मुखपृष्ठ > प्राथमिक > माझे मनोगत

माझे मनोगत

माझे मनोगत मी माझ्या पहिल्या नविन ब्लॉग मधे प्रकाशित केले खरे पण मनातील रूखरूख तशीच राहिली.


कश्या साठी हा नवा ब्लॉग ? ..’.व्यक्त ’ होण्या साठी ? मग मी व्यक्त तर आधीही होत होतोच की … मग वेगळे काय? माझा एकूण ऑर्कुट प्रवास मी कधीतरी आपणास ओघाने सांगीनच.

त्यानिमित्ताने कवितेच्या प्रांगणात एकीने मला हात धरून आणले ! ’काव्यांजली’ नावाची ती कवितेची कम्युनिटी आहे. तिथे मी काही काळ रमलो कवितांच्या  माध्यमातून ’व्यक्त’ होत राहीलो .’कवितेच्या गावाची’ सफरही घडली. तिही कवितेचीच कम्युनिटी  आहे. तोही प्रवास , वर्णन करीन एकदा. मग स्वत:च्या कवितांच्या कम्युनिटी … चित्रांचे अल्बम , इतरही कम्युनिटी, ब्लॉग सुध्दा झालेत पण ह्या स्व केद्रीत व्यक्त होत राहील्याने व्यक्त होण्यातील तळमळ शांत होण्या ऐवजी   वाढतच राहीली…..म्हणून त्या साठी हा नवा ब्लॉग !

आमचे वेळी कॉम्युटर नव्हते ! साध्या कॅलक्युलेटर नेही आम्हाला तेव्हा चकीत केलेले होते. माझ्या बरोबरचे अजूनही कॉम्प्युटरला सामोरे जायला घाबरतात. मी ही त्यातलाच एक असायचो ,पण एका बेसावध क्षणी त्याची गाठ पडली व त्याच क्षणी त्याचे प्रेमात पडलो. पुढे नेटची ओळख झाली व आमच्या ’ नेट प्रॅक्टीस’ ला जोरात सुरुवात झाली. अनेक मित्र मैत्रीणी मिळाल्यात ! आता  ते आणि तो च मला सतत काही न काही शिकवित रहातात !

आताही एक अशीच  मैत्रीण भेटली. ब्लॉग मी आधीही वापरलेत, पण ह्या तिच्या ब्लॉग विश्वाने मी अचंबित झालॊ. मला हा व्यक्त हॊण्यातला आविश्कार नवा हॊता. मला तॊ आत्यंतिक आवडला ! आता हा ब्लॉग म्हणजे माझ्या मनाचे साम्राज्य असेल. मात्र आपण कधीही त्यात डोकावू शकता !

अजून एक वैशिष्ठ्य त्यात असणार आहे. आता ह्या ब्लॉग मधे जरी मी सतत डोकावत असणार असलो तरी तॊ माझ्या वयोगटाचे प्रतिनिधित्व करणार आहे. माझी तशी धारणा असणार आहे.  तेव्हा हा नवा प्रवास माझा असूनही त्या अनुषंगाने माझ्या पिढीचा असेल. जे माझ्या वयोगटातील असतील त्यांना कदाचित पुन:प्रत्ययाचा आनंद घेता येईल. इतरे जनांना त्यामुळे, आमचीही काही बाजू असू शकेल, ती समजून घेण्याची व त्या बाबत आपल्या शंका-कुशंकांचे समाधान करून घेण्याची आयती संधी मिळू शकेल !

हा माझा नवा ब्लॉग, नव्याने– मुक्तपणाने व्यक्त होण्याचा प्रयत्न आपल्या साथीने आणि शक्य तितका नियमीत सुरू करणार आहे.


सुरेश पेठे

 

 

Advertisements
प्रवर्ग: प्राथमिक टॅगस्
 1. 30/11/2009 येथे 8:20 pm

  तन्वी ताई च्या ब्लॉग मधून तुमची ओळख झाली.तुमच्याकडून बरेच काही शिकण्यासारख आहे.इथे आम्ही केलेला संकल्प १० दिवस ही पाळत नाही आणी तुम्ही या वयात सुद्धा केलेला संकल्प चिकाटीने पूर्ण करता आहात.तुमच्या मेहनतीला सलाम…
  या ब्लॉगच्या माध्यमातून आमच्यासारख्या युवकांना योग्य ते मार्गदर्शन करत राहावे.या ब्लॉगच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…

  • 30/11/2009 येथे 9:57 pm

   देवेंद्रजी, आपल्या अभिप्रायाबद्दल व आपल्या शुभेच्छां बद्दल आभार,खरं सांगायचं तर इथे येण्याला तन्वीच कारणीभूत आहे ! तिची नेट वरची भेट मला माझ्या लहानपणीच्या त्या रम्य आठवणीतच नुसती घेऊन गेली नाही तर तिने माझ्या बालमैत्रीणीला पण मिळवून दिले. त्यातील काही आठवणी आपणा सर्वांना आवडाव्यात या हेतूने हा ब्लॉग सुरू केला आहे ! इथे कोणाला ही काही शिकविण्याचा अभिनिवेश नाही.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: