खास तन्वी साठी !
हा ब्लॉग खास तन्वी साठी आहे. पण असे असले तरी माझे सर्व मित्र मंडळी ही त्याचा आस्वाद घेऊ शकतात बरं का !
मी ही आठवण सांगत आहे त्यावेळी मी असेन बहुदा चवदा किंवा पंधरा वर्षांचा, माझ्या बगलेत आहे सर्वोदय माझा पुतण्या ( जन्म १९५६ ) तर मागे उभी स्वाती माझी पुतणी ( जन्म १९५२ ).
आता जो फोटो मी येथे पोस्ट केला आहे, ती ’ती’च गच्ची आहे जिथे तन्वी, मी तुझ्या आईलाही घेऊन येत असे ,,, काळही तोच असावा.( आई चा जन्म कधीचा ? ) फोटोत माझ्या पुढे जो ओटा आहे त्याचे बरोबर खाली कापसे कुटुंबीय म्हणजे तुझी आज्जी रहायची ( हा दुसरा मजला… म्हणजे मुंबईच्या भाषेत 1st floor ). गच्ची तून खाली उतरायला एक जीना होता व पुढे दिड – दोन फुटाची गॅलरी / पॅसेज तिन्ही बाजूने जेथून खालील चौक ( २०’x२०’) दिसे व परत मोठ्या जिन्याने खाली चौकात येता येत असे. हा मागिल दारचा चौक, असाच पुढील दारी पण होता ! मधे मग पडवी , मधले घर, ओसरी असे, ज्या ओसरीत मोठा झोपाळा होता.
परत फोटो कडे वळतो. तॊ जरा निरखून पहा. तिथे छोटी छोटी मॉडेल्स केलेली आहेत. दोन वा तीन मजली घरे, बाल्कनी असलेली, रस्ता आहे, कॉर्नरचे गोल घर, आहे की नाही छोटी टाऊन्शिप ? तिथे एसटी बस पण आहे , सर्वात मागची लांब बिल्डींग आहे बहुदा सीबीएस ची…त्या पुढे मोटारी !…… गच्चीला मधेच मोठ्ठी थोरली गॅप पडलेली दिसते आहे का?….. ती आहे मधून जाणारी नदी !…. त्यावर एक छोटा पूल ही केलेला आहे बरं का , वर एक मोटार…..दिसतंय का सारे?…. त्यावेळी फोटोग्राफी इतकी adavance नव्हती… साध्या बॉक्स कॅमेरावर काढलेला आहे हा फोटो.
हा फोटो आहे माझ्या आईचा, श्राध्दाचे लाडू वळतांनाचा…. येथे देण्यचे प्रयोजन ? हे आहे आमचे स्वैपाकघर. त्यावर कापसे कुटुंब राहायचे. डव्याबाजून अर्ध्या भागाचे वर जाळी होती व त्यापुढे होता चौक.
आता हा फोटॊ आहे रंगपंचमीचे दिवशीचा. रंग खेळून झालेला आहे. बजूला आहेत ती सर्व माझी भाचे मंडळी ! मी चौदावा ना…भाचे ही जवळपास माझ्याच वयाचे असणार.
येथे हा फोटो देण्याचा उद्देश… हा आहे चौक, मागे जाळी त्यामागे आमचे स्वैपाक घर व त्यावर रहायची, तन्वी तुझी आज्जी !
पुढे ह्या माझ्या छंदाने मला वेळेला थोडा पैसाही मिळवून दिला, त्याचे वर्णन पुन्हा कधीतरी करीन.
प्रवर्ग: अवांतर, माझे छंद, वर्णन
बिल्डींग-मॉडेल गच्ची
काका डोळ्यात पाणी आणलतं…आजवर अनेक भेटी मिळाल्यात पण आज तुम्ही दिलेली ही आगळी भेट आहे हिची सर नाही यायची कशाला!!! आभार हा खुप लहान शब्द आहे….. नको या ऋणातच राहू द्या मला!!!!!
आजीला कळवते आता, तिला फार आनंद होइल…..
काका खूप छान भेट दिली आहे तुम्ही तन्वीला!!! सर्वात अमूल्य अशी!!!
वा काका .. मस्तच लिहिलय तुम्ही .. आणि तुमच्या कलेला खरोखर दाद द्यायला हवी .. मस्तच !
काका आभार हा खरच खूप लहान शब्द आहे, तुमच्यामुळे आजीचा वाडा आम्हाला पहायला मिळाला. तुम्ही वसवलेले टाउनशीप तर निव्वळ अप्रतीम आहे… ईशान आणि मी थक्क झालोय बस आणि CBS बघून…..
त्या वेळी तुमच्याकडे कॅमेरा होता आणि हौसही…..पुन्हा एकदा प्रेरणा दिलीत…..
आजीचेच नाही तर काकुंचेही (माझ्या सासूबाई) बालपण गेलेली जागा पहाताना वेगळीच उर्मी मनात दाटतेय…त्या दोघी माझ्या लाडक्या आणि मी त्यांचा…..त्यांच्या दो्घींचा आहे का एखादा फोटो…..असल्यास तोही टाका नाहितर मी आल्यावर मला दाखवा….
काका तुम्हाला अनेक शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!!!!
……अमित
अमित,
मी बरेच फोटॊ धुंडाळलेत पण I am sorry असे फोटॊ माझ्याजवळ तरी नाहीत. पुढील महीन्यात नाशकास जात आहे, तिथे काही फोटो मिळताहेत का ते बघतो.
अभिप्राय वाचून हुरूप वाढला !
काय लिहू काका?? पुन्हा एकदा तन्वीच्या आयुष्यातल्या योगायोगाचं नवल, कौतुक, हेवा सारं काही वाटतं….
तुमच्या मॉडेल बनवायच्या छंद/उद्योगाबद्दलही वाचायला नक्की आवडेल…
तन्वी,मनमौजी, विरेन्द्र आणि अपर्णा, तिने म्हटले आहे,……
” काय लिहू काका?? पुन्हा एकदा तन्वीच्या आयुष्यातल्या योगायोगाचं नवल, कौतुक, हेवा सारं काही वाटतं…. ”
………..
तुलाच काय मलाही अगदी तसंच वाटतंय !!! माणसाने इतके ’लक्की’ असावे ?…. मला उगाचंच पडणारा….व तितकाच सुखावणारा प्रश्न कारण हा योगायोग नेमका माझ्याच बरोबर व्हावा !…पण खरं सांगू हेवा माझा मलाच वाटतोय !! … कोण कुठली साता समुद्रा पारची मंडळी …एका अवचित काळी एकत्र येतात व आणि कदाचित कुठल्या जन्मातली..युगातली मैत्री निभावतात … मला तर सारेच अतर्क्य वाटतेय !
काही लोक भाग्यवंत असतात तन्वी ही त्यातील एक आहे. बर मी नासिक येथे राह्तो बर का.
अरे व्वा! तन्वी हेच सांगत माझ्या स्क्रॅप बुकात अवतरली होती. नाशिक करांबद्दल मला विशेष आत्मियता आहे. आपण माझ्या मेल(बुकात) आलात तर ….( sureshpethe@gmail.com) जरूर या.
Namaskar Kaka,
mi Tanvichi Aai. Khup khup anand vatala photo pahun.
Mazya lekisathi Specially lihileli post vachun mazech balpan mala parat aathavun dile.
Balapanychya hya tumhi dilelya bheti mule jivhala kay asato he samajale.
Nasikla Jarur jarur ya.
Bhatichi vat pahato aahot.
Mrs Sudha Kulkarni.
माझी मैत्रीण तन्वीच्या आई, म्हणून ’तुम्ही’ म्हणू की माझ्या बालमैत्रीणीची, सुमनची मुलगी म्हणून ’तू’ म्हणू ?
ह्या तन्वीने माझी पंचाईत करून टाकली आहे ! असो,
वयाचा फायदा घेत ’तू’ म्हणतो , चालवून घेशील अशी आशा वाटते.
माझ्या ब्लॉगवर मायलेकींचे स्वागत.
मागेच आमचे बोलणॆ झाले तेव्हाच माझ्या डोक्यात फोटॊ होते, ह्या ब्लॉगचे निमित्ताने माझ्या आठवणींनाही उजाळा मिळाला !
मी पुढील महीन्यात २३ ते २५ च्या दरम्यान येण्याचा मानस आहे. आलॊ की नक्की तुम्हा सर्वांची गाठ घेईन
Ho Kaka tumchya matashi mi hi sahamat aahe Tanvi ne kharchach panchait keli aahe Mazihi.
Tumhi mala ‘Tu’ch mhana.
Nasikla tumhi yenar he aekun anand vatala, Mazi Aai/ Tumchi Balmaitrin(Suman) mazya gharajavalch rahate.
Tevha jarur jarur ya. Vat Pahate.
Mrs Sudha Kulkarni
आता तू तुला ’तू’ म्हणायची परवानगी दिल्यावर प्रश्नच मिटला !
यंदा आमच्या संस्कार भारतीचे निवासी शिबीर ३ रात्र नाशिक येथे होणार आहे. एखादा दिवस त्र्यंबकेश्वर येथेही असेल.
एकूण काय प्रोग्रॅम असेल तो मला सविस्तर कळला की नक्की तारखा वगैरे लवकरच कळवतो.
तो पर्यंत खालील मेल आय डी वर पत्ता आदि कळवून ठेवलास तर अधिक चांगले
sureshpethe@gmail.com