मुखपृष्ठ > Uncategorized > मेळाव्याला वृत्तपत्रीय प्रतिसाद

मेळाव्याला वृत्तपत्रीय प्रतिसाद

पेठे काका
नमस्कार
पुण्यात होणाऱया ब्लॉग लेखकांच्या मेळाव्याची बातमी मी आज आमच्याकडे दिली आहे. उद्याच्या मुंबई वृत्तान्तमध्ये पान एकवर ती प्रसिद्ध झाली आहे. आपल्याला लोकसत्ताच्या नेट आवृत्तीवर ती बातमी पाहता येईल.
कळावे
आपला
शेखर जोशी
आपले सगळे मित्र मंडळी आता जोरदार कामाला लागले आहेत .मुंबई वृत्तांतातील बातमी खाली देत आहे .
.
सुरेश पेठे
मेळावा मराठी ब्लॉगलेखकांचा! Print E-mail
प्रतिनिधी
आपल्या मनातील विचार, विविध विषयांवरील मते आणि भावभावना व्यक्त करण्यासाठी सर्वसामान्यांनाही आता ब्लॉगचा पर्याय उपलब्ध आहे. अमिताभ बच्चन शाहरुख खान यांच्या ब्लॉगप्रमाणेच ज्याला लिहिण्याची आवड आहे अशी कोणीही व्यक्ती आपला स्वत:चा ब्लॉग तयार करुन लेखन करु शकते. मराठी भाषेत आज सुमारे दीड हजारांन अधिक व्यक्ती आपले ब्लॉग चालवत असून त्यांचा एक मेळावा येत्या १७ जानेवारी रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.
गुगल आणि अन्य संकेतस्थळांच्या माध्यमातून आज सर्वसामान्य माणसालाही ई-मेल प्रमाणे जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यावर कोणीही आपला ब्लॉग सुरु करु शकतो. मराठी ब्लॉगनेटच्या माध्यमातून सध्या १ हजार ६४७ व्यक्ती विविध विषयांवर मराठातून ब्लॉगलेखन करत आहेत. केवळ मराठीतूनच ब्लॉग लेखन करणाऱ्या मराठी ब्लॉग धारकांचा हा मेळावा दुपारी ४ ते ७ या वेळेत पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रस्ता, बिग बाजारजवळ, पुणे येथे येत्या रविवारी आयोजित करण्यात आला आहे.
ब्लॉगलेखक सुरेश पेठे, अनिकेत समुद्र यांच्यातील चर्चेतून या पहिल्या मराठीतून लेखन करणाऱ्या ब्लॉग लेखकांच्या मेळाव्याची कल्पना पुढे आली. पेठे यांनी आपल्या ब्लॉगवर त्याविषयी सुतोवाच केले आणि ब्लॉगविश्वातून अनेकांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे पेठे व समुद्र यांचा उत्साह वाढला.
या ब्लॉगमेळाव्यासाठी जगभरातील मराठीतून ब्लॉगलेखन करणारी लेखक मंडळी अपेक्षित आहेत. केवळ ब्लॉगच्या माध्यमातून किंवा प्रतिक्रियांमधून नेहमी भेटणाऱ्या या सर्व मंडळींनी एकत्र यावे, सर्वाचा प्रत्यक्ष परिचय व्हावा, आपापले ब्लॉग, त्यावरील लेखन, नवीन कल्पना, भविष्यातील कार्यक्रमांची रुपरेषा यांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला
आहे.
येत्या रविवारी होणाऱ्या या मेळाव्यास मराठीतून ब्लॉगलेखन करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी पेठे यांच्याशी
sureshpethe@gmail.com वर संपर्क साधावा.

आत्ता  सकाळ मधील प्रतिसाद पहा

ही त्याची लिन्क.. http://72.78.249.125/esakal/20100114/4618764544374061429.htm

,


Advertisements
प्रवर्ग: Uncategorized
 1. 13/01/2010 येथे 7:16 सकाळी

  मी मराठी ब्लॉग विश्व च्या आयोजकांना मेळाव्याला येण्याचे आवाहन केले होते. त्याचेकडून खालील उत्तर आले. मात्र मराठी ब्लॉग विश्व च्या भींतीवर आपल्या मेळाव्याची जाहिरात झळकत्येय !

  ” नमस्कार सुरेश,

  तुमचा कार्यक्रम स्तुत्य आहे. आमचे प्रतिनिधी सध्या पुण्यात नसल्यामुळे (इच्छा असूनही) आम्हाला येणे जमणार नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत.

  मात्र या कार्यक्रमाबद्दल माहिती आम्ही जरूर मराठीब्लॉग्ज.नेट द्वारा मराठी ब्लॉगर्सना पोहोचवू.

  कळावे,
  admin@marathiblogs.net

 2. अनिकेत
  13/01/2010 येथे 11:37 सकाळी

  ह्म्म, हे छान झाले, माझाही विचार होता त्यांना लिहीण्याचा, पण आज-उद्या करत राहुन गेले होते.

 3. 13/01/2010 येथे 1:17 pm

  मी पण सकाळ’ला लिहून बघतो.

  • 13/01/2010 येथे 1:23 pm

   सगळ्यांनी प्रयत्न करा. उद्या परवा लोकसत्ताच्या पुणे आवृत्तीत येईल.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: