कर्दळ

आज गुरूवार म्हणजे पुण्याच्या विद्युत वितरण (अ) व्यवस्थापनाचा कत्तलचा  (म्हणजे विज पुरवठयाचा असणे नसणे या खेळाचा) दिवस ! त्यामुळे जवळपासचे छोटे मोठे कारखानदारांचा आज सुटीचा दिवस असतो. माझे एक स्नेही आहेत. जवळच आंबेगावला त्यांचा वर्कशॉप आहे. बुधवारीच त्यांचा मला हमखास फोन येतो उद्या कुठे जायचे त्यासाठी ! मग त्यांचे गाडीतून लॅंडस्केप साठी आम्ही कुठे कुठे जात असतो.
एकदा त्यांना वर्कशॉप मध्येच काम होते. विज नसली तरी डिलिव्हरी देणे वगैरे काम होण्या सारखे होते. त्यांनी सहज विचारले, वर्कशॉप वर येणार का? पण बघा बुवा तिथे काही स्पॉट मिळेल का बघावे लागेल. मी काय एका पायावर ( त्याचीही गरज नव्हती कारण कार मधूनच जायचे होते.) तय्यार. हे पहा त्या वेळी काढलेले चित्र.
आज मी स्कुटरने त्यांचे घरी गेलो स्कुटर त्यांचे बंगल्यात लावली तेव्हाच बाहेरच्या कर्दळीने माझे लक्ष वेधले होते पण आज आम्ही पाषाणला जायला निघालो होतो.
का कोण जाणे माझे पहिलेच चित्र बिघडले आणि मग मूडच येईना. नंतर एक ब्रश-स्केच व एक पोर्ट्रेट ही  काढले पण तरीही मूड काही आलाच नाही. आज घरी लवकर या अशी त्यांना तंबी असल्याने सारे लक्ष घड्याळाकडॆ लागलेले. मग काम संपवित दोघेही घरी परतलो.
त्यांचे बंगल्यात पाऊल टाकले मात्र, त्या कर्दळीने परत माझे लक्ष खेचलेच ! मग मात्र तिथेच ठिय्या मारीत झटपट कर्दळीला माझ्या कागदावर थबकवले !!


Advertisements
 1. saurabh
  17/12/2009 येथे 7:35 pm

  मस्तच काका

  • 17/12/2009 येथे 7:37 pm

   अत्यंत आभारी आहे.

  • 18/12/2009 येथे 6:39 सकाळी

   सौरभ,
   प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे.
   आधीचेही पोस्टींग्स वाचावेस, व या पुढे वारंवार येथे येत रहावे ही विनंती

 2. 17/12/2009 येथे 7:44 pm

  तुमच्या चित्रकारिते बद्दल तर काही बोलायलाच नको. सुंदर झालंय चित्र..

  • सुरेश पेठे
   17/12/2009 येथे 9:59 pm

   महेंद्रजी,रविंद्रजी,व भानसाताई,
   अभिप्रायांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

 3. 17/12/2009 येथे 8:21 pm

  अप्रतिम चित्र काढली आहेत. आपले छंद आवडले. 🙂

 4. 17/12/2009 येथे 9:38 pm

  सहीच आलेय चित्र.:)

 5. 17/12/2009 येथे 10:17 pm

  चित्र तर अप्रतिम आहेच आणि महेन्द्रकाका म्हणतात त्याप्रमाणे त्याबद्द्ल बोलायलाच नको..पण संदर्भ भावला..कलाकारांच असंच असतं…एखादी कलाकृती मनाप्रमाणे नाही जमली की मग त्याचाच विचार आणि एकदा का सगळं जमुन आलं की मग मात्र जो आनंद मिळतो त्याची तुलना नाही….

  • 17/12/2009 येथे 10:24 pm

   अपर्णा,
   अगदि मनातलं ओळखलंस ! धन्यवाद

 6. 17/12/2009 येथे 10:22 pm

  अपर्णा,
  अगदि मनातलं ओळखलंस ! धन्यवाद

 7. 17/12/2009 येथे 11:05 pm

  काका मस्त आलय चित्र…कर्दळ माझं आवडतं फुल….लाल,केशरी सगळेच रंग आवडते पण सगळ्यात आवडतात ती त्याची पोपटी, हिरवी पानं….आम्ही लहानपणी अनेकदा त्या पानांवर जेवलोय…..

 8. सुरेश पेठे
  17/12/2009 येथे 11:21 pm

  होय तन्वी, आणि त्याला एक प्रकारचा मधूर वास पण असतो. मस्कत ला आहे कर्दळ ? गरम गरम तूप+वरण+भात खावून बघ ! तुझी सगळी मरगळ पळून जाईळ ! बाय द वे तब्येत काय म्हणत्येय ?

  खरं तर तुला कंटाळा आलेला दिसतोय, तुला काहिसा बदल हवा आहे असे वाटते. खरे ना?…. पण जून पर्यंत कळ काढावी लागणार दिसतंय !

 9. 18/12/2009 येथे 1:32 सकाळी

  नमस्कार काका,
  फ़ारच छान चित्रे काढलीत.मोठी करुन पाहील्यावर तर अगदी बारकावे पण मस्त दिसतात.

  • 18/12/2009 येथे 6:29 सकाळी

   अक्षय,
   आभारी आहे.
   मी मुद्दामच रीझोलीशन्स जास्त ठेवली आहेत, त्यांची खरी मजा घेता यावी हाच उद्देश आहे.(फक्त जी आधीच्या फोटॊवरून विशेषत: जुन्या कामांची ची आहेत त्याला नाईलाज आहे कारण ती मोठी केलीत तर ग्रेन्स फाटतात.)

 10. Vaibhav Shirke
  18/12/2009 येथे 1:35 सकाळी

  No words to say
  “Simply Great”

  • 18/12/2009 येथे 6:51 सकाळी

   वैभव,
   आभारी आहे व या ब्लॉग वर स्वागत. आता नेहेमी भेटूच !

 11. 18/12/2009 येथे 10:24 सकाळी

  कर्दळीचे चित्र सुरेख आहे..फोरल्स आणि येकुणच क्लोजअप ओब्जेक्ट्स करताना Contour थोडे काटेकोर काढले तर अजुन मजा येईल

  • सुरेश पेठे
   18/12/2009 येथे 12:01 pm

   अजयजी,
   अभिप्रायाबद्दल आभार. सुचना लक्षात घेतल्यात !
   ह्या ब्लॉग वर मनाने ’ व्यक्त ’ होणे हा मूळ उद्देश ठेवला आहे.
   सध्याचा संकल्प लवकरच संपेल, पुढील वर्ष्यासाठी माझा sketching चा ब्लॉग वापरात आणण्याचे योजित आहे ! बघुया काय काय जमतंय ते.
   आपली ब्लॉगला वारंवार भेट अपेक्षित आहे !

 12. 18/12/2009 येथे 5:39 pm

  काका,

  सुंदर आहे ब्लॉग … आणि चित्रावरून दीलेली त्यांची माहिती खुप आवडली.

  सुंदर चित्रे आहे सगळीच.

  • 18/12/2009 येथे 8:29 pm

   आनंद,
   ह्या ब्लॉग वर तुझे स्वागत ! वारंवार येथे येत राहशीलच.

 13. sneha
  19/12/2009 येथे 10:01 सकाळी

  aflaatoon

 14. sneha
  19/12/2009 येथे 10:04 सकाळी

  kaka kay bolu tech kalat nahiye!!!!!!jabardast..great

  • 19/12/2009 येथे 1:55 pm

   प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे.
   आधीचेही पोस्टींग्स वाचावेस, व या पुढे वारंवार येथे येत रहावे.

 15. Suresh
  19/12/2009 येथे 6:13 pm

  तुमच्या चित्रकारिते बद्दल तर काही बोलायलाच नको. सुंदर झालंय चित्र.

  • 23/12/2009 येथे 2:46 pm

   सुरेश जी,
   आभारी आहे, असेच वारंवार भेट दे चला.

   • karbir rajgole
    20/02/2010 येथे 5:11 pm

    khup khup sunder chitra

 16. karbir rajgole
  20/02/2010 येथे 5:11 pm

  dhanyawad

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: