मुखपृष्ठ > पुस्तक परिक्षण > स्केचिंग व ड्राईंगचे नवीन पुस्तक

स्केचिंग व ड्राईंगचे नवीन पुस्तक

संग्रह प्लाझा मध्ये एक चित्र प्रदर्शन पहायला जाण्याचा योग आला. प्रसिध्द चित्रकार रवि परांजपे ह्यांच्या मॉडेल कॉलनीतील बंगल्याच्या आवारात त्यानी ही गॅलरी सुरू केली आहे. प्रदर्शन पाहून झाले. बाहेर काही पुस्तके व इतर चित्रकलानिर्मित भेट वस्तू विक्रीला ठेवल्या होत्या. श्री. रवि परांजपेंच्या एका नव्या पुस्तकाने मी ओढला गेलो.

पुस्तक इंग्रजीत आहे. अगदीच छोटेखानी आहे, अवघे ३२ पानांचे व लिखित मजकूर अक्षरश: जेमतेम चार पाने भरतील इतकाच आहे  पुस्तकाचे नाव आहे. SKETCHING & DRAWING, A Personal View by  अर्थात  RAVI PARANJAPE.


हे आहे त्याचे मुखपृष्ठ.


आत ही त्यांची अगदी मोजकीच चित्रे आहेत  त्यातही जी मला आवडली ती खाली देत आहे. त्यांच्या चित्रातील रेषांचे महत्व, अगदी आवश्यक तेव्हढेच काम, चित्रातील व्यक्तीच्या सौंदर्याचा घेतलेला ध्यास.
त्यामुळे प्रत्येक चित्र वैशिष्ठ्यपूर्ण झालेलॆ आहे व त्यावर श्रीयुत रवि परांजपेंचा ठसा उमटलेला आहे.
.
.
.
.
.
.
.
तर हे आहे्त त्यांच्या मनोगतातील काही अंश…मात्र सर्व काही वाचा याचे असेल तर मात्र पुस्तक विकत घेऊन वाचणे व संग्रही ठेवणे केव्हाही चांगलेच नाही का? व तेही अवघ्या साठ रुपयात.
.
.
.

 1. 19/02/2010 येथे 12:29 सकाळी

  Jabardast chitre ahet kaka.
  Mi suddhaa khup aadhi sketching karaycho. hi chitre pahun punha pencil hatat ghyavishi vaatatey

  • 19/02/2010 येथे 6:16 सकाळी

   सलील जी,

   आपले माझ्या ह्या छोट्याश्या ब्लॉग वर स्वागत. हे स्केचेस चे पुस्तक मला बघता क्षणी आवडले व त्यातून पहाणाऱ्यालाही स्फुर्ति मिळावी हाच ह्या ब्लॉग चा उद्देश आहे व आपणास पुन्हा हातात पेन्सिल घ्यावीशी वाटते आहे ……नव्हे तशी प्रत्यक्ष ती हातात घेतलीत तर…आणि तिचे प्रताप आम्हाला ह्याची डॊळा पहायला मिळालेत तर किती धन्यता वाटेल !

   तसा मला तन्वीने आपल्या ’ नेट्भेट ’ अंका वर तिच्या ’ मित्र ’ ह्या पोस्ट मधून आधीच पोहोचवला आहेच ! माझी चित्रे इथे व माझ्या दुसऱ्या ब्लॉगवर पाहून कशी वाटलीत ते जरूर कळवा व शक्य असेल तर त्याला आपल्या नेटभेट वर त्याला स्थान देत इतरांना भेटवायचे असेल तर मला आनंदच होईल.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: