मग काय येताय ?
ह्या ब्लॉग ची निर्मिती होण्याला माझी एक मैत्रीण तन्वी कारणीभूत झालेली होती. तिच्याच मस्कत गावात रहाणारी अनुजा माझी नंतर मैत्रीण झाली. योगायोग बघा दोघीही सध्या भारतात आलेल्या आहेत. मात्र माझी नंतर मैत्रीण होऊन सुध्दा माझी प्रत्यक्ष गांठ मात्र प्रथम पडत्येय ती अनुजाशी.
आज आम्ही जवळ जवळ दोन तास एकत्र इकडच्या तिकडच्या गप्पा हाणीत बसलो होतो. गप्पाच्या ओघात अनेक विषय येत होते. त्यातच दावणगिरी डोश्याचा पण विषय निघाला. मागे मी त्या संबधात एक पोस्ट टाकली होती व त्यावरून ’भांडणे’ होत होत, मग अनिकेत शी पहीली गांठ कशी पडली व त्याचे पर्यवसान मराठी ब्लॉगर्स च्या पहिल्याच यशस्वी मेळाव्यात कसे घडले ह्याचा वृतांत रवंथ करून झाला !
तेव्हा अनुजाने त्या सर्वांची पुन्हा भेट नाही का घडवून आणता येणार ? व तुम्ही म्हणजे ’मी’ असे काहीही घडवून आणू शकतो ह्या विश्वासाने ती जबाबदारी माझ्यावर सोपवून ती मात्र निर्धास्त झाली ! मग काय करणार एक स्त्री हट्ट… लागलो बिच्चारा कामाला , आणि मग फोनाफोनी सुरू झाली. पहीली ठरली तारीख…२० जून २०१० , आणि पुण्यात. अर्थात त्या तारखेला पुण्यात असणाऱ्या सर्व मराठी ब्लॉगर्स ना आग्रहाचे निमंत्रण ! शिवाय तेरा दिवस आधी सांगतोय आपापल्या कॅलेंडर वर नोंद करीत त्या प्रमाणे ठरवून येण्या साठी. नंतर तक्रार नको !
ठिकाण १) सिंहगडाच्या पायथ्याशी असलेले घाटगे फॉर्म कींवा २ ) वरसगाव धरणाला लागून असलेले सूर्य शिबीर ह्यापैकी एक, आणि खर्च अंदाजे रू. ५००/- पर्यंत असावा, अर्थातच ’सोल्जर कॉन्ट्रीब्युशन ! वेळ सकाळची, नाष्टा पाणी, जेवण…गप्पा टप्पा व परत… कुठलेही भाषण नाही, ठराव नाहीत …फक्त मौज मज्जा ! बरेच जण खात्रीने येणार असतील तर गाडी मिळत्येय का बघू, नाहीतर आपापले एकेक ..दोघे करीत करीत पोहोचू !
मग काय येताय ?
पटापट इथेच फक्त येणारांनीच नावे द्या !
काल रविवारी अनुजाने मला फोन केला. मीच फोन घेतला आणि माझी पुण्याला बदली झाल्याचे सांगितले तेव्हा तिने आपन भेटु पण अर्ध्दा एक तास नको म्हणुन मी म्हटले हो चालेल आपण कोठे तरी ट्रीप काढू. आणि आज ट्रीप अरेंज सुद्धा झाली. मी जरुर येणार आता पुणेकर होणार आहेच.
अरे हॊ तन्वी आल्याचे तिने मला कळविले नाही. ती नाशकातच असेल! मला तिचा फोन नं. पाठावाल का?
रविंद्रजी नमस्कार, व्वा आता पुण्यातच येणार आहात तेव्हा धम्माल करूच. चला शुभस्य शीग्रम !
१) मी
२) अनुजा
३) रविंद्रजी कोष्टी
confirmed, good start
रविंद्र काका, तुम्हाला तन्वी ताईचा मो.नंबर मेल केलाय!
विशाल ,
तुझे काय रे बाबा ! तू कुठे आहेस सध्या ?
सध्या भारताबाहेर आहे… तेंव्हा जमायचे नाही… 😦 त्या दिवशी फोन करतो हवेतर… 🙂 बोलणे होइल…
रोहन, कालच्या आम्हा दोघांच्या गप्पात तुझे नाव हटकून निघालेच, पण तुझे सततचे तळ्यात मळ्यात ठाऊकी आहे आम्हाला. मला वाटते आपला हा लपंडावाचा खेळ संपणारच नाहीय्ये ! असो तरीही कधीतरी भेटूच. फोन मात्र जरूर करच म्हणजे बोलणे तरी होईल ! नाहीतरी त्या दिवशीचा एकमेव अजेंडा गप्पा..गप्पा आणि गप्पा हाच आहे.
मी येतोय 🙂
सुहास झेले,
या या आम्ही वाट पहातोय बरं का!
१) मी
२) अनुजा
३) रविंद्रजी कोष्टी
४) सुहास झेले
thanks kaka. mazyakadun suddha avarjun amatran. sarvani jarur jamavun ekatra yeuya. musacat la parat jatana hyach athavaninchi shidori ghevun javu.
अनुजा,
तुला काय प्रत्युत्तर देणार? तुझ्या हट्टापायी तर हा घाट घातलाय, पण निश्चिंत रहा आपण नक्की जाणारच !
अनुजाने खास फोन केलाय येणार ना म्हणून विचारायला … मी नक्की येणार.
गौरी,
तू येणार हे नक्की धरून्च चाललो होतो. म्हणजे आता,
१) मी
२) अनुजा
३) रविंद्रजी कोष्टी
४) सुहास झेले
५) गौरी
मी पण येतोय…मागच्या वेळी जमल नाही तेव्हा तुम्हाला शब्द दिला होता पुढच्या वेळी नक्की येइन अस शिवाय अनुजाताईलापण भेटायच आहेच….
देवेंद्रजी नक्की याच वाट पहातोय.
आता येणारे झालेत
१) मी
२) अनुजा
३) रविंद्रजी कोष्टी
४) सुहास झेले
५) गौरी
६) देवेंद्र चुरी
माझही नक्की झालं..