मुखपृष्ठ > Uncategorized > दुसरा मराठी ब्लॉगर्स मेळावा, मुंबईत…९ मे २०१०

दुसरा मराठी ब्लॉगर्स मेळावा, मुंबईत…९ मे २०१०

मित्रहो !
.
.
आपण आपला मराठी ब्लॉगर्स चा पहिला वहिला मेळावा १७ जानेवारी २०१० रोजी पुण्यात दिमाखात संपन्न केला होता व मी त्याला अप्रत्यक्ष का होईना कारणीभूत झालो ह्याचा मला सार्थ अभिमान व संतोष आहे.
ह्याच महिन्याच्या ११ तारखेला मी मुंबईत होतो त्यावेळी मी श्री. महेंद्र कुळकर्णी व श्री. सलील चौधरी बरोबर भेट घेऊन आपण मुंबई करांनीही असाच मेळावा घ्यावा असे सुचवले होते व ह्या दोघांनी ते मान्य ही केले. अर्थात तेव्हा दिनांक ठरवला नव्हता. आता येत्या ९ मे २०१० रोजी हा मेळावा दादर येथे करण्याचे योजिले आहे हे कळून मला स्वत:लाच नितांत आनंद झाला आहे वर हर प्रयत्ने मी त्याला हजर रहावयाचे ठरवले आहे. आपण सर्वानी हा कार्यक्रम जोरदारपणे संपन्न करूया.
आपला,
.
सुरेश पेठे
.
.
सोबत ह्या मेळाव्या संबंधी ची माहिती जोडीत आहे:-
.
.
ब्लॉगर दोस्तांनो,

पुणे येथे यशस्वीरित्या संपन्न झालेल्या पहिल्या ब्लॉगर मेळाव्यानंतर दुसरा ब्लॉगर मेळावा तुमच्या, आमच्या, सर्वांच्या – आपली मुंबई येथे आयोजित होतो आहे. रविवार, दिनांक ९ मे २०१० रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळात हा ब्लॉगर मेळावा संपन्न होईल. एकमेकांशी ओळख करून घेऊन स्नेहबंध आणखी घट्ट करावे या उद्देशाने हा ब्लॉगर मेळावा आयोजित होतो आहे. केवळ प्रस्थापित ब्लॉगर्सच नव्हेत तर ज्यांना मराठी ब्लॉग सुरू करायची इच्छा आहे अशा भावी मराठी ब्लॉगर्सचे व ब्लॉग वाचकांचेही या मेळाव्यात स्वागत आहे.

मुंबईच्या कानाकोपर्‍यातून व मुंबईबाहेरूनही ब्लॉगर्स/वाचक उपस्थित राहतील असे गृहीत धरून भेटीसाठी दादर, मुंबई हे मध्यवर्ती ठिकाण निवडले आहे. आपली उपस्थिती मोठ्या संख्येने नोंदवून आपण हा ब्लॉगर मेळावादेखील यशस्वी कराल याची खात्री आहे.

आपल्या उपस्थिती संख्येनुसारच भेटीचे नेमके स्थळ निश्चित करता येईल. आपल्या उपस्थितीची संमती म्हणून इच्छुक ब्लॉगर्स/वाचकांनी या पोस्टखालील प्रतिक्रियांमधे आपले नाव, ब्लॉगचे नाव (वाचक अथवा भावी ब्लॉगर असल्यास ब्लॉगचे नाव आवश्यक नाही), संपर्कासाठी ईमेल पत्ता द्यावा.कृपया नोंद घ्यावी: नाव नोंदणीची अंतिम तारिख ७ एप्रिल २०१० आहे.

या नाव नोंदणीसाठी एक गुगल डॉकही तयार करण्यात आले आहे. http://spreadsheets.google.com/ccc?key=0AlwmOqlYyppgdGxuaTdNY1JEZXZ6c3VDVDM4ZU1NeGc&hl=en हा त्या डॉकचा दुवा आहे. येथेदेखील नाव नोंदणी करता येईल.

या ब्लॉगर्स मेळाव्याची माहिती जास्तीत जास्त मराठी ब्लॉगर्स व वाचकांना मिळावी म्हणून खाली दिलेली विजेट कॉपी पेस्ट करून आपल्या ब्लॉगवर लावा.

वाचक अथवा भावी ब्लॉगर (http://www.mogaraafulalaa.com/2010/03/blog-post_29.html) ही लिंक आपल्या ईमेलमधून आपल्या स्नेह्यांना पाठवू शकतील.

आपल्या शंका, सूचना व सल्ले खालील ईमेल पत्त्यावर अवश्य पाठवा:

रोहन चौधरी – chaudhari.rohan@gmail.com
महेंद्र कुलकर्णी – kbmahendra@gmail.com
कांचन कराई – mogaraafulalaa@gmail.com

धन्यवाद,
आपले ब्लॉगर मित्र,
रोहन चौधरीमहेंद्र कुलकर्णी व कांचन कराई

वाचक अथवा भावी ब्लॉगर (http://www.mogaraafulalaa.com/2010/03/blog-post_29.html) ही लिंक आपल्या ईमेलमधून आपल्या स्नेह्यांना पाठवू शकतील.

आपल्या शंका, सूचना व सल्ले खालील ईमेल पत्त्यावर अवश्य पाठवा:

रोहन चौधरी – chaudhari.rohan@gmail.com
महेंद्र कुलकर्णी – kbmahendra@gmail.com
कांचन कराई – mogaraafulalaa@gmail.com

धन्यवाद,
आपले ब्लॉगर मित्र,
रोहन चौधरीमहेंद्र कुलकर्णी व कांचन कराई

प्रवर्ग: Uncategorized
  1. 30/03/2010 येथे 2:47 pm

    स्तुत्य उपक्रम.आवडला.
    भाग घेण्याचा प्रयत्न आहे.

  2. 30/03/2010 येथे 2:55 pm

    मी अमोल केळकर या मेळाव्यास येण्यास उत्सुक आहे.

    माझा नंबर : ९८१९८३०७७०

    माझा ब्लॉग :http://www.juily.blogspot.com

  3. 30/03/2010 येथे 3:37 pm

    श्री. गंगधर मुटे जी व शरी अमोल केळकर जी आपण आपली कृपया माहीती वर नमूद केलेल्या गुगल डॉक्युमेंट मध्ये जाऊन नोंदवावीत ही विनंती

  4. 30/03/2010 येथे 7:52 pm

    सुरेशजी
    तुम्ही पण नक्की यायचं बरं कां..

    • 31/03/2010 येथे 8:02 सकाळी

      महेंद्रजी,
      मीच तुम्हाला उद्युक्त करणार आणि मी येणार नाही हे कसे शक्य आहे? अजून काहीही मदत हवी असेल तर हक्काने सांगा . मी सदैव तुमच्याबरोबर आहे.

  5. 31/03/2010 येथे 8:40 सकाळी

    मी गुगल डॉकमध्ये नोंदणी करायचा प्रयत्न केला, पण त्यात लॉग ईन करता येत नाहीये. मी देखील येईन.

  6. सुरेश पेठे
    03/04/2010 येथे 1:09 pm

    ज्यांना अजूनही आपले नाव नोंदविता आलेले नाही त्यांनी
    http://www.mogaraafulalaa.com/
    ह्या लिन्क वर जाऊन नाव नोंदवावे

  1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: