मुखपृष्ठ > अवांतर > मराठी ब्लॉगर्सचा मेळावा मुंबईत ?

मराठी ब्लॉगर्सचा मेळावा मुंबईत ?

आजचा दिवस माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. आज मी ’ काय वाट्टेल ते ’ लिहिणारे श्रीयुत महेंद्र कुलकर्णी व ’ नेटभेट.कॉम ’ चे सलील चौधरी ह्यांचे समवेत गांठ भेट घेऊन जवळजवळ दोन अडिच तास अंधेरीच्या मॅक्डोनॉल्ड मध्ये मनसोक्त गप्पा मारल्यात. दोन्ही व्यक्ती मला प्रचंड आवडल्यात. मराठी ब्लॉगर्स ना दोघेही चांगलेच सुप्रसिध्द आहेत त्यामुळे त्यांची ओळख पेक्षा आम्ही एकमेकांना ओळखण्यासाठी आजची भेट उपयुक्त ठरेल ह्यात मला संदेह नाही.

.

मागे मी व अनिकेत समुद्र एका दावणगिरी डोसाच्या ’वासा’ मुळे एकत्र काय भेटलो व त्याचे रूपांतर पुढे मराठी ब्लॉगर्स चा मेळावा प्रचंड उत्साहात पुण्यात घडण्यात झाले होते हे सर्वांना ज्ञात आहेच. त्याच वेळी श्री. महेंद्रजींनी तसा तो मुंबईत घडवून आणण्याबद्दल ईच्छा व्यक्त केली होती. आज आम्ही त्यावरही बोललो. कुणी सांगावे कदाचित पुण्यापेक्षाही मोठा, मराठी ब्लॉगर्सचा मेळावा मुंबईत घडविण्याचे ’त्या ’ च्या मनात असावे व मुंबईचे मराठी ब्लॉगर्स ते तितक्याच तत्परतेने मनावर घेतील ह्यात मला शंका नाही.

.

मागिल वेळी बऱ्याच जणांना पुण्यातील मेळाव्याला मनात असूनही उपस्थित रहाता आले नव्हते. शिवाय ’ मराठी मंडळी’ ह्या आपल्या संकेत स्थळाचे उदघाटन गेल्या एक तारखेला अंतराळातल्या अंतराळात झाल्यामुळे, पुन्हा एकत्र जमण्यातील आनंद अनेकांना घेता आलेला नव्हता. तेव्हा ही संधी आता आपल्याला मुंबईकर मिळवून देतील अशी माझी प्रबळ ईच्छा आहे व ती लवकर फलद्रुप होवो अशी ’त्या’चे पाशी प्रार्थना करतो..

महेंद्रजींनी अगदि घाई घाईत पण आठवणीने पाठवलेले ह्र छायाचित्र...सलील,मी आणि महेंद्रजी

 1. 12/03/2010 येथे 1:47 सकाळी

  मगाशीच महेंद्रदादाकडून आपल्या भेटीबद्दल कळले.तुमची भेट ह्यावेळी घेता आली नाही त्याबद्दल क्षमस्व. कृपया तारीख नक्की करण्याआधी मला कळवले तर बरे होइल कारण मला तशी सुट्टी बघावी लागेल.

  या विषयावर माझे अणि महेंद्र दादाचे बोलणे मागे एकदा झाले होते. मे महिन्यात मेळावा झाला तर उत्तम.

 2. 12/03/2010 येथे 6:19 सकाळी

  रोहन,

  आमच्या भेटीत तुमचा उल्लेख अगदि प्रथमच झाला, व नुकतेच म्हणजे काल परवाच तुम्ही अमेरिकेला गेल्याचे कळले. मागील महिन्याच्या १३ ता. ला तुम्ही पुण्यात येणार होतात पण जमले नव्हते, आणि मी इथे असूनही आपली भेट व्हायची नव्हती ! असूं दे लपंडावातही मजा असते.पण कितीवेळ लपून रहाणार नाही का ?

 3. 12/03/2010 येथे 8:22 सकाळी

  मस्त, बोललो होतो महेन्द्र काकाना ह्या बद्दल, काही मदत लागली तर नक्की सांगा.

 4. vinayak pachalag
  12/03/2010 येथे 2:33 pm

  aho
  kolhapur klolhapur kolhapur……………………………

  • 13/03/2010 येथे 11:30 pm

   कोल्हापूर वाले पण जमा ना एकत्र … आणि ठरवा जागा व तारीख म्हणजे तेथेही मेळावा घेऊ शकू , मलाच काय सर्वांनाच आवडेल अंबाबाईचा आशीर्वाद घ्यायला यायला ! मग काय ठरवतायना ?

 5. sahajach
  12/03/2010 येथे 3:12 pm

  काका यावेळेस तरी जुनचा मुहुर्त काढा ना… म्हणजे मलाही येता येईल…

  • 12/03/2010 येथे 8:18 pm

   तन्वी,

   तुझ्या तारखा नक्की झाल्यात का? आणि ह्यावेळी मुंबईकर तारीख व जागा ठरवणार आहेत !

  • 13/03/2010 येथे 11:43 pm

   तन्वी बर्याच दिवसांपसुन माझ्या मनात असे आहे की आपण नाशिकला येणार आहात तेव्हा येथे नाशकात मेळावा घेऊ या.

   • 13/03/2010 येथे 11:54 pm

    अगदि स्तुत्य विचार आहे.नाशिक तर माझे जन्म स्थळ तिथे तर मी हक्काने येईनच ! रविंद्रजी थोडा पुढाकार घ्या ना !
    रविंद्रजी तुमचा पत्ता मला मेल कराल?

 6. 13/03/2010 येथे 9:48 pm

  मेळावा व्हावी अशी तर मनापासून इच्छा आहे. तसे बऱ्याच लोकांना एकएकटं भेटून झालंय. पण एकदा सगळ्यांना एकदम भेटायला आवडेल.

 7. 13/03/2010 येथे 10:30 pm

  इच्छा आहे तिथे मार्ग पण आहे. महेंद्रजी, घ्या पुढाकार आम्ही मागे आहोच ! मुंबईकर तर पुण्यात सुध्दा आले होतेत. लागा आत्तापासून तयारीला.

 8. 13/03/2010 येथे 11:47 pm

  पेठे साहेब त्या दिवशी आपणाशी बोलायचा योग आला होता. पण माझा मोबाईल वाईब्रेटर वर होता त्यामुळे रिंग ऐकायला आलीच नाही. महेन्द्रजींनी दुसर्या दिवशी फोन केला होता. बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या. मी प्रत्यक्ष पणे नव्हे पण वर्चुअली आपल्या छोटे खानी मेळाव्यात हजर राहीलो असतो.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: