मुखपृष्ठ > अवांतर > जादूचा ’ पत्ता ’संगम प्रेस

जादूचा ’ पत्ता ’संगम प्रेस

अगदि बरोबर, १९८३ चाच तो काळ होता. भावाने मला कोथरुड चा प्लॉट बघायला पाठवले होते. प्रमुख खूण होती संगम प्रेस ही ! संगम प्रेस जवळ जी विहीर आहे, त्याचे बरोबर उजवीकडे वळून पाचशे पावले गेलॊ की जो दगड पुरलेला दिसेल तो आपल्या प्लॉटचा आग्नेयाचा कोपरा…इ. इ.
त्या काळात अर्ध्या मैलाच्या परिसरात एकही नाव घेण्या सारखी वास्तू नव्हती. त्यामुळे संगम प्रेस शोधायला कष्ट पडणार नव्हतेच. त्या नंतर आमची स्कीम सुरू झाली १९८४ मध्ये व १९८५ ला आम्ही रहायला पण आलो. तेव्हा धड रस्ता नव्ह्ता, ड्रेनेज नव्हते, एकट दुकट मिणमिणते दिवे ! अंधार पडला की बाहेर पडायची भितीच वाटायची. महत्वाचे सागायचे म्हणजे तेव्हा वास्तुशांतीला बोलावतांना पत्ता देतांना बिनदिक्कत सांगीतले गेले की अरे कोथरूड संगम प्रेस कोणालाही विचार. त्याचे समोर दिवे दिसतील तेच माझे घर.
पुढे संगम प्रेस व माझे घर ह्यामधे अजून एक दोन वास्तू उभ्या राहील्या. तरीही माझा पत्ता सांगतांना संगम प्रेस ’समोर’ ऐवजी ’ जवळ’ इतकाच फरक झाला. मध्यंतरी कोथरूड चा काया पालट झाला. एखाद्या भागाची डेव्हलपमेंट इतकी फास्ट होतेय की त्याची गिनीज बुकात नोंद घ्यावी लागली. तरीही कित्येक वर्षे माझ्याया  पत्त्यात बदल करावा अशी कधी जरूर पडॆल असे कधी वाटलेच नाही. खालील फोटो त्याची साक्ष द्यायला ताठ मानेने उभा होता.
हाच तो काही दिवसांचा सोबती !
आता परिस्थिती बदलत गेली आहे. नुकतेच ही वास्तु पाडायला सुरूवात झाली आहे. एव्हढा मोठा प्लॉट मोकळा रहातोय हेही महदाश्चर्य होतेच. प्लॉट इंडस्ट्रीअल एरीयातील. पण आता असली आडकाठी कुणालाच येत नाही.
ह्या पत्र्यांमागे होता, जो गायब होतोय, जादूचा ’पत्ता’
लवकरच तेथे एखादा मोठ्ठा मॉल उभा राहील. रस्ता ओलांडायला पोलीस तैनातीस असेल. सगळीकडॆ झगमगाट झालेला असेल, रहदारी ओसंडून वाहू लागलेली असेल. अडीच तीन दशकां पूर्वी तेथून जातांना भिती वाटेल अशी परिस्थिती होती हे्ही सारे विसरून गेलेले असतील.
एक मात्र होईल, माझ्या पत्त्या मधील संगम प्रेस हा ’पत्ता’ जादूने गायब झालेला असेल !!
Advertisements
प्रवर्ग: अवांतर टॅगस्,
 1. Leena
  08/01/2010 येथे 1:26 pm

  mahnaje ata sangam press band padali ka?

 2. 08/01/2010 येथे 3:58 pm

  अर्थात, आता बाहेरून पत्रे लावून आत जोरात काम सुरू झाले आहे.

 3. 09/01/2010 येथे 2:40 सकाळी

  मस्त झालेय पोस्ट. आपल्या आजुबाजुचा ओळखिचा परिसर पालटत जातो तेंव्हा वाईट वाटतच.

  • 09/01/2010 येथे 6:59 सकाळी

   शिल्पा,
   वाईट असे वाटत नाही, कारण पालटणे हे निसर्ग नियमांना धरून आहे, फक्त त्या विरूध्द पालटवणे त्रासदायक ठरू शकते !

 4. Shekhar
  05/02/2010 येथे 6:45 pm

  kharech kotharud zapatyane wadhale…june patte badatil… pan aathavani rahatil tashyach…mhanje lok mhantil…are ti juni Sangam press aathavate na…ho tyach thikani…pan khare aahe tumache…kalantarane te naav gayab houn jaail.

 5. 05/02/2010 येथे 10:21 pm

  शेखर,
  आताच लोक ’करिष्माच्या’ चौकात वगैरे म्हणू लागले आहेत… आठवणी आता बुझायच्याच!

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: