Archive
शिकवण्याचा पहिला दिवस !
मागिल शनिवारी १७ एप्रिल ला संस्कार भारतीच्या वतीने येथील श्री मृत्युंजयेश्वर मंदीराच्या निसर्ग रम्य परिसरात वस्तु व व्यक्ती चित्रणाचा वर्गाचे उद्घाटन झाले.
कालचा शनिवार हा त्या नंतरचा पहिला शनिवार. खरे तर संस्कार भारतीच्या वर्गांतून कोणीही एकजण असे काहीही शिकवत नाहीत. चित्रकला ही एक कला आहे व एकत्र येण्यातून, एकमेकांचे बघून आणि स्वत: साधना करीत ही कला साध्य होते असा आमचा विश्वास आहे. तॊ ही एक संस्कार आहे. त्याला वयाची वा कसलीच आडकाठी वा मर्यादा नाही. माणसाच्या अंगीची अनुकरण प्रियताच येथे कामी येते व येथे येणारा प्रत्येक जण आपोआप शिकत जातॊ अशी आमची धारणा आहे. तरी सुध्दा प्रस्तुत वर्गात पहिल्यानेच प्रवेश घेणाऱ्या ची वये आधीचे अनुभव ह्या सर्वांचा विचार करता येथे आधी थोडेशी पार्श्वभूमी तयार करावी लागणार ह्याची मला जाणीव झाली.
आज प्रथमच येणाऱ्यात १ मुलगा २ रीत गेलेल्या, दोघी ५ वीत गेलेल्या तर एक ७ वीत, रेग्युलर चित्रकला शिकणारी एकच ! बाकी काही मध्यमवयीन स्त्री पुरूष तर एक आजोबा ८० व्यात पदार्पण केलेले. त्यातील बहुतेकांची कल्पना शिसपेन्सिलीचा उपयोग लिहिण्याकरताच होतो व तीही कधी काळी हाती धरलेली ! चित्र काढण्या साठीही उपयोग होतॊ ह्याची जाणीव नव्यानेच होत असावी ! मात्र एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे चित्रकला यावी अशी मात्र सर्वांची दुर्दम्य इच्छा आणि तोच महत्वाचा प्लस पॉईंट !
माझी मात्र परीक्षा आहे खरीच. पहीलाच दिवस खूप धांदलीत गेला,ओळखी माहीतीची देवाण घेवाण इ.इ. पण सुरूवात तर छान झालीय ! अगदी पहीला धडा होता चित्रकले साठी पेन्सिल कशी हातात धरावी ! तिथे असलेली साधी पाण्याची बाटली माझ्या पहाण्यात आली व तीच समोर ठेवून त्याचे चित्र काढायला सांगीतले. मग लक्षात आले की चित्र काढण्यासाठी वस्तु कडे बघायचे कसे , काय ? तिला कागदावर चितारायचे म्हणजे काय करायला हवंय ? मग प्रश्न पडला ह्याचे मोजमाप घ्यायचे म्हणजे कसे? कागदाच्या आकारात ते कसे बसवायचे? प्रश्नातून प्रश्न येत होते.
पण तरीही पहीलाच दिवस खूप चांगला गेला. तसं म्हटलं तर मी तरी चित्रकला हा विषय कुठे शास्त्रशुध्द शिकलेलो आहे ? पाचवी ते आठवी व त्यातच चित्रकलेच्या दोन परिक्षा एव्हढेच माझे तुट्पुंजे शिक्षण. तेव्हा आम्हाला नाशिकला पेठे हायस्कूल ला डोंगरेसर नावाचे चित्रकला शिक्षक होते. खरे तर ते प्रसिध्द चित्रकार व्हायचे त्यावेळेच्या प्रसिध्द चित्रकारात त्यांची चांगली उठबस होती. मला आठवत्येय केवळ मैत्रीखातर अलमेलकरांसारख्या प्रसिध्द चित्रकारांचे प्रात्यक्षिक आम्हाला शाळेत दाखविण्याची व्यवस्था डोंगरे सरांनी केली होती. त्यांनी स्वत:ला चित्रकला शिकविण्याला वाहून घेतलेले होते. अगदी हाडाचे शिक्षक. त्यांनी त्यावेळी काय काय शिकवले होते त्याचे अर्थ मला गेल्या सहा वर्षातील संस्कार भारतीच्या नित्य साधनेतून उलगडत गेले. तीच आमची गांठीला बांधलेली शिदोरी, बहुदा आता उपयोगी पडेलसे वाटतंय !
आमचे प्रदर्शन गेल्या वर्षीचे
आज एक एप्रिल असेल पण मी काही एप्रिल फूल करीत नाहिये.मी आणि माझे सहकारी असे आम्ही एकूण संस्कार भारतीच्या आठ जणांनी बालगंधर्व कलादालन , पुणे येथे २६ मार्च २००९ ते ३१ मार्च २००९ रोजी , आमच्या चित्रांचे पहिले वहिले एकत्रित प्रदर्शन भरवले होते व त्याचे उदघाटन प्रसिध्द चित्रकार व संस्कारभारतीचे राष्ट्रीय मंत्री श्रीयुत रवि देव ह्यांच्या शुभहस्ते झालेले होते. कालच ह्या घटनेला बरोब्बर एक वर्ष झाले व म्हणून ही आहे त्याची एक आठवण आमच्या सगळ्यांच्या मर्मबंधातली ठेव.
.
.
१) श्री. गोपाळ शिखरे
२) श्री मधुकर रास्ते
३) श्री मधुकर हेडाउ
४) श्री. सुरेश पेठे …म्हणजे अर्थातच मी
५) श्रीराम बोकील
६) सुहास वागळे
७) श्री विवेक दाते
८) श्री दिलीप मुंगोले
.
.
आता इथे त्यावेळी प्रदर्शनाला भेट दिलेल्या काहींची क्षणचित्रे
अ)
ब)
क)
ड)
अलीकडील टिप्पण्या