मुखपृष्ठ > अवांतर > मराठी ब्लॉगर्सचा स्नेह मेळावा, पुण्यात

मराठी ब्लॉगर्सचा स्नेह मेळावा, पुण्यात

मराठीब्लॉग्स नेट वर  नोंदलेल्या व इतरही मराठीत नियमीत लिहिणाऱ्या पुण्यातील ब्लॉगर्सचा एक स्नेहमेळावा येत्या रविवारी दिनांक १७ जानेवारी २०१० रोजी संध्याकाळी ४ वाजता , सिंहगड रोड येथील पु. ल. देशपांडे उद्यानात ठरविला आहे.
पु. ल. देशपांडे उद्यान संध्याकाळी ४ ला उघडते. उद्यानाची प्रवेश फी रू ५/- आहे.
पहिल्या भेटीचा उद्देश एकमेकांचा परिचय करून घेणे हा्च मुख्यत: असेल, तरीही ह्या भेटीत पुढील कार्यक्रमांची रूपरेषा व वारंवारिता ठरवणे, त्याचे ठिकाण, आपापल्या ब्लॉग्स ची माहीती व इतर आवश्यक बाबींवर चर्चा करता येईल.
तरी ह्या स्नेह मेळाव्याला आपण उपस्थित रहावे, तसेच आपल्या माहीतीतल्या सर्व ब्लॉगर्स ना ह्याची कल्पना देऊन त्यानाही येण्यास उद्युक्त करावे अशी मी नम्र विनंती करीत आहे. आपण खात्रीने येणार असल्याची नोंद, आपले नाव व फोन नं. सहीत येथेच आपल्या उत्तरात करावी म्हणजे त्याचेशी संपर्क करणे सोयीचे होईल. ह्या पुढील कार्यवाही आपल्या प्रतिसादावर अवलंबून असेल.
आपले,
सुरेश पेठे
अनिकेत समुद्र
( ता.क. — आपण मला ९८५०४८८६४० वर SMS  करा अथवा  sureshpetheAtgmail Dotcom – वर मेल करा. )
प्रवर्ग: अवांतर टॅगस्
 1. अनिकेत
  04/01/2010 येथे 4:45 pm

  छान केलेत पोस्ट टाकलीत ते. आपण तर भेटुच, पण अजुन कोणी येणार असेल तर एकत्रच होऊन जाईल.
  मी येनार, येत्या ३-४ दिवसात वाचकांच्या प्रतिक्रिया बघुन मग त्यानुसार वेळ ठरवु.

  वाचकांना विनंती, येणार असाल तर तुम्हाला योग्य वाटणारी (संध्याकाळची ४-७ मधली) वेळ कळवावी.

  महेंद्र, पुण्याचा दौरा काढा की त्यावेळेस काही तरी काम/मिटींग काढुन या जमणार असेल तर 🙂
  भुंग्या, तुला तर मला भेटायचेच आहे, सो.. जमवंच बरं का!

 2. 04/01/2010 येथे 4:49 pm

  विक्रांत देशमुख
  ब्लॉग – http://vikrantdeshmukh.blogspot.com
  दूरध्वनी – ९८९०६६९५४३

 3. अनिकेत वैद्य
  04/01/2010 येथे 5:13 pm

  नमस्कार काका,

  मी एक वाचक आहे. मी येऊ शकतो का त्या मीट ला?

  अनिकेत वैद्य.

  • 05/01/2010 येथे 11:19 सकाळी

   अनिकेत वैद्य,
   आपण जरूर जरूर याच. आपला फोन नं. कळवलात तर बरे.

 4. 04/01/2010 येथे 5:23 pm

  कल्पना चांगली आहे. पण परवा पासुन बडोदा, सुरत वापी आहे प्लान. जर रविवारी घरी राहिलो नाही तर बायको घरात घेणार नाही. 🙂

 5. 04/01/2010 येथे 6:42 pm

  मूळ पोस्ट मध्ये १० जानेवारी तारीख टाकली होती , पण सगळ्य़ांना माहीती व्हावी म्हणून १७ जानेवारी ठरवित आहोत.

  @ महेंद्र,
  मग बायकोलाच घरा बाहेर काढा ना , तुमच्या बरोबर ! त्यांची ही पुण्याची ट्रीप होऊन जाईल !

  • 05/01/2010 येथे 9:30 सकाळी

   मुलीची परिक्षा आहे , सध्या.. त्यामुळे कुठे निघता येणार नाही सध्या तरी काही दिवस. गेली दोन वर्ष एल टी सी पण पेपर लिव्ह घेतोय 😦

   • सुरेश पेठे
    06/01/2010 येथे 11:07 pm

    महेंद्रजी,
    आपण ह्या प्रसंगी उपस्थित रहावेत अशी माझी व्यक्तीश: कळकळीची विनंती आहे. कसेहि ऍडजेस्ट कराच. मिळणा़ऱ्या प्रतिसादावरून मेळावा उपयुक्त होईल अशी आशा वाटते.

 6. 04/01/2010 येथे 7:02 pm

  me yenar. ravivari 4 / 5 vajata chalel.

  • 05/01/2010 येथे 11:45 सकाळी

   गौरी,
   मला फोन न. SMS केलात तर संपर्क करता येईल.

 7. 04/01/2010 येथे 7:08 pm

  फक्त पुण्यातील ब्लॉगर्सचा स्नेहमेळावा का ?

  आम्ही पुण्याबाहेरील लोकांनी काय करायचे 😦

  तरीही मी न बोलावता येणार 🙂 जमल तर बर का 😉

  • 05/01/2010 येथे 11:21 सकाळी

   विक्रम,
   आपण अवश्य यायचेच आहे. आपला फोन नं. कळवलात तर संपर्कात रहाता येईल.

   • 05/01/2010 येथे 11:39 सकाळी

    मी येण्याचा नक्की प्रयत्न करेन 🙂

    9423232313

 8. Meenal
  04/01/2010 येथे 7:40 pm

  फक्त पुणे ब्लॉगर्सच भेटणार? 😦
  आमच्यासाठी फोटो अपलोड कराल ना?

  • सुरेश पेठे
   06/01/2010 येथे 11:09 pm

   मीनल, असे कोणी सांगीतले ? जगभरातले कॊणीही पुण्यात होणाऱ्या ह्या मेळाव्याला आवर्जून यावेत अशीच इच्छा आहे.

   • 12/01/2010 येथे 6:29 सकाळी

    मीनल ,
    आपली माहिती व फोन न मेल करा ना

 9. 04/01/2010 येथे 8:26 pm

  चांगली कल्पना आहे. मी नक्की येईन. ४ ते ७ मधली कोणतीही वेळ चालेल.

  फोन नं – ९८६०६४८१२७

 10. 04/01/2010 येथे 9:18 pm

  माझ्या सर्व मित्र मंडळींनी, ब्लॉग ह्या विषयी आत्मियता व प्रेम असणाऱ्या सर्वांनी, तसेच त्या दिवशी पुण्यात असणाऱ्या व/वा येऊ शकणाऱ्या सर्वांनी कुठलाही गैरसमज करून न घेता ह्या मेळाव्याला अवश्य यावे. प्राथमिक अंदाज घेण्या साठी, आणि काही तरी criteria असावा म्हणून तसे लिहीले आहे एव्हढेच. मात्र येणार असाल तर आधी कल्पना असावी म्हणून येथे आपले नाव व फोन नं. ची येथे नोंद करावी.

  जे कोणी त्यावेळी येऊ शकणार नाहीत त्यांचे सोयी साठी, त्या दिवशी झालेल्या मेळाव्याची माहीती व फोटॊ सह एक पोस्ट माझ्याच ब्लॉगवर देण्याची व्यवस्था हॊईल.

 11. sahajach
  04/01/2010 येथे 9:47 pm

  अरेच्या, मगाशी पाहून गेले तेव्हा दोघेच होते आता बाकिचे पण जॉईन होताहेत……आमच्यासाठी फोटो काढण्याचे आणि ते टाकण्याचे काम अनिकेत तुझे बरं का…..आणि केलेले स्केचेस लोड करण्याची जबाबदारी काका तुमची…..आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत…..

  अनिकेत तुझे जुनिअर मॉडॆल ने बरोबर त्याचे मस्त स्केच होउ देत एक…आजवर त्याचे अनेक सुरेख फोटो पाहिलेत आता वेगळ्या रुपात येउ दे तो हिरो समोर……

  (मी भारतात नाहिये याचे अश्यावेळी भलते वाईट वाटते..पण better late than never…जुनमधे गाठतेच सगळ्यांना…..)

 12. vinayak
  04/01/2010 येथे 10:35 pm

  pls
  10 tarikh theva na
  mi 10 tarakhela aahe punyat
  mi mulacha KOp cha aahe
  blog
  http://www.pvinayak.co.cc

  • 05/01/2010 येथे 11:31 सकाळी

   विनायक,
   आपली सूचना कळाली, पण मलाच व्यक्तीश: तेव्हा जमणार नाही व हे कळल्या बरोबर मी तारीख बदलली. आताचा रिस्पॉन्स पहाता ती बदलली हेच ठिक वाटत आहे. आपण पुण्यात आल्यावर मला फोन केलात ( ९८५०४८८६४०) तर आपली गाठ घ्यायचा प्रयत्न करीन. असे असले तरि आपले मेळाव्या संबंधीचे विचार जरूर येथे कळवावेत.

 13. 04/01/2010 येथे 10:51 pm

  मी जर का या दिवशी पुण्यामधे असलो तर नक्की येईन.

  • 05/01/2010 येथे 11:34 सकाळी

   हरेकष्ण,
   आपण अवश्य वेळ काढून याच. आपला फोन नं. मला कळवलात तर मी संपर्कात राहीन

 14. आल्हाद alias Alhad
  04/01/2010 येथे 10:52 pm

  पुणे मीटसाठी शुभेच्छा…

  • 05/01/2010 येथे 11:17 सकाळी

   आझाद,
   आपला फोन नं. कळवलात तर संपर्क करता येईल

   • 05/01/2010 येथे 11:23 सकाळी

    आपण आल्हाद,
    माफ करा, नजर दोष मुळे हे घडले

 15. 04/01/2010 येथे 11:24 pm

  मित्रांनो,

  (हात वर करुन) मी येणार…….

  आपला,
  (रिकामटेकडा) विशुभाऊ….

  • 05/01/2010 येथे 10:54 सकाळी

   विशुभाऊ फोन नं कळवलात तर बरे अथवा मेल करा.

   • 06/01/2010 येथे 1:14 सकाळी

    मेल कशाला पंत???? इथेच लिहुनघ्या ९२२३३१५७०८, आमचा फोन म्हणजे फक्त छत्रपती किंवा पेशव्यांनीच करावा असा नाही… कोणिही खुशाल फोन करवा व गप्पा ठोकाव्यात…

    आपला,
    (गप्पिष्ट) विशुभाऊ

  • 05/01/2010 येथे 1:03 pm

   तुमची कंसात लिहायची ष्टाईल आवडली बरका !

 16. mipunekar
  04/01/2010 येथे 11:58 pm

  पुणे मीट साठी शुभेच्छा!
  सध्या पुण्यात नसल्यामुळे जमू शकणार नाही. फोटो जरूर अपलोड करावेत.

  • 05/01/2010 येथे 10:53 सकाळी

   पण संपर्कात रहा. आपल फोन नं कळवलात तर बरे अथवा मेल करा

 17. 05/01/2010 येथे 12:09 सकाळी

  आमच्यासाठी फोटो काढण्याचे आणि ते टाकण्याचे काम अनिकेत तुझे बरं का…..आणि केलेले स्केचेस लोड करण्याची जबाबदारी काका तुमची…..आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत…..
  तन्वीचं ढापलंय…पण माझ्या स्वतःच्या शुभेच्छा आहेह..मी मुंबैत येईन तेव्हा मुंबईची पण एक ब्लॉगर्स मीट करायला आवडेल आणि तेव्हा सगळे पुणेवाले याल अशी अपेक्षा आहे…..महेन्द्रकाका तुम्हाला आता जमलं नाहीतर आपण तेव्हा करू 🙂

 18. 05/01/2010 येथे 11:00 सकाळी

  अपर्णा, तन्वीला पूर्ण अनुमोदन. काका तुमचा नंबर देऊन ठेवा. व तुमच्या कडे एक डिरेक्टरी करा सर्वांची म्हणजे जे कोणी नंतर येतील ते तुम्हाला फोन
  करून संपर्क ठेवतील. शुभेश्च्या मीट साठी, व्हीडीओ क्लिप टाका म्हणजे आम्हाला ही सर्वाना पाहता येईल. अनिकेत ला सांगा. नाहीतर पंकज तयार असेलच. तुमच्या ब्लॉग वर सर्व एकत्रित टाका .छे! आम्ही किती लांब राहतो वाईट वाटते. असो मी पुणेकर आहे. माझे घर पुण्यात आहे. मी संपर्क करीनच पण काका तुमचा फोन नंबर पोस्ट वर द्या. वर्तमान पेपर ला बातमी द्या. म्हणजे सर्वाना समजेल. अनिकेत ठरवेल म्हणा सर्व.
  मी वर्ड प्रेस वर कमी आहे पण मेल चेक करत असते. काका मेल वर मला संपर्क केलात तरी चालेल. पुन्हा हार्दिक शुभेश्च्या!!

  • 05/01/2010 येथे 11:15 सकाळी

   अनुक्षरे,
   इथे भेट दिल्याने चांगले वाटले. अर्थात मेल ही करीनच. माझा नं. आहे ( ९८५०४८८६४० ), ज्यांना आपले नम्बर्स येथे देणे श्यक्य नसेल त्यानी मला SMS ने आपापले नम्बर्स कळवलेत तर मी संपर्क करीन. जे जे आत्ता पुण्यात येऊ शकणार नाहीत त्यांचे साठी वेगळ्या पोस्ट द्वारे माहीती देऊच मात्र ह्या मेळाव्या संबंधी आपले काही विचार असतील तर ते येथे उत्तरात मांडा जेणेकरून त्यावर मेळाव्यात जरूर चर्चा केली जाईल. खरे तर हा मेळावा घेण्याचा हाच तर उद्देश आहे.

 19. 05/01/2010 येथे 11:18 सकाळी

  विनायक,
  अभिनंदन!! मी लेख वाचला फारच छान लिहिला आहे. लहान वयात इतकी सुंदर भाषा शैली, ठाम विचार, ओघवते शब्द खिळवून ठेवले. २०१० साठी खूप शुभेश्च्या!! लवकरच प्रतिथयश लेखकात तुझे नाव असेल असा विश्वास मला आहे. लिखाण असेच सुरु ठेव. माझे सासर सांगली व घर कोल्हापूर
  येथे आहे म्हणून विशेष आत्मीयता!! असो लेख व ब्लॉग खूप आवडला.

  • 05/01/2010 येथे 12:07 pm

   विनायक,
   अरेव व्वा ! हा पैलू माझ्या नजरेतून निसटून चालला होता, अनुक्षरे मुळॆ लक्षत आला. तू कय वाटेल ते कर पण १७ ला येच.
   निदान पुण्यात आलास की मला कृपया फोन कर, वाट पहातोय.

 20. अनिकेत
  05/01/2010 येथे 12:01 pm

  तन्वी, अपर्णा – फोटो बद्दल न सांगताही ते आलेच. पु.ल. देशपांड बाग माझे अतिशय आवडते फोटो ठिकाण आहे. जपानी बागेचा तो एक अप्रतिम नमुना आहे त्यामुळे कॅमेरा बरोबर तर नक्की असणारच, आणि ब्लॉगर्सचे फोटो पण नक्की येतीलच.

  बाकी पोराला बरोबर न्हेणे म्हणजे.. जरा धोकादायक वाटते आहे 🙂 उच्छाद मांडेल तो तेथे. कारण ती बाग त्याला आवडत नाही. बाग म्हणल्यावर झोपाळे, पाळणे, घसरगुंड्या, फुगे, भेळ, घोडे, चक्र वगैरे असते तसे ह्या बागेत, बागेपाशी काहीच नाहीये.

 21. 05/01/2010 येथे 1:04 pm

  मी पण येणार .. विशुभाऊनी सांगितले ..
  माझा नंबर ९४२०४२५५५१

 22. 05/01/2010 येथे 2:33 pm

  I will try to come der, but I want to publish your this things on my web site. I need your permission. And if possible send me press note in english, so every body will knows it. MarathiTheatre.com will be online media partner for this. My contact number is 9833930990

 23. jayantckulkarni
  05/01/2010 येथे 7:49 pm

  मी येणार आहे.
  जयंत कुलकर्णी
  ९४२३२३०३९४
  http://www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

  • सुरेश पेठे
   06/01/2010 येथे 11:14 pm

   जयंतजी,
   आपले स्वागत आहे, जरूर या आम्ही सारे आपली वाट पहात आहोत.

 24. 05/01/2010 येथे 11:38 pm

  अनिकेत,
  व्हीडीओ पण टाक. मला बघायचे आहे सगळ्यांना. प्लीज मी, अपर्णा, तन्वी आम्ही लांब राहतो. आणि व्हीडीओ त नावाची ओळख द्या. नाही जमले तर आम्हाला मेल वर पाठव. सलील व प्रणव (नेटभेट) त्यानाही आवर्जून माझा निरोप दे. काकांचा ब्लॉग म्हणजे कट्टा झालाय न. मस्त वाटते त्यांच्या ब्लॉग वर गप्पा करायला. काय काय खादडाताय ते पण फोटो टाक रे आठवणीने. जळतोय रे आम्ही!!! दुखी: पण आहोत पण तुमचा भरोसा आहे.
  आम्हाला एकटे वाटणार नाही इतके छान रिपोर्ट बघायला मिळतील. अजून काही मदत मी इकडून करू शकेन ती मला कळवा.

  • सुरेश पेठे
   06/01/2010 येथे 11:17 pm

   अनुक्षरे,
   पु. ल. देशपांडे उद्यानात, खायला प्यायला काहीही नेता येत नाही ! तू आलीस की आपण खादाडी करूच ! फोटॊही काढू !!

 25. सुरेश पेठे
  06/01/2010 येथे 6:48 सकाळी

  माझ्या मित्रांनो माझे घर ’ कट्टा ’ होतोय ह्याचा मला आनंद आहे, या साऱ्यांनी येथे याच !

  मीच ह्या कट्ट्यावर नवीन आहे तेव्हा बऱ्याच जणांशी माझी अजून पुरती ओळख झालेली नाही तेव्हा सर्वांनी आपापल्या मित्रांना कळवून ह्या कट्ट्याचा पत्ता द्या.

  तसेच आपापल्या ब्लॉग वर ह्या मेळाव्या संबंधी पोस्ट टाकून सगळ्यांना हा पत्ता द्या. म्हणजे मराठीब्लॉग्स DOT नेट वर ही माहीती सतत वर व सगळ्याच्या नजरे समोर राहील.

  @ अनिकेत ,
  एव्हढा रिस्पॉन्स मिळॆलसे वाटले नव्हते. आत्ताच आंकडा १२ चे पुढे गेला आहे. तेव्हा आता प्लॅन करायला लागेलसे दिसते. लवकर भेट

 26. rohan
  06/01/2010 येथे 1:26 pm

  यायला आवडले असते पण सध्या भारताबाहेर आहे .. पुढच्या वेळी नक्की येणार आम्ही पुणेकर नसलो तरीही… 🙂

  • सुरेश पेठे
   06/01/2010 येथे 10:59 pm

   रोहनजी,
   आपण व्यक्तीश: असतात तर अधिक चांगले झाले असते, पुढील होणाऱ्या एखाद्या मेळाव्याला आपण हजर राहू शकता. आपण कुठेही असलात तरी येथे संपर्कात रहाल अशी आशा करतो.

   • Rohan
    09/01/2010 येथे 8:08 pm

    होय नक्कीच … भारतात असीन तर नक्की येणार… १११% तुम्हा सर्वांना भेटायची खुप इच्छा आहेच…

   • 10/01/2010 येथे 2:12 pm

    रोहन जी,
    मग असा कि भारतात , जमवलं की जमत.

 27. 06/01/2010 येथे 1:36 pm

  अप्पुन भी भटकत-भटकत आनेवाला हय… अर्थात सह्याद्रीने त्या दिवशी (तरी) सुट्टी द्यावी.

  http://www.pankajz.com/

  • सुरेश पेठे
   06/01/2010 येथे 11:20 pm

   पंकज,
   जरूर व आवश्यक त्या फोटोग्राफीच्या साहित्यासह यायचे आहे! सगळ्या जणीची तशी फर्माईश आहे बरं का !

   • 06/01/2010 येथे 11:34 pm

    फोटोची गळ मला नाही… अनिकेतला आहे…. चला मी सुटलो 😀

    असो… कुणीही कुठेही भेटणार असाल तर मला सांगा मी नक्की येण्याचा प्रयत्न करणार. लुडबुड करायला.
    pankajzarekar@gmail.com

   • sahajach
    07/01/2010 येथे 10:27 सकाळी

    पंकज असा बरा सुटलास…..तुझी नवी लेन्स ने…आणि क्लिका रे भरपुर……आमचा इथे हेवा वाटून(मनात जळुन) कोळसा होतोय……फोटू तरी पाहू दे….

 28. 06/01/2010 येथे 3:11 pm

  मी नक्की येणार. सिंहगड रोडलाच राहतो, त्यामुळं यायला काहीच अडचण नाहीये!

  – प्रभास गुप्ते
  ९९७० ९८९ ८७९

  • सुरेश पेठे
   06/01/2010 येथे 11:22 pm

   हो नक्की याच प्रभास गुप्तेजी. आम्ही सगळे वाट पाहू.

 29. Amarjeet
  06/01/2010 येथे 4:06 pm

  i cant come..im in nagpur

  • सुरेश पेठे
   06/01/2010 येथे 11:01 pm

   अमरजीत जी
   आपण व्यक्तीश: उपस्थित राहीला असतात तर अधिक चांगले झाले असते, पुढील होणाऱ्या एखाद्या मेळाव्याला आपण उपस्थित राहू शकता. आपण कुठेही असलात तरी येथे संपर्कात रहाल अशी आशा करतो

 30. vinayak
  06/01/2010 येथे 7:54 pm

  Sorry for let comment first
  I am buzy with my studies
  Yes, I will tray to come on 17 if psble
  was in pune at 10 th for my FIITJEE exam,& for going to Saptahik Sadhanas office
  but will try definately
  @suresh sir
  will definately call you
  & yes thanks for your many many responses on my article in Saamana
  tumache aashirvad asech rahu det
  by the way- for connecting with me
  my information
  1. e- mail ID- vinayakpachalag@gmail.com
  Mob- 8087216867
  twitter ID -pvinayak
  (nilesh malap has taken sponsership nahitar aamchya rangkarmi.com ne ghetali asati, ti pan punha suru hot aahe thodya divasat)

  • सुरेश पेठे
   06/01/2010 येथे 11:31 pm

   विनायक,
   तू येणार हे ऐकून आनंद वाटला, नाहीतर तारीख बदलल्यामुळॆच तू येऊ शकणार नाहीस अशी रूखरूख लागून राहीली असती.

   निलेश मळप ह्यांनी कुठलीही स्पॉन्सरशिप वगैरे घेतलेली / वा कोणाला दिलेली नाही. त्यांनी एक प्रस्ताव मांडण्याचे ठरवले आहे ज्यावर आपण विचार करून निर्णय घेऊ. तू ही तुझा काही प्रस्ताव असेल तर मेळाव्यात मांडू शकतोस, त्यावरही आपण सारे विचार / चर्चा करून निर्णय घेऊया.

 31. D D
  06/01/2010 येथे 8:30 pm

  या मेळाव्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! मुद्दाम आधी कॉमेंट दिली नाही, कारण मलाही ह्या मेळाव्याला यायची इच्छा आहे, पण शक्य झालं तरच! अर्थात माझा निर्णय अगदी आदल्यादिवशी होईल. पण मी येणार असेन तर मोबाईलवर संपर्क साधून कळवेनच. पण या मेळाव्याच्या वेळेत काही बदल झाला, तर कृपया या पोस्टवर सूचना द्या.

  • सुरेश पेठे
   06/01/2010 येथे 11:35 pm

   डी.डी.,
   असा कुठलाही बदल संभवत नाही. त्या दिवशीच्या पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा दोन दिवस आधी येथेच पोस्ट करू. आवश्य यायचे आहे न विसरता.

 32. 06/01/2010 येथे 11:26 pm

  या मेळाव्याला मीही मुंबईतून नक्की येणार आहे… सर्व ब्लॉगर्सना भेटण्याची मला उत्सुकता लागलेली आहे.
  माझी मोबाईल क्रमांक — 9820355926. जर मेळाव्याच्या स्वरुपात काही बदल झाला तर मला कृपया कळवा.

  • 06/01/2010 येथे 11:42 pm

   ॐकार डंके जी,
   आपले स्वागत आहे. अवश्य याच आम्ही वाट पहात आहोत.

 33. 06/01/2010 येथे 11:44 pm

  नमस्कार,
  ह्या ब्लॊगरच्या संमेलनाला यायची इच्छा आहे.
  पण सध्या तरी पुणे वारी शक्य नाही असे वाटते. तरी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा 🙂

  • 06/01/2010 येथे 11:48 pm

   देवदत्त जी,
   आपण व्यक्तीश: उपस्थित राहीला असतात तर अधिक चांगले झाले असते, पुढील होणाऱ्या एखाद्या मेळाव्याला आपण उपस्थित राहू शकता. आपण कुठेही असलात तरी येथे संपर्कात रहाल अशी आशा करतो

 34. 06/01/2010 येथे 11:55 pm

  येणारच असे म्हणत नाही पण यायचा प्रयत्न जरुर करेन…
  (८०८७३४५७८९)

  • सुरेश पेठे
   07/01/2010 येथे 12:00 सकाळी

   देवेंद्रजी,
   छान बातमी दिलीत, जरूर मेळाव्याला याच.

 35. 07/01/2010 येथे 8:28 सकाळी

  पेठेकाका संमेलनाची संकल्पना एकदम मस्तच आहे. आवर्जून उपस्थित राहायची इच्छा अर्थातच आहे परंतु मायदेशात नसल्याने निदान या पहिल्या मेळाव्याला हजर राहता येणार नाही त्यामुळे वाईट वाटतेय. पण केव्हांतरी योग येईलच आणि मी नक्कीच सहभागी होईन. तोवर ऒनलाईन सहभाग आहेच. व्हिडिओ-फोटो व वृत्तांत जरूर उपलब्ध करून द्या म्हणजे ओळखी होतील व जेव्हां सहभागी होण्याचा योग येईल तेव्हां जास्त मजा यईल.
  तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा.

 36. 07/01/2010 येथे 9:00 सकाळी

  काका, एकदम म्हणजे एकदमच मस्त कल्पना आहे स्नेह-मेळाव्याची. भारतात नसल्याने येऊ शकणार नाही. 😦 पण सर्वांना शुभेच्छा !! आणि फोटोज, विडीयोज नक्की अपलोड करा.

 37. 07/01/2010 येथे 10:33 सकाळी

  कळकळीची नम्र विनंती:
  बऱ्याच मित्र-मैत्रीणींनी इथे वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक दिले आहेत ज्याचा गैरवापर होण्याची या सायबर जालात खूप जास्त शक्यता असते. मी स्वतः असे अनेक विचित्र अनुभव घेतले आहेत. तसे वाईट अनुभव कुणाला येऊ नयेत म्हणून हा आग्रहवजा विनंती. अगदीच काही नाही तर मार्केटिंग वाले तरी टपून असतात. माझी पेठे काका, अनिकेत (किंवा इतर कुणीही, ज्यात मी पण आलो) नम्र विनंती आहे की या कमेंट्समधले क्रमांक स्वतंत्रपणे टिपून इथून काढून टाकावेत.
  अथवा मीपण हे काम करायला तयार आहे. तसे कळवा.

  • 07/01/2010 येथे 1:41 pm

   पंकज चा मुद्दा योग्य वाटतो, मालाही त्याची जाणीव आहे, त्याच साठी माझ्या मूळ ब्लॉगवर माझा फोन नंबर व मेल आय डी दिलेला आहे तेव्हा नवीन लोकांनी तेथेच आपली माहिती पुरवावी.

   मी स्वत: लकरच अश्या उल्लेखांचे संपादन करीत आहे. पंकजने हे काम केले तर मला मदतच होईल. सर्वांची एकत्रीत माहिती tabular form मधे मला मेल केली तरी चालेल

 38. 07/01/2010 येथे 12:43 pm

  Mi pan yenar …

  Maza blog.. – http://pune-marathi-blog.blogspot.com/

  M – 9822525662

  Omkar Deshmukh
  Sadashiv Peth
  Pune

 39. 07/01/2010 येथे 4:28 pm

  भुंगा आणि पेठे काका,
  मी काही वैयक्तीक कारणामुळे येऊ शकणार नाही, माफी असावी. तुम्हा सर्वांना खुप शुभेच्छा !

  -अजय

 40. salilchaudhary
  07/01/2010 येथे 6:33 pm

  प्रतीसाद पाहुन कार्यक्रम एकदम झकास होणारच यात शंका नाही. सुरेश काकांनी ही अफलातुन कल्पना लढवली. मस्तच !

  आम्ही मात्र कमनशिबी :-(.

  रोजची धावपळ कमी पडते म्हणुन की काय पण १७ जानेवारीला मुंबई मॅरेथॉन मध्ये धावण्याचा बेत आधीच ठरवलाय ! आणि चांगले २१ किलोमीटर धावल्यावर घरी परतायचेच वांदे मग “पुणं” तर दुरच राहीले !

  (नेटभेटवर फारसे वैयक्तीक काही लिहीत नाही, म्हणुन इथेच वाचकांना सांगुन टाकले की “मी मॅरेथॉन धावतोय 😛 )

  ब्लॉगर मित्रांनो मजा करा, फोटो अपलोड करा आणि सविस्तर लिहा बरं का आपापल्या ब्लॉग्जवर.

  जय महाराष्ट्र !

  Salil Chaudhary
  http://www.netbhet.com

 41. 07/01/2010 येथे 6:46 pm

  अरे वा.. मस्त आहे रिस्पॉन्स.. अरे मुंबईकरांनो कधी करताय मीट?? लवकर करा रे प्लान कुणीतरी. नाहीतर पेठेकाकांनाच यावं लागेल मुंबईची मिट प्लान करायला..

  • 07/01/2010 येथे 6:57 pm

   काय हे महेंद्रजी तुमच्यावर भरवसा आहे, कसे हि करा व या ना. इथे या मग मग मुंबईची मीट पण करू आम्ही ही येऊ. मग विचार बदला आणि आग्रहाचे निमंत्रण समजून याच.

 42. 07/01/2010 येथे 6:51 pm

  I will surely come.

  • 08/01/2010 येथे 9:09 सकाळी

   पल्लवी,
   या, जरूर याच. हा मेळावा आपल्या आपल्यातील विचारांची देवाण घेवाण साठीच तर आहे. आपला फोन नं. मला SMS किंवा मेल केलात तर आपल्याशी संपर्क करणॆ सोयीचे जाईल. माझा फोन नं. व मेल आय डी वरील लेखात दिला आहे.

 43. आनंद पत्रे
  07/01/2010 येथे 9:32 pm

  दुर्दैवाने या वेळेस नाही जमनार, पण सर्वांना शुभेच्छा!
  व्रुतांत आणि फोटोंची वाट पाहतो.

  • 08/01/2010 येथे 9:14 सकाळी

   आनंद पत्रे,

   काही हरकत नाही एक बस चुकली तर दुसरी मिळेल ! ह्याच ब्लॉग वर नंतर समग्र माहीती देऊच. आपला फोन नं. व इतर माहिती मेल केलीत तर संपर्क सोपा होईल.

 44. 07/01/2010 येथे 11:36 pm

  पेठे साहेब मी नाशिककर पण जमले तर जरूर येईन! या बिन भिंतीच्या घरच्यांना भेटण्याचा हा योग आहे असे म्हणायला हरकत नाही. 9423481757

  रविवार असल्याने मला वाटते वेळ १२ ते १ ची ठेवावी म्हणजे सकाळी लवकर निघालो तर वेळीच पोहोचता येते आणि कार्यक्रम आटोपून परत हि येऊ शकतो. बघा जस जमेलतसे.

 45. सुरेश पेठे
  08/01/2010 येथे 6:32 सकाळी

  रविंद्रजी,
  हे काय मला साहेब केलेत जो मला कधीच भावला नाही !! पुण्यात आता भेटण्या साठीही ’ फुकट’ जागा मिळत नाहीत !!
  आपला हा मेळावा जेव्हा ठरवित होतो त्यावेळी रिस्पॉन्स बद्दल कुठलीच कल्पना नव्हती. खरे तर आम्ही चार पाचच भेटू ही प्राथमिक कल्पना मनात होती. पण आता मिळणारा रिस्प~ऒन्स पहाता अश्या मेळाव्याची गरज आहे हे लक्षात येतेय.
  ही जपानी पध्दतीची बाग सुंदर आहे, संध्याकाळची वेळ पण मस्त आहे, तेव्हा मुक्काम करावा लागला तरी छान वाटणार आहे. मला चाट वर भेटलात तर नाशिकच्या गप्पा मारता येतील , माझे जन्म गाव आहे ते.

 46. 08/01/2010 येथे 7:44 pm

  प्लॅनिंग छान आहे, पण माझं मुळीच जमणार नाही, पण एन्जॉय करा… शुभेच्छा… 😉

  विशल्या!

  • 09/01/2010 येथे 7:05 सकाळी

   विशाल जी,
   मुळीच जमणार नाही म्हणजे काया? असं काय हे जरा जमवाच ना राव ! पुण्यातच आहात ना?

 47. D D
  08/01/2010 येथे 9:41 pm

  रवींद्रजींच्या सूचनेप्रमाणे जर मेळाव्याची वेळ सकाळी उशीराची (११ किंवा १२ ची) ठेवली, तर आमच्यासारख्या बाहेरगावहून येणार्‍यांना पहाटे निघून मेळाव्याला हजर राहता येईल आणि त्याच दिवशी कार्यक्रम आटोपून परत येता येईल. ते जास्त सोईचे वाटते. “पु. ल. देशपांडे उद्यान” सकाळी उघडे नसते का?

  • 09/01/2010 येथे 7:50 सकाळी

   देवयानी,

   पुण्यात फुकटात काय विकतही अश्या जागा मिळत नाहीत ! आणि बागा ही सुध्दा दुपारी बंद असतात का तर येणारे लोक झोपा काढायला येतात…व कर्मचाऱ्याची झोप उडवतात म्हणे !

   हा पहीलाच प्रयत्न म्हणून सार्वजनिक ठीकाणी स्नेह मेळावा घेत आहोत पुढील वेळी सर्व सुचनांचा अभ्यास करूच. तूर्त please bear with us !

   पण कसे ही करून शक्य कराच , कारण ह्याच प्रतिसादावर पुढील निर्णय अवलंबून आहेत… तर भेटुया आधी तिथेच.

 48. gajanan mhetar
  08/01/2010 येथे 9:56 pm

  kalpana chagli aahe mob no. 9423841409

  • 09/01/2010 येथे 7:02 सकाळी

   गजानन म्हेतर जी

   म्हणजे आपण नक्की येतायंत तर ! जरूर जरूर या आपले स्वागत आहे.

 49. 10/01/2010 येथे 10:56 सकाळी

  आताच एका मित्राने तुमच्या ब्लॉग ची लिंक फॉर्वर्ड केली.
  वाह! छान आइडीया आहे!
  १७ ला पुण्यात नसेन, पण ह्या पुढच्या मेळाव्यात नक्की हेज़री लावीन.
  तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

  • 10/01/2010 येथे 2:10 pm

   आकाश,
   आपल्या शुभेच्छा हव्यातच पण आपली उपस्थिती अधिक महत्वाची असती. अत्यंत आभार. शिवाय आभार त्या मित्राचेहि ज्याने लिंक तुम्हाला पाठवली !

 50. 10/01/2010 येथे 11:02 सकाळी

  श्री. सुरेश पेठे आणी श्री.अनिकेत समुद्र

  आपण पुढाकार घेउन हा कार्य्रक्रम करत आहात याबद्दल आपले आभार.
  फारच सुंदर उपक्रम आहे.
  येण्याचा विचार आहेच त्यानिमीत्ताने आपल्यासारख्या अनेक ब्लॉगर्सेची प्रत्यक्ष भेट होईल
  धन्यवाद
  संजय जोशी
  ९८२२०६१७५५

 51. aruna erande
  10/01/2010 येथे 3:38 pm

  a stutya upakram. abhinandan.

  • 10/01/2010 येथे 9:07 pm

   सौ. वहिनी नमस्कार,
   आभारी आहे , जमवा आणि जरूर या.

 52. Smit Gade
  11/01/2010 येथे 10:26 सकाळी

  Mi pan ..mi pan..
  maza number
  8087972601
  (amhi lekhak nasun visitorschi sankhya vadhavnare ahot)

  • 11/01/2010 येथे 10:50 सकाळी

   स्मित गाडे,
   आपण कोणीही असा , आपले स्नेह मेळाव्यात स्वागत आहे. मला खात्री आहे की ब्लॉग वाचता वाचता आपण स्वत: एकेदिवशी ब्लॉगर बनाल.

 53. Atul Deshmukh
  11/01/2010 येथे 1:52 pm

  मी दिल्लीला असतो.. पण जमले तर येण्याचा प्रयत्न करेन weekend मध्ये २ दिवसंकरिता…नटरंग आणि इतर उत्कृष्ट मराठी सिनेमे पण पहायचे आहेत जे येथे प्रदर्शीत होत नाहीत…एक तीर से दो निशान..:)

 54. 11/01/2010 येथे 3:48 pm

  मी या मराठी ब्लॉगर्स मेळाव्यासाठी लाईव्ह ट्विटींग करणार आहे.
  तेव्हा मला फॉलो करा ट्विटर वर… http://twitter.com/PrabhasGupte इथं..!

  • 11/01/2010 येथे 4:43 pm

   प्रभास जी खरे तर माझे ट्विटर वर अकौंट आहे पण मला अजूनही त्याचे तंत्र कळलेले नाही , थोड्या दिवसात कोणी समजावेल ? ( तसा मी कॉम्पुटर अडाणी मात्र आहे हं बर का!)

 55. 11/01/2010 येथे 4:39 pm

  I am a blogger from Pune and interested in this meet, but unfortunately the date and time does not suit me 😦

  Hope you all have a good time and I get opportunity to meet up sometime…

  ~ Kaustubh (@ Pune)
  http://swataha.blogspot.com
  http://cipher1980.blogspot.com

  • 11/01/2010 येथे 4:50 pm

   कौस्तुभ ,
   आपण पुण्यातच आहात तर कसाही वेळ काढून याच म्हणजे इतक्या सगळ्यांची गाठ एकदम पडेल. कसेही करा पण याच , आपला फोन नंबर मेलने कळवावा म्हणजे संपर्क करता येईल

   • 12/01/2010 येथे 12:01 pm

    Mala ‘Aapan’ vagaire nakaa mhanu…tu mhanalaat taree jaast aavadel!

    Mi yaayacha nakki prayatna karato…

    ~ K

   • 12/01/2010 येथे 12:10 pm

    कौस्तुभ ,
    नक्की ये , तुझे मेळाव्यात स्वागत आहे.

    ४३) कौस्तुभ

 56. 11/01/2010 येथे 9:49 pm

  @ सुरेश पेठे काका
  मी तुम्हाला ई-मेल करतो त्याबद्दल.

  – प्रभास

  ता.क. मला अहो वगैरे करु नका.. प्लीज!!!

 57. Sagar
  13/01/2010 येथे 4:11 सकाळी

  Kaka
  Mazi Exam aahe…..Yenyachi khup ichha aahe….Pan Nahi Shakya….Aniket Dada la tas bollo mi…..Mi Hinjevadit rahto v Gadi pan nahi mala…..nahitar 18 la paper asun hi aalo asto…..
  Pudhil meet mahinyatch jamava..mi Nakki yeian….
  An ho Shubhechya…..

  • 13/01/2010 येथे 7:07 सकाळी

   सागर,
   पहिल्याने परीक्षा, त्यात उत्तम पास होणे सगळ्यात महत्वाचे. तुला तुझ्या परीक्षेत सुयश चिंतीतो .

 58. 13/01/2010 येथे 2:24 pm

  ई-सकाळशी बोलणे झाले आहे. ई-संपादकसाहेब (श्रीयुत. सम्राट फडणीस) येणार असे म्हणाले आहेत. अजूनही त्यांना चर्चा करावयाची आहे.

 59. 13/01/2010 येथे 2:28 pm

  ई-सकाळशी बोलणे झाले आहे. ई-संपादकसाहेब (श्रीयुत. सम्राट फडणीस) येणार असे म्हणाले आहेत. अजूनही त्यांना चर्चा करावयाची आहे. ती मेळाव्यातच करु असे मी सांगितले आहे.

 60. 13/01/2010 येथे 10:13 pm

  माझीही इच्छा आहे…
  आधी नेट बंद होते त्यामुळे कळले नाही आजच नेट सुरु झाले
  आणि योगायोगाने लोक सत्ता मध्ये हि बातमी हि आली आहे
  त्यामुळे आनंद झाला आणि धास्ती हि आहे…
  अनिश्चित आहे येणे… पण यावेसे खूप वाटते आहे…
  hope तुम्ही उपस्थित लोक खूप धमाल कराल…
  मलाही यायचें आहे.. बघू या जमले तर नक्कीच येईईन…
  पुणेकरांच्या सर्व सूचना पळून…

  पुणे माझे आजोळ आहे,.. तरीही मनात घोळ आहे..
  कडव्या विना अधुरी अशी ध्रुव पदाची ओळ आहे..!!
  ९६८९५११७११ हा माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे..

  • 13/01/2010 येथे 11:29 pm

   अखिल जी

   चालले बंद होते ते
   वाटते ना ? करावे ते

   आता मोदे करा वस्ती
   सोडोनिया उगा धास्ती

   अनिश्चित अनिश्चित
   तेच होईल निश्चित

   जेथे तुमचे आजोळ
   तेथे कसला हो घोळ

   ओळ आहे ध्रुवपदी
   अढळता पदोपदी

   तुम्ही असता कडवे
   कडवे कश्या अडवे ?

   सुरेश पेठे

 61. krishnakumar
  14/01/2010 येथे 3:58 सकाळी

  नमस्कार,माझे नांव नोंदले आहे ह्याच आनंद आहे.प्रभास गुप्ते यांना भेटण्याची इच्छा खोप दिवसंपासून आहे.इतर कवि पेशांतले लोकही भेटले तर आनंदच आहे.मी ४-३० पर्यंत येण्याच प्रयत्न करेन.धबधब्याजवळ लाइन लागणार असे दिसते.असो.माझे वय फार झाले आहे.ऐन वेळी काही गडबड झाली तर सांगता येत नाही.

  • 14/01/2010 येथे 6:09 सकाळी

   कृष्णकुमारजी,

   असे काही मनातही न आणता या , आपले स्वागत आहे.

   सुरेश पेठे

 62. Sheetal
  15/01/2010 येथे 7:00 pm

  Mi yenyacha nakki prayatna karin. Mala yayla khup aavdel.

 63. Sheetal
  15/01/2010 येथे 7:02 pm

  Maza mobile no. 9960817744

 64. 16/01/2010 येथे 9:01 pm

  मी पण…मी पण!!! 🙂

 65. 16/01/2010 येथे 10:08 pm

  उद्या येतोय रे sssssssssss

 66. 17/01/2010 येथे 11:13 सकाळी

  मी एक नवीन ब्लॉगर आहे… ५-७ पोस्ट झाली असतील अत्तापर्यंत.. मी पुण्यात रहातो (पण पुणेकर नाही)

  http://kaywattelte.blogspot.com/

  मी आलेले चालेल का?

 67. 17/01/2010 येथे 11:31 सकाळी

  क्षमा असावी, काही अपरिहार्य कारणामुळे येत नाहिये..माझ्या शुभेच्छा आहेतच लवकरात लवकर इथे मेळाव्याचा सविस्तर वॄतांत टाका….

 68. 03/12/2010 येथे 6:52 pm

  Jay Mahrashtra Mandali ,
  Mi khup ushira aaplyla Bhetlo karan eharunaka ,
  Aplya Sarvanche Prtiuttar Chan Hote.

 1. 06/01/2010 येथे 3:21 pm
 2. 06/01/2010 येथे 4:06 pm
 3. 18/01/2010 येथे 10:30 pm
 4. 02/01/2011 येथे 4:15 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: