
१७ जानेवारी २०१०
प्रवर्ग: स्नेह मेळावा

मराठी ब्लॉगर्स मेळाव्याची काही संकेत स्थळांनी घेतलेली दखल

15/01/2010 7 comments
१) आपले प्रमुख संकेत स्थळ मराठी ब्लॉग विश्व ह्यांना विनंती केली होती पण ते म्हणताहेत,


” नमस्कार सुरेश,

तुमचा कार्यक्रम स्तुत्य आहे. आमचे प्रतिनिधी सध्या पुण्यात नसल्यामुळे (इच्छा असूनही) आम्हाला येणे जमणार नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत.

मात्र या कार्यक्रमाबद्दल माहिती आम्ही जरूर मराठीब्लॉग्ज.नेट द्वारा मराठी ब्लॉगर्सना पोहोचवू.

कळावे,


त्याप्रमाणे अगदी प्रमुख जागी ते आपल्या मेळाव्याची माहीती देताहेत.

हि त्याची लिन्क
२) ” ब्लॉगर्सचा स्नेहमेळावा ! ” ह्या मथळ्या खाली आपल्या स्नेह मेळाव्याची दखल घेत आहेत,..” उर्जाहे संकेत स्थळ
ही त्याची लिन्क पहा,

३) श्री. लतिकेश शर्मा हे हिंदीतून ” Media मंच ” नावाने हे संकेत स्थळ चालवतात. आपल्य मेळाव्याची बातमी त्यांनी त्यातून दिली आहे ते लिहीतात,

dear suresh pethe
we have published your blogars meet prog. news on our website www.mediamanch.com
kinldy visit on this site
y r also  requseted to send the news and images of pune blogars meet
we will publish this  on our website
best of luck for your meet
latikesh
editor
mumbai
mobile – 09322866250


ही त्याची लिन्क,

४)
कळते – समजते

मेळाव्याला वृत्तपत्रीय प्रतिसाद

13/01/2010 4 comments
पेठे काका
नमस्कार
पुण्यात होणाऱया ब्लॉग लेखकांच्या मेळाव्याची बातमी मी आज आमच्याकडे दिली आहे. उद्याच्या मुंबई वृत्तान्तमध्ये पान एकवर ती प्रसिद्ध झाली आहे. आपल्याला लोकसत्ताच्या नेट आवृत्तीवर ती बातमी पाहता येईल.
कळावे
आपला
शेखर जोशी
आपले सगळे मित्र मंडळी आता जोरदार कामाला लागले आहेत .मुंबई वृत्तांतातील बातमी खाली देत आहे .
.
सुरेश पेठे
मेळावा मराठी ब्लॉगलेखकांचा! Print E-mail
प्रतिनिधी
आपल्या मनातील विचार, विविध विषयांवरील मते आणि भावभावना व्यक्त करण्यासाठी सर्वसामान्यांनाही आता ब्लॉगचा पर्याय उपलब्ध आहे. अमिताभ बच्चन शाहरुख खान यांच्या ब्लॉगप्रमाणेच ज्याला लिहिण्याची आवड आहे अशी कोणीही व्यक्ती आपला स्वत:चा ब्लॉग तयार करुन लेखन करु शकते. मराठी भाषेत आज सुमारे दीड हजारांन अधिक व्यक्ती आपले ब्लॉग चालवत असून त्यांचा एक मेळावा येत्या १७ जानेवारी रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.
गुगल आणि अन्य संकेतस्थळांच्या माध्यमातून आज सर्वसामान्य माणसालाही ई-मेल प्रमाणे जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यावर कोणीही आपला ब्लॉग सुरु करु शकतो. मराठी ब्लॉगनेटच्या माध्यमातून सध्या १ हजार ६४७ व्यक्ती विविध विषयांवर मराठातून ब्लॉगलेखन करत आहेत. केवळ मराठीतूनच ब्लॉग लेखन करणाऱ्या मराठी ब्लॉग धारकांचा हा मेळावा दुपारी ४ ते ७ या वेळेत पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रस्ता, बिग बाजारजवळ, पुणे येथे येत्या रविवारी आयोजित करण्यात आला आहे.
ब्लॉगलेखक सुरेश पेठे, अनिकेत समुद्र यांच्यातील चर्चेतून या पहिल्या मराठीतून लेखन करणाऱ्या ब्लॉग लेखकांच्या मेळाव्याची कल्पना पुढे आली. पेठे यांनी आपल्या ब्लॉगवर त्याविषयी सुतोवाच केले आणि ब्लॉगविश्वातून अनेकांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे पेठे व समुद्र यांचा उत्साह वाढला.
या ब्लॉगमेळाव्यासाठी जगभरातील मराठीतून ब्लॉगलेखन करणारी लेखक मंडळी अपेक्षित आहेत. केवळ ब्लॉगच्या माध्यमातून किंवा प्रतिक्रियांमधून नेहमी भेटणाऱ्या या सर्व मंडळींनी एकत्र यावे, सर्वाचा प्रत्यक्ष परिचय व्हावा, आपापले ब्लॉग, त्यावरील लेखन, नवीन कल्पना, भविष्यातील कार्यक्रमांची रुपरेषा यांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला
आहे.
येत्या रविवारी होणाऱ्या या मेळाव्यास मराठीतून ब्लॉगलेखन करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी पेठे यांच्याशी
sureshpethe@gmail.com वर संपर्क साधावा.

आत्ता  सकाळ मधील प्रतिसाद पहा

ही त्याची लिन्क.. http://72.78.249.125/esakal/20100114/4618764544374061429.htm

,


प्रवर्ग: Uncategorized

मेळाव्याची कार्यक्रम पत्रिका

12/01/2010 2 comments
श्री अनिकेत व मी एकत्र बसून जो  कार्यक्रम ठरवला आहे तो त्यांनी त्यांच्या  ” निमंत्रण  पत्रिकेच्या “ रुपाने ब्लॉग वर टाकलेला आहेच येथे माझ्या ब्लॉग वर येणाऱ्या साठी मी त्याची फक्त लिंक देत आहे.

http://manatale.wordpress.com/

त्यात नकाशा पण दिला असल्याने कोणास अडचण येण्याचे कारण असू नये. हा पहिलाच अश्या पध्दतीचा मेळावा असल्याने सर्वाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तेव्हा त्या जास्तीत जास्त फलद्रूप व्हाव्यात असे माझी इच्छा आहे.
अर्थात हा प्रवास इथेच संपत नसून हि सुरुवात आहे असे मी समजतो. तेव्हा ह्याला कालपरत्वे अधिकाधिक सुव्यवस्थित रूप येत जाईल ह्याबाबत मला बिलकुल शंका नाही. तसेच ह्या मेळाव्याला तरुण ब्लॉगर्स चे प्रथम पासून साहाय्य मिळत असल्याने पुढील प्रवास मला उज्वल दिसत आहे. ही एक चळवळ बनावी, त्यातून चांगले पायंडे पडावेत हे माझे एक स्वप्न आहे.
येथे मी कार्यक्रमाची रुपरेषा माझ्या ब्लॉग वर येणाऱ्या साठी उधृत करीत आहे . वर दिलेल्या लिंक वर जाऊन अधिक माहिती मिळवावी.

कार्यक्रमाची रुपरेषा अशी राहील –

दिनांक – १७ जानेवारी, २०१०
वेळ – सायंकाळी ठिक ४ वाजता
स्थळ – पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, बिग बाझार जवळ, पुणे ४११ ०३९.
(राजाराम पुलावरुन सिंहगड रोडवर डावीकडे वळावे)

४ ते ४.१५ – सर्व ब्लॉगर मित्र-मैत्रीणींनी उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी जमणे

४.१५ ते ४.३० – उद्यान प्रवेश. तेथून डाव्या बाजूने धबधब्या जवळ असलेल्या गोल झोपडीत जमणे. येथे एक रजिस्टर ठेवले जाईल. त्यात प्रत्येकाने पुढील क्रमाने माहिती देणे अपेक्षित आहे..१)संपूर्ण नाव २) पत्ता ३) दूरध्वनी क्रमांक ४) ब्लॉग चे नाव ५ ) ब्लॉगचा पत्ता URL ६) ई-मेलचा पत्ता इत्यादी.

४.३० ते ५ – श्री. अनिकेत समुद्र, श्री. सुरेश पेठे आणि श्री. दिपक शिंदे आलेल्या मित्र-मैत्रिणींचे स्वागत आणि प्रास्ताविक करतील. नुकत्याच पार पडलेल्या संक्रांतीच्या पार्श्वभुमीवर (१४ जानेवारी) छोटेखानी तिळगुळ समारंभ पार पडेल.

५ ते ५.३० – प्रत्येकजण आपली ओळख, आपल्या ब्लॉगची ओळख करुन देतील.

५.३० ते ६.०० – चर्चा. ब्लॉगबद्दलच्या अपेक्षा, मराठीब्लॉग्सच्या श्रुंखलेत जोडल्या गेलेल्या ब्लॉग्समधील घडामोडी, त्यातील चांगले वाईट मुद्दे, ब्लॉग्सबद्दलच्या शंका त्यांची उत्तरे वगैरे

६ ते ६.३० – श्री प्रसन्न जोशी आणि मिडीया-हाईट कंपनीमधील त्यांचे सहकारी ब्लॉग्सबद्दलचे त्यांचे अनुभव सांगतील तसेच सर्व ब्लॉगर्सना मराठी ब्लॉग्स अधीकाधीक समृध्द होण्यासाठी मार्गदर्शन करतील.

६.३० ते ७ – पुढे काय? सर्व जण एकत्र येऊन काही चांगल्या योजना राबवु शकतो का त्याबद्दलची चर्चा. अश्या गाठी-भेटी कधी करायच्या याबद्दलचा आराखडा मांडुन हा स्नेहमेळावा समाप्त होईल.

स्नेहमेळाव्याची औपचारीकता संपली असली तरी ७ ते ७.३० पर्यंत सर्वजण (ज्यांना शक्य आहे त्यांना) एकत्र थांबुन अनौपचारीक गप्पा मारण्यासाठी वेळ.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अजून ज्यांनी आपली नावे  नोंदवली नसतील त्यानी माझ्या मुळ पोस्ट  वर जाऊन नोंदवावीत व फोन न मेल  करावेत.
१४ तारखेला संक्रांत आहे त्यानिमित्ताने सर्वांना…गोड गोड बोला !!
मग चला तर मंडळी आता भेट १७ जानेवारीला संध्याकाळी ४ वाजता पु ल देशपांडे उद्यानात.
आपला,
सुरेश पेठे

मेळाव्याला येणारे !

मी साद देताच दिनांक,  १७ जानेवारीला होणाऱ्या मराठी ब्लॉगर्स च्या स्नेह मेळाव्याला खालील व्यक्तींनी होकार दिला आहे. ज्यांचे ब्लॉग आहेत त्यांच्या ब्लॉगचे नाव त्यांच्या नावा  पुढे दिले आहे व ज्यांनी आपली अन्य ओळख दिली आहे ती पण खाली नमूद केली आहे.
अजूनही ५-६ दिवस आहेत व अधिकाधिक व्यक्तींशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. तेव्हा ही यादी म्हणजे परिपूर्ण यादी नव्हे.
ह्या मेळाच्याचा संपूर्ण कार्यक्रम येत्या १४ तारखेच्या आत येथेच दिला जाईल. सर्व साधारण कल्पना यावी म्हणून नावे दिली आहे.
१) सुरेश पेठे  “ये ss रे मना  येरे ss मना  “
२) अनिकेत समुद्र  ” डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा “
३) विक्रांत   देशमुख  ” Toss the feathers “
४) अनिकेत वैद्य … हे वाचक  आहेत
५) गौरी  ” झाले मोकळे आकाश “
६) विक्रम घाटगे   ” जीवनमूल्य “
७) विशुभाऊ रणदिवे  ” विशुभाऊ चा फळा “
८) अभिजीत  ” निरंकुश “
९)विनायक पाचलग  ” वॉन्ट टू  टॉक “
१०) वीरेंद्र ….” V-render “
११) नितेश मालप  ” MARATHITHEATRE.COM “
१२ ) जयंत कुळकर्णी ” ओमर खय्याम “
१३) दीपक शिंदे  ” भुंगा “
१४) कसबेकर प्रतीतकुमार  हे चित्रकार आहेत
१५) किरण  जोशी

१६) अमित परांजपे

१७) प्रभास गुप्ते   ” कवडसा “
१८) पंकज …” भटकंती “
१९ ) प्रसन्न  जोशी…… हे स्टार माझाशी संबंधित आहेत
२०) योगेश जोशी ……हे हिंदूस्तान टाईम्स शी संबंधित
२१) नितीन ब्रह्मे … हे पुणॆ मिरर शी संबंधित आहेत.
२२) गणेश पुराणिक …हे मुक्त पत्रका आहेत.
२३) ॐकार डंके  …” omkar Danke “
२४) देवेंद्र चुरी ……” दवबिंदू “
२५) ॐकार देशमुख …..” सारथी “
२६) शिल्पा   ” आठ्वणींचे पिंपळ्पान “
२७) स्वप्ना सप्रे
२८) पल्लवी केळकर … ” मनातले भाव कवितेच्या रुपात “
२९) सुहास झेले  ” मन उधाण वाऱ्याचे “
३०) रविंद्र
३१)आदित्य चंद्रशेखर
३२) गजानन म्हेतर
३३) हरेकृष्णाजी …. ” उनके दुष्मनहै बहुत , आदमी अच्छा होगा “
३४) संजय जोशी …..” संजय उवाच “
३५) देवयानी देवकर ……” Swing of mind_ स्पंदन “
३६) स्मित गाडे ……भेट द्यायला येत आहेत.
३७) अतुल देशमुख….हे दिल्लीचे आहेत
३८ ) कौस्तुभ ………” स्वत: “
३९) विकास पिसाळ
४०) माधुरी
४१) कृष्णकुमार उर्फ हेमंत प्रधान
४२)सौ. एम. व्ही. प्रधान
४३) निवेदिता बर्वे
४४) तेजस्चिनी जोशी
४५ ) अमोल  ” विजेची अक्षरे “
४६) नीरजा पटवर्धन ”  आतल्या सहित माणूस “
४७) विजय पारधी
४८) दिपक परुळेकर “तुटलेला तारा “
४९) अखिल जोशी ” स्पंदन

जादूचा ’ पत्ता ’संगम प्रेस

07/01/2010 6 comments
अगदि बरोबर, १९८३ चाच तो काळ होता. भावाने मला कोथरुड चा प्लॉट बघायला पाठवले होते. प्रमुख खूण होती संगम प्रेस ही ! संगम प्रेस जवळ जी विहीर आहे, त्याचे बरोबर उजवीकडे वळून पाचशे पावले गेलॊ की जो दगड पुरलेला दिसेल तो आपल्या प्लॉटचा आग्नेयाचा कोपरा…इ. इ.
त्या काळात अर्ध्या मैलाच्या परिसरात एकही नाव घेण्या सारखी वास्तू नव्हती. त्यामुळे संगम प्रेस शोधायला कष्ट पडणार नव्हतेच. त्या नंतर आमची स्कीम सुरू झाली १९८४ मध्ये व १९८५ ला आम्ही रहायला पण आलो. तेव्हा धड रस्ता नव्ह्ता, ड्रेनेज नव्हते, एकट दुकट मिणमिणते दिवे ! अंधार पडला की बाहेर पडायची भितीच वाटायची. महत्वाचे सागायचे म्हणजे तेव्हा वास्तुशांतीला बोलावतांना पत्ता देतांना बिनदिक्कत सांगीतले गेले की अरे कोथरूड संगम प्रेस कोणालाही विचार. त्याचे समोर दिवे दिसतील तेच माझे घर.
पुढे संगम प्रेस व माझे घर ह्यामधे अजून एक दोन वास्तू उभ्या राहील्या. तरीही माझा पत्ता सांगतांना संगम प्रेस ’समोर’ ऐवजी ’ जवळ’ इतकाच फरक झाला. मध्यंतरी कोथरूड चा काया पालट झाला. एखाद्या भागाची डेव्हलपमेंट इतकी फास्ट होतेय की त्याची गिनीज बुकात नोंद घ्यावी लागली. तरीही कित्येक वर्षे माझ्याया  पत्त्यात बदल करावा अशी कधी जरूर पडॆल असे कधी वाटलेच नाही. खालील फोटो त्याची साक्ष द्यायला ताठ मानेने उभा होता.
हाच तो काही दिवसांचा सोबती !
आता परिस्थिती बदलत गेली आहे. नुकतेच ही वास्तु पाडायला सुरूवात झाली आहे. एव्हढा मोठा प्लॉट मोकळा रहातोय हेही महदाश्चर्य होतेच. प्लॉट इंडस्ट्रीअल एरीयातील. पण आता असली आडकाठी कुणालाच येत नाही.
ह्या पत्र्यांमागे होता, जो गायब होतोय, जादूचा ’पत्ता’
लवकरच तेथे एखादा मोठ्ठा मॉल उभा राहील. रस्ता ओलांडायला पोलीस तैनातीस असेल. सगळीकडॆ झगमगाट झालेला असेल, रहदारी ओसंडून वाहू लागलेली असेल. अडीच तीन दशकां पूर्वी तेथून जातांना भिती वाटेल अशी परिस्थिती होती हे्ही सारे विसरून गेलेले असतील.
एक मात्र होईल, माझ्या पत्त्या मधील संगम प्रेस हा ’पत्ता’ जादूने गायब झालेला असेल !!
प्रवर्ग: अवांतर टॅगस्,

मराठी ब्लॉगर्स चा संकल्पित मेळावा

मराठी ब्लॉगर्स संकल्पित मेळावा
मी व अनिकेत सहज गप्पा मारीत असतांना हा विचार मनात चमकून गेला. भुंगा च्या ब्लॉग वर त्यानी काहींची मते मागवली आहेत की ” मराठी ब्लॉगर्स मीट व्हावी का? हो… चांगली आयडिया…!!! ” वगैरे. त्यामध्ये जवळ जवळ माझ्यासकट पंधरा जणांनी व्हावी असे मत नोंदवले होते. मी हाच धागा पकडला होता, व माझ्या पुढे मराठीब्लॉग्स डॉट नेट वर भेटणारी मंडळी होती. अनिकेत म्हणाला म्हणून मी लगेचच एक पोस्ट तयार करून टाकली. सुरवातीला त्याला कट्ट्याचे स्वरूप येऊ लागले होते पण कालांतराने ते अधिक चळवळ स्वरूपात पुढे येऊ लागले. हा मेळावा माझ्यामते ह्या स्वरूपात प्रथमच होत असावा, त्यामुळे कुठलेही फाटे न फोडता सर्वांनी प्रथम एकत्र यावे ही भुमिका मनात ठेवून ह्या मेळाव्याला सर्वांनी यावे हाच मी आग्रह धरला आहे. प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता हवी असे मला ठाम वाटते. पुढे सर्वानुमते चर्चा करीत ,निर्णय घेत त्याचे स्वरूप पक्के करीत जाऊया. येथे मी माझे स्वत:चे मत मांडत आहे. प्रत्येकाने आपापले मत येथे उत्तरात मांडावे अशी अपेक्षा आहे. तेच मुद्दे मग आपण पुढील मेळाव्यातून चर्चेला घेऊ शकू.
आम्ही हा मेळावा घेण्याचा जेव्हा विचार केला त्यावेळी त्याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळॆल अशी कल्पना केलेली नव्हती, पण त्या निमित्ताने सगळे जमत असतांना ह्या बाबत  व इतर वाचकांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा करून काही ठाम निर्णय घ्यावेत असे मला वाटते. कदाचित १७ जानेवारी २०१० चा मेळावा त्यासाठी अपुरा पडला तर पुन:पुन्हा त्यासाठी आपण जमू पण आता ही चळ्वळ त्या स्तरा वर न्यायचीच असे तरी ह्यावेळी ठामपणे ठरवूया. या सर्वांनी आपापले विचार घेऊन या !
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
हा मेळावा फक्त पुण्यातील लोकांसाठी आहे का?
अजिबात नाही. पुणे हे पहिल्या मेळाव्यासाठी निवडलेले ठीकाण आहे. जगभरातील
मराथी ब्लॉग लिहीणारे ह्यात  समाविष्ट आहेत. कोणीही स्वत:ला अलग समजू नये व एक दिलाने येथॆ यावे. सध्या मिळत असलेल्या प्रतिसादावरून ह्या पुढे ही चळवळ स्वरूपात रूपांतरीत होईल असे वाटते. तेव्हा पुढील मेळावे अन्य ठिकाणी सुध्दा करू शकू.
एक मुद्दा होता की हा मेळावा फक्त मराठीब्लॉग्स डॉट नेट वरील मराठी ब्लॉगर्स साठी सिमीत आहे का ?
नाही. माझी इच्छा सर्व मरा्ठीत ब्लॉग  लिहीणा़ऱ्या ब्लॉगर्स नी एकत्र यावे ही आहे. त्यात फक्त मराठीब्लॉग्स डॉट नेट वरील नोंदलेलेच असावेत असे नाही.
अजून एक मुद्दा आहे की मराठी माणूस पण इंग्रजीत ब्लॉग लिहीतात त्यांनी मेळाव्यात सहभागी व्हावे का?
इंग्रजीत ब्लॉग लिहीणारे पण मराठी माणूस म्हणून तो मेळाव्यात सहभागी असावा हे मला पटत नाही. त्याने मेळाव्याला जरूर यावे पण त्याने मराठीत लिहीण्यास उद्युक्त  व्हावे हा त्या मागील प्रमुख उद्देश आहे. अन्यथा इंग्रजी ब्लॉग्स इंग्रजाने लिहीले असले काय वा मराठी माणसाने लिहीले असले काय त्यात फरक तो काय? आणि जो माणूस आपले विचार इंग्रजीत मांडू शकतो त्याला ते आपल्या माय-मराठीत मांडायला काय अडचण आहे ?
एकूणच मराठीची काय अवस्था होऊ घातली आहे ते दिसतेच आहे. आमचेच…आम्हीच निवडून दिलेले आमचे शिक्षण मंत्री बिनदिक्कत, अनुदान द्यायला लागते म्हणून मराठी शाळांना सरळ सरळ परवानगी नाकारायला लागले आहेत ह्यापेक्षा दुर्दैव ते कोणते ? आम्हाला कित्येक कोटी खर्च करून समुद्रात पूल बाधता येतो कीवा पुतळे उभारता येतात पण शिक्षणा सारख्या बाबीला आम्ही अनुत्पादक म्हणून अव्हेरतो हा दैवदुर्विलास आहे दुसरे काय ?
आम्ही जगू ते मराठी म्हणूनच. आम्हाला इतर कुठल्याही भाषे बद्दल आकस नाही. मावशी कितीही चांगली असली तरी तिची जागा माय नंतरच.
आपण आपली चळवळ मराठीत ब्लॉग लिहीणाऱ्यां पुरतीच ठेवावी , इतर भाषेत ब्लॉग लिहीणाऱ्या मराठी माणसाने मराठीतही लिहीण्यास सुरूवात करावी. मराठी नसणाऱ्या पण मराठीत ब्लॉग लिहीणऱ्या मंडळीचे ही चळवळ स्वागत करते !
ब्लॉगचे स्वरूप काय कसे असावे ?
जगात अनंत गोष्टी नित्य घडत असतात. आपण त्या पहात असतो, अन्य लोकांनी त्या त्या घटनेवर मांडलेली मत-मतांतरे वाचित, ऐकत, बघत असतो. आपले मन घडणाऱ्या गोष्टींवर आपल्या पध्दतीने विचार करीत असतेच व त्यावरून आपल्या मनातही त्याबाबतचा एक ठसा तयार होत असतो. तसेच आपले मन सर्वात चंचल असते. ते कधी, कुठल्यावेळी, काय मनात आणेल, ठेवेल ह्याचा कुठलाच भरवसा नसतो. हे सांठलेले, करीत असलेले मनातले संवाद कोणाशी तरी बोलावेत, सांगावेत त्याची प्रतिक्रिया जाणून घ्यावी अशी आंस असते. ब्लॉग हे एक त्यासाठीच एक साधन आहे. तेव्हा आपले मनोव्यापार, ज्यात मी असणारच, त्यात आला तर ?…तो ही येणारच…. आणि माणसाला दुस़याच्या मनात डोकायला आवडतेच !
तेव्हा ब्लॉगला त्याबाबतीत कुठलेही बंधन नसावेच. असलेच तर ते स्वत:चेच ! त्यावरूनच माणसाच्या  विचारांची परिपक्वता, सौंदर्य दृष्टी, सुसंस्कृतपणा ह्याचे दर्शन घडणार आहे. कोणीतरी डोकावत आहेच, तेव्हा आपल्या घराचे दार किती किलकिले ठेवायचे हे स्वत:च ठरवा, नंतर तक्रार करू नका.. कोणी फारच डोकावते आहे म्हणून !
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००