मुखपृष्ठ > वर्णन > असे आहे आमचे हनुमान ज्येष्ठ मित्र मंडळ

असे आहे आमचे हनुमान ज्येष्ठ मित्र मंडळ

   

असे आहे  आमचे हनुमान ज्येष्ठ मित्र मंडळ

 

बजरंग बली कि जय !!

 

रोज सकाळी माझे स्केच बुक काखोटीला मारून हिंडायला जाण्याचा माझा शिरस्ता आहे. आम्ही १५ ते १६ ज्येष्ठ नागरिक एम.आय.टी. कॉलेज मधील हनुमानाच्या देवळाच्या पुढील बाकड्यांवर रोज सकाळी .३० ला जमतो. येथे येणारे साधारणत: साठी उलटलेले पासून ते नव्वदी कडॆ झुकलेल्यां पर्यंतच्या वयाचे असतात. त्यात ठिकठिकाणाहून सेवानिवृत्त झालेले असल्याने गप्पामध्ये , अनुभवात विविधता असते. मी मात्र श्रवणाचे काम करीत असतो ! आमच्यातलेच एक , त्यांनी आता डॉक्टरीपेशा सोडून गायनाचा क्लास लावलेला असल्याने हे व्यासपीठ गायना साठीही वापरले जाते ! मग त्यांचे बरॊबर इतर काही जण आपलाही घसा साफ करून घेतात !  

  

आठ वाजले की सगळ्यांनाच निघायची घाई होते ! मग सारे हनुमानाच्या समोर जमतात व भीमरूपी स्तोत्र सर्व जण तारस्वरात म्हणून हनुमानाला प्रार्थना अदा करतात.

 

 
 
 
 येथून आमचा जथा हलत डुलत अण्णा कडे येतो.
 
 
 

  

निघालेत अण्णाकडे !

   

 इथेही मनसोक्त गप्पा चालूच असतात. अण्णा कडे मग चहाची फैर झडते ! अण्णा ला माहीत असते तो त्या ज्येष्ठा कडे जातो त्याने मागितले की मुकाट्याने अण्णाचे चहाचे बिल भरले जाते ! त्या नंतर आम्ही गप्पा हाणीतच आपापले घरी जातॊ.    

त्यामुळे असा हा  सकाळचा रम्य वेळ चुकवायचा म्हणजे तर माझ्या जीवावर येते ! माझा ह्या घोळक्यातील उद्योग वेगळाच असतो मी ह्या साऱ्यांना माझ्या स्केच बुकात बंदिस्त करीत सुटतो तेही निमुटपणे माझ्या स्केचिंगची शिकार व्हायला एका पायांवर तयार असतात !    

ही आहेत मी तेथे काढलेली स्केचेस !   

   

   

   

   

   

   

   

ही आहेत आमची सर्व मंडळी

   

असे आहे आमचे हनुमान ज्येष्ठ मित्र मंडळ !    

.   

Advertisements
 1. 07/12/2009 येथे 11:02 सकाळी

  काका कधी कधी वाटते तुमची भेट होणे हा माझा भाग्ययोग आहे…..
  येव्हढ्या खिलाडूवृत्तीने तुम्ही सगळे आयुष्याची संध्याकाळ उपभोगत आहात की अनेकांसाठी प्रेरणा ठरावी…..जियो!!!!!!
  तुम्हालाच नाही तर या हनुमान मंडळातल्या प्रत्येकाला सलाम!!!!!

  • सुरेश पेठे
   07/12/2009 येथे 12:23 pm

   तन्वी,
   आभार मानू का नको समजत नाही ! पण आता सारे व्यवस्थित झालेले दिसतंय. माझा काय गोंधळ झाला होता ?

 2. Vaibhav Shirke
  18/12/2009 येथे 1:33 सकाळी

  Sir,
  My Best Wishes to u and Hanuman Jeshta Mandal
  Good work and good Article
  We learn a lot from u
  I like to meet u

  • 18/12/2009 येथे 6:47 सकाळी

   वैभव,
   या ब्लॉगवर तुझे स्वागत !
   आता असेच वारंवार येऊन येथे तर भेटत रहा. मला मेल कर, आपण लवकरच प्रत्यक्ष पण भेटू.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: