टॉम अल्टर

टॉम अल्टर हे नाव परिचयाचे नाही अशी व्यक्ती विरळा ! हो ना ? त्यांचा तो रुबाबदार,रेखीव व गोरापान चेहरा आणि तितकाच कसदार अभिनय पाहिल्यावर हिन्दी चित्रपटातील गोऱ्या माणसाची भूमिका टॉम अल्टर शिवाय कोणी करू शकेल ह्या वर माझा तरी विश्वास बसणे अशक्य आहे !
मला दिनांक २१ फेब्रुवारी २००९ हा दिवस एका वेगळ्या कारणा साठी स्मरणात पक्का ठसला आहे. रोजच सकाळी फिरायला जाणे आणि बरोबर स्केच बुक ठेवणे हा माझा नित्याचाच परिपाठ आहे. त्या दिवशी मी पुण्यातील ताथवडे उद्यानात गेलेलो होतो. दोन फेऱ्या मारून झाल्या. एका बाकावर एक वृध्द व्यक्ती, हातात काठी, अतिशय थकलेला चेहरा, बसलेली पाहीली. बहुदा ती एखादी रिटायर्ड मिलिटरी ऑफीसर असावी असे वाटले. तेव्हाच हा चेहरा आपण कोठेतरी पाहीलेला आहे असा मनात विचार येत पुढील फेरीला सुरुवात केली. मी स्वत: मिलिटरी इंजीनियरींग मधून रिटायर्ड झालेलो असल्याने ती व्यकी कोठे पाहीली असेल हा विचार डोक्यात घोळत होता.
तिसऱ्य़ा फेरीला मी त्या व्यक्ति कडे निरखून पाहीले व ओळखले अरे हे तर आपले टॉम अल्टर वाटत आहेत. तेव्ह्ढ्यात ते उठले मोठ्या मुष्कीलीने काठी टेकत चालू लागले. दोन व्यक्तींनी मला पुढे जाण्या साठी क्षणभर अडवले होते. मग मी इकडे तिकडे पाहू लागलो. एक छोटे युनिट, कॅमेरामन, स्त्री दिग्दर्शका, ६ इतर शुटींग मधे कार्यरत दिसले व मग लक्षात आले की येथे सिनेमाचे शुटींग चालू आहे.मग मात्र मी वॉकींग स्ट्रीप सोडून शुटींग युनिटच्याकडे वळलो. तिथे एक पॉन्ड आहे व त्यावर एक अगदि छोटा पूल आहे.
 एक व्यक्ती पाण्यात पहात असते, कुठुनशी एखादी वस्तू पाण्यात पडते त्याबरोबर पाण्याचे शिंतोडे वर उडतात व तितक्याच तत्परतेने शिंतोड्यांच्या वेगात ही व्यक्ती आश्चर्याने वर पहातेशॉट इथेच संपतो.
किती छोटासा शॉट ! …… पण सतरा वेळा रिटेक झाले. कधी दगडच आधी पाण्यात पडायचा तर कधी शिंतॊडे उडून गेल्यावर मान वर व्हायची दिग्दर्शिका शॉटवर समाधानी नव्हत्या आणि पॅक अप करण्याचा विचार चालू झाला होतातेव्हढ्यात अल्टर साहेब स्वत: तेथे येऊन त्यांनी ती क्लीप रिवाईंड करून बघीतली व टाईमींगचा अंदाज घेत परत पुलावर गेला व पुन्हा शॉट घेण्याचा इषाराही केला. पुन्हा सगळे सोपस्कार झालेपण हा शॉट मात्र ओके झाला होता. सगळ्याच्या चेहेऱ्य़ावर समाधान होते. मी हे सर्व अठरा शॉटस कॉम्प्युटर वर अगदि जवळून पहात होतो व एखादा शॉट ओकेहोतो म्हणजे काय / कसा ह्याचा वस्तुपाठ मला मिळून गेला. आपण चित्रपट पहातो तेव्हा असे हज्जारॊ शॉट्स एकत्र जोडलेले आपल्या लक्षात सुध्दा येत नाहीत ….मग त्यामागिल ह्या सर्वांची मेहनत कशी कळून येणार? मध्ये ब्रेक होता ! अल्टर साहेब येऊन त्या घोळक्यात सामील झाले.

माझे स्केचबुक दाखवीत मी अल्टर साहेबांना भेटलो व मला दहाच मिनिटॆ द्याल का अशी विनंती केली. माझे स्केचबुक व माझ्या कडे बघत किंचित हंसले. मी त्यालाच संमती समजत माझी पेन्सिल सरसावत त्यांचे कडे कटाक्ष टाकला. क्षणात पोज घेत ते बसले व मी स्केचिंगला सुरूवात केली.

हे ते मी काढलेले पोर्ट्रेट

पोर्ट्रेट हातात घेऊन सर्वांना दाखवित दिलेली पोज

शेवटी स्वत: शेजारी बसवून घेऊन फोटो काढून घ्यायची माझी हौस पण भागवली !!

पण हे सर्व कही इतके सोपे नव्हते. त्या ब्रेक मधे अनेक जवळ येत पुढल्या शॉट बद्दल चर्चा , भेटीला आलेले असा सतत राबता त्या दहा मिनीटातच सुरूच होता. तरीही नेटाने मी पोर्ट्रेट पूर्ण केले व टॉम साहेबांना दाखवले. ते बघत ते खुष झाले मला शेजारी बसवून घेतले. एक महान कलाकार माझ्या सारख्याची आस्थेवाईक पणे चौकशी करीत होता ! सारे युनिट ते पहात होते. चित्रावर सही द्याना म्हटल्यावर क्षणात माझ्या खिशातील पेन काढून घेत सही करून दिली. त्यांच्या बरोबर फोटॊ काढून घ्यायची माझी विनंतीपण तात्काळ मान्य करीत हव्या तश्या पोजेस दिल्यात आणि क्षणाचाही विलंब न लावता पुढील शॉट साठी स्वारी निघाली !

सर्व काही वीस मिनीटात संपले सुध्दा !!

 

 

Advertisements
 1. sahajach
  01/12/2009 येथे 3:31 pm

  काका मस्त…..मजा येणार आहे तुमचा ब्लॉग वाचायला आणि पहायलाही!!!

  • सुरेश पेठे
   01/12/2009 येथे 4:14 pm

   तन्वी आभारी आहे मला ह्या नव्या दुनियेत आणलेस !

 2. 02/12/2009 येथे 3:13 pm

  Sir Nice art-work, I am also an artist working at nifty creations. Sir can you please tell hoe to right here in the blog in Marathi , Actually I am using word-press blog first time.

  • 03/12/2009 येथे 11:08 pm

   शैलेशजी , अभिप्रायाबद्दल आभार. तुम्ही मराठी साठी http://www.baraha.com ह्या साईट वरून barahadirect डाऊन लोड करून मराठीत टाईप करू शकता.

 3. vasant
  02/12/2009 येथे 6:21 pm

  Pethe kaka Kamal kelit
  Pharach upkram chhan aahe
  Maja nakki yenar
  blog niymit pahanyacha praytna karen

  • 03/12/2009 येथे 11:15 pm

   वसंतजी,
   प्रतिक्रियेबद्दल आभार.

 4. 20/12/2009 येथे 9:40 सकाळी

  सुंदर काढलंय पोर्ट्रेट. आणि फक्त २० मिनिटात म्हणजे खरंच छान आहे.. 🙂

  • सुरेश पेठे
   20/12/2009 येथे 2:47 pm

   वीस नाही महेंद्रजी, दहाच, पण कसे असते मनातून तीव्र ईच्छा असेल ना तर मन सगळ्यांवर कबजा मिळवू शकते! आणि आम्ही हातांनी वा तोंडांनी (गाणाऱ्याबाबत बोलतोय) काहीच करीत नसतो. चित्र आमचे मन करून ठेवतॆ, आमचे हात तर हुकुमांची ताबिली करीत असते.

   एरव्ही आम्ही करीत असतो तो रियाझ !

   • 20/12/2009 येथे 7:55 pm

    सुरेशजी
    तुम्हाला या क्षेत्रात गती आहे म्हणुन सांगतो, ही साईट बघा.. http://www.imfpa.co.in/ आपल्याइथे मुंबईचीच आहे. अंधेरीला त्यांचं ऑफिस आहे. खरं तर मी यावर एक पोस्ट लिहिणार होतो, पण आपण लिहिल्यास वाचायला आवडेल..

 5. सुरेश पेठे
  20/12/2009 येथे 10:14 pm

  महेंद्रजी,
  ही साईट बघतो. तसेही पुर्वी त्याची ग्रीटींग कार्डस मी घेत असे.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: