मुखपृष्ठ
> Uncategorized > गुरूवार ना आज !
गुरूवार ना आज !
हो आज गुरूवारच आहे. आज लॅंड्स्केपिंगला आमचा जथ्था शिवण्याला गेला होता. पुण्याच्या इतक्या जवळ असून सुध्दा बऱ्याच अंशी त्या खेडॆगावाचे खेडॆगाव पण शाबूत राहीलंय ! अर्थात ते गाव सध्याच्या प्रचंड शहरी पणाच्या वेगाला आवर घालू शकेल असे मात्र वाटत नाही.
असे असले तरी छोटेसे गाव, त्याला एक नदीचा पाणवठा, पाणवठ्यावर जमणारा स्त्रियांचा जमाव, कुत्री, मांजरी, कोंबड्यां पासून गाई, म्हशी, शेळ्यांपर्यंत चा वावर….
हे पहा काही शेळ्यांचे फोटो.
इथेच ठिय्या मारून बसलोयत आम्ही चित्रे काढायला.
ही माझी स्केचेस पेनने आधी काढलीत
प्रवर्ग: Uncategorized
खरं तर कालच पोस्ट केलेले होते, काय तांत्रिक अडचण उदभवली कोण जाणे ?
पेठे साहेब खुपच सुंदर स्केचेस काढली आहेत. आणि ते शेवटचे चित्र तर अप्रतिम आहे.
रविंद्र जी,
आपल्या अभिप्रायाबद्दल आभार.
आत्ताच मी एक व्हिडियो क्लीप जोडली आहे. त्या वातावरणाची कल्पना यावी म्हणून, कशी वाटत्येय जरूर सांगा !
atishay surekh asa te drushya disla.
rang jasa shubhra aahe tasach vatavaranhi shuddha disat asel.
ahaha mi tithech aahe asa vatla ekdam
sheliche chitra aani video far srrekh aalaya
सुहासजी,
अभिप्रायाबद्दल आभार, आपणही त्या दिवशी आमचेबरोबर होताच ! आपणही ब्लॉग सुरू करावा व आपली चित्रे त्यावर ठेवावित सर्वांना पहाण्या साठी.
काका मी अगदी ठरवले होते की स्वत:चे एखादे तरी चित्र पुर्ण झाले की मगच इथे कमेंट पोस्ट करायची..
पण ते काही जमेलसे दिसत नाहीये..
शेळीचे चित्र फारच मस्त आलेय….
तन्वी,
इतके दिवस थांबलीस तर अजून थांबायचे ! तुझ्र चित्र तर पहायला मिळाले असते ! आता ते कधी मिळायचे?