Archive
मराठी ब्लॉगर्सचा मेळावा मुंबईत ?
आजचा दिवस माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. आज मी ’ काय वाट्टेल ते ’ लिहिणारे श्रीयुत महेंद्र कुलकर्णी व ’ नेटभेट.कॉम ’ चे सलील चौधरी ह्यांचे समवेत गांठ भेट घेऊन जवळजवळ दोन अडिच तास अंधेरीच्या मॅक्डोनॉल्ड मध्ये मनसोक्त गप्पा मारल्यात. दोन्ही व्यक्ती मला प्रचंड आवडल्यात. मराठी ब्लॉगर्स ना दोघेही चांगलेच सुप्रसिध्द आहेत त्यामुळे त्यांची ओळख पेक्षा आम्ही एकमेकांना ओळखण्यासाठी आजची भेट उपयुक्त ठरेल ह्यात मला संदेह नाही.
.
मागे मी व अनिकेत समुद्र एका दावणगिरी डोसाच्या ’वासा’ मुळे एकत्र काय भेटलो व त्याचे रूपांतर पुढे मराठी ब्लॉगर्स चा मेळावा प्रचंड उत्साहात पुण्यात घडण्यात झाले होते हे सर्वांना ज्ञात आहेच. त्याच वेळी श्री. महेंद्रजींनी तसा तो मुंबईत घडवून आणण्याबद्दल ईच्छा व्यक्त केली होती. आज आम्ही त्यावरही बोललो. कुणी सांगावे कदाचित पुण्यापेक्षाही मोठा, मराठी ब्लॉगर्सचा मेळावा मुंबईत घडविण्याचे ’त्या ’ च्या मनात असावे व मुंबईचे मराठी ब्लॉगर्स ते तितक्याच तत्परतेने मनावर घेतील ह्यात मला शंका नाही.
.
मागिल वेळी बऱ्याच जणांना पुण्यातील मेळाव्याला मनात असूनही उपस्थित रहाता आले नव्हते. शिवाय ’ मराठी मंडळी’ ह्या आपल्या संकेत स्थळाचे उदघाटन गेल्या एक तारखेला अंतराळातल्या अंतराळात झाल्यामुळे, पुन्हा एकत्र जमण्यातील आनंद अनेकांना घेता आलेला नव्हता. तेव्हा ही संधी आता आपल्याला मुंबईकर मिळवून देतील अशी माझी प्रबळ ईच्छा आहे व ती लवकर फलद्रुप होवो अशी ’त्या’चे पाशी प्रार्थना करतो..
अलीकडील टिप्पण्या