Archive

Posts Tagged ‘ब्लॉगर्स मीट’

मराठी ब्लॉगर्सचा स्नेह मेळावा, पुण्यात

मराठीब्लॉग्स नेट वर  नोंदलेल्या व इतरही मराठीत नियमीत लिहिणाऱ्या पुण्यातील ब्लॉगर्सचा एक स्नेहमेळावा येत्या रविवारी दिनांक १७ जानेवारी २०१० रोजी संध्याकाळी ४ वाजता , सिंहगड रोड येथील पु. ल. देशपांडे उद्यानात ठरविला आहे.
पु. ल. देशपांडे उद्यान संध्याकाळी ४ ला उघडते. उद्यानाची प्रवेश फी रू ५/- आहे.
पहिल्या भेटीचा उद्देश एकमेकांचा परिचय करून घेणे हा्च मुख्यत: असेल, तरीही ह्या भेटीत पुढील कार्यक्रमांची रूपरेषा व वारंवारिता ठरवणे, त्याचे ठिकाण, आपापल्या ब्लॉग्स ची माहीती व इतर आवश्यक बाबींवर चर्चा करता येईल.
तरी ह्या स्नेह मेळाव्याला आपण उपस्थित रहावे, तसेच आपल्या माहीतीतल्या सर्व ब्लॉगर्स ना ह्याची कल्पना देऊन त्यानाही येण्यास उद्युक्त करावे अशी मी नम्र विनंती करीत आहे. आपण खात्रीने येणार असल्याची नोंद, आपले नाव व फोन नं. सहीत येथेच आपल्या उत्तरात करावी म्हणजे त्याचेशी संपर्क करणे सोयीचे होईल. ह्या पुढील कार्यवाही आपल्या प्रतिसादावर अवलंबून असेल.
आपले,
सुरेश पेठे
अनिकेत समुद्र
( ता.क. — आपण मला ९८५०४८८६४० वर SMS  करा अथवा  sureshpetheAtgmail Dotcom – वर मेल करा. )
प्रवर्ग: अवांतर टॅगस्

ब्लॉगर्स मीट

01/01/2010 5 comments
ब्लॉगर्स मीट
~~~~
माझ्या दावणगिरी डोसा संबंधीच्या ब्लॉग वर खालील कविता उत्तरा दाखल टाकली आहे, ती येथे पुन्हा उद्धृत करीत आहे.
~~~~
भांडता रे काय तुम्ही
निमीत्ते दावणगिरी,
जणू निघाले हे वीर
आणावया द्रोणागिरी  ॥
….
’जून’ कां रे लांब आहे
गांठू या ना हाच पल्ला,
वगळा वगळी उगा
का बिच्चारीवर हल्ला ॥
……..
अनिकेत वा अजय
अपर्णा असूद्या, तन्वी
मनमौजी सह सर्व,
मंडळी मजला हवी ॥
….
ब्लॉगर्सची मोट बांधू
घेऊनी सर्वांना घट्ट
भांडाभांडी, टुकटुक
नका ना रे ताणू हट्ट  ॥
….
सुरेश पेठे
~~~~~~
तेथे जरी ही गम्मत म्हणून टाकली असली तरि त्या  पोस्ट वरून ह्या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतोय. भुंगाने त्यांच्या ब्लॉगवर त्यासाठी पोलिंग ठेवले आहेच व त्यास हळू हळू समर्थन मिळत आहे. तेव्हा त्यावर  थोडासा अधिक परिपूर्ण विचार करता यावा….. माझी घट्ट मैत्रीण तन्वी अनायसे  जून मध्ये भारतात येत आहे, तेव्हा ही वेळ ह्या मीट साठी योग्य व पुरेशी वाटतेय म्हणून मी हा विषय वेगळी पोस्ट येथे देऊन सर्वांसमॊर विचाविनिमयासाठी ठेवत आहे.
पुणे हे अश्या नव्या उपक्रमांसाठी प्रसिध्द ठीकाण आहेच. ते मध्यवर्तीही आहे, म्हणून सुचवले इतकेच, पण सर्वांच्या सम्मतीने त्याबाबत ठरवता येईल.
शिवाय प्रोग्रॅमचे स्वरूप कसे असावे, त्याला जोडून अधिक काय जोड देता येईल ह्याबाबत प्रत्येकाने आपापले विचार येथे मांडावे अशी अपेक्षा आहे.
करा तर सुरू त्यावर विचार व मांडा ते इथे.
प्रवर्ग: अवांतर टॅगस्