Archive
मी येतोय !
बर्याच दिवसांच्या विश्रांती नंतर मी परत येतोय माझ्या मनातील गर्दी केलेल्या विषयांना घेऊन.
2010 in review
The stats helper monkeys at WordPress.com mulled over how this blog did in 2010, and here’s a high level summary of its overall blog health:
The Blog-Health-o-Meter™ reads Wow.
Crunchy numbers
A Boeing 747-400 passenger jet can hold 416 passengers. This blog was viewed about 11,000 times in 2010. That’s about 26 full 747s.
In 2010, there were 39 new posts, growing the total archive of this blog to 58 posts. There were 72 pictures uploaded, taking up a total of 39mb. That’s about 1 pictures per week.
The busiest day of the year was January 7th with 437 views. The most popular post that day was मराठी ब्लॉगर्सचा स्नेह मेळावा, पुण्यात .
Where did they come from?
The top referring sites in 2010 were marathiblogs.net, WordPress Dashboard, sahajach.wordpress.com, bhunga.blogspot.com, and mr.wordpress.com.
Some visitors came searching, mostly for रांगोळ्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छा, संस्कार भारती rangoli, नाशिक, and ravi paranjape.
Attractions in 2010
These are the posts and pages that got the most views in 2010.
मराठी ब्लॉगर्सचा स्नेह मेळावा, पुण्यात January 2010
125 comments
माझ्या रांगोळ्या December 2009
11 comments
नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! January 2010
10 comments
माझे मनोगत January 2010
21 comments
मग काय येताय ? June 2010
15 comments and 3 Likes on WordPress.com
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
नूतन वर्ष के लिये शुभ कामनाये।
Happy new year !
मराठी ब्लॉगर्स : चला पहिल्या मेळावाच्या स्मृती जागवूया
आपल्यातील एक मराठी ब्लॉगर स्वप्ना सप्रे पुण्यात १६ जानेवारीला एक मेळावा घेण्याचे ठरवित आहे.
आपला जो पहिला मेळावा झाला होता ( १७ जाने २०१० ला पु. ल. देशपांडे उद्यानात ) त्याला १ वर्ष होत आहे त्या निमीत्ताने हा सोहळा व्हावा अशी ईच्छा तिने बोलून दाखवली आहे ! गेल्या वेळी त्या सोहळ्यात माझा जरी सहभाग प्रामुख्याने होता तरीही अनिकेत समुद्र , दिपक शिंदे , पंकज झरेकर , विक्रांत देशमुख, गौरी ह्यांचे संपूर्ण सहकार्य मिळाले व पुण्यात अश्या पध्दतीने साजऱ्या झालेल्या सोहळ्याने अनेकांच्या आशा पालविल्या गेल्यात आणि पुढे ’मराठी मंडळी’ ही आपली हक्काची जागा ही तयार झाली.
आता पुन्हा सर्व तरुणांनी पुढे यावे व गेल्या वर्षीच्या त्या सोहळ्याची आठवण करीत / ठेवीत पुढील वाटचाल करावी असे मला वाटते.
बघा आपण सर्वांना जर पटत असेल तर चला एखादी भेट ठरवूया व कामाला लागूया अजून तीन तरी आठवडे आहेत आपल्या हातात. सगळे तयार असाल तर मी अर्थातच आपल्याच सोबत असेन.
मग सांगा काय विचार करताय ते ?
वाढदिवस मित्राचा
वाढदिवस मित्राचामागे मी आमच्या हनुमान मंडळा बद्दल एक लेख लिहीला होता. अलिकडे लांब पडते, त्यात पाऊस म्हणून मी अधून मधून तिकडॆ जाण्याला मी अळंमटळंम करतो. त्यातून जास्त करून स्केचिंग वर्गा्ची जबाबदारी आल्यापासून श्री मृत्युंजयेश्वर मंदिरातच बहूतेक जात असतो. पण काल आमच्या एका मित्राचा आवर्जून फोन आला होता. आज श्री.कौजलगीकर, आमच्या मंडळातील एक सहचारी, ह्यांचा वाढदिवस आहे. मग मोर्चा MIT कडे वळविला. बरेच दिवसाने ह्या निमित्ताने आल्यामुळे सर्व भेटले. आजच्या दिवसाची सकाळ सगळ्यांच्या गाठी मुळे मजेत गेली. नेहमी प्रमाणे गाणी चालू असतांना ५-१० मिनिटात कौजलगीकराचे एक पेन्सिल स्केच केले व त्यावर त्यांची स्वाक्षरीही घेतली. हेच ते स्केच.
टा ss टा ss अनुजा
हेंच ते अर्धवट राहिलेले स्केच पण मला ह्या दिवसाची आठवण देत राहील!
” काका, तुम्ही एव्हढा मराठी ब्लॉगर्स चा मेळावा यशस्वीपणे संपन्न केला होता मी येऊ शकले नाही तेव्हा, आता करा ना तसा अॅरेंज ” अनुजा
” बाई ग तेव्हा मी काही एकटा नव्हतो, आणि तेव्हा तो होऊन गेला इतकेच.”मी.
” काही नाही आताही एक पोस्ट टाका, तुम्ही तेव्हा पाच सहा जमतील अशी अपेक्षा केलीत व साठचे वर जमलेत, आता फक्त गप्पांसाठीच जमायचे डझनभर तर जमतील ? ते काही नाही ! ”
एक स्त्री हट्ट… पण लगेचंच फोना फोनी होत आम्ही डझनभर लोक कसे सिंहगडावर जाऊन आलो हे वर वाचलेत / बघीतलेच. मस्कत हूनच आलेली तन्वी पण सहकुटूंब हजर होती!हीच ती तन्वी जिच्यामुळे माझा हा ब्लॉग तयार झाला. जिने स्वतंत्र पोस्ट टाकून सर्वांना माझी ओळख करून दिली होती. सध्या म्हणे ती भारतातच आहे पण मस्कतहून ही दूर गेल्या सारखी भासावी इतकी इथे गुरफटून गेलीय, की साधा फोन हातात घ्यायलाही फुरसत नाहीय्ये !
पण ती उणीव मस्कतच्याच अनुजाने भरून काढली ती इथे असे पर्यंत जवळ जवळ एक दिवसा आड फोन यायचा. पाच सहा वेळा आम्ही भेटलोही. तिच्या मनमोकळ्या व अघळपघळ गपा मला सतत आठवत राहातील.
नुकतेच नाशिकचे श्री. कोष्टी साहेब आता पुण्यात बदलून आले आहेत. ते त्या वेळी सिंहगडावर येऊ शकले नव्हते.
मग परवा कांदे नवमीला आम्ही तिघेच मुद्दाम एकत्र जमलो होतो निमीत्त होते अनुजाला send off !
अश्शीच ट्रीट तन्वीलाही देण्याची इच्छा आहे… पण बाई साहेबांनावेळ? असो
आज आता, ती मस्कतला पोहोचायच्या वाटेवर असणार आहे.
टा ss टा ss अनुजा
आणि सरतेशेवटी आमची ’ मीट ’ झालीच !
आणि सरतेशेवटी आमची ’ मीट ’ झालीच !
मी नेमका हंपी येथे आमच्या चित्रकारांच्या कार्यशाळेला गेलो होतो व आदल्या दिवशी उशीरा परतलो होतो. त्यामुळे सगळी व्यवस्था अनुजावर सोपवून गेलो होतो व तिने ही ती अगदि चोख बजावलेली होती. मी येईतॊ तिचा फोन सतत चालू होता. पुण्यातील मराठी ब्लॉगर्स कसे हो आले नाही असा एक अगदिच बालिश प्रश्न तिने विचारला होता ! अर्थात मीहि तो पुणेरी पध्दतीने टोलविला होता. काय सांगणार होतो मी तिला ! मागील पहिल्याच मेळाव्याला साठच्यावर पुणेरी कसे काय हजर होते हा प्रश्न मी आजही माझ्या स्वत:लाच विचारीत असतो, असो.
आदल्या रात्री आम्ही कोथरुड येथिल रेल्वे म्युझियम मागील नवीन हॉटेलात जमलो तेव्हा आकडा ५-६ चे पुढे जाणार नाहीसे वाटत होते. पण सरते शेवटी आम्ही एक डझनावर जमलो होतो हेही नसे थोडके !
दुसऱ्यादिवशी म्हणजे २० तारखेला ठरल्या वेळी आम्ही शनिवार वाड्या जवळील बस स्टॉप वर जमा झालो. अर्थात पहीली बस चुकलीच. मग सगळे शनिवार वाडा बघायला गेलॊ. आजच्या मेळाव्याला बरेच मुंबईकर, हैदराबादहून आनंद तर मस्कत हून आलेली अनुजा ह्यांनी शनिवार वाडा बघितला नव्हता.
नंतर बसने घाटगे बोटॅनिकलला पोचले सगळ्यांचे पैसेही भरले व आता तॊ पावती करणार तेव्ह्ढ्यात प्रचंड खळबळ माजली व सर्वानुमते सिंहगडला जायचे ठरले कारण तॊही खूप जणांनी पाहिलेला नव्हता.नाशिकहून गाडी करून आलेली तन्वी व तिच्जे यजमान अमित व मुलेही आम्हास जॉईन झाली. भरलेले पैसे परत करतांनाचा चेहरा बघण्या लायक झाला होता !
आज रविवारचा सुटीचा वार असल्याने सिंहगडावर प्रचंड गर्दी झालेली होती.
गाड्यांचा ’खच’ होता. मोटार सायकली तर काळ्या मुंग्यांसारख्या दिसत होत्या मात्र त्याच्या सारख्या शिस्तीचा मात्र प्रचंड अभाव पदोपदी जाणवत होता.( खरे तर पावले टाकणेच अवघड जात होते. )
खालच्या टप्प्यावर कसे तरी पोचलो एकदाचे. मग मात्र आमच्या गप्पांना ऊत आला. खरपूस कांदा भजींच्या प्लेटी वर प्लेटी रिचवल्या जाऊ लागल्या ! साथीला सुमधूर ताकांचे ग्लास व मडक्यातील दही आणि पुढे गडावरची भ्रमंती, तीही ढगांच्या दुलईत लपेटलेली व आम्ही मंडळी झपाटलेली ! अधुन मधुन पावसाच्या सरी, मग काही विचारायलाच नको, तहान भुकेचीही ना राहीली पर्वा.
आता मात्र खाली उतरायची लगबग सुरू झाली ! खाली उतरायला रस्त्याचाच आधार घेणे जरूरीचे होते ना. परततांना मोटारसायकलींच्या सुळसुळाटीला कुठलीच उपमा देणे अशक्य आहे ! कसेतरी एकदाचे आम्ही खाली पोहोचलो व लगेचच एका दिवसा साठी जमलेले आम्ही तत्काळ चारी दिशेला पांगलो.
माझा कॅमेरा नेमका माझ्यावर रुसला होता त्यामुळे आता इतरांनी फोटो पाठवलेत की मी ते इथॆ देत राहीनच.
हे आहेत मी काढलेले फोटो :-
मग काय येताय ?
ह्या ब्लॉग ची निर्मिती होण्याला माझी एक मैत्रीण तन्वी कारणीभूत झालेली होती. तिच्याच मस्कत गावात रहाणारी अनुजा माझी नंतर मैत्रीण झाली. योगायोग बघा दोघीही सध्या भारतात आलेल्या आहेत. मात्र माझी नंतर मैत्रीण होऊन सुध्दा माझी प्रत्यक्ष गांठ मात्र प्रथम पडत्येय ती अनुजाशी.
आज आम्ही जवळ जवळ दोन तास एकत्र इकडच्या तिकडच्या गप्पा हाणीत बसलो होतो. गप्पाच्या ओघात अनेक विषय येत होते. त्यातच दावणगिरी डोश्याचा पण विषय निघाला. मागे मी त्या संबधात एक पोस्ट टाकली होती व त्यावरून ’भांडणे’ होत होत, मग अनिकेत शी पहीली गांठ कशी पडली व त्याचे पर्यवसान मराठी ब्लॉगर्स च्या पहिल्याच यशस्वी मेळाव्यात कसे घडले ह्याचा वृतांत रवंथ करून झाला !
तेव्हा अनुजाने त्या सर्वांची पुन्हा भेट नाही का घडवून आणता येणार ? व तुम्ही म्हणजे ’मी’ असे काहीही घडवून आणू शकतो ह्या विश्वासाने ती जबाबदारी माझ्यावर सोपवून ती मात्र निर्धास्त झाली ! मग काय करणार एक स्त्री हट्ट… लागलो बिच्चारा कामाला , आणि मग फोनाफोनी सुरू झाली. पहीली ठरली तारीख…२० जून २०१० , आणि पुण्यात. अर्थात त्या तारखेला पुण्यात असणाऱ्या सर्व मराठी ब्लॉगर्स ना आग्रहाचे निमंत्रण ! शिवाय तेरा दिवस आधी सांगतोय आपापल्या कॅलेंडर वर नोंद करीत त्या प्रमाणे ठरवून येण्या साठी. नंतर तक्रार नको !
ठिकाण १) सिंहगडाच्या पायथ्याशी असलेले घाटगे फॉर्म कींवा २ ) वरसगाव धरणाला लागून असलेले सूर्य शिबीर ह्यापैकी एक, आणि खर्च अंदाजे रू. ५००/- पर्यंत असावा, अर्थातच ’सोल्जर कॉन्ट्रीब्युशन ! वेळ सकाळची, नाष्टा पाणी, जेवण…गप्पा टप्पा व परत… कुठलेही भाषण नाही, ठराव नाहीत …फक्त मौज मज्जा ! बरेच जण खात्रीने येणार असतील तर गाडी मिळत्येय का बघू, नाहीतर आपापले एकेक ..दोघे करीत करीत पोहोचू !
मग काय येताय ?
पटापट इथेच फक्त येणारांनीच नावे द्या !
माझ्या कोंबड्यांची शान
आज मी तुम्हाला कोंबड्यांचे विलोभनीय दर्शन घडवणार आहे.
दैनिक जागरण, सिटी प्लस, ह्यांची दखल
संस्कार भारती, संभाजी भाग पुणे, ह्यांच्या विद्यमाने वस्तू आणि व्यक्ती चित्रणाचे साप्ताहिक वर्ग शनिवार दिनांक १७ एप्रिल २०१० पासून दर शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्यावेळेत मृत्युंजयेश्वर मंदीर, कर्वे रोड, पुणे येथे सुरू झाले आहेत. ह्या वर्गाची दखल दैनिक जागरण, सिटी प्लस, कोथरूड / पौड रोड, ह्यांनी त्यांच्या बुधवार दिनांक २८ एप्रिल,२०१० च्या अंकात घेतली.
फोटोवर क्लिक कारा !
ह्या वर्गाचे शुल्क अत्यल्प म्हणजे रुपये २००/- फक्त संपूर्ण वर्षासाठी आहे ( एप्रील ते मार्च ). ह्या वर्गाला येणाऱ्यांना दर रविवारी वरील शुल्कात ठिकठिकाणी होणाऱ्या निसर्गचित्रण वर्गानांही उपस्थित रहाता येणार आहे तसेच वेळोवेळी मान्यवर चित्रकारांचे मार्गदर्शनही उपलब्ध होणार आहे व कोणत्याही वयाच्या स्त्री पुरूषास प्रवेश घेता येईल. ज्यांना चित्रकलेची मनापासून आवड आहे व नित्य नियमाने सराव करण्याची इच्छा आहे, अश्यांना निश्चितपणे लाभ करून घेता येणार आहे.
अलीकडील टिप्पण्या