मुखपृष्ठ > स्थळ परिचय, Uncategorized > ग्लोबल पॅगोडा

ग्लोबल पॅगोडा

ग्लोबल पॅगोडा

आज मी तुम्हाला मुंबई जवळ गोराई खाडीतील एसेल वर्ड च्या अगदि शेजारी निर्माण होत असलेल्या एका विशाल पॅगोडाच्या कामावर घेऊन जात आहे. मागे माझ्या एका मैत्रिणीने मला ह्या कामाची माहिती दिली होती. इथे आचार्य सत्यनारायण गोयंका ह्यांचे द्वारा शिकविल्या जाणाऱ्या विपश्यने साठी विशाल ध्यान कक्षेचे निर्माण होत आहे. इथे यायला दोन मार्ग आहेत. भायंदर वरून गोराई बीच, एसेल वर्ड च्या मार्गाने रस्त्याने येता येते, या मार्गावर अनेक ठीकाणी मिठागरे आहेत व त्याचे पांढरे स्वच्छ डोंगर जातायेतांना पहाताना खूप सुंदर दिसतात. दुसरा मार्ग कांदिवली – बोरीवली मार्गावरील गोराई खाडीतून फेरी बोटीतून थेट पॅगोडा – एसेल वर्ड ला पोचता येते. मी मात्र मला जवळच्या दुसऱ्या फेरीच्या मार्गाने जाणेच पसंद केले.

गेल्या एक तपाहूनही अधिक काळ हे निर्माण कार्य चालू आहे. हे काम पूर्ण पणे भक्तांनी दिलेल्या दानातून चालू आहे. त्या कामाची छायाचित्रे व चलत चित्रे मी दाखवणार आहेच पण स्थूल मानाने कल्पना यावी म्हणून काही आंकडे वारी देतोय. ह्याची एकूण उंची आहे २९४ फूट. तळाशी ह्याची रचना अष्ट्कोनी असून प्रत्येक बाजू १२० फूट आहे. आतला गाभारा वर्तूळाकृती असून व्यास २७९ फूट आहे.तर आतील गाभाऱ्याची उंची आहे ८६ फूट. अष्ट्कोनाचे समोरा समोरील कोनांचे अंतर ३३७ फूट तर बाजूंचे अंतर ३११ फूट आहे.

आता हे छायाचित्रे पहा.


१) हे फेरी बोटीतून दिसणारे पॅगोडाचे प्रथम दर्शन !

२) इथून तुमची प्रत्येक ठीकाणी तपासणी सुरू होते

३) थोडेसे बागेतून हिंडत गेल्यावर काही पायऱ्या चढून वर आले की प्रदक्षिणा मार्गाने आपण पॅगोडाचे समोर येऊन पोहोचतो. ह्या आहेत मुख्य पायऱ्या. थोड्या पायऱ्या चढून उजवीकडे गेले की कार्यालय, व चित्र कक्षा आहे. ती आवर्जून पहायला हवीच. येथे अतिशय सुंदर पेंटींग्स संपूर्ण बुध्दाचे चरीत्र उलगडून दाखवतात. ही सर्व चित्रे सुप्रसिध्द चित्रकार श्रीयुत वासूदेव कामतांनी काढलेली आहेत.

४) हा गाभाऱ्यात शिरण्याचा मार्ग.

५) ही दर्शनी लाकडी दरवाज्या वरील कोरीव काम.

६) ह्या छायाचित्रात गाभाऱ्याचा अगदि थोडा भाग आहे, जेव्हढा माझ्या कॅमेरा पकडू शकला !

७) बाहेरील भागाच्या भिंतींवर अशी सुवचने आहेत.

८) एक नमुन्याचा स्तंब, असे सगळेच अजून व्हायचे आहेत.

९) हे मी तिथेच बसून काढलेले लॅंडस्केप…कसं वाटतंय?

काही मुव्हीज

१)

२)

प्रवर्ग: स्थळ परिचय, Uncategorized टॅगस्
  1. 15/03/2010 येथे 11:44 सकाळी

    फोटो मस्त आहेत. . .माहितीबद्दल धन्यवाद!!!

    • 21/03/2010 येथे 9:22 pm

      मनमौजी,
      आपल्या अभिप्रायामुळे आनंदलो !

  2. ARUNAA ERANDE
    15/03/2010 येथे 12:59 pm

    अप्रतीम माहिती दिलीत . हा पगोडा जास्त लोकान्ना माहीत नसावा. मी ही त्यातलीच एक. पण तुमचि माहिती आणी फोतो दोन्ही छान. आणी जलचित्र तर अगदि हुबेहुब!
    अभिनन्दन .

    • 21/03/2010 येथे 9:21 pm

      अरूणाताई,

      अश्या अभिप्रायांमुळे हुरूप येतो.

  3. हेमंत आठल्ये
    15/03/2010 येथे 10:54 pm

    तुमच्या चित्रकलेला तोड नाही. जबरदस्त. लेख खुपंच माहितीपूर्ण होता. आवडला.

    • 27/03/2010 येथे 12:44 pm

      हेमंत जी प्रतिक्रियेबद्दल आभार

  4. hetal thakur.
    13/02/2012 येथे 3:12 pm

    tumchyamule mala itaki mahiti milali tyabaddal mi aapli aabhari aahe

  1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: