Archive

Archive for 04/12/2009

टिंबांचा गणपती !

04/12/2009 7 comments

टिंबांचा गणपती

गेल्या ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात मी मुंबईला गेलो होते. तिथे माझे एक स्नेही आहेत, पाटील त्यांचे नाव. ते रहातात बोरीवली मध्ये. ते स्वत: सेवानिवृत्त आहेत, पण गेली अनेक वर्षे !  कित्येकांची पोर्ट्रेटस आज पर्यंत त्यांनी  केलीत . त्यांनी संस्कार भारतीचे वर्गात यायला सुरुवात केली. मी मुंबईला गेलो की ह्या वर्गांना आवर्जून जातो. तेथेच ह्या पाटीलांची गाठ पडली व त्याचे रुपांतर घट्ट मैत्रीत झाले. त्यांनी अनेकदा मला सांगीतले होते की त्यांचे एक स्नेही आहेत, त्यांचे नाव श्रीयुत प्रसाद काणे. गेली कित्येक वर्षे ते टिंबांनी गणपती रंगवतात व त्यांचे टिंबांचे गणपती बरेच प्रसिध्द आहेत व बरेचसे विकलेही जातात.
 
हे गणपतीचे एक रूप
अजून एक मनोहारी रूप

इथे जरा टिंबांकडॆ निरखून पहा !

रंगाची करामत पहा

किती सुंदर नाही का?

 
श्रीयुत प्रसाद काणे हे व्यवसायाने कमर्शिअल आर्टीस्ट. गेली कित्येक वर्षे चांगल्या चांगल्या व्यवसायिक कंपनी बरोबर त्यांनी काम केले. पण एकूण कॉम्प्युटरच्या प्रसाराने हाताने आर्टवर्क करणाऱ्यांच्या जमान्यातील ती मजा नष्ट होत गेली. आता त्यांनी सेवानिवृत्ती पत्कारली, पण त्या आधीच त्यांना नव्या युगाची चाहूल लागली होती व जे काम कॉम्प्युटरला जमणार नाही असा मार्ग शोधण्याची त्यांची जाणीवपूर्वक प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू झाली, कारण ती त्यांची गरजही होतीच.
गरज ही शोधांची जननी असते हे त्यांचे बाबतीत खरे ठरले व त्यांना ह्या टिंबांचा अचानक शोध लागला. एके दिवशी ते त्यांच्या  ऑफीसचे आर्टीस्टिक  काम चालू असतांना त्यांचे हातातील ब्रश मधून रंगाचा एक ठिपका कागदावर पडला ! त्यावेळी ह्या गोष्टीचे गांभिर्य त्यांना समजले नाही. कालांतराने त्या ठिपक्या कडे जेव्हा ल्क्ष गेले तेव्हा एक गोष्ट त्यांचे लक्षात आली व ती म्हणजे ह्या ठिपक्याला वाळल्या नंतर एक प्रकारचा उंचवटा निर्माण झाला होता व उजेडाच्या परिणामाने एक प्रकारचे वेगळेपण त्याला प्राप्त झाले. झालं त्यानंतर श्रीयुत प्रसाद काणे ह्यांचे त्यावर निरनिराळे प्रयोग सुरू झाले व त्यामुळे निर्माण झालेया टेक्श्चरचा त्यांनी उपयोग करून घेऊन एक अगदी वेगळ्या प्रकारची शैली निर्माण केली. त्यानंतर मग ह्या शैलीत त्यांच्या कलाकृती निर्माण होऊ लागल्या ! पुन्हा त्यावर अनेक प्रयोग करीत त्यात वैविधता आणण्याचा प्रयत्न नेटाने चालूच राहीला.

अश्या कलाकाराला माझॆ वंदन !
मला हा प्रकार अगदि नवीनच होता. शिवाय मी त्याची कल्पना ही करू शकलेलो नव्हतो ! तेव्हा ह्यावेळी त्यांची गाठ घ्यायचीच असे मी मनोमनी ठरवले व पाटीलांना गळ घातली ! त्यांनीही तत्परतेने भेटीचा ठरविला व एका दुपारी आम्ही दोघे चौथ्या मजल्यावरील श्रीयुत प्रसाद काणे ह्यांचे घरी जाऊन पोचलो. थोडीशी एकमेकांची ओळख व जुजबी गप्पा होऊन श्री काणेंनी  आतल्या खोलीत नेत त्यांचा खजिना दाखवायला सुरूवात केली

हे आहेत श्री.प्रसाद काणे

मला जो खजिना मिळाला होता तो आपणापुढे रिता केलेला आहे !

प्रवर्ग: व्यक्ती परिचय टॅगस्