मुखपृष्ठ > व्यक्ती परिचय > टिंबांचा गणपती !

टिंबांचा गणपती !

टिंबांचा गणपती

गेल्या ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात मी मुंबईला गेलो होते. तिथे माझे एक स्नेही आहेत, पाटील त्यांचे नाव. ते रहातात बोरीवली मध्ये. ते स्वत: सेवानिवृत्त आहेत, पण गेली अनेक वर्षे !  कित्येकांची पोर्ट्रेटस आज पर्यंत त्यांनी  केलीत . त्यांनी संस्कार भारतीचे वर्गात यायला सुरुवात केली. मी मुंबईला गेलो की ह्या वर्गांना आवर्जून जातो. तेथेच ह्या पाटीलांची गाठ पडली व त्याचे रुपांतर घट्ट मैत्रीत झाले. त्यांनी अनेकदा मला सांगीतले होते की त्यांचे एक स्नेही आहेत, त्यांचे नाव श्रीयुत प्रसाद काणे. गेली कित्येक वर्षे ते टिंबांनी गणपती रंगवतात व त्यांचे टिंबांचे गणपती बरेच प्रसिध्द आहेत व बरेचसे विकलेही जातात.
 
हे गणपतीचे एक रूप
अजून एक मनोहारी रूप

इथे जरा टिंबांकडॆ निरखून पहा !

रंगाची करामत पहा

किती सुंदर नाही का?

 
श्रीयुत प्रसाद काणे हे व्यवसायाने कमर्शिअल आर्टीस्ट. गेली कित्येक वर्षे चांगल्या चांगल्या व्यवसायिक कंपनी बरोबर त्यांनी काम केले. पण एकूण कॉम्प्युटरच्या प्रसाराने हाताने आर्टवर्क करणाऱ्यांच्या जमान्यातील ती मजा नष्ट होत गेली. आता त्यांनी सेवानिवृत्ती पत्कारली, पण त्या आधीच त्यांना नव्या युगाची चाहूल लागली होती व जे काम कॉम्प्युटरला जमणार नाही असा मार्ग शोधण्याची त्यांची जाणीवपूर्वक प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू झाली, कारण ती त्यांची गरजही होतीच.
गरज ही शोधांची जननी असते हे त्यांचे बाबतीत खरे ठरले व त्यांना ह्या टिंबांचा अचानक शोध लागला. एके दिवशी ते त्यांच्या  ऑफीसचे आर्टीस्टिक  काम चालू असतांना त्यांचे हातातील ब्रश मधून रंगाचा एक ठिपका कागदावर पडला ! त्यावेळी ह्या गोष्टीचे गांभिर्य त्यांना समजले नाही. कालांतराने त्या ठिपक्या कडे जेव्हा ल्क्ष गेले तेव्हा एक गोष्ट त्यांचे लक्षात आली व ती म्हणजे ह्या ठिपक्याला वाळल्या नंतर एक प्रकारचा उंचवटा निर्माण झाला होता व उजेडाच्या परिणामाने एक प्रकारचे वेगळेपण त्याला प्राप्त झाले. झालं त्यानंतर श्रीयुत प्रसाद काणे ह्यांचे त्यावर निरनिराळे प्रयोग सुरू झाले व त्यामुळे निर्माण झालेया टेक्श्चरचा त्यांनी उपयोग करून घेऊन एक अगदी वेगळ्या प्रकारची शैली निर्माण केली. त्यानंतर मग ह्या शैलीत त्यांच्या कलाकृती निर्माण होऊ लागल्या ! पुन्हा त्यावर अनेक प्रयोग करीत त्यात वैविधता आणण्याचा प्रयत्न नेटाने चालूच राहीला.

अश्या कलाकाराला माझॆ वंदन !
मला हा प्रकार अगदि नवीनच होता. शिवाय मी त्याची कल्पना ही करू शकलेलो नव्हतो ! तेव्हा ह्यावेळी त्यांची गाठ घ्यायचीच असे मी मनोमनी ठरवले व पाटीलांना गळ घातली ! त्यांनीही तत्परतेने भेटीचा ठरविला व एका दुपारी आम्ही दोघे चौथ्या मजल्यावरील श्रीयुत प्रसाद काणे ह्यांचे घरी जाऊन पोचलो. थोडीशी एकमेकांची ओळख व जुजबी गप्पा होऊन श्री काणेंनी  आतल्या खोलीत नेत त्यांचा खजिना दाखवायला सुरूवात केली

हे आहेत श्री.प्रसाद काणे

मला जो खजिना मिळाला होता तो आपणापुढे रिता केलेला आहे !

Advertisements
प्रवर्ग: व्यक्ती परिचय टॅगस्
 1. sahajach
  04/12/2009 येथे 3:30 pm

  फारच सुंदर गणपती आहेत काका…..श्री.प्रसाद काणे यांचे अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा…..
  आणि आभार तुमचेही की तुम्ही आमची त्यांच्याशी आणि त्यांच्या कलेशी ओळख करून दिलीत!!!!

  • 04/12/2009 येथे 4:42 pm

   तन्वी, आभार प्रतिक्रियेबद्दल !

 2. 04/12/2009 येथे 6:44 pm

  गणपती कुठल्याही मटेरीअल मध्ये बनवला तरी सुंदर दिसतो
  पण त्यासाठी लागते श्रद्धा आणि निस्सीम भक्ती
  बाप्पावर पण आणि कलेवरपण…
  सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,
  कलाकाराचे आणि तुमचेही काका

  • 04/12/2009 येथे 9:45 pm

   अखिलजी तुम्ही म्हणता ते खरं आहे … श्रध्दा व भक्ती हीच खरी द्विसुक्ती आहे. अभिप्राया बद्दल धन्यवाद .

 3. 06/12/2009 येथे 2:00 सकाळी

  नमस्कार ,
  फ़ार छान कलाकॄती आहे. श्री.प्रसाद काणे यांचे अभिंनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्या.
  या लेखाबद्दल आपलेही धन्यवाद.

 4. 17/12/2009 येथे 9:35 सकाळी

  गणपतीची चित्रं तितकीशी खास वाटली नाहीत. अगदी बाळबोध वाटतात. पण कला म्हणुन पाहिलं तर ठिक आहेत. स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे, पब्लिश केली नाहीत तरीही हरकत नाही..

 5. सुरेश पेठे
  17/12/2009 येथे 2:48 pm

  महेंद्रजी,
  आपल्या स्पष्ट प्रतिक्रियेचंही स्वागत आहे, उलट स्पष्ट प्रतिक्रियेतून गोष्टी अधिक स्पष्ट होतात !

  मी ही पोस्ट देण्यामागील उद्देश सेवानिवृत्तीनंतरही श्री. काणें सारखा माणूस एखादी गोष्ट जिद्दीने करतॊ त्या वृत्तीला ही दाद आहे.

  मूळ गणपतींची चित्रे पुर्वीच कोणी कोणी काढलेली आहेत. ठीपक्यांनी ती सुशोभित करायला योग्य वाटलीत म्हणून त्यांनी ती चित्रे स्वत:च्या फॉर्म साठी वापरलीत इतकेच. ( आणि गणपतीची चित्रे विक्रीलाही तशी योग्य समजली जातात हा त्यामागील त्यांच फायदेशीर विचार असेलच. )

  आपण जसे एखाद्या भरतकामातील सौंदर्य त्यातील टांक्यांचा व रेशीम रंगाचा झालेला वापर ह्यावरून जास्त ठरवतो , तसेच इथे आहे. ठरावीक उंचीचे ( उठावाचे ) रंगांचे ठीपके व त्याची मांडणी हे ह्या चित्रांचे वैशिष्ठ्य आहे, आणि ते कला म्हणून आपणांसही ठीक वाटते आहेच.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: