मुखपृष्ठ > Uncategorized > आणि सरतेशेवटी आमची ’ मीट ’ झालीच !

आणि सरतेशेवटी आमची ’ मीट ’ झालीच !

आणि सरतेशेवटी आमची ’ मीट ’ झालीच !

मी नेमका हंपी येथे आमच्या चित्रकारांच्या कार्यशाळेला गेलो होतो व आदल्या दिवशी उशीरा परतलो होतो. त्यामुळे सगळी व्यवस्था अनुजावर सोपवून गेलो होतो व तिने ही ती अगदि चोख बजावलेली होती. मी येईतॊ तिचा फोन सतत चालू होता. पुण्यातील मराठी ब्लॉगर्स कसे हो आले नाही असा एक अगदिच बालिश प्रश्न तिने विचारला होता ! अर्थात मीहि तो पुणेरी पध्दतीने टोलविला होता. काय सांगणार होतो मी तिला ! मागील पहिल्याच मेळाव्याला साठच्यावर पुणेरी कसे काय हजर होते हा प्रश्न मी आजही माझ्या स्वत:लाच विचारीत असतो, असो.

आदल्या रात्री आम्ही कोथरुड येथिल रेल्वे म्युझियम मागील नवीन हॉटेलात जमलो तेव्हा आकडा ५-६ चे पुढे जाणार नाहीसे वाटत होते. पण सरते शेवटी आम्ही एक डझनावर जमलो होतो हेही नसे थोडके !

दुसऱ्यादिवशी म्हणजे २० तारखेला ठरल्या वेळी आम्ही शनिवार वाड्या जवळील बस स्टॉप वर जमा झालो. अर्थात पहीली बस चुकलीच. मग सगळे शनिवार वाडा बघायला गेलॊ. आजच्या मेळाव्याला बरेच मुंबईकर, हैदराबादहून आनंद तर मस्कत हून आलेली अनुजा ह्यांनी शनिवार वाडा बघितला नव्हता.

नंतर बसने घाटगे बोटॅनिकलला पोचले सगळ्यांचे पैसेही भरले व आता तॊ पावती करणार तेव्ह्ढ्यात प्रचंड खळबळ माजली व सर्वानुमते सिंहगडला जायचे ठरले कारण तॊही खूप जणांनी पाहिलेला नव्हता.नाशिकहून गाडी करून आलेली तन्वी व तिच्जे यजमान अमित व मुलेही आम्हास जॉईन झाली. भरलेले पैसे परत करतांनाचा चेहरा बघण्या लायक झाला होता !

आज रविवारचा सुटीचा वार असल्याने सिंहगडावर प्रचंड गर्दी झालेली होती.
गाड्यांचा ’खच’ होता. मोटार सायकली तर काळ्या मुंग्यांसारख्या दिसत होत्या मात्र त्याच्या सारख्या शिस्तीचा मात्र प्रचंड अभाव पदोपदी जाणवत होता.( खरे तर पावले टाकणेच अवघड जात होते. )

खालच्या टप्प्यावर कसे तरी पोचलो एकदाचे. मग मात्र आमच्या गप्पांना ऊत आला. खरपूस कांदा भजींच्या प्लेटी वर प्लेटी रिचवल्या जाऊ लागल्या ! साथीला सुमधूर ताकांचे ग्लास व मडक्यातील दही आणि पुढे गडावरची भ्रमंती, तीही ढगांच्या दुलईत लपेटलेली व आम्ही मंडळी झपाटलेली ! अधुन मधुन पावसाच्या सरी, मग काही विचारायलाच नको, तहान भुकेचीही ना राहीली पर्वा.

आता मात्र खाली उतरायची लगबग सुरू झाली ! खाली उतरायला रस्त्याचाच आधार घेणे जरूरीचे होते ना. परततांना मोटारसायकलींच्या सुळसुळाटीला कुठलीच उपमा देणे अशक्य आहे ! कसेतरी एकदाचे आम्ही खाली पोहोचलो व लगेचच एका दिवसा साठी जमलेले आम्ही तत्काळ चारी दिशेला पांगलो.

माझा कॅमेरा नेमका माझ्यावर रुसला होता त्यामुळे आता इतरांनी फोटो पाठवलेत की मी ते इथॆ देत राहीनच.

हे आहेत मी काढलेले फोटो :-

शनीवार वाड्या पुढे आम्ही सारे

शनीवार वाड्या पुढे आम्हीच

शनिवार वाड्याच्या सज्ज्यात गप्पा चालूच

अनुजा वाढदिवसाचा केक तोडतांना ! ( सुरी विसरली....होती ती कांद्याची ! ) बाजूला आहेत , तन्वीची मुले..गौरी आणि इशान

प्रवर्ग: Uncategorized
 1. anuja
  21/06/2010 येथे 5:57 pm

  kaka,

  chotishi post pan mast lihilit. shabdani je mandalet tyala camerachi univ janavali nahi. jevhade jamalo hoto tyat apulki v jivhala hota ki jo blog peksha khupach motha aahe. ashach mothya athavani manachya kupit ghevun parat muscat la javu. athavani mitraichya japavyat. je nahi aale tyani tyncha susnvad tyanich chukavila.
  kaka, punha ekada sarvanche koutuk ki avarjun ekmekana vel devun bhetanyas aale.

  • सुरेश पेठे
   21/06/2010 येथे 10:06 pm

   अनुजा खरा तर जिव्हाळा आपापल्या कोषातून बाहेर पडले तर वाढतो. आम्ही पुणेकर ( मी जन्माने नाशिकचा असलो तरी गेली पन्नास वर्षे पुण्यात काढलीत तेव्हा मी ही पुणेकरच की ! ) थोडे आपापल्या कोषात ज्यास्त मश्गुल असतो हे खरेच आहे. त्यामुळे असेल कींवा मला आमच्या पुणेकर मित्रांशी सुसंवाद करण्यास अपुरा वेळ मिळाला असेल , अथवा ती मंडळी खरोखरीच अत्यंत कामात गढलेली असतील, पण कालच्या ’ मीट ’ ला आम्ही एक दोघेच पोहोचलो हे खरे आहे. मात्र ठिकठिकाणाहून जे आवर्जून आले त्यांचे खरोखरीच कौतुक आहे. अगदि मस्कतसुध्दा आता लांब मानायची गरज नाही. तन्वीचे तर मला खरंचच कौतुक वाटते, एव्हढ्या कमी वेळा साठी आलेली मुद्दाम वेळात वेळ काढून सहकुटुंब सिंहगडावर आली.

   • सुरेश पेठे
    21/06/2010 येथे 10:28 pm

    हो ss ! आणि अत्यंत महत्वाचे सांगायचे राहीलेच. त्यादिवशी अनुजाचा वाढदिवस होता (!) व हे, ही बाई सकाळी आम्ही दोघेच रिक्षाने बस साठी निघालो व रिक्षा बेकरी पाशी केक घेण्यासाठी थांबवली तेव्हा सांगते ! ते ही इतरांना न सांगण्याची ताकीद देऊन ! surprize द्यायचे होते ना सगळ्यांना ! तरीही अनुजा, तुझे प्रेझेंट मात्र माझ्याकडे उधार राहीले बरं कां !

  • 22/06/2010 येथे 10:22 सकाळी

   व्वा… मस्त मजा केलीत तर तुम्ही लोकांनी… असो, आम्ही न आलेले कम-नशिबीच म्हणावेच लागतील… परदेशांतून, परप्रांतातून तुम्ही लोक जमलात व ब्लॉगिंगद्वारे जमवलेले व्हर्च्युअल मित्र रिअल लाइफमध्ये भेटलात, याचा मलासुद्धा खुप आनंद झाला आहे! [आजकाल जास्त वैचारिक लिखान करत नसल्याने मला नेमके काय लिहावे, तेच कळत नाहिये, त्यामुळे ही कमेंट “कशी-बशी” लिहिलीय! 😛 ]

   कधी ना कधी तुम्हा लोकांशी मीसुद्धा भेटेनच… काका, तुमच्या उत्साहाची दाद द्यावी तेवढी तोकडीच आहे, कारण गेल्या वेळचा पुण्यातला ब्लॉगर्स मेळावा अन आता ही ब्लॉगर्स मीट (हुंदडण्याची!)… तुम्ही म्हणजे ग्रेटच!!

   फोटोज कोणत्याही मार्गाने(!) जमा करून लवकर टाका, नुसती पोस्ट वाचून माझी तहान/भूक भागली नाही… वाट पाहतोय! 😉

 2. 21/06/2010 येथे 6:18 pm

  धन्यवाद पेठेकाका हया कार्यक्रमाबद्दल.. कालची भेट अनुजाताईच्या आग्रहाखातर असली तरी ती तुमच्या पुढाकारानेच झाली आहे…खुप खुप आनंद झाला सगळ्यांना भेटुन..कालच्या भेटीतील सर्वात मह्त्वाच होत ते म्हणजे जिव्हाळा..सगळे असे मिळुन-मिसळुन गेले होते कि पहिल्यांदा भेटतोय अस वाटतच नव्हते..बाकी पुण्यातले ब्लॉगर्सही भेटतील अशी आशा होती पण..असो..
  मी सुदधा आता लिहायला घेतो मीट बद्दल…बघुया कस जमत ते..

 3. 21/06/2010 येथे 6:19 pm

  काल खुपच मजा आली. तुमचे आणि अनुजाताईंचे आभार….

  • सुरेश पेठे
   21/06/2010 येथे 10:31 pm

   देवेंद्र व आनंद, आम्हा पुणेकरांबद्दल मी वर लिहीले आहेच तेव्हा शक्य करून आम्हाला माफ करशीलच ! तू म्हणतोस तसे जिव्हाळा हेच आपल्यातील प्रमुख सुत्र आहे व तेच आपण सर्वांनी जपुया. असेच वारंवार भेटत राहूया व एकमेकातील प्रेमांची, जिव्हाळ्याची ग्वाही देत राहू या.

 4. 21/06/2010 येथे 7:16 pm

  मी येऊ शकलो नाही ह्या भेटीला त्याबद्दल मला खंत वाटते. पण २३ तारखेला मी पुण्यातील कार्यालयात हजार होत आहे. तेव्हा आता पुणेकर होणारच. पेठे साहेब व अनुजा यांना भेटता येईल.

  • सुरेश पेठे
   21/06/2010 येथे 10:37 pm

   अच्छा ! तर लवकरच रविंद्रजी, आपण लवकरच पुणे दरबारात येणार तर. आल्या आल्या आपल्या आगमनाची वार्ता आमच्या पर्यंत पोहोचावयाची व्यवस्था व्हावी, म्हणजे आम्ही जातीने आपल्या भेटीला येऊ !!

 5. 21/06/2010 येथे 9:55 pm

  अभिनंदन
  मजा केलीत तुम्ही. फोटॊ टाका लवकर.

  • सुरेश पेठे
   21/06/2010 येथे 10:43 pm

   महेंद्रजी, आपलेही ह्या पुण्य नगरीत स्वागत आहे ! भेटीचा योग लकरच आहे हे ऐकून जीवास संतोष वाटला ! आपल्या आपल्या हुकुमाबर हुकूम फोटोज लवकरच पेश केले जातील !


   पोरांनॊ लवकर मला आपले फॊटो पाठवा रे !

 6. 22/06/2010 येथे 8:03 सकाळी

  थोड, लिहायचा प्रयत्‍न केलाय मी पण 🙂

  Link – http://suhasonline.wordpress.com/2010/06/22/मुंबईकरांचा-पुणेरी-दौरा/

  Photos link – http://picasaweb.google.com/116105626169388865011/GkLpmJ

 7. 22/06/2010 येथे 11:48 सकाळी

  gr8…………
  मस्तच काका… फोटो लवकर लोड करा… बघता येतील…
  तुमच्या उत्साहाला माझाही सलाम..

  परवाच महाराष्ट्र माझा या पुस्तकात शनिवार वाड्याचा फोटो वरच्या view ने बघितला..
  खूप वेगळा वाटतो.. काळातच नाही शनिवार वाडा आहे ते..
  असो… मस्त धमाल आली असेल न??

 8. 22/06/2010 येथे 6:46 pm

  मस्तच काका. फोटोही छान आहेत. सुहासचे पण फोटो पाहिले. लय्य्य भारी.

 9. anuja
  22/06/2010 येथे 7:14 pm

  माझा वाढदिवस नव्हता माझ्या लग्नाचा होता व खास करून धनंजय
  ने सुचविले होते कि आपल्या ब्लॉगर्स मित्रपरिवारात साजरा कर. असा लग्नाचा वाढदिवस छान साजरा आपण सर्वांनी केला. धनंजय ने तर मोठा आयसिंग वाला केक घेऊन का गेलीस नाही म्हणून विचारले सुद्धा. त्यांना म्हणाले प्रत्येकाच्या पोस्ट वाचा म्हणजे सिंहगडचा कसा द्राविडी प्रवास होता त्याची कल्पना येईल. तरी पण सगळे कसे मस्त मस्त मस्त जमून गेले.

  • 22/06/2010 येथे 7:29 pm

   हो खरंच तो तुमच्या लग्नाचा वाढदिवस होता ! धनंजयराव, पण तॊ चांगल्या प्रकारे साजरा केला बरं का ! तुम्ही ही असता तर सोन्याहून पिवळे झाले असते !

 10. 22/06/2010 येथे 7:24 pm

  विक्रांत, तुलाही मी व अनुजानेही फोन करून आमंत्रण दिले होते पण तुझे नेमके काम निघाले होते त्याला काय करणार ? आला असतास मजाच आली असती. मुख्य म्हणजे ही भेट कुठलेही कारण-विरहीत होती, त्यामुळे सर्वांनीच तणाव मुक्त वातावरणाचा लाभ उठवला. प्रत्येक वेळी भेटीला कारण असावेच असे नाही. मागच्या आपल्या मेळाव्या नंतर असे मेळावे वारंवार भरवावेत असा सूर होता परंतू ते जमले नव्हते. ठीक आहे पुन्हा कधी तरी भेटू ! मागील भेटीस आता बरेच दिवस झालेत नाही.

 11. 24/06/2010 येथे 11:13 सकाळी

  माझ्याकडे काहीतरी लोचा चालू होता, त्यामुळे मला इथे कमेंटताच येत नव्हतं…
  मस्त झालीय काका पोस्ट…त्यादिवशीच्या आठवणी कायमच्याच मनावर कोरल्या गेल्यात….पोस्ट आपल्या भेटीसारखीच झालीय..शॉर्ट ऍण्ड स्वीट!

 12. 26/06/2010 येथे 12:43 pm

  नमस्कार काका,
  तुमचा लेख वाचुन व छायाचित्रे पाहुन, मला अधिकच वाईट वाट्त आहे की, पुण्यात असूनही मी मीटला(सहलीला) येवू शकलो नाही.पण काम आलं आडव, असो. पुढल्यावेळी नक्की येईल.
  तुम्ही खुप मजा केली वाटते.काका अजुन छायचित्रे टाका.मी वाट पाहतोय.
  तुमची व अनुजा ताईंची भेट झाली, ते तरी छान झालं.पहिल्या भेटितच तुम्ही आपलंस करुन टाकलं. मी वर्धेला पोहोचलोय. जसा पुण्यात येईल तसा कळवीलच. पुन्हा भेटु.
  क.लो.अ.

 1. 22/06/2010 येथे 12:46 pm
 2. 22/06/2010 येथे 6:38 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: