टा ss टा ss अनुजा
हेंच ते अर्धवट राहिलेले स्केच पण मला ह्या दिवसाची आठवण देत राहील!
” काका, तुम्ही एव्हढा मराठी ब्लॉगर्स चा मेळावा यशस्वीपणे संपन्न केला होता मी येऊ शकले नाही तेव्हा, आता करा ना तसा अॅरेंज ” अनुजा
” बाई ग तेव्हा मी काही एकटा नव्हतो, आणि तेव्हा तो होऊन गेला इतकेच.”मी.
” काही नाही आताही एक पोस्ट टाका, तुम्ही तेव्हा पाच सहा जमतील अशी अपेक्षा केलीत व साठचे वर जमलेत, आता फक्त गप्पांसाठीच जमायचे डझनभर तर जमतील ? ते काही नाही ! ”
एक स्त्री हट्ट… पण लगेचंच फोना फोनी होत आम्ही डझनभर लोक कसे सिंहगडावर जाऊन आलो हे वर वाचलेत / बघीतलेच. मस्कत हूनच आलेली तन्वी पण सहकुटूंब हजर होती!हीच ती तन्वी जिच्यामुळे माझा हा ब्लॉग तयार झाला. जिने स्वतंत्र पोस्ट टाकून सर्वांना माझी ओळख करून दिली होती. सध्या म्हणे ती भारतातच आहे पण मस्कतहून ही दूर गेल्या सारखी भासावी इतकी इथे गुरफटून गेलीय, की साधा फोन हातात घ्यायलाही फुरसत नाहीय्ये !
पण ती उणीव मस्कतच्याच अनुजाने भरून काढली ती इथे असे पर्यंत जवळ जवळ एक दिवसा आड फोन यायचा. पाच सहा वेळा आम्ही भेटलोही. तिच्या मनमोकळ्या व अघळपघळ गपा मला सतत आठवत राहातील.
नुकतेच नाशिकचे श्री. कोष्टी साहेब आता पुण्यात बदलून आले आहेत. ते त्या वेळी सिंहगडावर येऊ शकले नव्हते.
मग परवा कांदे नवमीला आम्ही तिघेच मुद्दाम एकत्र जमलो होतो निमीत्त होते अनुजाला send off !
अश्शीच ट्रीट तन्वीलाही देण्याची इच्छा आहे… पण बाई साहेबांनावेळ? असो
आज आता, ती मस्कतला पोहोचायच्या वाटेवर असणार आहे.
टा ss टा ss अनुजा
चित्रकला छान आहे तुमची!!! सेंड ऑफ ला असेच एक छान चित्र पाठवा अनुजाना. त्यांनाही आवडेल.
नमस्कार काका,
आपण तर ह्या पोस्ट ने अधर्वट राहिलेले स्केच पण पूर्ण केलेत. मी अजूनही पुण्यातच आहे फक्त मस्कत मधून आपणा सर्वांशी संपर्क साधते. आपण पुण्यात होता म्हणून व आपला स्वभाव पण मन मोकळा आहे ह्या दोन कारणांमुळे आपुलकी जाणवत राहिली. आज माझ्यावर पोस्ट केलीत हेच मला इकडे राहण्यास पुरेसे बळ देईल. लवकरच पोस्ट मधून गप्पा करण्यास येईन. सेंड ऑफ नसून पुनर्भेट लवकर होण्यासाठी अशा आठवणी मनाच्या गुलदस्त्यात असाव्यात. श्री. रवींद्र कोष्टी पण अगदी सहज मोकळे पणाने संवाद करतात हेच तर मैत्री च्या टाळी करता दोन्ही हाताची गरज असते दाखवून देतात. पोस्ट वाचून खूप भारावून गेले आहे. अधिक काय लिहू?
हेमंत,
आपल्या इतक्या सुंदर अभिप्राय च्या भेटीने खूप आनंद झाला. अशा कितीतरी आठवणींनी मनरूपी कागदावर कधीच स्केचेस काढली आहेत. काकांची स्केचेस खूप बोलकी असतात. आपणही भेटलो असतो तर आवडले असते. असेही खूप जण आहेत कि जे मला काहीही झाले तरी आवर्जून भेटतील असे वाटत होते पण त्यांच्या कामाच्या व्यस्तते मुळे जमले नाही असो, काही जण पुढील वर्षी मी येईन तेंव्हा तरी भेटतील असा विश्वास अजूनही आहे. मैत्री ची टाळी पूर्ण करण्याकरता माझा हात नेहमीच स्वागत करतो. असो. स्केच आवडले आहेच पण आपला हा दृष्टीकोन सुद्धा खूप भावला. पुढल्या स्केच मध्ये जे राहिले ते पण असेल.
नमस्कार
तुम्ही पुण्यात मेळावा आयोजित केलात तर मला येता येईल. मला आवडेल.