मुखपृष्ठ > माझे छंद > माझी मूर्तिकला

माझी मूर्तिकला

माझ्या मूर्तिकलेला कधी बरे सुरूवात झाली असावी ? मी सहजच आठवत बसलो होतो, पण स्पष्ट पणे काही लक्षात येत नव्हते. पण एके दिवशी मनातल्या मनात एक ललकारी ऐकू येऊ लागली. ” होळी होळीला पांच पांच गवऱ्या ! ” आणि मी एकदम माझ्या लहाणपणात अवतरलो !

असेन बहुदा मी तीन ते पाच वर्षांचा. शाळेत जायला लागलो नव्हतो. मला पक्के आठवते की सहावे लागले आणि मला एकदम दुसरीत घातले होते ! वरील नारे करीत गल्लीतील मुले होळी साठी गवऱ्या, लाकडे जमा करीत असत कींवा पळवापळवी ही करीत. आमची होळी दादा ( म्हणजे माझे वडील) सकाळी पुढील चौकात सोवळे नेसून करीत असत. नैवेद्याला हमखास पुरणाची पोळी असायचीच. हॊळीची तयारी अर्थातच मलाच करावी लागे. विशेष फुलाचा पुडा उघडून तबकात वेगवेगळी करणे, गंध उगाळून ठेवणे, होळीचे साहित्य जुळवणे इ.इ. अजून एक विशेष गोष्ट माझ्यावर सोपवलेली असे ती म्हणजे गुळा चे प्राणी म्हणजे साप,विंचू,इतर किटके आदि करून ठेवणे ! ज्यांचा नंतर होळीच्या ज्वालात स्वाहाकार होत असे ! माझ्यातल्या मूर्तिकाराचे बीज तेव्हाच अंकुरले असावे, कारण मी बनविलेल्या विंचवाला बघून ” हं लक्ष दे चावेल ” असे एकदा मला दादा म्हणाल्याचे स्मरते ! मी खूप मनलावून ते प्राणी बनवायचो, कारण पुढे वर्षभर असे प्राणी आपल्याकडे फिरकत नाहीत अशी आमची समजूत करून दिलेली असायची. अर्थात उरलेला गूळ गट्टम करायला मिळायचा हा फायदा असायचाच ! त्याची तजविज गूळ घेतानाच घेतली जायची ! आत्ता मला जाणवते की बहुदा माझ्यातल्या नव्याने अंकुरणाऱ्या मूर्तिकलेला ती दाद /शाबासकीच असावी.

पुढे पाचवीत आम्हाला हस्तव्यवसायासाठी वेगळ्या शिक्षकाची नेमणूक व वेगळा तास मिळू लागला. पेठे विद्यालयात त्यावेळी रानडे आडनावाचे शिक्षक होते व ते शाळेच्या अगदि जवळ रहात . शिवाय आमची त्यांचेशी घरगुती ओळख असल्याने मी त्यांचे कडे नेहमी जात असे कारण मी त्यांचा लाडका विद्यार्थी होतो. दर गॅदरींगला ते माझ्याकडून काहीतरी वेगळे बनवून घ्यायचे. एका वर्षी आम्ही धरणाची प्रतिकृती केली होती. त्यासाठी धरणाचे पोटात बोहोरी आळीतील गांगल टिनमेकर कडून टिन चा ट्रफ बनवून घेतला होता व त्यात खरे खुरे पाणी साठवून धरणातून पडते असे ते दृश्य केले होते. सरांनी त्याला भरपूर मदत क्र्ली होतीच. पण ट्रफ ची कल्पना माझी होती म्हणून सरांनी माझी पाठ थोपटली होती. शिवाय कागदाचा लगदा करून त्याच्याही काही काही वस्तू बनवल्या होत्या. तेव्हा जे केले ते शेवटचे पुन्हा त्या वाटेला जाईल अशी मला स्वत:लाही सुतराम शक्यता वाटली नव्हती.

पण पुढे त्याचे असे झाले मी डीप्लोमाला गणितासाठी नारायणपेठे तील देशपांडे सरांचा क्लास लावला होता. क्लासला मागिलबाजूने जिन्याने जावे लागे, त्याच्या पलिकडील वाडा मूर्तिकार गोखल्यांचा होता व जातायेता ते गणपती करतांना दिसायचे. एकेदिवशी हिय्या करून गेलो व मला शिकवाल का असे विचारले. त्यावेळी रंगकाम सुरू होते, आधी हे रंगकाम शिकायला या व नंतर पुढील वर्षी मातीकाम शिका असा सल्ला दिला व त्यानुसार आमच्र रंग काम सुरू झाले. एखादे वेळी एखाद्या गणपतीचे काम करीत असतांनाही ते दिसत असत तेव्हढेच ! पुढे क्लास सुटला व आमचे तेथे जाणेही बंद झाले !

असेच कुठलेसे एक मूर्तिचे प्रदर्शन पाहून आलॊ व मनात त्याचेच विचार घुटमळत होते त्याच तिरीमिरीत बाजारातून शाडू मातीचे पोतेच घेऊन आलो. (आजही घरात पडून आहे ! कधी मूड यॆईल सांगता थोडेच येणार ) नंतर ब्रिटीश कौन्सिल लायब्ररीतून संबधित पुस्तके आणली व माझा मीच अभ्यास सुरू केला. त्यावेळी बऱ्याच लहान मोठ्या मूर्ती घडत गेल्या. व व्यक्त व्हायचा अजून एक मार्ग मला सांपडला !

