मुखपृष्ठ > अवांतर > प्रामाणिकता अजून टिकून आहे

प्रामाणिकता अजून टिकून आहे

सकाळी नेहमी सारखा हिंडून परतत होतो. आमच्या इथे थोड्या अंतरावर नवी खाद्य संस्कृती उभी राहू लागली आहे. अनेक टपऱ्या कोणा- कोणाच्या (माहित नाही) तरी आशिर्वादाने उभ्या रहात आहेत. तेथे सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थांची सध्या रेल्चेल असते. तेथे नवीनच एक टपरी उभी राहीली आहे. त्याचेकडे दावणगिरि लोणी स्पंज डोसे मिळू लागले आहेत. आम्हा सारख्या उरलेल्या दातांवर ज्यादा जबरदस्ती नको असे वाटणाऱ्यांना तर हा मऊशार डोसा एक वरदान आहे.
सध्या माझी नात व मुलगी नाताळच्या सुटी मुळे माझ्याकडे आलेली आहे. त्यामुळे रोजच काही न काही खादाडी करणे वा आणणे चालूच असते. आज मनात आले व त्याप्रमाणे तीन लोणी स्पंज ( एकात साधारणत: ५” व्यासाचे तीन डोसे असतात ) व मला एक साधा असे पार्सल घेऊन घरी खुशीत परतलो व पार्सल नातीकडे दिले.
मी बाहेरच्या खोलीत होतो. नातीने खुशीत पार्सल उघडले, पण थोड्याच वेळात आतून धूसूक फूसूक ऐकू येऊ लागली. आतून अर्धवट काही काही ऐकू येऊ लागले !…”धांदरटपणा जायचा नाही अजून”….” एव्ह्ढेच ?”…..” मी किती घेऊ ?”…… ” फसवलं असणार बहूतेक “… “आता तो काय देणार आहे ?” ” सगळॆ ह्यांना फसवतात…वगैरे वगैरे. मी अत आलो, तेव्हा असे लक्षात आले की त्याने एकच स्पंज दॊसा दिलेला होता. मी चपला पायात सरकावत परत जायला बाहेर जाई पर्यंत मला ताशेरे ऐकू येत होतेच. पाऊण तास उलटून गेलेला होता त्यामुळे मलाही शंका येऊ लागली होती की आपण गंडलो गेलो आहोत !
पण, मी त्याचे कडे जाऊन काही सांगणार तेव्हढ्यात तोच आपणहून गयावया करीत संगू लागला, “सॉरी सर! गलती हुई,ये दोनो यहा ही थे, आपके पार्सल मे डालना मै भूल गया. आपको यहा तक आना पडा ! मुझे माफ करना !” …. शिवाय ते दोन्ही डोसे बाजूला ठेवित मला दोन नवीन गरम गरम करून दिले. परत एकदा ” सॉरी सर ! ” म्हणाला…..माझा राग कुठल्या कुठे पळून गेला.
मनात आले ’ प्रामाणिकता  अजून  टिकून आहे ’


Advertisements
 1. अनिकेत
  30/12/2009 येथे 4:47 pm

  ते झालं, पण आता दावणगिरीचे डोसे वाचुन तोंडाला पाणी सुटले आहे त्याचे काय? तुमचीच चुक आहे, द्या आता आम्हाला प्रामाणिकपणे डोसे. बोला कधी कुठे भेटताय?

  • 30/12/2009 येथे 5:39 pm

   अनिकेत,
   हो बाबा, चूक झाली खरी माझी आणि पाणी तर माझ्या तोंडालाही सुटले आहे, बोल कुठे भेटुया ?

 2. 30/12/2009 येथे 5:31 pm

  मलाही हॉटेल तिलक ला जाऊन दावणगिरी डोसा घ्यायची इच्छा झाली आहे. 🙂

  -अजय

  • 30/12/2009 येथे 5:42 pm

   अजय,
   मी आणि अनिकेत जातोय दावणगिरी डोसा खायला, तू एकटाच का ? चल ना आमच्याच बरोबर !

   अजून कोणी येतंय का बघायचंय का ?

 3. 30/12/2009 येथे 5:42 pm

  चला आजचा मेनु दावणगिरी डोसा!!!! 🙂

  • 30/12/2009 येथे 5:44 pm

   बघा, मनमौजी पण येतोय, थोडावेळ थांबुया का रे, अजून कोण कोण येतंय ते बघुया का ?

 4. sahajach
  30/12/2009 येथे 8:11 pm

  खरयं काका तुमचं प्रामाणिकता टिकून आहे अजून……आणि ती तशीच टिकणार जोवर तिची कदर करणारे तुमच्यासारखे लोक आहेत….

  बाकि हे काय बाकिचे पुणेकर घेउन निघालात आम्हाला सोडलेत वाऱ्यावर…अनिकेत, अजय मी येतीये रे बाबांनो …….सगळेच जाउया…..

  • सुरेश पेठे
   30/12/2009 येथे 8:39 pm

   अगं तन्वी, म्हणूनच थांबायला लावलंय सगळ्य़ांना ! मला वाटतं तू जून मध्ये आलीस की पुण्यात आपण सर्व मराठी ब्लॉगर्स ची एक पूर्ण दिवसाची मिटींग ठरवूया का ? मुंबईचे लोकही येऊ शकतील. मला वाटतंय सारेच त्याला सहमत होतील. सर्व मित्रमंडळींनी ह्याबाबत आपले विचार मांडावेत. म्हणजे आपण सर्व सम्मतीने तारीख व प्रोग्रॅम ठरवूया. मग खुष ना तन्वी ? दावणगिरी डोसा अर्थात माझ्या तर्फे !

   • sahajach
    30/12/2009 येथे 10:35 pm

    हं आता ठीक आहे…सांगा त्या आधि कमेंट लिहिणाऱ्या लबाडांना, काका मला वगळून जाणारच नाहित….
    बाकि आपण सगळे भेटण्याची कल्पना मस्त…भुंगाही हेच म्हणतोय!!!!

 5. अनिकेत
  31/12/2009 येथे 10:43 सकाळी

  जुन???? 😦 छ्या.. डोसा हवाय म्हणजे हवाय आत्ताच हवाय. तन्वी तुला टुकटुक, आम्ही जाणार, आम्ही जाणार आणि तुला फोटो पण पाठवणार 🙂

  • 31/12/2009 येथे 11:10 सकाळी

   हे काय तुम्हाला काही स्त्रीदाक्षिण्य आहे की नाही??? ती इतकी थांबा म्हणतेय तरी तुम्ही जाणार आणि वर फ़ोटो काढून पाठवणार…छ्या भलाईचा जमाना नाही राहिला म्हणून एक पोस्ट लिहून टाका काका….:)

 6. 31/12/2009 येथे 6:08 pm

  भांडता रे काय तुम्ही
  निमीत्ते दावणगिरी,
  जणू निघाले हे वीर
  आणावया द्रोणागिरी ॥
  ….
  ’जून’ कां रे लांब आहे
  गांठू या ना हाच पल्ला,
  वगळा वगळी उगा
  का बिच्चारीवर हल्ला ॥
  ……..
  अनिकेत वा अजय
  अपर्णा असूद्या, तन्वी
  मनमौजी सह सर्व,
  मंडळी मजला हवी ॥
  ….
  ब्लॉगर्सची मोट बांधू
  घेऊनी सर्वांना घट्ट
  भांडाभांडी, टुकटुक
  नका ना रे ताणू हट्ट ॥
  ….

  सुरेश पेठे

 7. 01/01/2010 येथे 12:12 सकाळी

  काका तुम्ही कवितापण करता का असं विचारणारंही चुकीचं आहे नं….आता पासष्टाव्या कलेबद्दल तेवढं सांगा…:) छान दिलंत उत्तर….

  • 01/01/2010 येथे 2:02 pm

   कुठल्या काळात हा ६४ आकडा होता देव जाणे ? आता तर १६४ ही कमीच असतील ! पण माझ्याकडे नाहीत हं इतक्या ! उगाचच आपली आंकडॆमोड करण्यात काय हंशील ?

 8. sahajach
  01/01/2010 येथे 9:15 सकाळी

  सही काका…………..मस्त उत्तरं दिलतं…..आम्ही आपले तुम्हाला गाठायला पळतोय आणि तुम्ही आणि एक एक कलाविष्कार सादर करताहात………..भरपूर लिहा काका…. आम्ही वाचतोय, शिकतोय……

 9. 01/01/2010 येथे 2:08 pm

  काय बोलू तन्वी ? फार दमछाट होणार नाही आता, झालं, होतं तेव्हढं संपत आलं बरं का !

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: