Archive

Archive for 27/07/2010

वाढदिवस मित्राचा

वाढदिवस मित्राचा
मागे मी आमच्या हनुमान मंडळा बद्दल एक लेख लिहीला होता. अलिकडे लांब पडते, त्यात पाऊस म्हणून मी अधून मधून तिकडॆ जाण्याला मी अळंमटळंम करतो. त्यातून जास्त करून स्केचिंग वर्गा्ची जबाबदारी आल्यापासून श्री मृत्युंजयेश्वर मंदिरातच बहूतेक जात असतो. पण काल आमच्या एका मित्राचा आवर्जून फोन आला होता. आज श्री.कौजलगीकर, आमच्या मंडळातील एक सहचारी, ह्यांचा वाढदिवस आहे. मग मोर्चा MIT कडे वळविला. बरेच दिवसाने ह्या निमित्ताने आल्यामुळे सर्व भेटले. आजच्या दिवसाची सकाळ सगळ्यांच्या गाठी मुळे मजेत गेली. नेहमी प्रमाणे गाणी चालू असतांना ५-१० मिनिटात कौजलगीकराचे एक पेन्सिल स्केच केले व त्यावर त्यांची स्वाक्षरीही घेतली. हेच ते स्केच.

वाढदिवस मित्राचामागे मी आमच्या हनुमान मंडळा बद्दल एक लेख लिहीला होता. अलिकडे लांब पडते, त्यात पाऊस म्हणून मी अधून मधून तिकडॆ जाण्याला मी अळंमटळंम करतो. त्यातून जास्त करून स्केचिंग वर्गा्ची जबाबदारी आल्यापासून श्री मृत्युंजयेश्वर मंदिरातच बहूतेक जात असतो. पण काल आमच्या एका मित्राचा आवर्जून फोन आला होता. आज श्री.कौजलगीकर, आमच्या मंडळातील एक सहचारी, ह्यांचा वाढदिवस आहे. मग मोर्चा MIT कडे वळविला. बरेच दिवसाने ह्या निमित्ताने आल्यामुळे सर्व भेटले. आजच्या दिवसाची सकाळ सगळ्यांच्या गाठी मुळे मजेत गेली. नेहमी प्रमाणे गाणी चालू असतांना ५-१० मिनिटात कौजलगीकराचे एक पेन्सिल स्केच केले व त्यावर त्यांची स्वाक्षरीही घेतली. हेच ते स्केच.

श्री.कौजलगीकर गाणे गात असतांना.

प्रवर्ग: Uncategorized