मुखपृष्ठ > माझे छंद > माझ्या रांगोळ्या

माझ्या रांगोळ्या

रांगॊळी बाबत मला कुठलाही पूर्व अनुभव नव्हता. मला माझ्या वयाच्या मैत्रिणीं बरोबर कधीही वावरता आलेले नाही ! त्या मुळॆ रांगॊळी ह्या त्यांच्या विशेष प्रांतात मला कधीच डोकावता आलेले नाही ! माझी आई व ’मोठ्ठी’ बहीण ( माझा पहिला भाचा माझ्याहून चार वर्षांनी मोठा होता ! ) ह्यांना पण कधी रांगोळ्या काढतांना पाहीलेले  नाही. त्यामुळॆ माझी ती भूक राहूनच गेली.
मी १९५८ साली नाशिकच्या पेठे विद्यालयातून अकरावी एस.एस.सी. पास झालॊ. मी पुढे काय करायचे ह्यावर घरात खूप चर्चा चालत असे. माझ्या मनात मुंबईला जे.जे. मध्ये चित्रकलेचा डिप्लोमा करावा अशी खूप इच्छा होती. पण शेवटी हो ना करत मी पुण्याला सिव्हिल इंजीनीयरींग डिप्लोमाला प्रवेश घेतला ! पण मूळ आवड काही जाईना ! चित्रकलेची प्रदर्शने पहाणे एव्हढेच तेव्हा शक्य होते. शिवाय शाळेत माझे चित्रकला शिक्षक डोंगरे सर ह्यांनी काय पाठ गिरवून घेतले होते ती एक शिदोरी जवळ होती ! तेव्हा रांगोळीची प्रदर्शने गोखले हॉल कींवा टिळक स्मारक मध्ये नेहमी होत असत ! मी ती अर्थातच पहायला चुकवित नसे.
आता त्याला पंचेचाळीस – पन्नास वर्षे लोटलीत अश्याच एका प्रदर्शनाचे वेळी थोडे आधी मी तेथे पोहोचलो. उदघाटनाला अवकाश होता. चित्रकार मंडळी रांगॊळी चित्रांवर अखेरचा हात मारीत होती. मी ते पहात राहीलो. थोडावेळ तेथेच घुटमळत राहीलो. आता मला नक्की आठवत नाही पण नाही तो काटेच होता. माझ्याहून थोडा अधिक वयाचा असावा. मी त्याला गाठलेच. त्याचे काम संपलेले होते म्हणून तो गप्पांच्या मूड मध्ये होता. वेळही होता. आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. अधून मधून इतरांना ही मदतीचा हात देत होता. आणखी काही जणांच्या ओळखी करून दिल्यात. तो नंतर एकदा माझ्य रूमवर पण आला. माझी काही चित्रे त्यानी पाहीलीत. त्याकाळात तो माझा चांगला मित्र बनला होता. पुढे माझी बदली झाली. माझ्या अनेक गोष्टी बंद झाल्यात त्यात रांगॊळीही बंद झाली, तशी आमची मैत्रीही संपुष्टात आली. आता तो कुठे असतो चौकशी करायला पाहीजे !
काटे मुळे माझा ह्या ग्रुप मधे शिरकाव झाला. त्या ग्रुप मध्ये एक सर्वात लहान शाळकरी मुलगा होता ! कॊण असेल? सध्याचा प्रसिध्द चित्रकार व लेखक श्री सुहास बहुलकर ! त्या वयात सुध्दा त्याची चित्रकलेची समज अव्वल होती. रांगॊळी तर अप्रतीम असायचीच व तो आमच्या ग्रुप चा बाल हीरॊ होता. आता तो खूप मोठ्ठा चित्रकार झालेला आहे. अजून माझी त्याची गांठ पडलेली नाही पण पुन्हा ओळख व्हायला हा दुवा चांगला उपयोगी पडेल. ह्या ग्रुप बरोबर मी अनेक प्रदर्शनातून भाग घेतलेला होता. त्यातील काहींचे फोटो व वर्तमान पत्रात आलेली कात्रणे व ढिग भर आठवणी ह्यांची मला आता सोबत आहे !

हे एका नर्तकीचे रांगोळीतले चित्र आहे.

हे आहेत महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राहीलेले मुख्यमंत्री वसंतराव नाईक

ह्या रांगोळीची एक कहाणी आहे. माझी त्यावेळी जयपूर येथे बदली झालेली होती. तेथील महाराष्ट्र मंडळाचा कसलासा कार्यक्रम होता व त्या कर्यक्रमास स्वत: वसंतराव नाईक हजर रहाणार होते. मला रांगोळी येते म्हटल्यावर ते काम माझ्यावर सोपवले गेले. मी जवळ जवळ दोन-अडीच तास खपून ही रांगोळी काढली. सगळ्यांनी माझे कौतुक केले. मुख्यमंत्री यायला अर्धा तास होता … पण…..माझी मोठी मुलगी अमिता, असेल दिड दोन वर्षांची ….आई तिला घेऊन मागून आली व काही क्षणांचे दुर्लक्ष … ती जी दुड दुड धावत आली ती सरळ रांगोळीवरूनच !…सगळ्य़ा मेहनती वर पाणी फिरले ! लगेचच ती फरफटली गेलेली रांगोळी झाडून पुसून टाकावी लागली. ….फक्त त्याआधी मी फोटॊ काढून ठेवलेला होता. तेव्हढाच पुरावा राहीला.
महर्षि धोंडो केशव कर्वे
छत्रपती शिवाजी महाराज
ही रांगोळी प्रसिध्द चित्रकार दिनानाथ दलाल ह्यांचे चित्रा वरून आमच्या कॉलेजच्या गॅदरींग ला काढली होती.
चित्रपट महर्षि व्ही. शांताराम

अशी आहे आमच्या रांगोळीची चित्तरकथा

प्रवर्ग: माझे छंद टॅगस्
 1. 14/12/2009 येथे 1:58 सकाळी

  नमस्कार काकां ,
  आपण तर रांगोळीही फ़ार छान काढता. आपल्या जवळ त कलेचा खजिनाच आहे की. असेच खजिने उघडत जा.

  • 14/12/2009 येथे 5:27 सकाळी

   अक्षय,
   अभिप्राय वाचून आनंद झाला. मलाही कधी कधी आश्चर्य वाटते , पण अलिक्डे विषाद सुध्दा वाटतो, कारण हे त्या त्या काळी होऊन गेले, पुढे टिकले नाही, राहील्यात त्या त्याच्या आठवणी

 2. sahajach
  14/12/2009 येथे 4:13 pm

  काका फारच सुरेख आहेत रांगोळ्या….किती कला आहेत तुमच्याकडे आणि दांडगा उत्साहही!!!!!
  आता तर मला कधी तुम्हाला भेटु आणि बाकी सगळी चित्रे आणि संग्रह पाहू असे होतेय!!!!

 3. 14/12/2009 येथे 4:40 pm

  काका या बातम्यांच्या कात्रणांमधे प्रवेश फी १० पैसे वाचून मजा वाटली….तेव्हढ्याश्या फीमधे केव्हढा खजिना होता तेव्हा आता लोकांकडे महामोर पैसा आहे पण कलेसाठी वेळ नाही!!!!!

 4. 14/12/2009 येथे 7:14 pm

  तन्वी,
  थॅंक्स ! अगं इतक्यातंच कसं संपेल ? ही तर सुरूवात आहे . अजून तर बरेच छंद दाखवायच्येत इथे. तेव्हा तू म्हण्त्येस तसा उत्साह होता खरा . आणि जाऊ तेथे हात घालूच अशी वृत्ती होती. निराश वगैरे होऊन म्हणत नाही पण आता आमचा उलटा प्रवास सुरू झालेला ! काय किडूकमिडूक जमवलंय ते इथे उधळायचं व रित्या हाताने पण भरल्या मनाने पोबारा करायचा एव्हढेच उद्दिष्ट !!

  दहा पैसे प्रवेश फी सुध्दा तेव्हा खूप वाटायची. आम्ही चार आणे केली होती पण परत दहा पैशावर आणावी लागली होती !

  त्यावेळी माझा पहिला पगार होता रु. १८०/- बेसिक ! प्रॉव्हीडंट फंड जाऊन बाकी हातात पडायचे. परवा शेजारील मल्टीप्लेक्स का काय म्हणतात तेथे सिनेमाला ( कित्येक वर्षांनी जांवई घेऊन गेले होते. ) गेलो होतो. तिकिट केव्हढ्याचे ? रु १७५/- फक्त !

 5. 15/12/2009 येथे 11:32 pm

  नमस्कार काका,
  खूपच छान आहेत रांगोळ्या. माझ्या हातात काही जन्मजात चित्रकला नाही. प्रत्येकाचा भाव वेगळा, मूड वेगळा कलाकाराचे मन त्यांच्या कलाकृतीतून दिसते. रांगोळीत सुद्धा व्यक्तिरेखा जिवंत आपण केल्यात. मी फक्त एक रसिक, आवडल्याची पोच पावती आपल्याला देणे म्हणजे……जरा अवघडच वाटते. पण आवर्जून धन्यवाद आपणाला छान खजिना आपण आमच्या करता
  आणलात. आणि हो तन्वी ला पण विशेष आभार कळवा, तिच्यामुळे आपण आम्हाला हा खजिना मुक्त हस्ताने देत आहात. तुमच्या इथे तन्वी नक्कीच आहे म्हणून माझा हा छोटासा निरोप द्या.

 6. 16/12/2009 येथे 9:27 pm

  खुपच सुंदर आहेत रांगोळ्या. बराच वेळ आणि महेनत दिसुन येते. धोंडो केशव कर्वे यांची रांगोळी विशेष आवडली. अर्थात सगळ्याच सुंदर आहेत, तरी पण सगळ्यात जास्त म्हणुन ती आवडली..

 7. sucheta apte
  19/12/2009 येथे 10:26 pm

  apratiiiim aahet saglyach rangolya. shicaji maharaj tar khoopach chaan aahet.agdi tumhi sketch kelay asach vattay.mhanje kharach khoop avarnaniya aahe sare.

  • सुरेश पेठे
   19/12/2009 येथे 10:28 pm

   आभारी आहे सुचेता !

 8. SANGEETA
  23/12/2009 येथे 2:32 pm

  VERY NICE RANGOL HOW WE LEARN RANGOLI, PLEASE GUIDE……

  • 23/12/2009 येथे 3:14 pm

   संगिता,
   अभिप्रायाबद्दल आभार.
   रांगोळ्या अनेक प्रकाराने काढल्या जातात, त्यातील हा एक प्रकार. वेलबुट्टी, डीझाईन ज्या दिवाळीत दारापुढे काढतात तोही प्रकार आहे.
   sureshpethe@gmail.com
   वर मेल करू शकतेस.

 1. 02/01/2011 येथे 4:15 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: