मुखपृष्ठ > माझे छंद > माझी बुक कव्हर्स

माझी बुक कव्हर्स

माझा एक मित्र आहे त्याचे वडिल कै. लक्ष्मण के. तांबे, त्यांच्या काळातील ते प्रख्यात हस्तसामुद्रिक. अत्यंत शांत धीर गंभीर स्वभाव. मित्राचे घरी गेलो व ते घरी असले तर सतत काहीतरी लिहीण्यात गढून गेलेले असत. ते पुण्याच्या अहिल्यादेवी शाळेत ऑफीस सुपरींटेंडेंट होते.  त्यांनी ज्योतिषा वर अनेक पुस्तके लिहीलीत त्यांचे शेवटचे पुस्तक होते ’ साक्षात्कार’. शेवटचे म्हणतोय अश्या साठी , कारण नंतर पुढे ते फार जगले नाहीत. मी त्यावेळी जयपूर येथे होतो. ते काही दिवसांसाठी तिकडे येण्याच्या तयारीत होते, पण येऊ शकले नाहीत.
त्या काळात त्यांचे ’ साक्षात्कार’ चे लिखाण चालू होते. त्यात आत बरीच चित्रे काढायची होती. मी चित्रे काढतॊ म्हटल्यावर ते काम ओघानेच माझ्या कडॆ आले व आतील मी काढलेली खूपशी चित्रे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले होते.
पुस्तक जसे संपत आले, एके दिवशी मीच विषय काढला, ” नाना, पुस्तक तर तयार होत आले आहे,  कव्हरा साठी काही ठरवले आहे का? ” तेव्हा त्यांनी
प्रश्नार्थक दृष्टीने माझ्या कडे पाहीले. ” तुम्हाला चालणार असेल तर मी प्रयत्न करतो . “
झाले मी लगेच तयारीला लागलो. एक दोन नमुने दाखवले पण त्यांचे पसंतीस येईना. मी ही थोडा नर्व्हस झालॊ. तेच म्हणाले की काहीतरी नाविन्यपूर्ण कर कि शेल्फ वर आपले पुस्तक उठून दिसायला हवे ! एक दोन दिवस विचारात गेले. काही पुस्तकांची दुकाने ढुंढाळलीत. व मग एक विचार मनात चमकून गेला. मागे मी त्यांचे हाताच्या तळव्याचा ठसा घेतलेला होता.त्या पुस्तकातील स्केचेस साठीच, त्यावरून कल्पना सुचली व खालील कव्हर तयार झाले. हे क्व्हर नानांना एव्हढे आवडले की आधीच्या सर्व पुस्तकावर त्यांनी ते छापून घेतले. पुस्तकांची नावे फक्त आम्ही वेगवेगळी बनवून घेतलीत. हेच ते कव्हर !
हे दुसरे कव्हर ही असेच अचानक करायला मला सांगीतले गेले. तोही माझा जरा उशीरा झालेला मित्रच होता. ह्या आधीची बरीच पुस्तके प्रकाशित झालेली होती व त्याची कव्हर्स बाहेरील आर्टीस्ट करून घेतली होती. ह्या नव्या पुस्तकाचे कव्हर मात्र त्याला माझ्याकडूनच हवे होते. हे ते दुसरे कव्हर !
खरं तर हा माझा विषय नव्हता त्यामुळे नंतर मात्र मी कधी त्या फंद्यात पडलॊ नाही. मात्र ही दोन कव्हर्स माझ्या खात्यात जमा होऊन गेलीत !!
Advertisements
प्रवर्ग: माझे छंद टॅगस्
 1. sahajach
  26/12/2009 येथे 11:04 pm

  काका कोपरापासूनच नव्हे तर साक्षात दंडवत घालतेय इथुनच तुम्हाला…पुढची पोस्ट ’हे मी केलेले नाही’ अशी लिहा बरं…अहो सगळचं केलत तुम्ही ते ही केवळ उत्तम आणि उत्तमच………….

  पुन्हा पुन्हा लिहितीये पण लिहिल्याशिवाय रहावत नाहीये…I’m proud to be ur friend….

  काका शतायू व्हा आणि असेच नवे नवे अविष्कार करत रहा!!!!!!

 2. sahajach
  26/12/2009 येथे 11:06 pm

  एक राहिले यातले पहिले पुस्तक बाबांकडे आहे….आता मी त्यांना सांगणार तुम्ही वाचा पुस्तक माझी ओळख डायरेक्ट थोरामोठ्यांशी आहे पुस्तकाचे कव्हर डिजाईन करणारे गृहस्थ अपने फ्रेंड है!!!!!!!!!!!!

 3. 26/12/2009 येथे 11:26 pm

  खरंच काका कोपरापासून दंडवत….पासष्टावी कलापण तुम्हालाच येत असणार याची पक्की खात्री…
  जळव आम्हाला तन्वी..पण आता ते आमचेही मित्र आहेत बरं का???

 4. 27/12/2009 येथे 7:01 सकाळी

  तन्वी, अपर्णा आणि माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीनॊ,

  हा माझा ब्लॉग केवळ तन्वी मुळॆ प्रत्यक्षात आला हे खरेच आहे. अक्षरश: उभी साठ वर्षे म्हणजे माझे स्मरण जेथपर्यंत पोहोचतेय ते सारे मला आठवायला मला तिचीच मदत झाली !काय काय सांगू व किती हाच प्रश्न पडतो कधी कधी !

  पण मला तुम्हा सर्वांच्याच प्रतिक्रियेंमुळे परत उमेदीत आल्याचा ’भास’ होऊ लागला आहे. माझे असे आता काहीही नाही, जे आहे ते सर्व तुमचेच आहे . मी सारे उधळायलाच आलेलॊ आहे !

 5. 27/12/2009 येथे 7:12 सकाळी

  आता मी सहजच हे पहिले बुक कव्हर मोठे करून पाहीले, बापरे अगदी रेष न रेष स्पष्ट दिसत आहे ही सर्व अधुनिक तंत्र विद्येची किमया आहे.

  पुर्वी नाना सहा इंची व्यासाचे भिंग लावून त्यातून रेषा बघायचे. आत जर ते हयात असते व इतक्या स्पष्ट दिसणारा फोटॊ पाहीला असता तर अक्षरश: नाचले असते ! ……. कदाचित सांगितले जाणारे भविष्य ही अधिक स्पष्ट झाले असते !!!

 6. 27/12/2009 येथे 11:10 सकाळी

  नमस्कार काका,
  आपण तर हे पण केल आहेत, मला वाटते आता कला संपतील पण आपली कलाकारी नाही.फ़ारच छान. आपण असेच पुढे जावो हिच शुभेच्छा.

 7. सुरेश पेठे
  27/12/2009 येथे 12:53 pm

  अक्षय,

  माझी कलाकारी माझ्या बरोबरच संपणार… पण काळजी नको..तुम्हा तरूणांनी मला उम्मेद दिली आहे जगण्याची.

 8. saurabh
  28/12/2009 येथे 6:06 pm

  सुंदर coverpages दोन्ही अप्रतिम

 9. सुरेश पेठे
  28/12/2009 येथे 6:46 pm

  सौरभ,
  अभिप्रायाबद्दल आभार

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: