मुखपृष्ठ > वर्णन, स्नेह मेळावा, Uncategorized > संकलन स्नेह-मेळाव्याचे

संकलन स्नेह-मेळाव्याचे


खरोखरीच कालचा स्नेह मेळावा हा आम्हा मराठी ब्लॉगर्स च्या एकुण कालखंडात सुवर्ण अक्षरांनी लिहीला जावा नव्हॆ लिहिला  जाईल हे काल उपस्थित असलेल्या अनेकांनी भेटून व त्यांच्या चेहेऱ्या वरील भावावरून सहज रित्या समजून येत होते. जे कोणी येऊ शकले नाहीत ते चुटपुटले, त्यांनी नंतर आपली हळहळ ही व्यक्त केली. पण अनेक जण जे स्नेह मेळाव्याला उपस्थित होते ही बघा त्यांनी केलेली काही चतुर्वैसत्यम वर्णने. मी इथे फकत त्यांना संकलीत केलॆ आहे.

सुरेश पेठे


इथे ऑर्कुट वरील फोटोची लिन्क

अनिकेत

पंकज

विक्रांत देशमुख

प्रभास गुप्ते


वैभव

हरेकृष्णजी

नीरजा पटवर्धन


अभिजित पेंढारकर
Media मंच , मधॆ वाचा
विनायक पाचलग चा लेक …… मेळाव्यानंतर..

तन्वी मस्कत हून इतरांच्या डोळ्यातून पहात !

म्हणूनच ठरवलं की मी आज जे वर्णन करणार आहे ते म्हणजे ह्या कार्यक्रमा मागिल पडद्या मागच्या हालचाली.

खरी ह्याला सुरुवात झाली ती माझ्या दावणगिरी डोस्यावरील पोस्ट वरून अनिकेत, अजय, तन्वी, अपर्णा ह्यांच्या भांडणावर मी एका कवितेतून उत्तर दिले तेव्हा पासून !


त्यावरून मी एकदा सहज म्हणून अनिकेत ला फोन केला. तेव्हाच आम्ही एकमेकाशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आपण दोघेच का आपण सगळ्यांनाच बोलावू या ना, एखादी पोस्ट टाकूया त्या साठी !  त्याची सम्मती कळली व लगेच  मी एक पोस्ट तयार करून व पु. ल. देशपांडे उद्यान ही जागा ही ठरवून टाकली. आणि १७ जानेवारी हा दिनांक कायम केला. अगदि सुरुवाती पासून प्रतिसादांचे रतीब सुरू झाले, सुरुवातीला हा  कट्टा बनतोय की काय शंका आली. परंतू नंतर मात्र प्रत्येकाला त्याची निकड आहे ह्याची जाणीव झाली व नंतर प्रतिसादांचा तर अक्षरश: पाऊस पडला. ही च ती पोस्ट ज्यावर १२१ प्रतिक्रिया नोंदविल्या गेल्यात.

मग एकदा अनिकेत ची गांठ घेतलीच ….. आपल्या ब्लॉगर्स मधला हा पहिला भुणभुणणारा भुंगा मी प्रत्यक्ष पाहिला व  पकडला !! तो पर्यंत मी मेळाव्याला येतोय म्हणणाऱ्यांची गर्दी वाढू  लागलेली होती. आम्हाला आणखीन सहाय्यकांची जरूर लागणार असे फक्त मनात विचार येण्याचा अवकाश.. विक्रांत, भुंगा, पंकज  असे ….नव्या दमाचे सहाय्यक बाह्या सरसावून पुढे आले. मग काय गेल्याच शनिवारी ९ जानेवारीला आम्ही बालगंधर्व च्या कॅंटीन मधे जमलो. अजून नवे तीन सहकाऱ्यांची प्रत्यक्ष गाठ व साथ मिळाल्यावर आमची अशी ही ” हम पाच ” ची पंचकडी तयार झाली !
सर्व कार्यक्रमाची रूपरेषा  मिनिट तू मिनिट आखून लिहून घेतली. ऐन वेळी कुठलीही गडबड होऊ द्यायची नाही. एव्हढा मोठ्ठा जमाव ( आम्हाला , निदान मलातरी तशी स्वप्ने पडू लागलेली होती ) जमणार तेव्हा कार्यक्रम वेळेवरच सुरू हवा हा कटाक्ष होता. जमावाला कंटाळा वाटू नये त्याचे आत तो संपवणे हेही बंधन कारक होते. शिवाय मधल्या काळात तॊ वाहवत जाणार नाही हे पहाणे तितकेच निकडीचे झाले. फोटॊ, विडीयो वगैरे प्रत्येक बारिकसारीक गोष्टीची आंखणी झाली. कामे वाटून घेतलीत. व सर्व कार्यक्रम सफाईदार पणॆ पार पडावा अशी इच्छा मनी धरली.
आता मात्र मी एकटा वा आम्ही पाचच नाहीत आपण सर्व आता आमच्या  बरोबरीने आहात. एव्हढॆच सांगेन की नजीकच्या कालावधीत आपण खूप  काही महत्वाचे व दूरगामी परिणाम घडवणारे निर्णय घेणार आहोत त्यासाठी तयारीत रहा..
Advertisements
 1. 18/01/2010 येथे 11:38 pm

  पेठेकाका घेतलेली मेहनत तडीस लागली व यापुढे वाढतच राहील. अभिनंदन!

 2. 18/01/2010 येथे 11:49 pm

  फोटोत मी छान दिसतोय ना? 🙂

  • 19/01/2010 येथे 10:55 सकाळी

   हो ना मला मात्र आउट ऑफ फोकस ठेवलेत ना ?

   • sahajach
    19/01/2010 येथे 10:58 सकाळी

    काका तुम्ही आउट ऑफ फोकस नाही आहात…तुम्ही उलट केंद्रस्थानी आहात…
    हो ना रे पंकज!!!!

   • 19/01/2010 येथे 12:01 pm

    काका, आऊट ऑफ फोकस नाही… सेंटर स्टेजला आहात तुम्ही.

 3. Atul Deshmukh
  19/01/2010 येथे 12:05 सकाळी

  orkut madhye photos la tag karanyachi soy aste..te karun photot disnaryanchi tari olakh hou shakel ase mala vatate…

  • सुरेश पेठे
   19/01/2010 येथे 6:41 सकाळी

   अतुलजी व सर्वांना विनंती….!

   कारण त्या एके दिवशीच अनेक मंडळींचा परिचय झाल्याने कित्येक नावे आत्ता लक्षात येत नाहीत…क्षमस्व !…तरीही खालील कॉमेंटस मध्ये‘ आपले स्थान व नाव ज्याचे त्याने लिहावेत अशी मी विनंती करतॊ. नंतर सवडीने मी अपडेट करीन

   कदाचित जे माझ्या मित्र यादीत नसतील त्यांनी विनंती पाठवल्यास मी तत्परतेने त्यांना मित्र बनवून घेईन, मला मित्र हवे आहेतच !

 4. 19/01/2010 येथे 6:38 सकाळी

  पेठेकाका आणि खरंतर तुम्हा सर्वांचच अभिनंदन की इतक्या पटकन आपण हा मेळावा घडवून आणलात…मला खूपच कौतुक आणि येता न आल्याबद्दल वाईट वाटतंय..
  पंकज तू फ़ोटोत एकदम भटक्या दिसतोयस…म्हणजे छानच (त्याचा कुठलाही पुणेरी अर्थ काढु नये म्हणून छानही म्हटलंय…:))
  भुंगा (दिपक), मी यापुढे तुम्हाला आदरार्थी संबोधावं असं वाटतंय…
  भुंगा (अनिकेत) तुला तसं ऑर्कुटवर पाहिलंय पण या ठिकाणी तू बराच असा मेळावामय झालेला वाटतोय…
  विक्रांत मी फ़ार ओळख नाही झाली ब्लॉगशी पण फ़ोन कानाशी त्यामुळे बिझी बी …
  आणि काका तुम्हाला काय आता फ़ोटो कॉमेन्टस देऊ सर्वांना जोडणारा एक मोठा हात असंच तुमचं वर्णन करायला हवं नाही का??
  फ़क्त पंकजबद्दल लिहून गैरसमज नको म्हणून सगळ्यांनाच फ़ोटो कॉमेन्टपण दिलीय…काका तुमचे पुन्हा आभार…

 5. sahajach
  19/01/2010 येथे 9:21 सकाळी

  काका, आत्ताच ऑर्कूटवरचे सगळ्यांची नाव असलेले फोटो पाहिलेत……

  पंकज तू नायगावकर (ज्युनियर) दिसतोस :)….

  आणि अपर्णा अगं भुंगा (दिपक) ला केवळ वयातले साधर्म्य पहाता मी तरी सरळ एकेरी हाक मारते नाहीतर त्याच्या ब्लॉगमधले त्याचे विचार वाचता तो आदरार्थी संबोधनालाच पात्र आहे. (तसेही त्याच्या आणि माझ्यात गुडघे दुखीचेही साम्य आहे आणि तो मला सावंतवाडीहुन आणलेली लाकडी मगर देणे आहे :)) …….पण एकेरी म्हटले की कसे मनमोकळेपणे बोलता येते……..बाकि पंकज, रोहन मंडळी तर तसेही लहान आहेत…..

  भूंगा (अनिकेतला) ऑर्कुटवर पाहिलेलेच आहे फक्त एक बारिक विचार मनात येतोय की त्याची ’प्रवास स्थुल बांधा ते बारिक’ अशी जी पोस्ट होती ती मागे पडल्यामुळे वजनाचा काटा पुढे आला असावा :D(अनिकेत रागावू नकोस…माझे आपले मत)……….

  विक्रांतशी माझीही खुप ओळख नाहीये अजुन…..पण better late than never या न्यायाने आता त्याच्या ब्लॉगाला गाठले पाहीजे……….

  आणि ’काका’ …..तुम्हाला कालच सांगितलेय तसे की तुम्ही ’चिरतरूण’ आहात……

  काकांच्या पोस्टपेक्षा माझी प्रतिक्रिया मोठी होतीये बहुतेक……पण हा ब्लॉग हे हक्काचे घर आहे इथे मनातले विचार जसे येतात तसे टाईपतेय…

  काका खरयं तुमचं आता आपण सगळे एकत्र आहोत…..आणि तुमचा विश्वासक आधार आम्हाला आहे तेव्हा एकेक पाउल पुढे टाकूयात नक्की……….

  • अनिकेत
   19/01/2010 येथे 9:13 pm

   तन्वी, 🙂 अगं मी खरंच रागावत नाही गं, मागे पण तुला सांगीतले होते असो.
   हम्म, तु म्हणतीस ते बरोबर आहे, काटा थोडा (!) सरकला आहे पुढे, पण त्याचे कारण माझ्या २०१० च्या रिझॉल्युशन मध्येच आहे नं, बघीतलं नसशील तर हे बघ इथे टिचकी मार. गेले दोन वर्ष शरीराला फारच त्रास दिला होता २०१० जरा काही तरी वेगळं बस्सं. बाकी जाड वगैरे नाही हं, थोडंसं बाळसं धरलं आहे एवढचं 🙂

 6. 19/01/2010 येथे 11:54 सकाळी

  या मेळाव्याला मुकलो..पण पुढच्या वेळी हे होणे नाही..खुप तळमळतो आहे इतक्या ब्लॉगर्सना एकाच ठिकाणी भेटता आल असत..असो आता पुढच्या वेळी यमाच्या द्वारातुन देखील परत येइन…बाकी वरील सर्व पोस्टमुळे मेळावा काही अंशी अनुभवता आला त्याबद्दल सर्वांचेच आभार…मेळावा यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन..ऑल क्रेडिट गोज़ टु यु एन युवर पंचकडी…

 7. 19/01/2010 येथे 8:05 pm

  maajhaa blog chitraanchaa tyaamule mraathi bloggers chya meLavyaalaa naahi rahilo upastheet. bahutek yetyaa athwadyaat Pune yethe chakkar hoyeel , jamal tar tumhaala bhetun jaayeen

 8. 21/01/2010 येथे 1:04 pm

  Tya database che pudhe kaay zale? Tyabaddal email vagaire pathavali ahe ka?

  Mala tari kahi email milali nahi ajun…

  aani mi Orkut var nahiye Facebook var koni photo takale ahet ka?

  ~ Kau

 9. सुरेश पेठे
  21/01/2010 येथे 3:33 pm

  कौस्तुभ,
  डाटा बेस तयार होत आहे व सगळ्यांना एका ग्रूप वर येण्या साठी मेल लवकरच पाठवली जाईल. तसेच लवकरच आपण आपली स्वतंत्र वेब साईट तयार करीत आहोत. सध्या मराठी साहित्य परिषदे्च्या येत्या सम्मेलनात आपल्याला भाग घेता यावा ह्या प्रयत्नात आपली टीम गर्क आहे. थोडे थांबा व पहा एव्हढेच मी आत्ता सागेन.

 10. vinayak
  21/01/2010 येथे 10:59 pm

  hey all aani suresh kaka
  pls check my blogs for my views
  pls consider it
  http://www.pvinayak.co.cc

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: