Archive

Archive for जून, 2010

आणि सरतेशेवटी आमची ’ मीट ’ झालीच !

आणि सरतेशेवटी आमची ’ मीट ’ झालीच !

मी नेमका हंपी येथे आमच्या चित्रकारांच्या कार्यशाळेला गेलो होतो व आदल्या दिवशी उशीरा परतलो होतो. त्यामुळे सगळी व्यवस्था अनुजावर सोपवून गेलो होतो व तिने ही ती अगदि चोख बजावलेली होती. मी येईतॊ तिचा फोन सतत चालू होता. पुण्यातील मराठी ब्लॉगर्स कसे हो आले नाही असा एक अगदिच बालिश प्रश्न तिने विचारला होता ! अर्थात मीहि तो पुणेरी पध्दतीने टोलविला होता. काय सांगणार होतो मी तिला ! मागील पहिल्याच मेळाव्याला साठच्यावर पुणेरी कसे काय हजर होते हा प्रश्न मी आजही माझ्या स्वत:लाच विचारीत असतो, असो.

आदल्या रात्री आम्ही कोथरुड येथिल रेल्वे म्युझियम मागील नवीन हॉटेलात जमलो तेव्हा आकडा ५-६ चे पुढे जाणार नाहीसे वाटत होते. पण सरते शेवटी आम्ही एक डझनावर जमलो होतो हेही नसे थोडके !

दुसऱ्यादिवशी म्हणजे २० तारखेला ठरल्या वेळी आम्ही शनिवार वाड्या जवळील बस स्टॉप वर जमा झालो. अर्थात पहीली बस चुकलीच. मग सगळे शनिवार वाडा बघायला गेलॊ. आजच्या मेळाव्याला बरेच मुंबईकर, हैदराबादहून आनंद तर मस्कत हून आलेली अनुजा ह्यांनी शनिवार वाडा बघितला नव्हता.

नंतर बसने घाटगे बोटॅनिकलला पोचले सगळ्यांचे पैसेही भरले व आता तॊ पावती करणार तेव्ह्ढ्यात प्रचंड खळबळ माजली व सर्वानुमते सिंहगडला जायचे ठरले कारण तॊही खूप जणांनी पाहिलेला नव्हता.नाशिकहून गाडी करून आलेली तन्वी व तिच्जे यजमान अमित व मुलेही आम्हास जॉईन झाली. भरलेले पैसे परत करतांनाचा चेहरा बघण्या लायक झाला होता !

आज रविवारचा सुटीचा वार असल्याने सिंहगडावर प्रचंड गर्दी झालेली होती.
गाड्यांचा ’खच’ होता. मोटार सायकली तर काळ्या मुंग्यांसारख्या दिसत होत्या मात्र त्याच्या सारख्या शिस्तीचा मात्र प्रचंड अभाव पदोपदी जाणवत होता.( खरे तर पावले टाकणेच अवघड जात होते. )

खालच्या टप्प्यावर कसे तरी पोचलो एकदाचे. मग मात्र आमच्या गप्पांना ऊत आला. खरपूस कांदा भजींच्या प्लेटी वर प्लेटी रिचवल्या जाऊ लागल्या ! साथीला सुमधूर ताकांचे ग्लास व मडक्यातील दही आणि पुढे गडावरची भ्रमंती, तीही ढगांच्या दुलईत लपेटलेली व आम्ही मंडळी झपाटलेली ! अधुन मधुन पावसाच्या सरी, मग काही विचारायलाच नको, तहान भुकेचीही ना राहीली पर्वा.

आता मात्र खाली उतरायची लगबग सुरू झाली ! खाली उतरायला रस्त्याचाच आधार घेणे जरूरीचे होते ना. परततांना मोटारसायकलींच्या सुळसुळाटीला कुठलीच उपमा देणे अशक्य आहे ! कसेतरी एकदाचे आम्ही खाली पोहोचलो व लगेचच एका दिवसा साठी जमलेले आम्ही तत्काळ चारी दिशेला पांगलो.

माझा कॅमेरा नेमका माझ्यावर रुसला होता त्यामुळे आता इतरांनी फोटो पाठवलेत की मी ते इथॆ देत राहीनच.

हे आहेत मी काढलेले फोटो :-

शनीवार वाड्या पुढे आम्ही सारे

शनीवार वाड्या पुढे आम्हीच

शनिवार वाड्याच्या सज्ज्यात गप्पा चालूच

अनुजा वाढदिवसाचा केक तोडतांना ! ( सुरी विसरली....होती ती कांद्याची ! ) बाजूला आहेत , तन्वीची मुले..गौरी आणि इशान

प्रवर्ग: Uncategorized

मग काय येताय ?

ह्या ब्लॉग ची निर्मिती होण्याला माझी एक मैत्रीण तन्वी कारणीभूत झालेली होती. तिच्याच मस्कत गावात रहाणारी अनुजा माझी नंतर मैत्रीण झाली. योगायोग बघा दोघीही सध्या भारतात आलेल्या आहेत. मात्र माझी नंतर मैत्रीण होऊन सुध्दा माझी प्रत्यक्ष गांठ मात्र प्रथम पडत्येय ती अनुजाशी.
आज आम्ही जवळ जवळ दोन तास एकत्र इकडच्या तिकडच्या गप्पा हाणीत बसलो होतो. गप्पाच्या ओघात अनेक विषय येत होते. त्यातच दावणगिरी डोश्याचा पण विषय निघाला. मागे मी त्या संबधात एक पोस्ट टाकली होती व त्यावरून ’भांडणे’ होत होत, मग अनिकेत शी पहीली गांठ कशी पडली व त्याचे पर्यवसान मराठी ब्लॉगर्स च्या पहिल्याच यशस्वी मेळाव्यात कसे घडले ह्याचा वृतांत रवंथ करून झाला !
तेव्हा अनुजाने त्या सर्वांची पुन्हा भेट नाही का घडवून आणता येणार ? व तुम्ही म्हणजे ’मी’ असे काहीही घडवून आणू शकतो ह्या विश्वासाने ती जबाबदारी माझ्यावर सोपवून ती मात्र निर्धास्त झाली ! मग काय करणार एक स्त्री हट्ट… लागलो बिच्चारा कामाला , आणि मग फोनाफोनी सुरू झाली. पहीली ठरली तारीख…२० जून २०१० , आणि पुण्यात. अर्थात त्या तारखेला पुण्यात असणाऱ्या सर्व मराठी ब्लॉगर्स ना आग्रहाचे निमंत्रण ! शिवाय तेरा दिवस आधी सांगतोय आपापल्या कॅलेंडर वर नोंद करीत त्या प्रमाणे ठरवून येण्या साठी. नंतर तक्रार नको !
ठिकाण १) सिंहगडाच्या पायथ्याशी असलेले घाटगे फॉर्म कींवा २ ) वरसगाव धरणाला लागून असलेले सूर्य शिबीर ह्यापैकी एक, आणि खर्च अंदाजे रू. ५००/- पर्यंत असावा, अर्थातच ’सोल्जर कॉन्ट्रीब्युशन ! वेळ सकाळची, नाष्टा पाणी, जेवण…गप्पा टप्पा व परत… कुठलेही भाषण नाही, ठराव नाहीत …फक्त मौज मज्जा ! बरेच जण खात्रीने येणार असतील तर गाडी मिळत्येय का बघू, नाहीतर आपापले एकेक ..दोघे करीत करीत पोहोचू !
मग काय येताय ?
पटापट इथेच फक्त येणारांनीच नावे द्या !

प्रवर्ग: Uncategorized