मुखपृष्ठ > प्राथमिक > येss रे मना येरेss मना !

येss रे मना येरेss मना !

ही श्रीं चीच इच्छा असावी !

गेले कित्येक दिवस मी एका अनामिक अस्वस्थतेत होतो. काहीतरी करायचे आहे आपल्याला पण सुचत तर काहीच नव्हते. गेले वर्षभर मी ऑर्कुट वरील माझ्या प्रोफाईल वर रोज एक नवे चित्र टाकीत आलो. खूप जणांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली. हा माझा संकल्प आता ह्या डिसेंबर अखेर पुर्ण होणार …
ही त्याची लिन्क
पण आता पुढे काय ? ह्या विचाराने अलिकडे मला कही रात्रींनी जागवत ही ठेवले. काहीतरी वेगळे करावे ही इच्छा स्वस्थ बसू देईना.
मागे अश्याच एकावेळी एका मैत्रीणीने माझ्या कवितां साठी ब्लॉग विश्व उघडून दिले. काही दिवस त्यावर कविता टाकीत राहीलो. हाच तो माझ्या कवितांचा ब्लॉग. अजून सुचतील तश्या फक्त माझ्या स्वत:च्याच कविता येथे वाचायला मिळतील.
पुढॆ अश्याच एका मैत्रीणीने माझ्या चित्रांवर चर्चा आरंभली तेव्हा स्केचिंग संबधी माहीती व चर्चा करण्या साठी अजून एक ब्लॉग तयार झाला !हाच तो ब्लॉग. तेथेही स्केचिंग बाबत काही काही व माझी काही स्केचेस टाकणार आहेच. ही पण चर्चा राहू दे चालू अशीच !
आताही मला अशीच एक मैत्रीण भेटलीय नेटवर ! ( माझ्या ह्या योगाचा तुम्हालाच कां मलाही हेवा वाटतोय !! ) तन्वी,( माझ्या बाल मैत्रीणी ची नात ! ) ती माझ्या चित्रांच्या प्रेमात तर मी तिच्या ब्लॉगचे प्रेमात ! ( प्रेमांचे असेच नेहमी त्रांगडॆ असते का ? ). काय सुंदर ब्लॉग्स लिहीते की यंव! … आणि मग मात्र मला माझा पुढील रस्ता साफ दिसू लागला. हा नवीन ब्लॉग हे त्याचेच फळ !
ह्या ब्लॉगचे नाव आहे …’ येss रे मना येरेss मना ! ’  इथे आता माझ्यावर माझ्या मनाचेच राज्य चालणार ! जे जे मनात येणार ते ते इथे येणार…नो आडपडदा !.. नो वेळ काळाचे बंधन….मग त्यात कधी कुठल्या आठवणी,… कधी एखादी सुचलेली वा आवडलेली कविता… एखादे चित्र माझे वा कुणाचेही असेल….काय वाट्टॆल ते ह्यात असेल !… मी मनाला आडवणार नाही….चुकून कुणाचा नामोल्लेख झालाच तर मला माफ करावे ..कारण काहींना तो तसा आवडत नाही ह्याची मला कल्पना आहे…तरी पण कधी कधी नाईलाज को क्या इलाज ? नाही का ? ( मी शक्यतो काळजी घेइनच ! )
तर असा हा माझा ब्लॉग मी आपणांसमोर घेऊन येत आहे…. कधी काही आवडलेच तर  आणि …समजा नाही आवडले तरीही मला आपली प्रतिक्रिया हवीच..देणार ना ?
सुरेश पेठे
Advertisements
प्रवर्ग: प्राथमिक टॅगस्
 1. 27/11/2009 येथे 9:31 सकाळी

  kindly see my blog…..
  http://akhiljoshi.wordpress.com
  thanx

  • 27/11/2009 येथे 10:22 सकाळी

   अखिल जी

   पहीलाच म्हणून आनंद ही व अप्रूप ही

 2. sahajach
  27/11/2009 येथे 11:47 सकाळी

  मस्त काका…..आता लिहीत रहा!!!!!

  तुमचे विचार मलाच काय सगळ्यांना वाचायला आवडतील….

  तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा…..

  तन्वी

  • 27/11/2009 येथे 11:51 सकाळी

   तन्वी,
   आभार मानलेत तर तू माझ्यावर चिडशील…नकोच ते ! ..पण श्रेयाचे मानकरी तुला व्हावेच लागेल !

   सुरेश काका

 3. 27/11/2009 येथे 1:28 pm

  thik ahe thik ahe…..

  शब्द फुले तू वाहिलीस…
  त्या फुलांची यातनाही तू पाहिलीस…
  ओल्या जखमा जितक्या जास्त…
  तितकी संवेदना राहील तंदुरुस्त…

  संवेदना जागृत तर
  आपणही राहू जिवंत…
  शरीराने तर प्रत्येक जण जिवंत राहतो…
  मनाने खरा मनस्वी जगाकडे पाहतो…

  • 28/11/2009 येथे 6:28 सकाळी

   वाहिलेली शब्द फुले
   यातना ज्या पाहिलेल्या
   जखमांची भळभळ
   संवेदना जपलेल्या !

   ज्योतीला लागता ज्योत
   फिटे अंधाराचे जाळे
   आग आगीला लागता
   सर्वस्वच रे, ती जाळे !

   जिवंत आहे ? मेलेला ?
   आगीतही लोळलेला
   मरणाच्या दारातही
   धर्मच नाही कळला !!

   सुरेश पेठे
   २८.११.०९

   अखिलजी,

   तुमच्या काव्यमय प्रतिक्रिये मुळे मलाही चार ओळी लिहायला स्फूर्ती मिळाली त्याबद्दल आभार

   • 30/11/2009 येथे 6:40 pm

    mastach…….ata jara ghaiiiit ahe tyamule kavitetun pratuttar nahi devu shakat….. punha kevhatari……… sundar kavita keli ahe apan…..

    keep coming back to my blog @ http://akhiljoshi.wordpress.com

   • 30/11/2009 येथे 10:04 pm

    अखिलजी, कवितेतून दिलेले उत्तर आवडले ह्याचा आनंद आहे. माझा कविताचा
    ब्लॉग ची लिन्क देत आहे, जरूर पहाव्यात.
    http://sureshpethe.blogspot.com/

    आपल्या ब्लॉग ला घाईत भेट देण्या पेक्षा जरा निवांत पणे पण जरूर भेट देत राहीन.

 4. 04/12/2009 येथे 12:19 pm

  तन्वीच्या ब्लॉगवरून माहित झालं होतं आपलं नाव..आता या ब्लॉगचा पत्ता पण मिळाला. मला तुमचा वेगळ्या कारणांसाठी हेवा वाटतो आहे काका. तुम्हाला सगळंच कसं हो जमतं?? 🙂

  • 04/12/2009 येथे 10:25 pm

   अपर्णा ताई ,
   तुम्ही मला लाजवित आहात !!
   ब्लॉगचा पत्ता आता मिळालाय तेव्हा तुमची उपस्थिती व अभिप्राय हेच तर माझे टॉनीक , मला पुरवित रहाल ना ?

 5. shrikant patil
  04/12/2009 येथे 12:54 pm

  Sureshju aapale pratham abjinandan .. ha ek changala platform dilat yere manaa … yere manaa saarkhaa, mnaatil supt ashi barich kalaa kaushalye aani vichar asataat te nidristh avasthetach asataat tyaanaa kuthe tari asaa platform havaa asato to ithe milalyavar tyaala prakat vhaayalaa avasar sandhi melavun denyaache shrey aapalyaalach aahe.

  • 04/12/2009 येथे 9:57 pm

   श्रीकांतजी ह्या सगळ्य़ा मागे आपणही आहात तेव्हा श्रेयाची वाटणी तुम्हाला वगळून कशी होईल ?… मला वाटतंय एक पोस्ट आपल्या वडीलांवर लिहावी मला मदत कराल?… तुमच्या वडीलांच्या चित्रांच्या प्रतिमा आपण घेतलेल्या आहेत. त्यांची थोडी विस्तृत माहीती मला मेल कराल ?

 6. 04/12/2009 येथे 6:09 pm

  सुरेशजी नमस्कार,

  वेळेचा सदउपयोग केला
  उत्तम ब्लॉग तयार झाला
  तर जिवनात रंग भरला

  सलाम तुमच्या जिद्दीला
  माझ्या शुभेच्छा आपल्याला
  प्रगती होवो पावला पावलाला

  अर्थ मिळाला जीवनाला
  जोपासलेल्या कलेला
  स्वप्न उद्यान फुलवायला

  • 04/12/2009 येथे 10:34 pm

   वसंताजोबा, किती उशीर ? पण तुमचा आशिर्वाद पोचला आणि भरून पावलो. !

 7. sucheta apte
  05/12/2009 येथे 10:29 pm

  timbanchi rangoli baddal chi mahiti khoopach avadli. ani sketching kiti soppa ahe asa tumhi dakhavlyavarun vatayla lagla aahe. ani tumcha manogat tar khoopach avadla. manatli pratyek goshta ashich lihit ja mhanje manahi mokla hota ani khoop chhaan vatta. ho na?

  • 05/12/2009 येथे 10:42 pm

   खूप छान अभिप्राय ! चांगले वाटले !

 8. dayaram Nimbolkar
  11/12/2009 येथे 12:18 pm

  सुरेशजी तुमच्या ब्लॉग ने प्रभावित केले.
  ब्लॉग चे नाव सुध्हा खुपच छान सुन्दर
  व्यक्त होण्यासाठी चांगली जगा आहे ही.
  पुढे केव्हा तरी आम्ही ही ज्वाइन करू.

  • 11/12/2009 येथे 12:27 pm

   दयारामजी,
   नमस्कार इथे भेट झाली खूप आनंद वाटला.
   बरेच पोस्ट टाकून झालॆ आहेत, आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे.

 9. vasanti
  11/12/2009 येथे 2:17 pm

  Hii mast aahe tumcha blog,
  khup vachanya sarkha aahe,
  ani photo pan khup chan aahet.
  kavita pan khup khup aahet,
  mas vel kadun saglya kavitache vachan karnar aahe.

  • 11/12/2009 येथे 3:03 pm

   वासंती,
   खूप छान वाटले तुझी प्रतिक्रिया वाचून. आता मला इथेच भेटायचं पोस्ट वाचित रहा, प्रतिक्रिया देत रहा !!

 10. VasantAajobaa
  18/01/2010 येथे 4:28 pm

  येss रे मना येरेss मना !
  naav khupch chhaan aahe.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: