मुखपृष्ठ > अवांतर > हीच तर जगरहाटी !

हीच तर जगरहाटी !

एरव्ही सकाळी साडेपाचला उठणारा मी आज साडे सहा वाजून गेले तरी गादीवर लोळत पडलेलो होतो.कारण काही विशेष नव्हते, तसे कालच थोडेसे फिवरीश वाटत होते पाव गोळी क्रोसीन घेतली होती त्याचा तर परिणाम नसावा ! कोण जाणे?
जाग आली ते मोबाईल च्या कर्णकर्कश्श टोनने. कितीदा मुलगी म्हणत असते, ” बाबा इनकमिंगला छान टोन लावून घ्या ना ! ” पण मी मुलखाचा आळशी. फोन तिचाच होता व आमच्या लग्नाच्या वाढदिवसा साठी आमचे अभिनंदन करायला मुद्दामच लवकर केला होता कारण मी नाहीतर हिंडायला बाहेर पडलेला असेन. पण आज मी नेमका घरी सापडलो .
सांगायचे म्हणजे आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस , १६ डिसेंबर १९६८. तो दिवस, त्या दिवसाचा गडबड गोंधळ सारे काही आठवले ! पण खरं तर आज काल आम्हाला कुठलेच दिवस आठवेनासे झालेले आहेत. हल्ली खरंच आमच्या लक्षातही रहात नाहीत ! पण मग मुली असतात ना आठवणी करून द्यायला.
तर हा दिवस आमच्या आयुष्यातील एक घडामोड म्हणून, अन्यथा नेहमी सारखाच तर दिवस आहे की . कुठल्यातरी कार्यालयात दोन घराण्यातील माणसे जमतात. आपापल्या मित्र मंडळीनाही बोलावतात त्यांचे  आशीर्वाद मिळवायला ! पुढे त्या दोन व्यक्ती एकत्र रहाण्याच्या शपथा घेतात. आयुष्यातील राहीलेली वर्षे इमाने इतबारे एकत्र घालवतात. हाच गाडा पुढे चालविण्यासाठी, अपत्ये निर्माण करतात. घासून पुसून त्यांना ह्या जगात पाठवतात व मग पुढील प्रवासाला निघतात. नंतर मात्र हे दोन जीव बरोबर असतीलच असा काही नियम नाही !! तर असा हा दिवस ! म्हणता म्हणता एक्केचाळीस वर्षे झालीत सुध्दा ! कदाचित पन्नाशी उलटलीच तर एखादा छोटासा समारंभ पण होईल. पण मनात विचार येतो, काय फरक पडलेला असेल जगरहाटीत ?
पण नाही काहीतरी फरक सतत पडत असतोच ! ओळखी रिफ्रेश होत रहातात ! नाती जुळतात, मोडतात नवीन जुळत रहातात, नव्याने पुढे येतात. आठवणींची उजळणी होते … आणि ह्यालाच म्हणतात जीवन ऐसे नांव !…प्रत्येकाच्या आयुष्यातील त्याचे स्वत:चे स्थान हा एक केंद्र बिंदू ठरतो व सारे जग त्या भोवती फिरतंय असा भास होत रहातोच की नाही ?
ह्याला पण एक आयाम आहे. जीवनाच्या सुख दु:खांची किनार आहे आणि तोच पुढे जगण्याचा आधारही आहे !
कोण कुठली एखादी तन्वी ह्या हल्लीच्या  इंटरनेट माध्यमामुळे जीवनात प्रवेश करते. एक नवे नाते निर्माण होते. आयुष्यात विस्मरणात गेलेल्य़ा आठवणीचे मोती परत हाती घेऊन येते. परत केंद्र बिंदू सक्रीय होतॊ ! आणि पुन्हा सारे सुरू होते …नव्याने, हीच तर जगरहाटी !
Advertisements
प्रवर्ग: अवांतर टॅगस्
 1. sahajach
  16/12/2009 येथे 2:23 pm

  काका लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा!!!!!!!!!!!!!काकुंना काय भेट दिली मग आज???
  लवकर द्या हं मी फोन करून विचारणार आहे…..

 2. सुरेश पेठे
  16/12/2009 येथे 2:28 pm

  प्रतिक्रियेबद्दल संतॊष !
  मीच आख्खा तिचा आहे ना ! अजून मी असे काय वेगळे द्यायला हवे?

  हल्ली तू ही दुर्मीळ होत चाललीयस ! काही विशेष ?

 3. 16/12/2009 येथे 2:41 pm

  काका बालुमामा मला नेहेमी म्हणतो तू मामीपासून दुर रहात जा…आलीस की नव्या नव्या कल्पना तिच्या डोक्यात घालतेस आणि मला वैताग होतो…..आता मी आले की काकुंना सांगणार आहे की असे कसे सोडायचे नवरोबांना….एक सांगू का बेस्ट गिफ्ट म्हणजे मस्त ताजा ताजा गजरा न्या!!!!

  • सुरेश पेठे
   16/12/2009 येथे 4:22 pm

   तो गजरा ना फ्रिज ची धन होईल ! आणि दुसऱ्या दिवशी मुलीच्या डोक्यात ! “आता पांढऱ्या केसांवर कसला गजरा घालायचा !”
   ती या ’लोकात’ नाही रहात !! ती सोन्याचा एकही दागीना अंगाला चिकटवु देत नाही !! मंगळसूत्र हा नाईलाज आहे !

 4. 17/12/2009 येथे 2:14 सकाळी

  Kaka, Belated Happy wedding Anniversary.sorry हं लेट झालो.आपल्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्या.

  • सुरेश पेठे
   17/12/2009 येथे 9:53 pm

   अक्षय,
   शुभेच्यां बद्दल धन्यवाद !

 5. 17/12/2009 येथे 8:24 pm

  लग्नाच्या वाढ दिवसा बद्दल हार्दिक अभिनंदन पेठे साहेब 🙂

  • सुरेश पेठे
   17/12/2009 येथे 9:54 pm

   रविंद्र जी,
   अभिनंदना बद्दल धन्यवाद .

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: