Archive

Archive for 22/01/2010

मराठी पण, जवळ यायला हवे आहे !

22/01/2010 3 comments
नुकताच आपण मराठी लिहीणाऱ्या ब्लॉगर्स चा मेळावा घेतला. त्यातील एक महत्वाचा ठराव होता की,
“मराठी साहित्य आजपर्यंत दृक्‌, श्राव्य आणि लिखीत स्वरूपात उपलब्ध होत आले. बदलत्या माहितीतंत्रज्ञानाच्या युगात ब्लॉगच्या रूपाने या तीनही अंगांचा समावेश असलेला अतिशय परीणामकारक वाङमय-प्रकार प्रसृत झालेला आहे. जगभरातून अदमासे वीस हजाराहून अधीक लेखक नियमितपणे या माध्यमातून मराठी भाषेचे वैभव वाढवत आहेत. या मायमराठीला यथाशक्ती, यथामती समृद्ध करणार्‍या उपक्रमाला आपल्या कौतुकाच्या थापेची अपेक्षा आहे.
मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाने  या साहित्यप्रकाराची विशेष दखल घ्यावी व आपल्या अध्यक्षीय भाषणात ’ब्लॉगिंग’ द्वारा चाललेल्या या लेखनयज्ञाचा आवर्जून उल्लेख करावा ही आग्रहाची विनंती.”
त्या निमित्ताने आम्ही श्री. संजय भा. जोशी, मुख्य कार्यकारी व्यवस्थापक, ८३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१० ह्यांना व्यक्तीश: भेटलो व त्यांनी , आपण अपेक्षिला होता त्या पेक्षा अधिक  चांगला प्रतिसाद दिला. ते सर्व आपणास कालांतराने महिती होईलच.
त्या साठी त्यांनी काही माहिती मागवलेली आहे व ती आम्ही पुरवत आहोच. त्या महितीच्या  संदर्भात  महिती देत असतांना श्री. प्रसन्न जोशींनी एका टिपणावर मत मागवले होते.
मी माझे मत देतांना म्हणले होते.
“……. ब्लॉगिंगचे फायदे- तुम्ही ब्लॉगिंग मराठीत करा किंवा अन्य कुठल्याही भाषेत, तुम्हाला स्वत:ला ओळख मिळाल्याचा आनंद गवसेल…..
ह्यातील ’ अन्य कुठल्याही भाषेत’  इथे अप्रस्तुत   वाटते “
त्याला प्रसन्नजींनी उत्तर दिले होते,
“apan Marathi bloggers aslo tari anya bhashebabat duswas karnyache karan nahi. Tyamule ‘Blogging Marathit kara kinwa anya kuthlyahi bhashet….’ ya vakyat khataknuasarkhe kahi nahi. Shivay, apan Marathi ase mhantana Puneri pramanit marathi manto. Pan aapli koknatali govyatali, khandeshatli, vaidarbhiya yanchi bhasha Marathichya jawal janari asli tari tyanchya bhashechee vegli olakh aahech ki! Kokani sahitya aani Marathi sahitya asa waad aahech. Pan mhanun te hi aaple Marathi janach aahet. Ha artha majha tya vakyat abhipret aahe. Shivay, je Marathi jana englishmadhe blogging kartat tyanna apan savatra manannar ka? Aaple paradeshastha Marathi jan bhale Marathit blogging karat astil, pan tyanchee mule ata WESTERN jhaleli aahet. Pan, jar tee peedhi Marathi vishwashi samaras hot asel, tar keval English bhasha te boltat mhanun tyanna aaplyat ghyaycha nahi ka?
Majha mate, aapla Marathi blogger bana ha sweekarnara-INCLUSIVE asawa.
त्याला माझे उत्तर असे आहे…..
इथेच नेहमी आमचा वैचारीक गोंधळ उडतो ! एकूण हे म्हणणे म्हणजे एखाद्या राजकारण्या सारखे झाल्या सारखे वाटते !.
कोकणी मराठी वादाचे खरे तर काहीच कारण नाही. कालच आपल्याच मुख्य मंत्र्यांनी टॅक्सीवाल्यांच्या संदर्भात, मुंबई साठी, हिंदी व गुजराती ह्यांची गणना स्थानिक भाषा म्हणून केलीच ना ! कोणाच्या दबावाखाली ? केवळ मतांच्या गणितात वरचढ राहीलेत म्हणून ? की साठ टक्के लोक मतदानासाठी बाहेर न पडता मिळालेली सुट्टी मजेत घालवायला बाहेर पडले म्हणून ? हा राज कारणाचा विषय आहे तेव्हा तो सोडणेच ठीक !
आम्हा मराठी वाल्यांना इतर कुठल्याही भाषे बाबत कधीच दुस्वास नव्हता व नाही ही !. आमचा प्रयत्न आहे तॊ आपली मूळ जी मराठी मातृभाषा आहे तिचे अस्तित्व जतन करण्या साठी फक्त धडपड ! कशाला, फार दूर नकॊ जायला आधल्या पिढीतले मराठी वाङमय कींवा अगदी घरातली बोली व आताच्या पिढीतील जर तपासले तर काय दिसेल ?..विषयातील फरक मी समजू शकतॊ पण भाषेचा बाज शब्दांसह का बदलावा ?
ब्रिटीश अमदानीत अनेक पाद्री इथे येवून मराठी शिकले व मराठीतून लिखाणही केले पण एखाद्या रे.टिळकां खेरीज बाकीच्यांचे लिखाणाला मराठीचा सुगंध येत होता का? कारण भाषा ही नुसती भाषा कधीच नसते तर त्यातून त्याचे मराठीपण दिसते व ते असणे हे ही महत्वाचे असते. जे मराठी लोक इंग्रजीतून लिहितात त्यांची ओळख वाचक मराठी म्हणूनच ठेवतो की तो काय लिहीतो ह्यावर ?
महाराष्ट्रातील इतर भागातील मराठी भाषा ही मराठीच आहे त्यात दुमत असण्याचे काहीही कारण नाही . मग तसे म्हणाल तर दर बारा कोसावर भाषा बदलते ! प्रत्येक भाषेचा एक बाज असतो. तो जो पर्यंत टिकला जातॊ, त्या त्या भाषेतून जो पर्यंत तो सुगंध भरलेला असतो तो पर्यंत ती भाषा, ती माणसे व पर्यायाने तो प्रांत टिकून रहातॊ. जेव्हा आम्ही भारताच्याही बाहेर जातॊ तेव्हा भारतातील कुठलीही भाषा आपल्याला सर्वात जवळची वाटते कारण तेथे मग आम्ही भारतीय असतो…. पण इथेच शेजारील माणूस मराठी असला तरी आम्ही जेव्हा हिंदी किंवा अन्य भाषेत एकमेकाशी बोलतो त्याला काय म्हणायचे ?
मला एक प्रसंग चांगला आठवतॊ , संस्कार भारतीच्या सुवर्ण महोत्सवाचा समारंभ पुण्यात चार वर्षापुर्वी संपन्न झाला. देशभरातले २५०० कलाकार मंडळी येथे जमा झाली होती. त्या सर्वांची त्यांच्या त्यांच्या प्रादेशिक पोषाखात शोभा यात्रा काढली गेली होती. सगळ्यात जास्त शोभा कोणाची झाली असेल तर ती आमची ! ना आम्ही आमची भाषा टिकवतोय, ना पोषाख, ना महाराष्ट्रीयत्व ….सगळंच सोडलंय व त्याची ना आम्हाला खंत वा खेद ! उलट त्यासाठी आम्ही आमचीच पाठ थोपटून घेतोय ! हो आम्ही आमच्याच मराठी भाषेबाबत आग्रही आहोत असे आम्ही म्हटले तर त्यात आम्ही काय चुकीचे करीत आहोत? असे म्हणायला आम्हाला का कमी पणा वाटावा ?
रहाता राहीला प्रश्न परदेशस्थांचा. हे माझे वैयक्तीक मत आहे कोणाला पटत असेल वा कोणाला नसेलही…. जो पर्यंत तेथील माणूस आपली भाषा व खरे तर त्या मागील आपला विचार टिकवून असेल तो पर्यंत तो जी , जशी मोडकी तोडकी मराठी भाषा वापरेल त्या मराठीचा सुगंध खपवून घेतला जाईल नव्हे आम्हाला ती आवडेलही कारण त्याला इथल्या मातीचा सुगंध जाणवेल ! पण आपण म्हणालात तसे WESTERN  विचारांचे इंग्रजाळलेले ’ वाघिणीचे दूध शुध्द मराठी त असले तरी ते आमच्या पचनी पडेल हे संभवत नाही ! कारण मग वर उल्लेखलेला पाद्री व ह्याच्यात कुठलासा फरक राहीलेला असेल ? मात्र .. Pan, jar tee peedhi Marathi vishwashi samaras hot asel, tar …हे आपले शब्द खरोखरीच आश्वासित करणारे आहेत व तसेच ते जर मराठी विश्वाशी समरस होतील तर भाषा ही फक्त एक औपचारीकता राहील !
जेव्हा आम्ही मराठी ब्लॉगर्स ना एकत्र आणायचे म्हणतॊय तेव्हा मला मराठी मने, मराठी विचार, मराठी पण, जवळ यायला हवे आहे !
प्रवर्ग: अवांतर