मी काढलेली व्यंगचित्रे
मागिल पोस्ट मधे मी मॅगेझीन सेक्रेटरी म्हणून निवडलो गेलो या बाबतचे वर्णन दिले होते. ह्याच मॅगेझीन मध्ये मी काही व्यंगचित्रे ही काढली होती व ती आपण आता येथे बघुया. प्रत्यक्षात मी पाच चित्रे काढली होती पण प्रयत्न करूनही तूर्त मला तीनच मिळालीत.शेवटी विचार केला तीन तर तीन , तेरा वाजवू या नकॊ ! पुढे मागे मिळालीत तर ह्याच ब्लॉग मध्ये वाढवता येतील. ही सर्व व्यंगचित्रे ’आमचे व्यायाम प्रकार’ या विषयावर होती.
पहिले वर्ष सगळ्यांनाच कॉमन होते. आमच्यातील इलेक्ट्रीकलच्या विद्यार्थ्यांचे हातात कायम मोठी मोठी पुस्तके असायची. त्यांचे इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी हा तर मोठ्ठा ठोकळाच होता म्हणून ते ’इलेक्ट्रीकल वेटलिफ्टींग” !
आम्ही तेव्हा डिप्लोमाला ऍडमीशन घेतली होती. आमच्या नविन इमारतीस सुरुवात झाली होती पण पुर्ण होण्यास अवकाश होता, तेव्हा आमचे वर्ग इंजिनियरींग कॉलेज मधेच पण दुपारी १ ते रात्री ८ पर्यंत असत. सुरवातीचे एक दोन व शेवटचे काही तास लेक्चर्स व मधल्या काळात प्रॅक्टीकल्स असत. दुपारी एक वाजता म्हणजे जेवून आलेले तर शेवटचे कंटाळा आलेले म्हणून मुले वर्गात चक्क झोपा काढीत असत ती ही ’ क्षणिक निद्रासने !’
आम्ही सिव्हिलचे विद्यार्थी सर्व्हेइंगला निघालॊ की सर्व सामान हातात वागवित व झेंडे वगैरे फडकावित जात असू , तॊ हा आमचा ’मार्च-पास्ट !!’
अजून एक आठवते आहे ते म्हणजे जुवेलिअन थ्रो म्हणजे भाला फेक , आमची रेंजींग रॉड ची नेहमी फेकाफेकी असे त्याबाबत होते व ….पाचवे तर आठवतही नाहीये !
काका मजा आली पाहुन , आम्हालाही फर्स्ट ईयरला सिव्हिल ईंजी. विषय होता…..त्यात सर्वेला जाताना आमचा जथ्थाही असाच दिसायचा….मी अजुनही ईशानला डंपी लेवल म्हणते कधी कधी…मला फार मजा वाटते त्या नावाची….सगळ्यात काय आवडले सांगु…ती साडीतली क्लासमेट, साडी-वेण्या…..आमच्या वेळेस काही पंजाबी, काही जिन्स असायच्या…आता पहायला हवेय!!!!!!
ईलेक्ट्रिकलचे बी.एल.थरेजाच आठवले एकदम…….
निद्रासने पण मस्त…..
चला त्यानिमित्ताने तुझीही आठवण ताजी झाली….. त्याकाळात साड्या..वेण्याच होत्या,… सबंध वर्गात एक मुलगी फक्त !…इतर कॉलेज कन्यकात क्वचित स्कर्टस दिसायचे पण अलिकडल्या मेडी का काय म्हणतात तसे..अर्ध्या पोटऱ्या झांकणारे !..आणि हातात पहीलं ? काहीही हेवी नाही… स्त्री-दाक्षिण्य दुसरे काय !!!