मुखपृष्ठ > अवांतर > ब्लॉगर्स मीट

ब्लॉगर्स मीट

ब्लॉगर्स मीट
~~~~
माझ्या दावणगिरी डोसा संबंधीच्या ब्लॉग वर खालील कविता उत्तरा दाखल टाकली आहे, ती येथे पुन्हा उद्धृत करीत आहे.
~~~~
भांडता रे काय तुम्ही
निमीत्ते दावणगिरी,
जणू निघाले हे वीर
आणावया द्रोणागिरी  ॥
….
’जून’ कां रे लांब आहे
गांठू या ना हाच पल्ला,
वगळा वगळी उगा
का बिच्चारीवर हल्ला ॥
……..
अनिकेत वा अजय
अपर्णा असूद्या, तन्वी
मनमौजी सह सर्व,
मंडळी मजला हवी ॥
….
ब्लॉगर्सची मोट बांधू
घेऊनी सर्वांना घट्ट
भांडाभांडी, टुकटुक
नका ना रे ताणू हट्ट  ॥
….
सुरेश पेठे
~~~~~~
तेथे जरी ही गम्मत म्हणून टाकली असली तरि त्या  पोस्ट वरून ह्या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतोय. भुंगाने त्यांच्या ब्लॉगवर त्यासाठी पोलिंग ठेवले आहेच व त्यास हळू हळू समर्थन मिळत आहे. तेव्हा त्यावर  थोडासा अधिक परिपूर्ण विचार करता यावा….. माझी घट्ट मैत्रीण तन्वी अनायसे  जून मध्ये भारतात येत आहे, तेव्हा ही वेळ ह्या मीट साठी योग्य व पुरेशी वाटतेय म्हणून मी हा विषय वेगळी पोस्ट येथे देऊन सर्वांसमॊर विचाविनिमयासाठी ठेवत आहे.
पुणे हे अश्या नव्या उपक्रमांसाठी प्रसिध्द ठीकाण आहेच. ते मध्यवर्तीही आहे, म्हणून सुचवले इतकेच, पण सर्वांच्या सम्मतीने त्याबाबत ठरवता येईल.
शिवाय प्रोग्रॅमचे स्वरूप कसे असावे, त्याला जोडून अधिक काय जोड देता येईल ह्याबाबत प्रत्येकाने आपापले विचार येथे मांडावे अशी अपेक्षा आहे.
करा तर सुरू त्यावर विचार व मांडा ते इथे.
Advertisements
प्रवर्ग: अवांतर टॅगस्
 1. sahajach
  01/01/2010 येथे 7:04 pm

  काका तुम्ही ठरवा मी तयार आहे…माझे अजून यायची नक्की तारिख वगैरे ठरलेली नाही….ते ठरले की कळवते….

 2. 03/01/2010 येथे 2:46 सकाळी

  काका आमचं टेन्टेटिव्ह मेमध्ये आहे…जून थोडं कठिण आहे….

  • सुरेश पेठे
   03/01/2010 येथे 6:54 सकाळी

   तन्वी व अपर्णा, हे असे तर होत रहाणार. मला याटते जे, जेव्हढे जमतील, त्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून त्यावर चर्चा व विचारविनिमय सुरू करायला काय हरकत आहे? व आपले विचार इथेही मांडायला हरकत नसावी.

   • 03/01/2010 येथे 9:36 सकाळी

    ते तर आहेच काका..मी फ़क्त माझी avaialability कळवली. माझ्यासाठी काही बदल नकोत कारण आम्ही भरवशाचे पाहुणे नाहीत..मग बाकीचे काय म्हणताहेत त्याप्रमाणे तुम्ही मोठी लोकं काय ते ठरवा…

 1. 18/01/2010 येथे 10:30 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: