Archive

Archive for 22/07/2010

टा ss टा ss अनुजा

22/07/2010 5 comments
दिवस काय भराभर निघून गेलेत. मागच्याच महिन्यात मला एक फोन आला होता,
” मी अनुजा ! अनुक्षरे “.
मी म्हटले, ” मस्कतहून बोलत्येस?”
“नाही काका मी पुण्यात आलेय, कधी भेटुया? “
“आत्ता, म्हणजे आज सुध्दा !”
” कुठे कधी ? ” अनुजा.
” तुझ्यावर सोपवतो, मी काय रिकामटेकडाच असतो.”
” आज संध्याकाळी सहाला, दिन दयाल बागेत. “
” उत्तम ! ठरले “
मी थोडा आधीच जाऊन मुख्य दरवाज्या समोरील बाकड्यावर बसून शबनम मधील स्केच बुक काढून स्केच काढायला सुरुवात केली. थोडा वेळ उगाचंच बागेत येणाऱ्यांकडे पहात राहीलो व नंतर लक्षात आले की मी तर ह्या अनुजाला ओळखतही नाही व तिचा कुठे फोटोही पाहिलेला नाही मग मी कोणाला शोधू ? मी आपला स्केच काढीत राहीलो. पण फार वेळ थांबावे लागले नाही, एक मध्यमवयीन ’बाई’ माझ्या पुढ्यात येऊन माझे स्केच पाहू लागली. हा अनुभव नवीन नव्हता त्यामुळे माझे तिच्याकडे विशेषसे लक्ष गेले नव्हते.
“मी अनुजा ! ” माझ्या शेजारी बाकड्यावर बसत म्हणाली आणि प्राथमिक ओळखीची देवाणघेवाण झाली व लगेचंच गप्पाचा ओघ सुरू झाला. मी आपले स्केचबुक बंद करीत शबनम मधे ठेवले व गप्पात सहभागी झालो.

हेंच ते अर्धवट राहिलेले स्केच पण मला ह्या दिवसाची आठवण देत राहील!


” काका, तुम्ही एव्हढा मराठी ब्लॉगर्स चा मेळावा यशस्वीपणे संपन्न केला होता मी येऊ शकले नाही तेव्हा, आता करा ना तसा अ‍ॅरेंज ” अनुजा

” बाई ग तेव्हा मी काही एकटा नव्हतो, आणि तेव्हा तो होऊन गेला इतकेच.”मी.

” काही नाही आताही एक पोस्ट टाका, तुम्ही तेव्हा पाच सहा जमतील अशी अपेक्षा केलीत व साठचे वर जमलेत, आता फक्त गप्पांसाठीच जमायचे डझनभर तर जमतील ? ते काही नाही ! ”

एक स्त्री हट्ट… पण लगेचंच फोना फोनी होत आम्ही डझनभर लोक कसे सिंहगडावर जाऊन आलो हे वर वाचलेत / बघीतलेच. मस्कत हूनच आलेली तन्वी पण सहकुटूंब हजर होती!हीच ती तन्वी जिच्यामुळे माझा हा ब्लॉग तयार झाला. जिने स्वतंत्र पोस्ट टाकून सर्वांना माझी ओळख करून दिली होती. सध्या म्हणे ती भारतातच आहे पण मस्कतहून ही दूर गेल्या सारखी भासावी इतकी इथे गुरफटून गेलीय, की साधा फोन हातात घ्यायलाही फुरसत नाहीय्ये !

पण ती उणीव मस्कतच्याच अनुजाने भरून काढली ती इथे असे पर्यंत जवळ जवळ एक दिवसा आड फोन यायचा. पाच सहा वेळा आम्ही भेटलोही. तिच्या मनमोकळ्या व अघळपघळ गपा मला सतत आठवत राहातील.

नुकतेच नाशिकचे श्री. कोष्टी साहेब आता पुण्यात बदलून आले आहेत. ते त्या वेळी सिंहगडावर येऊ शकले नव्हते.

मग परवा कांदे नवमीला आम्ही तिघेच मुद्दाम एकत्र जमलो होतो निमीत्त होते अनुजाला send off !

अश्शीच ट्रीट तन्वीलाही देण्याची इच्छा आहे… पण बाई साहेबांनावेळ? असो

आज आता, ती मस्कतला पोहोचायच्या वाटेवर असणार आहे.
टा ss  टा ss अनुजा

प्रवर्ग: Uncategorized