मग काय येताय ?
ह्या ब्लॉग ची निर्मिती होण्याला माझी एक मैत्रीण तन्वी कारणीभूत झालेली होती. तिच्याच मस्कत गावात रहाणारी अनुजा माझी नंतर मैत्रीण झाली. योगायोग बघा दोघीही सध्या भारतात आलेल्या आहेत. मात्र माझी नंतर मैत्रीण होऊन सुध्दा माझी प्रत्यक्ष गांठ मात्र प्रथम पडत्येय ती अनुजाशी.
आज आम्ही जवळ जवळ दोन तास एकत्र इकडच्या तिकडच्या गप्पा हाणीत बसलो होतो. गप्पाच्या ओघात अनेक विषय येत होते. त्यातच दावणगिरी डोश्याचा पण विषय निघाला. मागे मी त्या संबधात एक पोस्ट टाकली होती व त्यावरून ’भांडणे’ होत होत, मग अनिकेत शी पहीली गांठ कशी पडली व त्याचे पर्यवसान मराठी ब्लॉगर्स च्या पहिल्याच यशस्वी मेळाव्यात कसे घडले ह्याचा वृतांत रवंथ करून झाला !
तेव्हा अनुजाने त्या सर्वांची पुन्हा भेट नाही का घडवून आणता येणार ? व तुम्ही म्हणजे ’मी’ असे काहीही घडवून आणू शकतो ह्या विश्वासाने ती जबाबदारी माझ्यावर सोपवून ती मात्र निर्धास्त झाली ! मग काय करणार एक स्त्री हट्ट… लागलो बिच्चारा कामाला , आणि मग फोनाफोनी सुरू झाली. पहीली ठरली तारीख…२० जून २०१० , आणि पुण्यात. अर्थात त्या तारखेला पुण्यात असणाऱ्या सर्व मराठी ब्लॉगर्स ना आग्रहाचे निमंत्रण ! शिवाय तेरा दिवस आधी सांगतोय आपापल्या कॅलेंडर वर नोंद करीत त्या प्रमाणे ठरवून येण्या साठी. नंतर तक्रार नको !
ठिकाण १) सिंहगडाच्या पायथ्याशी असलेले घाटगे फॉर्म कींवा २ ) वरसगाव धरणाला लागून असलेले सूर्य शिबीर ह्यापैकी एक, आणि खर्च अंदाजे रू. ५००/- पर्यंत असावा, अर्थातच ’सोल्जर कॉन्ट्रीब्युशन ! वेळ सकाळची, नाष्टा पाणी, जेवण…गप्पा टप्पा व परत… कुठलेही भाषण नाही, ठराव नाहीत …फक्त मौज मज्जा ! बरेच जण खात्रीने येणार असतील तर गाडी मिळत्येय का बघू, नाहीतर आपापले एकेक ..दोघे करीत करीत पोहोचू !
मग काय येताय ?
पटापट इथेच फक्त येणारांनीच नावे द्या !
ताज्या प्रतिक्रिया