माझे मनोगत

आजचा मराठी ब्लॉगर्स चा स्नेह मेळावा अतिशय सुनियोजित पणे व दिमाखात पार पडला. ६१ जणांची उपस्थीती होती.  आजच्या मेळाव्याचा एक आयोजक ह्या नात्याने मी माझे खालील  मनोगत प्रास्ताविकात मांडले.

अधिक माहिती व फोटो उद्या पोस्ट करतो.

माझे मनोगत


१)  मराठीतून ब्लॉग लिहीणाऱ्यांचा एक स्नेह मेळावा भरवावा ह्याबाबत मनात कल्पना येताच मी अनिकेतशी बोललो. तो ही माझ्या मताशी सहमत आहे हे बघीतल्यावर मी लगेच एक पोस्ट तयार करून ब्लॉगवर टाकली. त्यावेळी त्याला इतका मोठा प्रतिसाद मिळेल ही कल्पनाही आमचे मनात नव्हती. पण मिळालेल्या प्रतिसादावरून अश्या मेळाव्याची आवश्यकता आहे हे  आता जाणवते. आज आपण मोठ्या संख्येने जमून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

शिवाय जगभरातील मराठी ब्लॉगर्स चे डोळे आजच्या मेळावाच्या यशस्वीतेकडे लागून राहीलेलॆ आहेत. काहींची नावे घेतलीत तर ती अप्रस्तुत ठरू नये जसे अनुजा व तन्वी मस्कत, रोहन चौधरी, भाग्यश्री आदि अमेरिकेतून, तर अजून एक भाग्यश्री इंदूर हून, अगदि मुंबई, नागपूर, कोल्हापूर,नाशिक, औरंगाबाद, सांगली ते फलटण पर्यंत सर्व दूर पसरलेले आहेत.  आज ह्या मेळाव्याला  निरनिराळ्या  क्षेत्रातील अनेक प्रतिष्टीत व्यक्ती उपस्थित आहेत. मेडीया व वर्तमान पत्रांनीही ही कल्पना उचलून धरली आहे. मी इथे उपस्थीत असलेल्या या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत करतो.

२)  मध्यंतरीच्या काळात अनेक जणांनी अनेक अपेक्षा वर्तवल्या आहेत. मात्र आज आपण येथे प्रामुख्याने जमा झालॊ आहोत ते एकमेकांच्या व्यक्तीश: ओळखी करून घेण्या साठी.  कारण आत्ता पर्यंत आम्ही भेटत आलो ते आंतर्जालावर पोस्ट नाहीतर कॉमेंटसच्या रूपाने ! त्या नंतरच आपल्याला काय काय करता येईल हे आपण पहाणार आहोत.

३)  आपणा पुढेही अनेक अडचणी आहेत. सर्व प्रथम आपण असे किती जण ब्लॉग्स लिहीतो. आपले ब्लॉगचे विषय काय काय आहेत?  कुठल्या कुठल्या संकेत स्थळांवर आपण  ब्लॉगस लिहीतो. अशी एक सर्वकश  यादी  बनविणे हे आपले सर्वात प्रथम काम असेल व त्यासाठी आपणा सर्वांनी ती ती माहीती पुरवणे ही आपल्या पुढील कामाची प्राथमिकता असेल.

४)  अश्या ब्लॉगची सुविधा आपणा पर्यंत पोहोचवणारे कोण कोण आहेत व त्यांचा तौलनीक अभ्यास. त्यातील असलेल्या सुविधा वा कमतरता. मराठी टाईपिंग च्या सुविधा त्यातील आपल्याला येणाऱ्या अडचणी.इत्यादि वर चर्चा करून निघणाऱ्या मार्गांबाबत विचार करणे.

५)  तसेच, अनेक ब्लॉगर्स  अत्यंत अभ्यासपूर्ण लिखाण करतात. अश्या ब्लॉगर्स च्या ब्लॉग मधून निर्माण होणाऱ्या वाङमयाला साहित्य संमेलनातून काही प्रोत्साहन मिळू शकते का व त्याचे छापील रूपांतरा बाबतची शक्यता व संबधितांशी वार्तालाप. अश्या वाङ्मयातील होणाऱ्या चौर्यकर्मा बाबत काय करता येईल ह्याबाबत विचार वगैरे.  मी येथे फक्त अश्या काही समस्यां व मुद्यांचा अगदि ओझरता परामर्श घेतला आहे आपल्यातील चर्चेतून त्यांचे समग्र दर्शन व त्यावरील उपाय ह्याचा उहापोह होईलच.

६)  त्या साठी आपण सारे एकत्र आलो व संघटीत बनलो तर ब्लॉगर्स च्या अडचणींवर संघटीत पणाने मात करणे शक्य होईल. तेव्हा ह्या आजच्या मेळाव्याच्या रूपाने जमलेल्या सर्वांना मी आवाहन करीत आहे की सर्वांनी  संघटीत सामना करण्यासाठी एक होऊया.

७)  त्यासाठी लवकरच आंतरजालावर एक ग्रुप स्थापन करू. म्हणजे त्या ग्रुपच्या व्यासपीठावर  जगभरातील मराठी लिहीणारे ब्लॉगर्स सखोल चर्चा करू शकतील. तसेच ठराविक कालाने आजच्या सारखेच पुन्ह: पुन्हा एकत्र जमून चर्चा विनिमय करून सर्वानुमते निर्णयही घेऊ शकु व त्याचा सतत पाठपुरावा करू शकू. मराठी ब्लॉगर्स  साठी काहीतरी ठोस करण्याची इच्छा मनात बाळगुया. अशी उत्कटता व पारदर्शकता हेच आपले प्रमुख उद्दीष्ट असायला हवे.

जय महाराष्ट्र ! जय भारत !

सुरेश पेठे

पुणे
१७ जानेवारी २०१०
प्रवर्ग: स्नेह मेळावा
 1. vinayak
  17/01/2010 येथे 11:27 pm

  thanks kaka
  mi tar sharirane ithe aani mananne tithe hoto
  sarakhe pankaj la phone karat hoto
  mi aaj jari upasthit nasalo
  tari ya pudhachya sagalya uprakmat mi ek integral part asin nahi asnarach aahe
  aajach mi shekhr joshi (loksatta) aani pudhraitil lok yana batami cover karayala sangitali aahe
  jamale tar udya parava Radio Mirchi var ghein
  no prob
  thanks again
  melavhya potosahit vruttatntachya pratikshet
  vinayak

 2. 18/01/2010 येथे 12:03 सकाळी

  पेठेकाका एका विवक्षीत क्षणी तुमच्या मनात या कल्पनेने मूळ धरले आणि लगोलग ते बीज सगळ्यांच्या मनात रूजलेही गेले. तुम्ही व अनिकेतने सुरवात करून-मेहनत घेऊन संकल्पना पुढे नेलीत. अनेक मने याची वाटच पाहात होती. सगळे ब्लॊगर्स अतिशय आनंदाने व उत्सुकतेने या मेळाव्याची उत्सुकतेने व आतुरतेने वाट पाहू लागले. आमच्यासारखे पैलतिरावर असले तरी मनाने तुमच्या सगळ्यांबरोबरच होते. सगळ्यांचेच मन:पूर्वक अभिनंदन व अनेक शुभेच्छा! ब्लॊगर्स स्नेह उत्तरोत्तर वाढत जावो व अतिशय समर्थ साहित्य व बहुउद्देशीय उपक्रम यातून निर्माण व्हावेत अशीच इच्छा आहे. पुन्हा एकदा अभिनंदन!

 3. vinayak
  18/01/2010 येथे 12:14 सकाळी

  shekhar joshina mail kela aahe tar baki sagalyana phone
  ya nimmitane kahi mudde mandayache aahet
  udya photo aani vruttant vachalyavar mandato

 4. 18/01/2010 येथे 1:22 सकाळी

  This is a great beginning!!! I am sure this activity will grow in a big way!!!
  Please let me know in what way I can contribute.. and count me in the future activities.
  -Sudhanwa

 5. 18/01/2010 येथे 5:06 सकाळी

  काका, खूप छान निर्णय घेतले गेलेत. एकंदर याची मोठ्ठी चळवळ होणार हे नक्की. मस्तच. सगळ्यांचं अभिनंदन..!!

 6. 18/01/2010 येथे 8:13 सकाळी

  ब्लॉगर्स मीटची माहिती लगेच कळवल्याबद्द्ल खूप आभार…

 7. 18/01/2010 येथे 8:45 सकाळी

  Sarva-pratham tumche abhinandan!!
  Aaj-ach sakali – esakaal war batmi vachli.
  Pahilyach bhetit 50 houn adhik bloggers cha ptatisaad milala. Hee baab tar kautukaspad aahech.

  Chala, hya weli nahi; pan pudhchya weli hazeri lavin 🙂

 8. sahajach
  18/01/2010 येथे 9:11 सकाळी

  काका या यशाचे श्रेय तुमचे, अनिकेतचे आणि भूंगा,पंकज सगळ्यांचे!!!! सगळ्यात आधि तर तुम्हा सगळ्यांचे आभार…
  मजा आली असेन ना!!! एक वेगळाच अनुभव…चला प्रत्यक्ष नाही तरी तुमच्या लेखनातून आणि फोटोतून पहातो आम्ही……….

  तुम्ही मांडलेले मुद्देही अगदी व्यवस्थित आहेत…
  तेव्हा लगे रहो!!! हम तुम्हारे साथ है!!!!यावेळेस तर नाही जमले पण जुनमधे मात्र नक्की भेटते तुम्हा सगळ्यांना!!

 9. 18/01/2010 येथे 9:25 सकाळी

  तुम्ही ऑर्कुटवर लावलेले फोटो पाहिले. पण कुठला फोटो कोणाचा आहे तेच समजत नाही. कृपया सगळ्यांची नावं लिहिलीत तर बरं होईल.
  ह्या मेळाव्यात झालेल्या गोष्टींवर चर्चा होणे आणि त्यांचा पाठ पुरावा होणे पण आवश्यक आहे. लवकरच मुंबईला पण करु या मेळावा..

  • 18/01/2010 येथे 9:55 सकाळी

   महेंद्रजी,
   जी थोडा वेळ द्या, मी आहे अडाणी, मला टॅग प्रकरण काय असते व कसे ते समजावलेत तर अधिक चांगले

 10. 18/01/2010 येथे 9:31 सकाळी

  मराठी ब्लॉग मेळावा जो यशस्वी पार पडला त्याबद्दल आपले अभिनंदन. मी स्वतः लेखिका आहे. साहित्य संमेलना बाबत जे निर्णय होतील त्याबद्दल माहिती द्यावी ही विनंती.

  धन्यवाद

  उज्ज्वला केळकर

  सांगली

  http://www.ujjwalakelkar.blogspot.com

 11. 18/01/2010 येथे 9:32 सकाळी

  पहिला मराठी ब्लॉगर्सचा मेळावा यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन. पुढील काळात प्रत्यक्षपणे सहभागी होण्यास उत्सुक आहे. अधिक माहिती देत रहालच याची खात्री आहे.

  आपला

  अमोल केळकर

 12. 18/01/2010 येथे 11:33 सकाळी

  काका, वृत्तांत वाचला. अभिनंदन! ब्लॉगर्स स्नेह मेळावा यशस्वीरित्या पार पाडलात. ऑर्कुटवर तुम्ही याच युझरनेमने आहात का? फोटो पहाते.

 13. 18/01/2010 येथे 2:06 pm

  Kaka,
  http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/2010/01/blog-post.html
  ithe mi pan vruttant takalay. ani tumhala orkut var friend req pathavaliye.

 14. 18/01/2010 येथे 3:26 pm

  ब्लॉगर्सच्या मेळाव्याला यायचे सकाळी ठरविले. पण अचानक महत्वाचे काम उपटले आणि राहून गेले. तुम्ही मंडळी ह्या निमित्ताने मराठीची जाण आणि पोज वाढवित आहेत याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. माझा ब्लॉग निमित्त आहे.www.subhshinamdar.blogspot.com तुमच्या कार्यात पहभागी होण्याची इच्छा आहे. माझा उपयोग झाला तर आनंदच वाटेल. पुढची प्रगती जरूर कऴवा. त्यासाठी माझा मेल आहे.subhashinamdar@gmaiul.com

 15. 18/01/2010 येथे 4:29 pm

  पेठे साहेब आपल्या उत्साहाने आमचाही उत्साह अंमळ वाढला आहे. स्वांत सुखाय लिहायचा कंटाळा आला होता.

 16. 18/01/2010 येथे 4:49 pm

  मराठी ब्लॉगर्सचा पहिला वहिला मेळावा यशस्वी झाल्याबद्दल आपले अभिनंदन
  मॆळाव्याला भरपूर प्रतिसाद मिळाल्याचे वाचून बरे वाटले
  ऐनवेळी काहीतरी काम निघाल्यामुले येउ शकलो नाही याचे वाईट वाटते आहे.

  संजय जोशी

 17. 18/01/2010 येथे 4:55 pm

  नमस्कार काका,
  अभिनंदन!! अर्थात मीट छानच होणार याची खात्री होतीच. आपण पुढाकार घेऊन सर्वाना एकत्र केलेत. मी मीट च्या पोस्ट वाचतच आहे. आपले प्रोत्साहन आम्हाला पुन्हा पुन्हा भेट करवून आणण्यास उत्सुक करीत आहे. आपण सर्वांनी ठरविलेले प्रस्ताव खूपच आवडले. आम्ही( मी व तन्वी) जून मध्ये येऊ तेंव्हा एखादी भेट नक्की ठरवाल का? य्द्याच्या पोस्ट ची वाट पाहते. काही मदत हवी असल्यास काका हक्काने सांगा. मेल पाठवते. वाचून कळवा. सर्वांचे अभिनंदन!!

 18. D D
  18/01/2010 येथे 6:31 pm

  नमस्कार,
  मराठी ब्लॉगर्सचा हा पहिला मेळावा आयोजित करून यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन!
  मी या मेळाव्याला येऊ शकले नाही याचे वाईट वाटते आहे. पण आता ऑर्कुटवर फ़ोटो पाहणार आहे.

 1. 18/01/2010 येथे 10:29 pm
 2. 02/01/2011 येथे 4:15 pm
 3. 15/05/2011 येथे 10:04 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: