मुखपृष्ठ > अवांतर > मराठी ब्लॉगर्स चा संकल्पित मेळावा

मराठी ब्लॉगर्स चा संकल्पित मेळावा

मराठी ब्लॉगर्स संकल्पित मेळावा
मी व अनिकेत सहज गप्पा मारीत असतांना हा विचार मनात चमकून गेला. भुंगा च्या ब्लॉग वर त्यानी काहींची मते मागवली आहेत की ” मराठी ब्लॉगर्स मीट व्हावी का? हो… चांगली आयडिया…!!! ” वगैरे. त्यामध्ये जवळ जवळ माझ्यासकट पंधरा जणांनी व्हावी असे मत नोंदवले होते. मी हाच धागा पकडला होता, व माझ्या पुढे मराठीब्लॉग्स डॉट नेट वर भेटणारी मंडळी होती. अनिकेत म्हणाला म्हणून मी लगेचच एक पोस्ट तयार करून टाकली. सुरवातीला त्याला कट्ट्याचे स्वरूप येऊ लागले होते पण कालांतराने ते अधिक चळवळ स्वरूपात पुढे येऊ लागले. हा मेळावा माझ्यामते ह्या स्वरूपात प्रथमच होत असावा, त्यामुळे कुठलेही फाटे न फोडता सर्वांनी प्रथम एकत्र यावे ही भुमिका मनात ठेवून ह्या मेळाव्याला सर्वांनी यावे हाच मी आग्रह धरला आहे. प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता हवी असे मला ठाम वाटते. पुढे सर्वानुमते चर्चा करीत ,निर्णय घेत त्याचे स्वरूप पक्के करीत जाऊया. येथे मी माझे स्वत:चे मत मांडत आहे. प्रत्येकाने आपापले मत येथे उत्तरात मांडावे अशी अपेक्षा आहे. तेच मुद्दे मग आपण पुढील मेळाव्यातून चर्चेला घेऊ शकू.
आम्ही हा मेळावा घेण्याचा जेव्हा विचार केला त्यावेळी त्याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळॆल अशी कल्पना केलेली नव्हती, पण त्या निमित्ताने सगळे जमत असतांना ह्या बाबत  व इतर वाचकांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा करून काही ठाम निर्णय घ्यावेत असे मला वाटते. कदाचित १७ जानेवारी २०१० चा मेळावा त्यासाठी अपुरा पडला तर पुन:पुन्हा त्यासाठी आपण जमू पण आता ही चळ्वळ त्या स्तरा वर न्यायचीच असे तरी ह्यावेळी ठामपणे ठरवूया. या सर्वांनी आपापले विचार घेऊन या !
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
हा मेळावा फक्त पुण्यातील लोकांसाठी आहे का?
अजिबात नाही. पुणे हे पहिल्या मेळाव्यासाठी निवडलेले ठीकाण आहे. जगभरातील
मराथी ब्लॉग लिहीणारे ह्यात  समाविष्ट आहेत. कोणीही स्वत:ला अलग समजू नये व एक दिलाने येथॆ यावे. सध्या मिळत असलेल्या प्रतिसादावरून ह्या पुढे ही चळवळ स्वरूपात रूपांतरीत होईल असे वाटते. तेव्हा पुढील मेळावे अन्य ठिकाणी सुध्दा करू शकू.
एक मुद्दा होता की हा मेळावा फक्त मराठीब्लॉग्स डॉट नेट वरील मराठी ब्लॉगर्स साठी सिमीत आहे का ?
नाही. माझी इच्छा सर्व मरा्ठीत ब्लॉग  लिहीणा़ऱ्या ब्लॉगर्स नी एकत्र यावे ही आहे. त्यात फक्त मराठीब्लॉग्स डॉट नेट वरील नोंदलेलेच असावेत असे नाही.
अजून एक मुद्दा आहे की मराठी माणूस पण इंग्रजीत ब्लॉग लिहीतात त्यांनी मेळाव्यात सहभागी व्हावे का?
इंग्रजीत ब्लॉग लिहीणारे पण मराठी माणूस म्हणून तो मेळाव्यात सहभागी असावा हे मला पटत नाही. त्याने मेळाव्याला जरूर यावे पण त्याने मराठीत लिहीण्यास उद्युक्त  व्हावे हा त्या मागील प्रमुख उद्देश आहे. अन्यथा इंग्रजी ब्लॉग्स इंग्रजाने लिहीले असले काय वा मराठी माणसाने लिहीले असले काय त्यात फरक तो काय? आणि जो माणूस आपले विचार इंग्रजीत मांडू शकतो त्याला ते आपल्या माय-मराठीत मांडायला काय अडचण आहे ?
एकूणच मराठीची काय अवस्था होऊ घातली आहे ते दिसतेच आहे. आमचेच…आम्हीच निवडून दिलेले आमचे शिक्षण मंत्री बिनदिक्कत, अनुदान द्यायला लागते म्हणून मराठी शाळांना सरळ सरळ परवानगी नाकारायला लागले आहेत ह्यापेक्षा दुर्दैव ते कोणते ? आम्हाला कित्येक कोटी खर्च करून समुद्रात पूल बाधता येतो कीवा पुतळे उभारता येतात पण शिक्षणा सारख्या बाबीला आम्ही अनुत्पादक म्हणून अव्हेरतो हा दैवदुर्विलास आहे दुसरे काय ?
आम्ही जगू ते मराठी म्हणूनच. आम्हाला इतर कुठल्याही भाषे बद्दल आकस नाही. मावशी कितीही चांगली असली तरी तिची जागा माय नंतरच.
आपण आपली चळवळ मराठीत ब्लॉग लिहीणाऱ्यां पुरतीच ठेवावी , इतर भाषेत ब्लॉग लिहीणाऱ्या मराठी माणसाने मराठीतही लिहीण्यास सुरूवात करावी. मराठी नसणाऱ्या पण मराठीत ब्लॉग लिहीणऱ्या मंडळीचे ही चळवळ स्वागत करते !
ब्लॉगचे स्वरूप काय कसे असावे ?
जगात अनंत गोष्टी नित्य घडत असतात. आपण त्या पहात असतो, अन्य लोकांनी त्या त्या घटनेवर मांडलेली मत-मतांतरे वाचित, ऐकत, बघत असतो. आपले मन घडणाऱ्या गोष्टींवर आपल्या पध्दतीने विचार करीत असतेच व त्यावरून आपल्या मनातही त्याबाबतचा एक ठसा तयार होत असतो. तसेच आपले मन सर्वात चंचल असते. ते कधी, कुठल्यावेळी, काय मनात आणेल, ठेवेल ह्याचा कुठलाच भरवसा नसतो. हे सांठलेले, करीत असलेले मनातले संवाद कोणाशी तरी बोलावेत, सांगावेत त्याची प्रतिक्रिया जाणून घ्यावी अशी आंस असते. ब्लॉग हे एक त्यासाठीच एक साधन आहे. तेव्हा आपले मनोव्यापार, ज्यात मी असणारच, त्यात आला तर ?…तो ही येणारच…. आणि माणसाला दुस़याच्या मनात डोकायला आवडतेच !
तेव्हा ब्लॉगला त्याबाबतीत कुठलेही बंधन नसावेच. असलेच तर ते स्वत:चेच ! त्यावरूनच माणसाच्या  विचारांची परिपक्वता, सौंदर्य दृष्टी, सुसंस्कृतपणा ह्याचे दर्शन घडणार आहे. कोणीतरी डोकावत आहेच, तेव्हा आपल्या घराचे दार किती किलकिले ठेवायचे हे स्वत:च ठरवा, नंतर तक्रार करू नका.. कोणी फारच डोकावते आहे म्हणून !
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
  1. अनिकेत
    07/01/2010 येथे 9:17 सकाळी

    स्टार माझा, हिंदुस्तान टाईम्स, पुणे मिरर आणि मुक्त पत्रकार हे सर्व जण ह्या मेळाव्याविषयी जाणुन घेण्यास उत्सुक आहेतच पण त्याच बरोबर, माझ्या माहीतीतील काही मराठी वेब-साईट्सनाही याबद्दल अधीक माहीती हवी आहे. आपली रुपरेषा नक्की झाली की या बाबतची माहीती ते त्यांच्या वेबसाईटवर प्रसिध्द करतील जेणे करुन अधिक लोकांना याबद्दल माहीती मिळेल.

    माझे काल अभिजीतशी बोलणे झाले आणि ह्याबाबत एखादी छोटी बातमी दै. सकाळ मध्ये छापुन येण्याचाही आपण प्रयत्न करत आहोत.

    अर्थात हे सर्व प्रसिध्दीसाठी नाहीच. मुळ उद्देश आपण सर्व एकत्र येऊन व्हर्चुअल जगातील ओळखी ह्या रिअल लाईफ मध्ये करुन घेणॆ आणि आपल्या ह्या ज्ञानाचा, कौशलतेचा काही कंस्ट्रक्टीव्ह वापर करता आला तर पहाणे आहे.

    • 12/01/2010 येथे 2:54 pm

      माझ्या माहीतीतील काही मराठी वेब-साईट्सनाही याबद्दल अधीक माहीती हवी आहे….
      hyana cotact kele ka?

  2. अनिकेत वैद्य
    07/01/2010 येथे 9:47 सकाळी

    पेठे काका,
    मी स्वत: ब्लॉग लिहीत नाही. पण अनेक ब्लॉग चा नियमीत वाचक आहे. मी सुद्धा ह्या स्नेह मेळाव्याला येणारे.

    अनिकेत वैद्य.

    • 07/01/2010 येथे 10:06 सकाळी

      @ अनिकेत वैद्य,
      आपले ह्या मेळाव्यात सहर्ष स्वागत आहे. एक वाचक म्हणून आपलीही काही भूमिका ‘demand’ असेलच व ती आम्हाला आपल्या कडून ऐकायला नक्कीच आवडेल. आज आपण इतरांचे ब्लॉगस वाचत आहात पण मला खात्री वाटते की आपण ही आपला मराठी ब्लॉग अगदी लवकर सुरू करणार आहात. आम्ही तो ही वाचायला उत्सुक आहोत.

  3. 07/01/2010 येथे 10:16 सकाळी

    सुरेशजी, संकल्पना अतिशय उत्कृष्ट आहे. यानिमित्ताने ब-याच विषयांवर चर्चादेखील होईल जी आपली अभिव्यक्ती आणि आवड समृद्ध करण्यास नक्कीच हातभार लावेल.

  4. sahajach
    07/01/2010 येथे 10:31 सकाळी

    काका यासाठी हवी असतात मोठी माणसं( वयानेच नव्हे तर वकुबाने) ……चळवळ सुरू केलीत एकदम……अनेक अनेक शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!!
    (काका मला येता येणार नाही याचं जाम वाईट वाटतय!!!!!!!!!!!!!!)

  5. 07/01/2010 येथे 10:38 सकाळी

    सर्वांना एक विनंती आहे, येथे आपण आपले मुद्दे द्यावेत ज्यांची मेळाव्यात चर्चा करता येईल.

  6. 07/01/2010 येथे 10:50 सकाळी

    माझी ही मराठी बिघडत चालली आहे. शिर्षकात दुरूस्ती केली आहे.

  7. 07/01/2010 येथे 11:01 सकाळी

    काका तन्वी म्हणतेय त्यात अजून एकच सांगेन की मोठी लोकं बरोबर असली म्हणजे गोष्टी जरा शिस्तीनं होतात त्यामुळे आपला उत्साह खरंच वाखाणला पाहिजे..
    माझ्यावतीने मी एक मुद्दा मांडेन की एक आपण मराठी ब्लॉग लिहीतो हे मराठीसाठी चांगलं आहे पण आपण त्यात शुद्धलेखनाकडे संपुर्ण दुर्लक्ष करतो. जर इंग्रजीत लिहित असू तर स्पेल चेक, ग्रामर करेक्शन इ. सुविधा वर्डमध्येही असतात त्यामुळे सर्वसाधारण लेखन शुद्ध असतं..मग मराठीबाबत आपण अशुद्धलेखन गृहित धरु नये…आणि त्यासाठी काही करता येईल का?? आधी जमेल तेवढं आणि मग शंभर टक्के शुद्ध लिहीलं गेलं पाहिजे. हा मुद्दा पटण्यासारखा नक्कीच आहे तर त्याचा कृपया समावेश करा. नुस्तंच मराठी मला येत तसं मी लिहीन हे थोडं बरोबर नाही..अर्थात सुरूवात चुकीने झाली तरी ती बरोबर करायचा प्रयत्न विद्येच्या माहेरघरी व्हावा…

    • अनिकेत
      07/01/2010 येथे 12:55 pm

      अपर्णा, सहमत! ह्या मुद्यावर नक्कीच चर्चा व्हायला हवी पण इतक्यात व्हावी असे मला वाटत नाही. सर्व प्रथम अनेका अनेक लोकांना मराठीतुन लिहावयास उद्युक्त करणे हाच आपला मोटीव्ह असावा. अनेक लोकं अजुनही अशी आहेत ज्यांना मराठीतुन टायपींग जमत नाही म्हणुन त्यांचे ब्लॉग नाहीत. ह्या मेळाव्यात अश्या लोकांना मार्गदर्शन करता आले तर अजुन अनेक नविन ब्लॉग चालु होतील.

      दुसरी गोष्ट, ब्लॉग खरं तर मनातल्या भावना, विचार आणी इतर अनेक गोष्टी मांडण्यासाठीचे एक व्यासपिठ असते, असावे त्याला उगाचच आत्तापासुनच शुध्दलेखनाच्या जाळ्यात अडकवु नये.

      मी यापुर्वी एका वेबसाईटवर लिहायचो, पण तेथील लोक लेखनाचा आशय,विषय बाजुला ठेवुन शुध्दलेखनातीलच चुका काढायचे. त्यामुळे माझ्यासारखेच अनेक ‘उभरते लेखक’ हिरमुसले झाले आणि तेथुन बाहेर पडले

      असो, शुध्दलेखन नक्कीच महत्वाचे आहे, आणि त्यावर चर्चा, मार्गदर्शन होणं गरजेचे आहे, फक्त इतक्यात नको असं माझं प्रांजळ मत आहे.

      • 07/01/2010 येथे 1:42 pm

        ते पण ठिक आहे भिडू…मीट(non veg aathwate punha) क्रमांक दोनला जरूर करू…निदान जे कसलेले ब्लॉगर्स आहेत त्यांच्यासाठीतरी हा विचार पुढे करायला हरकत नाही…

  8. swapna sapre
    07/01/2010 येथे 11:49 सकाळी

    me nuktich blog lihayala suruwat keli aahe.me journalism chi student aahe.marathi typing thod awaghad aahe.mhanun eng madhe type karat aahe.kshama asawi.
    pethe sir tumachi kalpana khup changali aahe.malahi melawyala yayala awadel.blog me niyamit wachate.sagale blog lekhak ekatra zale tar navin kalpana nakkich kalatil aani zala tar fayadach hoil.
    melawyachi sampurna mahiti milel ka?

    • 07/01/2010 येथे 12:13 pm

      स्वप्ना सप्रे,

      माझी व इंग्रजीची फारकत आहे असे समजू नये. पण इतकी सुंदर भाशा व देवनागरी सारखी लिपी मिळालेल्या भाषेला तुच्छ का समजायचे ते मात्र कळत नाही. व्यवसायासाठी इंग्रज इथे आले तेव्हा मराठीच काय ते मोडी सारखी लिपी ही शिकले, पण त्यांनी त्यांची इंग्रजी सोडली नाही तर आम्हालाच शिकायला लावले. आम्ही मात्र ते करतांना आमचे मात्र विसरत चाललो आहोत.

      आपणास वाटते इतके मराठी टाईपिंग अवघड नाही, त्याबाबत आपण नक्की पुन्हा बोलू.
      आपल्या ब्लॉग ची माहीती व आपला फोन नंबर मला मेल करावा. मेळाव्या संबंधीची माहीती ब्लॉग वर दिली जाईलच. आपण अवश्य उपस्थित रहावेत.

  9. 07/01/2010 येथे 12:34 pm

    सुरेशजी,
    ब्लॉग मेळाव्याला मिळणारा प्रतिसाद चांगलाच आहे. शिवाय स्टारचे पत्रकारही येताहेत म्हटल्यावर या मेळाव्याच्या प्रसार आणि प्रचारही चांगला होईल.
    माझ्या तर्फे मी – ब्लॉगर्स मेळाच्याचे विजेट करुन ते सर्वांनाच ब्लॉगवर लावण्यासाठी निवेदन ब्लॉग, ट्विटर आणि ई-मेल वरुन करत आहे. सदर विजेट आणि कोड माझ्या ब्लॉगवर आहे.

    तेंव्हा सर्व ब्लॉगर्सनी ते आपापल्या ब्लॉगवर चिकटवुन हा मेळावा यशस्वी होण्यासाठी / प्रचारासाठी मदत करावी.
    तुम्ही जरी हजर राहु शकत नसला तरीही तुमच्या ब्लॉगवर हे विजेट दाखवुन तुम्ही तुमच्या विजिटर्स ना मेळाव्या बद्दल माहिती द्या!

  10. 07/01/2010 येथे 12:38 pm

    yenar yanar nakki yanar…
    majyakadun kahi madat zali tar khup anand hoil..

  11. swapna sapre
    07/01/2010 येथे 12:42 pm

    dhanyawaad sir.
    marathishi maze wakade aahe ase nahi.me swata marathi shalet shikale aani jithe shakya aahe tithe marathich waparate aani waparayala lawate…..shakya tithe lokanche marathi sudharat asate…..marathi typing chi saway nahi tyamule prashna aahe…..saway zali ki mag vyawasthit hoil…..
    maza blog ya site war takalela aahe.SWAPNALU SWAPNA ya navane….
    nuktich suruwat aahe tyamule khupach sadhe-sadhe lihilele aahe.
    tumacha mail ID kaay aahe……
    ya sitewar bhanjalali aahe.kalat nahiye kahich….
    ..

  12. 07/01/2010 येथे 8:20 pm

    उत्कृष्ट कल्पना आहे ही..मला ही आवडेल यायला

  13. 08/01/2010 येथे 12:46 pm

    सुरेश पेठे,
    नमस्कार
    सर्वप्रथम आपले अभिनंदन. एक चांगला उपक्रम आपण हाती घेतला आहे. मराठी ब्लॉगच्या माध्यमातून किंवा ब्लॉगवरील प्रतिक्रियेच्या माध्यमातून सर्व मंडळी एकमेकांना भेटत असतात. पण प्रत्यक्ष भेटीचा कार्यक्रम आयोजित करुन एक चांगली सुरुवात आपण केली आहे. या मेळाव्याला शुभेच्छा.
    मी ही ब्लॉगधारक असून पूर्वी जोशीपुराण आणि आता पुन्हा एकदा जोशीपुराण हा ब्लॉग चालवतो. खरे म्हणजे मेळाव्यासाठी यायला मलाही आवडले असते. पण त्या दिवशी सुट्टी नसल्याने जमू शकणार नाही. असो.
    पुन्हा एकदा आपले अभिनंदन आणि शुभेच्छा
    कळावे,
    आपला
    शेखर जोशी

  14. 08/01/2010 येथे 1:27 pm

    श्री. शेखर जोशी,
    आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. मेळवा ४ ते अंदाजे ७ पर्यंत चालावा. मधे कधीही थोडा वेळ काढता आला व तेथे आलात तर आपले स्वागत आहे. अन्यथा माझा e mail ID दिलेला आहे, मला मेल करून फोन नं. कळवावा म्हणजे मला संपर्क करणे सोपे जाईल.

  15. 09/01/2010 येथे 2:46 सकाळी

    भुंग्याच्या ब्लॉगवर ही कल्पना वाचन मला खरं सांगायचं तर जळायला झालं होतं. पुण्यातल्या मंडळींचाच मेळावा म्हणजे काय? पण ही पोस्ट वाचून शंका दूर झाली.जिवास आनंद बहुत जाहला! मला यायला नक्की आवडेल. येणं जमविण्याचा प्रयत्न करेन.

  16. 09/01/2010 येथे 7:13 सकाळी

    शिल्पाजी,
    जळायंच कारणच काय? आपण सारेच एकत्र येतोय जमलंच तर इतरेजना जळवायाला ! आता यायचंयंच हे पक्कं ! मला आपली माहिती व फोन नं. मेल कराल ? पत्ता मेन पोस्ट वर आहेच.

  17. 15/01/2010 येथे 10:33 pm

    स्वप्नाजी,

    आपण http://www.baraha.com वापरा ना. आपण जे आंग्लभाषेत लिहिले आहेत तेच देवनागरी लिपीमधे बदलु शकता

  1. No trackbacks yet.

यावर आपले मत नोंदवा