सोबत मी केलेल्या काही मूर्तींचे फोटॊ देत आहे.

ही तरूणी हातात पुजेचे साहित्य घेऊन निघाली आहे.  हा  statue  जे जे स्कूल ऑफ आर्टच्या दर्शनी प्रवेश दालनात आहे. मला त्याचा एक फोटॊ मिळाला होता त्यावरून केला.

वरील चारही फोटोज मी केलेल्या एकाच मूर्तीचे निरनिराळ्या कोनातील आहेत

वरील दोन्ही मूर्ती आता राहील्या नाहीत ! राहील्यात त्या आठवणी व फोटो.

वरील गणपती व हरताळिकांच्या मूर्ती ह्या आम्ही सध्याच्या सोसायटीत रहायला आल्या नंतर च्या वर्षी म्हणजे १९८६ च्या सुमारास बनवल्या होत्या. अख्ख्या सोसायटीतील महिलांनी त्या पुजिल्या होत्या, नंतर अर्थात त्यांचे विसर्जन केले. माझ्या कडॆ राहील्या त्या आठवणी व हे फोटो.

Advertisements
 1. 15/12/2009 येथे 11:12 pm

  नमस्कार,
  अप्रतिम मूर्ती आहेत.विशेष करून हरतालका फारच भावल्या.

  • 16/12/2009 येथे 1:51 pm

   मला वाटलेच होते ! काय वेणी आवडली का? लांबसडक वेणीची कोणीही दिसली की अजूनही मागे वळायला होते !!!
   अभिप्रायाबद्दल संतोष !

 2. 15/12/2009 येथे 11:47 pm

  नमस्कार काका, आपण मूर्ती कलेतही प्रवीण आहात तर मग. फ़ारच छान मूर्ती घडवल्यात. आरतीचे सामान घेतलेली मूर्ती त अप्रतिम.

 3. 16/12/2009 येथे 1:55 pm

  अक्षय,
  हो बाबा कधी काळी हे ही करायचो. घरात रिकाम टेकडे आजही बसवत नाही ना !!
  अभिप्रायाबद्दल आनंद वाटला.

 4. hemantjadhav
  16/12/2009 येथे 2:07 pm

  नमस्कार, तुम्ही बनवलेल्या मूर्ती फार सुरेख आहेत. तुम्ही एक उत्कृष्ट कलाकार आहात.

  • 16/12/2009 येथे 2:18 pm

   हेमंत,
   तुझ्या अभिप्रायाबद्दल संतोष॒ ! अशीच भेट देत रहा. ह्याच नावाने मी!ओर्कुट वर पण आहे. तिथेही फ्रेंड होता येईल.

 5. sahajach
  16/12/2009 येथे 2:27 pm

  मस्त काका एकदम सही!!!! तुम्ही आता तुमच्या पोतडीतून काय काय रत्न काढणार आहात!!! मलाच दम लागतोय…..
  I’m proud to be ur friend!!!!!
  आता आजीला सांगणार आहे नासिकला गेल्यावर की ती एक आळशी मी तिची नात दहा आळशी…नाहितर ती पण फार सुंदर चित्रे काढते, विणकाम शिवणकाम सगळेच सुरेख!!!! पण पुढे काही गती नाही!!!

 6. 16/12/2009 येथे 9:24 pm

  आज जरा शांततेने तुमचा ब्लॉग वाचला. अतिशय सुंदर कलाकृती पहायला मिळाल्या. लेख पण अप्रतीम आहेत. परिचय झाल्यामुळे आनंद झाला. इतरही लेख वाचुन काढतो.

  • 17/12/2009 येथे 7:11 सकाळी

   महेंद्रजी,
   आपले येथे स्वागत करतो.
   अभिप्रायाबद्दल मनापासून आनंद झाला. आधीच्या पोस्ट वरील आपले अभिप्राय वाचायला उत्सुक आहे.

 7. 17/12/2009 येथे 1:06 सकाळी

  ajoba nice murtis, will u teach me how to make them?…. ishaan !!!!!!!!!!!!!!!!!!!

  • 17/12/2009 येथे 7:08 सकाळी

   ईशान,
   अगदी जरूर रे. पण आत्ता पासून मातीशी खेळायला लाग ! तुमच्या कडॆ माती असते ना रे ? की जिकडे तिकडे वाळूच वाळू ?

   मातीचे भिजवून गोळे केलेस की आपोआप त्यातून आकार तयार करावयास लागशील… कारण आकारांचे तुझे खूप छान जमते व ते मी पाहीलेले आहे.

   मग बघ तुझी कल्पनाशक्ती तुला कुठे कुठे घेऊन जाईल.

   मला खात्री आहे पुढील पोस्ट मध्ये मला तुझी मातीची चित्रे पहायला मिळतीलच !

   • 20/12/2009 येथे 11:30 pm

    काय रे ईशान माती खेळायला मिळाली की नाही अजून ?

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: