टॅग

अपर्णा ने  टॅग केलं, पहील्याने ही काय भानगड समजेच ना, अनेकांना वाट पुसत चाललोय. बघा जमलंय का !

1.Where is your cell phone?
आपटलाय ( बहूतेक भूर्दंड आहे )
2.Your hair?
तेल लावलंय आज ( न्हायलो ना ! )
3.Your mother?
विश्रांती ( वर घेतेय )
4.Your father?
विश्रांती (  अर्थात वरच , जेथे सीता तेथे राघव ! )
5.Your favorite food?
पथ्यंच पथ्य !( कसलं फेवरेट घेऊन बसलाय ! )
6.Your dream last night?
आठवतोय ( सांगतोच आठवल्या आठवल्या )
7.Your favorite drink?
पाणी ( पुण्यातील कार्पोरेशन च्या नळातील शुध्द ! )
8.Your dream/goal?
कुठल्याश्या कलासागरात गटांगळ्या खातोय.
9.What room are you in?
ड्रॉईंग रूम (ड्रॉईंग काढीत बसायला छान नाही ? )
10.Your hobby?
तुम्हाला काढणे ( म्हणजे तुमचे पोर्ट्रेट  काढणे हो )
11.Your fear?
मला माझीच ( आणखीन कोण भिववणार मला ?)
12.Where do you want to be in 6 years?
आहे अस्सेच ! ( बरं आहे ना उगाच कुठे कशाला ? )
13.Where were you last night?
अहो घरीच (रोख नाही कळला ?)
14.Something that you aren’t? diplomatic
मी काहीच नाहीय्ये!
15.Muffins?
काय असते ते?
16.Wish list item?
’त्या’ लाच सांगीन
17.Where did you grow up?
ह्याच जमीनीवर की
18.Last thing you did?
टांगाटांगी
19.What are you wearing?
माझाच चष्मा
20.Your TV?
लोडशेडींग चाललंय (बंद केलाय !)
21.Your pets?
नाही सांभाळत
22.Friends?
तुम्ही सारेच
23.Your life?
मस्त चाललंय !
24.Your mood?
एकदम छान !
25.Missing someone?
अस्सं ?
26.Vehicle?
बजाजसुपर (७८ चे मॉडॆल, अजून हाफ कीक स्टार्ट !)
27.Something you’re not wearing?
चेन ( कोणी गळ्यात बांधून हिंडवतंय सं वाटतं )
28.Your favorite store?
अख्खं जग ( त्यापेक्षा मोठे स्टोअर कुठे आहे ?)
Your favorite color?
सर्वच ( रंगात खेळणे हाच तर माझा छंद )
29.When was the last time you laughed?
Just the  moment !
30.Last time you cried?
पाळण्यात असावा !
31.Your best friend?
निसर्ग
32.One place that you go to over and over?
निसर्गच ! ( जो रंगवायला मला आवडतो )
33.One person who emails me regularly?
कोणी असतंच तर ?
34.Favorite place to eat?
Any place (पण तिथं खायला मिळायला हवं !)

आता कुणाला टॅगू ?

Advertisements
प्रवर्ग: अवांतर टॅगस्
 1. Naniwadekar
  24/12/2009 येथे 4:03 सकाळी

  Your favorite colour?
  सर्वच ( रंगात खेळणे हाच तर माझा छंद )
  ——

  LOL. Great answer.

  • 24/12/2009 येथे 3:55 pm

   नानिवडेकर,
   प्रथमच दर्शन दिलेत, येथे स्वागत व अभिप्रायाबद्दल आभार !
   ““““
   अहो खरंच तो माझा छंद आहे

   • नानिवडेकर
    24/12/2009 येथे 4:31 pm

    पेठे काका : तो तुमचा छन्द तर आहेच, शिवाय त्याचा तुम्ही उत्तर देताना छान उपयोग केला. इतरही काही उत्तरं मजेशीर होती; आणि तुमच्या पिढीचे तुम्ही या मालिकेत एकटेच असणार, तेव्हा त्यानुसार वेगळा सूर अपेक्षितही होता. (उदा. ‘पथ्यंच पथ्यं’.) पण ‘सगळेच रंग आवडते’ यामागे तुमच्या वयापेक्षा तुमच्या छन्दाचा संबंध होता, म्हणून मला खूप हसू आलं.

    ‘पथ्यंच पथ्यं’ वाचल्यावर मला उगीचच ‘यथा काष्ठं च काष्ठं च’ ची आठवण झाली.

    ‘Muffins’ प्रश्नाचा अर्थ न कळलेला मीच एक बुद्‌दू आहे की काय, अशी मला शंका आली होती. पण तुमची मला त्याबाबत साथ मिळाली, याचाही आनंद आहे. आता ‘मफ़िन्स’बाबत मी पथ्य पाळायला सुरवात करणार आहे. माझा माझ्या जिभेवर ताबा असा तो नाहीच.

    ‘टॅग करणे’ याचा अर्थ मात्र मला माहीत होता. तुमच्यापेक्षा मी तितपत मॉडर्न आहे. चित्र वगैरे न ज़मणार्‍या भानगडी कोणी करायला सांगितल्या तर मात्र तुमच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठ्या लोकांइतकाच माझा हात थरथरेल. तेव्हा तुमची चित्रं पाहून तुमचा थोडासा हेवाच वाटतो.

    – डी एन

   • 24/12/2009 येथे 8:33 pm

    मला Muffins चा अर्थ अजून ही कळला नाही… माझ्या dictionary मधेही तो नाही ! मी त्याबाबत खरेच बुद्दू आहे !

   • Naniwadekar
    25/12/2009 येथे 1:20 सकाळी

    पटकन वापरायला http://www.m-w.com हा एक चांगला शब्दकोश आहे. (dictionary.com पण मी वापरतो.) त्यावर ‘muffin’ चे दोन अर्थ दिले आहेत.

   • 25/12/2009 येथे 7:17 सकाळी

    माझी जुनी शाळेतली कित्येक पाने गळू लागलेली डिक्शनरी… आता त्यातून शब्द पण गळायला लागलेतसे वाटते !… बरं झाले आपण मला एक नाही दोन D दिल्यात. आभार !

 2. 24/12/2009 येथे 6:36 सकाळी

  आवडते स्टोअर….आख्खे जग…. सहीच.

  • 24/12/2009 येथे 4:04 pm

   भानसा,
   अभिप्रायाबद्दल आनंद झाला.
   “““‘

   हे जग म्हणजे कसले प्रचंड डीपार्टमेंटल स्टोअर आहे ! येथील काही माल फुकट मिळतॊय वाटलं तरी किंमत मोजावीच लागते (!) व किंमत देऊन मिळवलेलं असलं तरी स्टोअरचे बाहेर न्यायला परवानगी इल्ला !

 3. 24/12/2009 येथे 8:00 सकाळी

  malaa vaatale favorite color mhatalyavar tumhi ‘water color’ kinva ‘acrylic’ ase kahitari uttar lihinar 🙂

  • 24/12/2009 येथे 8:30 pm

   गौरी,
   तू म्हणत्येस तसं क्षणभर मनात आलं पण काहींच्या उत्तरातून पांढरा. काळा आदि उल्लेख होते, शिवाय वॉटर कलर, ऍक्रेलिक वा ऑईल ही माध्यमे आहेत, colour नव्हेत ! तसेच जेव्हा रंगवतो तेव्हा त्या ठिकाणी कुठला रंग सूट होतोय एव्हढेच पहातो, तिथे कुठलाच particular color मनात नसतॊ, कुठलाच वर्ज पण नसतो !

 4. 24/12/2009 येथे 9:47 सकाळी

  क्या बात है आज मी तुमच्या ब्लॉगवर ब्लॉगविश्वावरून आले…….
  सही झालाय टॅग काका….सगळी उत्तरे तरुण मनाचा पत्ता देताहेत…..

  रंगात खेळणे हाच छंद …मस्त!!!!

  • 24/12/2009 येथे 4:16 pm

   तन्वी,
   तुम्ही खरी उत्तरे मागितलीत ना ?
   “““
   हा टॅगा-टॅगी चा तुम्हा तरूण लोकांचा खेळ, प्रथम कळला नव्हता, पण आवडून गेला. अश्याच पण थोडा वेगळ्या प्रकारचा आणि तोंडी खेळला जाणारा आमच्या वेळचा खेळ ” कोण म्हणतो टक्का दिला ” उगाच आठवून गेला.
   “““
   झालं ’बाई’ एकदाचे ब्लॉग विश्व वर सुरू, अगदि प्रथम पासून तू फारच मेहनत घेत्येस त्याला फळ आल्याचा मलाच आनंद जाला.

 5. 24/12/2009 येथे 10:13 सकाळी

  मस्त लिहिलाय tag आपले सुंदर असे जीवन पुस्तक उलगडून सांगितलेत. अर्थात tag हे पुरसे नक्कीच नाही. पण जी माहिती दिलीत त्यावरून
  जीवन सुंदर असते हेच खरे आहे.

  • 24/12/2009 येथे 4:21 pm

   अनुक्षरे,
   ह्या टॅगा-टॅगी चा तुमच्या खेळा मुळे अनेकांचे स्वभाव विशेष कळायला मदत होतेय. आवडला मला खेळ व अभिप्रायही.

 6. sahajach
  24/12/2009 येथे 9:02 pm

  काका,

  आज पहिल्यांदाच तुमच्या ब्लॉग वर कॉमेंट टाकण्याची हिम्मत करत आहे……… खर तर मी तुमची प्रत्येक पोस्ट वाचतो आणि खरच तुमच्या प्रत्येक पोस्ट वरुन खूप प्रेरणा मिळ्ते आणि शिकायलाही मिळते ………. उगाच फॉरमॅलिटी म्हणुन पोस्ट्स वर कॉमेंट करण्यापेक्षा तुमच अनुकरण करणे मला जास्त आवडेल…. माझ्या साठी तुम्ही एक आइडीयल व्यक्तिमत्व आहात… यापेक्षा अज़ून काय सांगू… असचं कायम ऍक्टिव रहा आणि आम्हाला प्रेरणा देत रहा………
  तुमच्या ईतर पोस्टप्रमाणेच तुम्ही टॅगिंगला दिलेली उत्तरेही प्रेरणादायीच आहेत आणि तुमच्यातील खिलाडूवृतीचे दर्शन घडवणारे आहेत…

  अमित

 7. 24/12/2009 येथे 9:59 pm

  अमित,
  बापरे तू आणि तन्वीने हे काय आरंभलंय ! अरे उलट तुम्हा तरूणांकडूनच तर मी प्रेरणा घेतोय ! कोण कुठली तन्वी अचानक माझ्या स्क्रॅपबुक मध्ये येते काय आणि बघता बघता जन्म जन्मांतरीची ( खानदानी ) मैत्रीण बनते काय….हा ब्लॉग सुध्दा तिचीच प्रेरणा … नाहीतर आधीचे माझे दोन्ही ब्लॉगस आसन्नावस्थेत पोहोचले्ले होते … आता त्यांनाही उर्जितास्थेत आणण्याची स्वप्ने बघतोय मी ! तुमचे सुखी चौकोनी कुटुंब तन्वी, तू, ईशान छोटी गौराई आणि ह्या ब्लॉग वरील समस्त मंडळी हेच माझ्या पुढील प्रेरणा स्त्रोत आहेत. तुम्हीच तर मला तरूण करत आहात व तो पर्यंत मला काळजी वा फिकीरही नाहीय्ये.

 8. 25/12/2009 येथे 12:18 सकाळी

  ह्या टेगा टेगीच्या खेळात आपण सुद्धा शामिल झाला हे पाहून आनंद झाला. प्रत्येक प्रश्नांची अप्रतिम उत्तर दिली आहेत. मला खूप आवडले. 🙂

 9. 25/12/2009 येथे 6:41 सकाळी

  मनापासुन लिहिलेली उत्तरं आहेत.. गळ्यात चेन बांधल्यासारखं वाटतं..
  दिलसे लिहिलंय तुम्ही, म्हणुन वाचतांना पण ्निर्भेळ आनंद आणि करमणुक झाली.

  • 25/12/2009 येथे 7:05 सकाळी

   महेंद्रजी,
   ह्या टॅगा-टॅगी च्या खेळात भाग घ्यायला तुमचा त्यातील सहभागच कारणीभूत झाला… आई शप्पत !

  • 25/12/2009 येथे 7:06 सकाळी

   रविंद्रजी,
   मी इतका काही म्हातारा झालोय का? अहो मला अजून ’ अवघे पाऊणशे’ पोहोचायला ही बरीच वर्षे वाट पहायची आहे! तेव्हढा वेळ तरी तुमच्यात काढू द्या ना !
   आता तुमच्या बरोबर रहायचे तर तुमचे खेळ मला आत्मसात करायला हवेतच ना ? हां आता थोडे सांभाळून घ्या म्हणजे झाले !!

 10. 25/12/2009 येथे 7:01 सकाळी

  रविंद्रजी,
  मी इतका काही म्हातारा झालोय का? अहो मला अजून ’ अवघे पाऊणशे’ पोहोचायला ही बरीच वर्षे वाट पहायची आहे! तेव्हढा वेळ तरी तुमच्यात काढू द्या ना !
  आता तुमच्या बरोबर रहायचे तर तुमचे खेळ मला आत्मसात करायला हवेतच ना ? हां आता थोडे सांभाळून घ्या म्हणजे झाले !!

  • 25/12/2009 येथे 9:48 pm

   तुम्हाला उद्दंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

   • 25/12/2009 येथे 10:09 pm

    आपल्या प्रार्थनेचा अव्हेर करण्याचे ’त्याला’ काहीच कारण नसावे !!

    आपल्या सारख्या तरूणांसमवेत वय विसरायला मला नक्कीच आवडॆल !

 11. 25/12/2009 येथे 9:02 pm

  नमस्कार!
  तन्वीमुळे आपला ब्लॉग कळाला आणि या पोस्टवरुन “आपली आवड” समजली 🙂 भेटत राहु!
  शुभेच्छा!

  • 25/12/2009 येथे 10:01 pm

   भुंग्याचे माझ्या ब्लॉगवरील आगमनाचे मन:पूर्वक स्वागत ! भुंग्याचा गुंजारव कानाला गोड वाटला सतत कानी पडावा हीच ईच्छा !

   तन्वी मुळेच हे सर्व घडत आहे, त्याचे क्रेडीट तिला द्यायलाच लागेल !

   ब्लॉग वाल्यांच्या स्नेह भेटीला मी आतूर आहे !!

 12. 26/12/2009 येथे 3:04 pm

  खूपच छान उत्तरे दिलीत तुम्ही..मी सुद्धा चार वर्षे बजाज सुपर चालवली स्कूटर चाल्वाण्याटली मजा काही औरच होती

  • 26/12/2009 येथे 6:26 pm

   वैभव,
   प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभार

 13. 27/12/2009 येथे 2:08 pm

  काका,
  खूप सुंदर पोस्ट झाली आहे.सर्व उत्तर खूप छान आहेत!!!

  • 27/12/2009 येथे 2:14 pm

   मनमौजी,
   आपल्या नावातच ’ मस्त’ गिरी भरली आहे ! आपल्या भेटीने छान वाटले. वारंवार येत रहा आपले सदोदीत स्वागतच आहे.

 14. 28/12/2009 येथे 4:49 सकाळी

  पेठेकाका प्रथम माझ्याकडून टॅगवून घेतल्याबद्दल धन्यवाद…:) मला वाटलंच होतं की तुम्ही हे आमंत्रण नक्कीच स्विकारणार…आणि हो तुमच्या १० नंबरच्या उत्तरासाठी मी नक्की तुम्हाला भेटणार आहे….एक दिवसाचं मॉडेलपद मिळवायला…:))

  • 28/12/2009 येथे 6:19 सकाळी

   अपर्णा,
   तुझ्या टॅगींग मुळे व इतरांची उत्तरे वाचून आमंत्रण स्विकारण्यापासून ’ गत्यंतर’ च नव्ह्ते! पण मजा वाटली तुम्हां बरोबर नवा खेळ खेळयला, तन्वी मुळे तिचे सारे मित्र मंडळी अपसूक माझेही मित्र बनत चालले आहेत ह्याहून अधिक आनंददायी काय आहे ? तुम्हा सगळ्य़ांना प्रत्यक्ष भेटायला मी सदैव आतूर आहे !

   फक्त पंधरा मिनीटे माझ्या समॊर स्तब्द बसण्याची शिक्षा निमूटपणे स्विकारावी लागेल ! तर माझ्या कडील काय काय बघायला अर्धा दिवस तरी…तुमच्या बिझी शेड्युल मधून राखावा लागेल… आधीच कल्पना असलेली बरी नाही का ?

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: