Archive

Archive for 04/02/2010

नव्या मराठी ब्लॉग्सची उत्पत्ती

04/02/2010 5 comments
आपल्या मराठी ब्लॉगर्स च्या मेळाव्याच्या निमित्ताने व नंतरही माझा व्यक्तिश: अनेकांशी संबंध आला. आपली ही चळवळ यशस्वी करायची असेल तर शेकडॊ, हजारोनी नवीन मराठी ब्लॉगर्स पुढे यायला हवे आहेत, जेणेकरून त्यांच्यात आपोआप विषयाचे वैविध्य येईल व हळू हळू कसदार लिखाणांमधून मराठी वाङ्मयात मोलाची भर पडत राहील , हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून मी प्रत्येकाला मराठीत ब्लॉग लिहीण्यास प्रोत्साहित करीत आलेलो आहे. हे श्री.प्रशांत प्र. देगांवकर, पुणे. त्यांना उलगडलेलॆ “ब्रह्मांडाचे रहस्य “. आपणासाठी उघड करायला उत्सुक आहेत एका नव्या मराठी ब्लॉगचे रूपाने…
.
.
माझा “मराठी” ब्लॉग – ” ब्रह्मांडाचे रहस्य “.
.
आदरणीय महोदय,
.
मला कळविण्यास आनंद वाटतो की मी  “मराठी” मधून ब्लॉग लिहिला आहे.
ब्लॉगचे नांव :-  “ब्रह्मांडाचे रहस्य “.
ह्या मध्ये माझ्या ” टोटल हेल्थ ” वरील पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे.
ब्लॉग बघण्यासाठी लिंक :- http://brahmandrahasya.blogspot.com/
कृपया आपण माझा ब्लॉग बघावा व आपले मत,विचार,अभिप्राय कळवावेत.
हा ब्लॉग करण्यासठी मला, श्री.पेठेकाका(पुणे), श्री.अनिकेत समुद्र( पुणे ) व श्री. तुषार जोशी(नागपूर) यांची खूप खूप मदत झाली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद व मनःपूर्वक आभार.
कळावे,
.
आपला,
.
प्रशांत प्र. देगांवकर, पुणे.
.
.

नमस्कार पेठे काका (आणि समस्त मराठी ब्लॉगर्स मंडळी),
सर्वप्रथम आपणां सर्वांचे अभिनंदन, समस्त मराठी ब्लॉगर्सना आपण एका छ्त्राखाली आणण्याचा घाट घातलात आणि तो सत्यात आणलात. अभूतपूर्व अशी ब्लॉगर्स मीट पुण्यात घडवून आणलीत. त्यामागे नक्कीच आपले योगदान फार मोठे आहे. नाहीतर पन्नास मराठी माणसे जमवणे हे काही खायचे काम नाही. मी इकडे रशियामध्ये एका मोठ्या स्टील प्लांटवर सेल्स मध्ये नोकरी करतो. आणि फुटकळ लेखन करतो. अर्थात ते सर्व फक्त माझ्यासाठीच असते. मी स्वतःची इ-डायरी मराठीमध्ये लिहितो. खरं तर जेव्हा मी इ-सकाळवर ही बातमी वाचली तेव्हाच मला असे वाटले की लगेचच्या विमानाने पुण्याला निघावे. तिकीट बुकही केले होते. पण कामाच्या अचानक आलेल्या गडबडीमुळे यायला जमले नाही. पण पुढला मेळावा जेव्हा होईल तेव्हा मला नक्की कळवा. थोडे आधी कळवलेत तर बरे होईल, म्हणजे कामांची सोय लावून येता येईल.
मराठी भाषेच्या साहित्यात आपल्या मराठी ब्लॉगर्सकडून खरंच तोलामोलाची भर पडत आहे. आणि त्यासाठी साहित्य संमेलनाबाबत जो ठराव झालाय तो अगदी योग्यच आहे. तुम्हां सर्वांना माझ्या शुभेच्छा. मी खरं तर कधी ऑनलाईन लिहिले नाही. पण आपणांपासून प्रेरणा घेऊन आता (आता म्हणजे या क्षणीच) एक ब्लॉग सुरु करत आहे. “मनाच्या धुंदीत”… म्हणून त्या ब्लॉगला नाव पण तेच ठेवणार “”मनाच्या धुंदीत”. सध्या तरी माझी ओळख आणि माझ्याबद्दल अशीच एक पोस्ट टाकतो. पण लवकरच हा ब्लॉग ओसंडून वाहायला लागेल याची खात्री बाळगा. मी नियमितपणे आपला ये रे मना… वाचतो, स्केचिंग पाहतो. दोन्ही भुंग्यांचे ब्लॉगही माझे आवडते आहेत. आणि तन्वीचा पण ब्लॉग खूप आवडतो मला. मला लिहायला प्रेरणा देणारे फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात. मी नेहमीच कामासंदर्भात संपूर्ण रशियामध्ये कायम फिरत असतो. आजवर तिथेले जीवन, संस्कृती, लोक यांबद्दल डायरीत लिहिले आता ब्लॉगवर पण लिहिणार.
ब्लॉगची लिंक: http://manachya-dhundit.blogspot.com/
याचे सर्व श्रेय आपलेच आहे. पुढील माहितीची आणि उपक्रमांची मी आतुरतेने वाट पाहत आहे. आपण माझ्या भावना सर्व मराठी ब्लॉगर्स संयोजकांपर्यंत नक्की पोचवा. आणि सर्वांना धन्यवाद सांगा.
माझ्यालायकीचे काही काम असेल तर अवश्य सांगा.
धन्यवाद!!!
अजित
.
.
हे आहेत श्रीयुत  अजित रायकर ह्यांचॆ  रशियन जीवनावरील रसरशित लेख वाचण्याच्या तयारीत रहा.