Archive

Archive for 13/01/2010

मेळाव्याला वृत्तपत्रीय प्रतिसाद

13/01/2010 4 comments
पेठे काका
नमस्कार
पुण्यात होणाऱया ब्लॉग लेखकांच्या मेळाव्याची बातमी मी आज आमच्याकडे दिली आहे. उद्याच्या मुंबई वृत्तान्तमध्ये पान एकवर ती प्रसिद्ध झाली आहे. आपल्याला लोकसत्ताच्या नेट आवृत्तीवर ती बातमी पाहता येईल.
कळावे
आपला
शेखर जोशी
आपले सगळे मित्र मंडळी आता जोरदार कामाला लागले आहेत .मुंबई वृत्तांतातील बातमी खाली देत आहे .
.
सुरेश पेठे
मेळावा मराठी ब्लॉगलेखकांचा! Print E-mail
प्रतिनिधी
आपल्या मनातील विचार, विविध विषयांवरील मते आणि भावभावना व्यक्त करण्यासाठी सर्वसामान्यांनाही आता ब्लॉगचा पर्याय उपलब्ध आहे. अमिताभ बच्चन शाहरुख खान यांच्या ब्लॉगप्रमाणेच ज्याला लिहिण्याची आवड आहे अशी कोणीही व्यक्ती आपला स्वत:चा ब्लॉग तयार करुन लेखन करु शकते. मराठी भाषेत आज सुमारे दीड हजारांन अधिक व्यक्ती आपले ब्लॉग चालवत असून त्यांचा एक मेळावा येत्या १७ जानेवारी रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.
गुगल आणि अन्य संकेतस्थळांच्या माध्यमातून आज सर्वसामान्य माणसालाही ई-मेल प्रमाणे जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यावर कोणीही आपला ब्लॉग सुरु करु शकतो. मराठी ब्लॉगनेटच्या माध्यमातून सध्या १ हजार ६४७ व्यक्ती विविध विषयांवर मराठातून ब्लॉगलेखन करत आहेत. केवळ मराठीतूनच ब्लॉग लेखन करणाऱ्या मराठी ब्लॉग धारकांचा हा मेळावा दुपारी ४ ते ७ या वेळेत पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रस्ता, बिग बाजारजवळ, पुणे येथे येत्या रविवारी आयोजित करण्यात आला आहे.
ब्लॉगलेखक सुरेश पेठे, अनिकेत समुद्र यांच्यातील चर्चेतून या पहिल्या मराठीतून लेखन करणाऱ्या ब्लॉग लेखकांच्या मेळाव्याची कल्पना पुढे आली. पेठे यांनी आपल्या ब्लॉगवर त्याविषयी सुतोवाच केले आणि ब्लॉगविश्वातून अनेकांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे पेठे व समुद्र यांचा उत्साह वाढला.
या ब्लॉगमेळाव्यासाठी जगभरातील मराठीतून ब्लॉगलेखन करणारी लेखक मंडळी अपेक्षित आहेत. केवळ ब्लॉगच्या माध्यमातून किंवा प्रतिक्रियांमधून नेहमी भेटणाऱ्या या सर्व मंडळींनी एकत्र यावे, सर्वाचा प्रत्यक्ष परिचय व्हावा, आपापले ब्लॉग, त्यावरील लेखन, नवीन कल्पना, भविष्यातील कार्यक्रमांची रुपरेषा यांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला
आहे.
येत्या रविवारी होणाऱ्या या मेळाव्यास मराठीतून ब्लॉगलेखन करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी पेठे यांच्याशी
sureshpethe@gmail.com वर संपर्क साधावा.

आत्ता  सकाळ मधील प्रतिसाद पहा

ही त्याची लिन्क.. http://72.78.249.125/esakal/20100114/4618764544374061429.htm

,


प्रवर्ग: Uncategorized