मुखपृष्ठ > माझे छंद > सविताचा वाढदिवस

सविताचा वाढदिवस

कोण कुठली सविता ? त्याची ही एक गम्मतच आहे. आज आम्ही पुणे युनिव्हर्सिटीत निसर्ग चित्रे काढायला गेलो होतो. आज युनिव्हर्सिटी मध्ये पदवीदान समारंभ होता. अर्थातच त्यावेळी तेथे जत्रेचे स्वरूप असते. मुला-मुलींची पदवी पत्र मिळण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली असते. एरव्ही युनिव्हर्सिटीत बरीचशी सामसूम असते कारण तिचा विस्तार कित्येक एकर मध्ये पसरलेला आहे. पण आज जिकडेतिकडे गर्दी व रगांची उधळण झालेली दिसते !
मी आज जेथे रंगवायला बसलो होतो तेथिल हिरवळीवर पण एक मुला मुलींचा घोळका येऊन बसला. त्यातीलच एक सविता, तिचा आज नेमका वाढदिवस होता. घोळक्यातील सगळे तिचे अभिनंदन करीत होते. कोणीतरी तिच्यासाठी केक आणून कापला. तोपर्यंत मी अगदी कामात गढून गेलेला होतो. थोड्याच वेळात सविता स्वत: येऊन मला केक देऊ लागली. अर्थातच मी तिचे अभिनंदन करीत केक घेतला. मग मी तिला विचारले अगं मी तर तुला गिफ्ट तर दिलेच नाही ! माझ्याकडून गिफ्ट घेशील ना? क्षणभर तिने चमकून माझ्याकडे पाहिले…..हातात तर माझ्या काहीही नव्हते. मग मी म्हटले तू माझ्यापुढे फक्त दहा मिनिटेच बसायचे. ती तय्यार झाली.
मग मी तिचे पोर्ट्रेट पेन्सिलीने दहा मिनिटात तयार करून दिले तर सगळेच खुष झाले. सविता तर एकदमच खुष ! मलाही, मी ही गिफ्ट देऊ शकलॊ त्या मुळे आनंद झाला.

मग सगळ्यांनी मला मधे घेऊन हा फोटॊ काढला

अश्या रितीने सविताचा वाढदिवस साजरा झाला !

 1. 02/01/2010 येथे 11:18 pm

  काका खुप छान आहे पोट्रेट. माझ्या वाढदिवस १ औगस्ट ला आहे पण तोपर्यंत मी पोट्रेटची वाट नाही पाहू शकत 🙂

  • सुरेश पेठे
   02/01/2010 येथे 11:28 pm

   अजय,
   It is very simple, मग असं कर, एक छानसा केक घेऊन ये मला भेटायला, म्हणजे वाट बघायला लागायची नाही !!

   • अनिकेत
    03/01/2010 येथे 10:26 सकाळी

    काका, आम्ही दोघंही एकत्र येतो आणि एकच केक देतो, एकाच कागदावर दोघांच चित्र काढाल का? आम्ही मग ते मधे कापुन अर्ध अर्ध करुन घेऊ

  • अनिकेत
   03/01/2010 येथे 10:25 सकाळी

   अरे.. मी २ ऑगस्ट

   • sahajach
    03/01/2010 येथे 4:03 pm

    ईथे मी तुम्हा दोघांच्या आधि……६ जुलै…..आपण सगळे जुनमधे भेटु तेव्हा काही काकांना विश्रांती मिळेलसं दिसत नाही…अनिकेत आणि आपणच का, ओजस, ईशान, गौरी हे ही मेंबर्स आहेत की रांगेत आपल्या पुढे….
    त्यांना निदान स्केच पुरते तरी एका जागी बसवणे हे मात्र आपले काम :)……

 2. 03/01/2010 येथे 8:53 सकाळी

  ओफ़र चांगली आहे… 🙂

  • सुरेश पेठे
   03/01/2010 येथे 9:05 सकाळी

   नुसती ऑफर चांगली आहे, म्हणून काय उपयोग ? implication कधी व्हायचं ?

 3. 03/01/2010 येथे 9:46 सकाळी

  पुण्याला याव लागेल ना त्यासाठी..मुहुर्त काढावा लागेल एखादा…

 4. sahajach
  03/01/2010 येथे 10:52 सकाळी

  काका खरं सांगु का तुमच्या कला पाहूनच नव्हे पण स्वभावातले बारकावे पहाता आम्ही कितीतरी शिकतोय ….तुम्ही ’दो कराने” देताहात आमची झोळी तेव्हढी पुरेशी ठरावी असे वाटतेय…..किती आनंद झाला असेल सविताला आणि I can imagine तुम्हालाही….ती जर संपर्कात असेल तर तिला ब्लॉग दाखवा आणि आम्हा सगळ्यांच्याही शुभेच्छा कळवा….

  मान गये उस्ताद…(उस्ताद दोन्ही अर्थाने म्हणतेय तुमची कला म्हणूनही आणि माझे गुरु म्हणुनही…)

 5. 03/01/2010 येथे 1:08 pm

  काका पोट्रेट अन केक वाढदिवसाआधी अस चालेल का??? कारण १८ ऑक्टो. पर्यंत कोण वाट बघेल?? 🙂 पोट्रेट खूप सुंदर आहे!!

 6. D D
  03/01/2010 येथे 2:28 pm

  सविताच्या वाढदिवसाला तुम्ही तिला इतकी वेगळी भेट दिली आहे, की हा वाढदिवस तिला कायम लक्षात राहील.

 7. सुरेश पेठे
  03/01/2010 येथे 8:17 pm

  अजय…अनिकेत…देवेंद्र…तन्वी…मनमौजी…देवयानी… आणि माझे सर्व मित्र मंडळी… मी तुम्हाला १०-१५ मिनिटात कागदावर उतरविणार आहे तेव्हढा वेळ मात्र काढा ! सगळ्यांनी एक केक आणलात तरी चालेल… आपण तो एकच केक सगळे मिळून खाऊया ( एक तीळ सातात वाटून खायची संवय आहे ) ! पोर्ट्रेट्स मात्र प्रत्येकाची वेगवेगळी असतील त्यात कापाकापी नकॊ उगाचंच !!

 8. 04/01/2010 येथे 10:49 सकाळी

  नविन वर्षाच्या शुभेच्छा, तुमचा स्केचिंग चा ब्लॉग सुद्धा असाच बहरत राहो
  visit me at http://colors-etc.blogspot.com/

 9. 04/01/2010 येथे 10:50 सकाळी

  नविन वर्षाच्या शुभेच्छा
  http://colors-etc.blogspot.com/

 10. sudha kulkarni
  04/01/2010 येथे 11:51 सकाळी

  Kharach kaka Mazya taichya matashi mi hi sahamat aahe aani ho hya sagalyanchyahi aadhi maza number karan my birthday is in february.

 11. 04/01/2010 येथे 7:06 pm

  vadhadivasachi bhet mhatali tar mala december paryant vaat baghavi lagel, tyamule me pan Manmaujee shi sahamat 🙂

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: