मुखपृष्ठ > Uncategorized > आमचे प्रदर्शन गेल्या वर्षीचे

आमचे प्रदर्शन गेल्या वर्षीचे


आज एक एप्रिल असेल पण मी काही एप्रिल फूल करीत नाहिये.मी आणि माझे सहकारी असे आम्ही एकूण संस्कार भारतीच्या आठ जणांनी बालगंधर्व कलादालन , पुणे येथे  २६ मार्च २००९  ते ३१ मार्च २००९ रोजी , आमच्या चित्रांचे पहिले वहिले एकत्रित प्रदर्शन भरवले होते व त्याचे उदघाटन प्रसिध्द चित्रकार व संस्कारभारतीचे राष्ट्रीय मंत्री श्रीयुत रवि देव ह्यांच्या शुभहस्ते झालेले होते. कालच ह्या घटनेला बरोब्बर एक वर्ष झाले व म्हणून ही आहे त्याची एक आठवण आमच्या सगळ्यांच्या मर्मबंधातली ठेव.

~~~~~~~~~
आमच्या प्रदर्शना निमीत्ताने मी माझे मनोगत खालील कवितेतून  व्यक्त केले होते.
~~~~~~~~~
माझ्या मनी मनोगत, तुम्हा पुढे मांडतोय
दिन उगवला आज, तेच तुम्हा सांगतोय ॥
सप्तरंगांची चाहूल , होती मनी बालपणी
मिळे त्यास अपसूक , माती आणि खतपाणी ॥
पण कधी वाळवंट , कधी दिसे मृगजळ
कधी हाती करवंटी. कधी भरेना ओंजळ ॥
दिन गेले वर्षे गेली, कुठलं फुलपांखरू ?
सुरवंट तस्सा राही , पाहू सारेच विसरू ॥
पण नाही न्याय आहे,’ देवा’ पाशी वाव आहे !
’संस्कारभारती’ ची साथ , सदाचि पाठी आहे ! ॥
मज आता ना फिकीर, अर्धे आयु उलटले
पुर्वीचे दिन सगळे , आता सारे पालटले ॥
आता जगतो मस्तीत , रोज रोज काढी चित्र
भेटीला या जीवा शिवा , प्रदर्शना आले मित्र, ॥
हीच सारी करामत , मांडीली माझी तपस्या
आशिर्वाद द्या शुभेच्छा , असुद्या की अमावस्या ॥
माझ्या मनी मनोगत, तुम्हा पुढे मांडतोय
दिन उगवला आज, तेच तुम्हा सांगतोय  ॥
सुरेश पेठे
२६मार्च०९
~~~~~~~~
ही होती त्या प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका ज्या मध्ये आम्हा आठही जणांची माहीती दिलेली आहे. आपण त्यावर टिचकी मारित मोठे करून वाचू शकता.
~~~~~~~~
आणि  ही आहे त्यावेळच्या  DNA मधील बातमी
.
.
हे आहेत ते आम्ही आठ !
.
.
१) श्री. गोपाळ शिखरे

२) श्री मधुकर रास्ते

३) श्री मधुकर हेडाउ

४) श्री. सुरेश पेठे …म्हणजे अर्थातच मी

५) श्रीराम बोकील

६) सुहास वागळे

७) श्री विवेक दाते

८) श्री दिलीप मुंगोले

.
.
आता इथे त्यावेळी प्रदर्शनाला भेट दिलेल्या काहींची क्षणचित्रे
अ)

ब)

क)

ड)

Advertisements
प्रवर्ग: Uncategorized
 1. 01/04/2010 येथे 1:28 pm

  वाह काका..सुंदर…कालच भेटलो तुम्हाला..परत नक्की येईन एके दिवशी खास वेळ काढून..सर्व पेंटींग्स पहायच्या आहेत.. 🙂

  • 01/04/2010 येथे 2:24 pm

   अर्थात तू कधी ही येऊ शकतॊस, चार पाच तासांचा अवधी ठेवूनच ये ! कालच्या सारखा धावपळीत नको !

 2. ARUNAA ERANDE
  04/04/2010 येथे 3:08 pm

  it was a good exhibition. when are you going to have the next one? My good wishes to you all for your next venture. may it come soon.

 3. sahajach
  06/04/2010 येथे 7:55 pm

  काका गेले दोन तीन दिवस विचार करतेय या पोस्टवर कमेंट टाकायचा पण किती तरी वेळा तुम्हा सगळ्यांचे व्हिडिओ पहाते आणि परत जाते…
  ग्रेट आहात तुम्ही सगळेच आणि सगळ्यांची पेंटिंग्स…… मला रोह्याची पेंटींग्स तर फारच आवडली कारण ते लाडके गाव आहे!!!

  बाकि सगळ्यांची चित्रे अतिशय सुंदर आहेत आणि विशेष आवडतो तो तुम्हा सगळ्यांचा उत्साह!!!

 4. 22/04/2010 येथे 3:24 pm

  Hello Who are you

 5. 22/04/2010 येथे 4:08 pm

  श्रीधरजी,
  आपल्या प्रश्नाचा रोख कळला नाही ! मीच सुरेश पेठे , काही शंका आहे ?

 6. 28/04/2010 येथे 9:35 pm

  नमस्कार काका,
  फ़ार दिवसांनी इथे आलो. परिक्षेमुळे व प्रोजेक्ट मुळे लिहिन जमलच नाही.पण आता वापस आलोय.
  आपले मागील वर्षाच्या कार्यक्रमाचे फ़ोटो पाहिले , फ़ारच छान झाला. सर्वाचे चित्रेही अप्रतिम आहेत.
  मला पुन्यातच नोकरि लागली आहे आता जमल तर भेटिलच आपल्याला.
  क.लो.अ.

  • 28/04/2010 येथे 9:52 pm

   अक्षय,

   तुझा अभिप्राय आवडला, बरे वाटले. आता पुण्यास आलाय… मी कोथ्रूड येथे रहातॊ. तुझा ठाव ठिकाणा कळव. सवडीने फोन कर म्हणजे आपण नक्की भेटू .

   • 29/04/2010 येथे 9:08 pm

    मी सध्या वर्धेलाच आहे.मे च्या शेवटी येइल तिकडे.तेव्हा तुम्हाला कळ्विल. आपण नक्की भेटु.
    आणि हो कविता हि छान लिहिली , काल विसरलोच लिहायला.
    क.लो.अ.

 7. 03/05/2010 येथे 7:44 सकाळी

  wa kaka khupach chaan ho …. ek number paintings aahet ….

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s