मुळशी जवळ
काल गुरूवार होता. माझे अजून एक स्नेही मला विचारते झाले व मीही होकार भरला, अन गाडी आम्हाला घेऊन सकाळी सातलाच पिरंगुट कडे निघाली. श्री. रवी देव हे अखिल भारतीय संस्कार भारतीचे मंत्री आहेत व चित्रकलेतही माहीर. गेल्या सहा वर्षापासून मी ह्या संस्थेचा सभासद आहे पण असा त्याचे सोबत जाण्याचा योग आलेला नव्हता !
वाटेत आमच्या गप्पा पण चालूच होत्या. संस्कार भारती हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच एक अंग आहे पण संघाच्या इतर कार्याची आम्हास खरे तर फारशी ओळख नाही. आज आम्हाला त्यातील काहीची तोंड ओळख होत होती.
मावळातील हा मुळशी धरणा जवळचा भाग डोंगर खोऱ्यांनी वेढलेला व निसर्गाने मुक्तहते उधळण केलेला प्रदेश आहे पण आत आतल्या गावातून दळणवळणाचे बाबतीत मात्र स्वातंत्रपूर्व काला इतकाच अप्रगत राहीलेला आहे, आणि शिक्षणाचे बाबतीत तर आजही तितकाच मागासलेला ! जिल्हा परिषदेच्या शाळा फक्त चौथी पर्यंत आहेत म्हणजे आहेत ! आता संघाने एक शाळा काढली आहे ५ वी ते १० वी पावेतो, तेही सरकार कडून छदाम ही न घेता फक्त जमणाऱ्या देणगींवर. त्यामुळे मुलांना तिथल्या तिथे शिकता तरी येते. निम्या मुलीही त्यात आहेत
काही वसतीगृहे ही चालवली जातात. अगदि स्वयंपूर्ण ! शिवाय महीलांचे विविध बचत गटही आहेत ! हा माणूस स्वत:चा ग्राफिकचा धंदा सांभाळून एव्हढी व्यवधाने कशी समर्थपणॆ सांभाळतो हे पाहणे कौतुकाचे आहे ! तेथिल निसर्ग सौंदर्याचे आधी काही फोटॊ दाखवतो.
दुधाचा धन्दा हा गावकऱ्यांचा पूरक धंदा.
आता आम्ही एक पठाराची जागा शोधलीय व बसतॊय ठिय्या मारून लँड्स्केपला.
ही बघा काही मी काढलेली जलरंग चित्रे !
landscapes chhan aahetch pan mala sangayache te ravi dev yanchyabaddal! hya mansachya sahavasat aalyavar vatate kase bare jamate hyana yevdhe sagale?
होय मलाही हा प्रश्न वारंवार पडतो
landscapes ani photos donhi chan aahet..aaj ek wegli mahiti wachayala milali….Thanks..
इतक्या जवळ असून मलाही ती माहीती तितकीच अपरिचित होती, म्हणतात ना , अति परिचया… पण इथॆ तर ती नव्याने परिचित होत होती
ekadam chhan! mala tisara sagalyat jast awadala. rangsangati ekdam mast.
पेठेकाका, माहिती व फोटो छानच आहेत. मला सगळ्यात जास्त आवडली ती तुम्ही काढलेली चित्रे. त्यातही दुसरे खूपच छान आलेय.
शब्दांकित व भा.स.
अभिप्रायांबद्दल आभार !
हे बरं आहे ना, प्रत्येकाला वेगवेगळी चित्रे आवडतात… म्हणजेच ती विकली जाण्याचे चान्सेस वाढतात !
काका मस्तच आलीत की स्केचेस……आणि शाळेबद्दलची माहितीही मस्त…असे काही पाहिले की आपणही काहितरी करावे ही उर्मी दाटते!!!
तू म्हणत्येस त्या प्रमाणे काहितरी करावेसे सतत वाटत रहाते ! आर्थिक मदतीचा ओघ चांगल्या कामांना सहसा कमी पडत नाही….खरं तर त्यांच्यात मिसळून वावरलो व थोडी आपले पणाने विचारपूस झाली ना तरी त्यांच्या नवी उमेद येते. त्यांच्यात जमीनीवर बसून चित्र काढीत होतो तर त्यांना केव्हढे अप्रूप वाटत होते ! वारंवार जाऊन असेच मिसळण्याचॆ ठरवले आहे, बघुया शरीर कसे , किती साथ देते ते !
landscapes apratim jhali aahet … aho kaka Mulashi la amcha farm house aahe … exact sangaycha tar nisarg mhanun ek ahe tikade tyachya jawal ,…pavasalyat tar Mulashi mhanje ekdam Exotic …
व्वा! मग छानच,.. मग पुण्यात कधी आगमन? जाऊया ना फॉर्म हाऊस वर…मी तय्यार आहे!
तिसरे निसर्ग चित्र एकदम सहीच …..
शेखरजी, आपले माझ्या ब्लॉग वरिल आगमन संतोषजनक आहे . आपल्या प्रतिक्रियेबद्दल आपले आभार
काका बोललों तर चालेल ?…..म्हणजे चालवूनच घ्यायला लागेल !!!
मला फक्त शेखर म्हणा….तो ‘जी’ नका लावू…… आणि हा reply हे सांगण्यासाठी कि माझे घरचे नाव संतोष आहे 🙂