Archive

Archive for फेब्रुवारी, 2010

वस्तू व व्यक्ती चित्रणाचे वर्ग कोथरूड,पुणे येथे

26/02/2010 4 comments
संस्कार भारती, संभाजी विभाग पुणे, ह्यांच्या विद्यमाने कोथरूड येथे वस्तू आणि व्यक्ती चित्रणाचे वर्ग शनिवार दिनांक २७ मार्च २०१० पासून प्रत्येक शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्यावेळेत बाल शिक्षण शाळेत सुरू करीत आहोत. ह्या वर्गाचे शुल्क अत्यल्प म्हणजे रुपये २००/- फक्त पूर्ण वर्षासाठी असणार आहेत ( एप्रील ते मार्च ). ह्या वर्गाला येणाऱ्यांना दर रविवारच्या  निसर्गचित्र वर्गालाही उपस्थित रहाता येणार आहे. ह्या वर्गाला अधून मधून मान्यवर चित्रकारांचे मार्गदर्शनही उपलब्ध होणार आहे. ह्या वर्गात १५ वर्षा वरील कोणाही स्त्री पुरूषास प्रवेश घेता येईल. ज्यांना चित्रकलेची मनापासून आवड आहे व नित्य नियमाने सराव करण्याची इच्छा आहे, अश्यांना ह्या वर्गाचा निश्चित लाभ करून घेता येईल. इच्छूकांनी श्री.सुरेश पेठे ह्यांचेशी
ईमेल sureshpethe@gmail.com
अथवा ९८५०४८८६४० ह्या क्रमांका वर संपर्क साधावा.
Categories: Uncategorized

ओळखा पाहू !

काय झालंय मला हे चित्र तिला भेट द्यायचंय पण कोणाला देऊ ? मला मदत करा ना ओळखायला !

स्केचिंग व ड्राईंगचे नवीन पुस्तक

16/02/2010 2 comments

संग्रह प्लाझा मध्ये एक चित्र प्रदर्शन पहायला जाण्याचा योग आला. प्रसिध्द चित्रकार रवि परांजपे ह्यांच्या मॉडेल कॉलनीतील बंगल्याच्या आवारात त्यानी ही गॅलरी सुरू केली आहे. प्रदर्शन पाहून झाले. बाहेर काही पुस्तके व इतर चित्रकलानिर्मित भेट वस्तू विक्रीला ठेवल्या होत्या. श्री. रवि परांजपेंच्या एका नव्या पुस्तकाने मी ओढला गेलो.

पुस्तक इंग्रजीत आहे. अगदीच छोटेखानी आहे, अवघे ३२ पानांचे व लिखित मजकूर अक्षरश: जेमतेम चार पाने भरतील इतकाच आहे  पुस्तकाचे नाव आहे. SKETCHING & DRAWING, A Personal View by  अर्थात  RAVI PARANJAPE.


हे आहे त्याचे मुखपृष्ठ.


आत ही त्यांची अगदी मोजकीच चित्रे आहेत  त्यातही जी मला आवडली ती खाली देत आहे. त्यांच्या चित्रातील रेषांचे महत्व, अगदी आवश्यक तेव्हढेच काम, चित्रातील व्यक्तीच्या सौंदर्याचा घेतलेला ध्यास.
त्यामुळे प्रत्येक चित्र वैशिष्ठ्यपूर्ण झालेलॆ आहे व त्यावर श्रीयुत रवि परांजपेंचा ठसा उमटलेला आहे.
.
.
.
.
.
.
.
तर हे आहे्त त्यांच्या मनोगतातील काही अंश…मात्र सर्व काही वाचा याचे असेल तर मात्र पुस्तक विकत घेऊन वाचणे व संग्रही ठेवणे केव्हाही चांगलेच नाही का? व तेही अवघ्या साठ रुपयात.
.
.
.

मुळशी जवळ

काल गुरूवार होता. माझे अजून एक स्नेही मला विचारते झाले व मीही होकार भरला, अन गाडी आम्हाला घेऊन सकाळी सातलाच पिरंगुट कडे निघाली. श्री. रवी देव हे अखिल भारतीय संस्कार भारतीचे मंत्री आहेत व चित्रकलेतही माहीर. गेल्या सहा वर्षापासून मी ह्या संस्थेचा सभासद आहे पण असा त्याचे सोबत जाण्याचा योग आलेला नव्हता !

वाटेत आमच्या गप्पा पण चालूच होत्या. संस्कार भारती हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच एक अंग आहे पण संघाच्या इतर कार्याची आम्हास खरे तर फारशी ओळख नाही. आज आम्हाला त्यातील काहीची तोंड ओळख होत होती.
मावळातील हा मुळशी धरणा जवळचा  भाग डोंगर खोऱ्यांनी वेढलेला व निसर्गाने मुक्तहते उधळण केलेला प्रदेश आहे पण आत आतल्या गावातून  दळणवळणाचे बाबतीत मात्र  स्वातंत्रपूर्व काला इतकाच अप्रगत राहीलेला आहे, आणि शिक्षणाचे बाबतीत तर आजही तितकाच मागासलेला ! जिल्हा परिषदेच्या शाळा फक्त चौथी पर्यंत आहेत म्हणजे आहेत ! आता संघाने एक शाळा काढली आहे ५ वी ते १० वी पावेतो, तेही सरकार कडून छदाम ही न घेता फक्त जमणाऱ्या देणगींवर.  त्यामुळे मुलांना तिथल्या तिथे शिकता तरी येते. निम्या मुलीही त्यात आहेत

काही वसतीगृहे ही चालवली जातात. अगदि स्वयंपूर्ण ! शिवाय महीलांचे विविध बचत गटही आहेत ! हा माणूस स्वत:चा ग्राफिकचा धंदा सांभाळून एव्हढी व्यवधाने कशी समर्थपणॆ सांभाळतो हे पाहणे कौतुकाचे आहे ! तेथिल निसर्ग सौंदर्याचे आधी काही फोटॊ दाखवतो.

दुधाचा धन्दा हा गावकऱ्यांचा पूरक धंदा.
आता आम्ही एक पठाराची जागा शोधलीय व बसतॊय ठिय्या मारून लँड्स्केपला.
ही बघा काही मी काढलेली जलरंग चित्रे !

हे पहिले लॅंडस्केप

हे दुसरे लॅंडस्केप

आणि हे तिसरे... मग परतलो

जोडे आणि पादुका

भलतंच बोलताय राव तुमी !

अहो, आम्ही जातीवंत आहोत ! तुम्ही काय आम्हाला आता महाराष्ट्राची परंपरा शिकवणार काय ? आम्ही तर नुसते उचललेत, तुम्ही नाही का डोक्यावर घेऊन नाचता ? हां आता थोडी गल्लत झालीय आमची जोडे आणि पादुकात !!

नाशिक-त्र्यंबकेश्वर,संस्कार भारती_ निवासी शिबीर

नाशिक –  त्र्यंबकेश्वर_ संस्कार भारती_ निवासी शिबीर



खरे तर हे शिबीर गेल्या महिन्यात २४ ते २६ जानेवारी २०१०  ला पार पडले  व त्यासंबंधीचा पोस्ट खरे तर मी कधीच टाकायला हवा होता. परंतू  दिनांक २४ लाच माझ्या डिजीटल कॅमेऱ्यात अचानक बिघाड झाला , त्याचे शटरच चालू होत नव्हते! मला तर वाटले होते की त्या दिवशी चे घेतलेले शॉट्स बहुदा ’धारातीर्थी’ पडलेले असणार ! पण काल कॅमेरा दुरुस्त होऊन आला व त्या दिवशी घेतलेले शॉटस शाबूत होते , व म्हणूनच ही पोस्ट टाकू शकतोय !

हे शिबीर संस्कार भारतीच्या नेहमीच्या वर्गांना व कार्यक्रमाला जे येतात त्यांचे साठी असते ! दर शनिवारी दुपारी एका शाळेत आम्ही जमतो व व्यक्ती चित्रणाचा सराव करतो. तर दर रविवारी निसर्ग चित्रणासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच  ठरविलेल्या जागी जावून निसर्ग चित्रण करतो. माझे आता हे सहावे वर्ष आहे पण मला खाडा माहित नाही. अगदिच ठरविलेल्या जागी  जाता आले नाही तर वा जेथे असेन तेथे जवळच्या एखाद्या जागी जाऊन हजेरी लाऊन येतोच येतो !

यंदा आम्ही २३ ला दुपारी निघालॊ.२३, २४ व २५ ला त्र्यंबकेश्वरच्या ( शेगाव ) भक्ती निवासात राहीलो. व २६ ला सकाळी नाशिकच्या गंगाकांठी चित्रण करून दुपारी पुण्या कडॆ रवाना झालो. मात्र छायाचित्रे २४ चीच काही शाबूत राहीलीत ती येथॆ देत आहे. आमच्या बरोबर श्रीयुत संदीप यादव हे पुण्याचे प्रसिध्द तरुण चित्रकार तिन्ही दिवस होते. तर २५ तारखेला नाशिकचे तरुण चित्रकार श्रीयुत प्रफुल्ल सावंत होते.


२४ तारखेचॆ प्रात्यक्षिक  श्रीयुत संदीप यादव ह्यांनी दिले, त्याचे काही फोटो व व्हिडियो क्लिप्स मी घेऊ शकलो तेव्हढेच येथे देऊ शकत आहे. २५ तारखेचे पात्यक्षिक श्रीयुत प्रफुल्ल सावंत ह्यानी  त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्ता वर दिले होते.
.
.

गजानन महाराज मठातील शिव मंदिर

ह्याच मंदिराचे लॅंडस्केप काढत आमच्या शंकांचे निरसन करीत ते पूर्ण केले
.
.
ह्याच मंदिराचे पेन ने मी काढलेले स्केच
.
आम्ही सारे प्रात्यक्षिक बघण्यात तल्लीन झालॊ होतो.
.
.
संस्कार भारतीचे नाशिक शिबीर २४ ते २६ जानेवारी २०१० श्री. संदीप यादव,प्रसिध्द जलरंग चित्रकार, व्हॅल्यू स्केच कसे काढायचे समजावत आहेत
.
.
संस्कार भारतीचे नाशिक शिबीर २४ ते २६ जानेवारी २०१० श्री. संदीप यादव,प्रसिध्द जलरंग चित्रकार, व्हॅल्यू स्केच कसे काढायचे समजावत आहेत व जलरंगास सुरुवात कएली आहे.
.
.
संस्कार भारतीचे नाशिक शिबीर २४ ते २६ जानेवारी २०१० श्री. संदीप यादव,प्रसिध्द जलरंग चित्रकार, व्हॅल्यू स्केच कसे काढायचे समजावत आहेत व जलरंगास सुरुवात केली आहे. अधून मधून शंकांचे निरसन सुध्दा !
.
संस्कार भारतीचे नाशिक शिबीर २४ ते २६ जानेवारी २०१० श्री. संदीप यादव,प्रसिध्द जलरंग चित्रकार, व्हॅल्यू स्केच कसे काढायचे समजावत आहेत व जलरंगास सुरुवात केली आहे वॉश देऊन झाला आहे.
.

आणि निसर्ग चित्रण पूर्ण झाले

.

जर माझ्या कॅमेराने अवसान घातकी पणा केला नसता तर ?

.

.

पण ह्या जर….तर ला काही अर्थ नसतो ! जे पदरात पडले त्यावर समाधान मानून घ्यायलाच हवे नाही का ?

नव्या मराठी ब्लॉग्सची उत्पत्ती

04/02/2010 4 comments
आपल्या मराठी ब्लॉगर्स च्या मेळाव्याच्या निमित्ताने व नंतरही माझा व्यक्तिश: अनेकांशी संबंध आला. आपली ही चळवळ यशस्वी करायची असेल तर शेकडॊ, हजारोनी नवीन मराठी ब्लॉगर्स पुढे यायला हवे आहेत, जेणेकरून त्यांच्यात आपोआप विषयाचे वैविध्य येईल व हळू हळू कसदार लिखाणांमधून मराठी वाङ्मयात मोलाची भर पडत राहील , हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून मी प्रत्येकाला मराठीत ब्लॉग लिहीण्यास प्रोत्साहित करीत आलेलो आहे. हे श्री.प्रशांत प्र. देगांवकर, पुणे. त्यांना उलगडलेलॆ “ब्रह्मांडाचे रहस्य “. आपणासाठी उघड करायला उत्सुक आहेत एका नव्या मराठी ब्लॉगचे रूपाने…
.
.
माझा “मराठी” ब्लॉग – ” ब्रह्मांडाचे रहस्य “.
.
आदरणीय महोदय,
.
मला कळविण्यास आनंद वाटतो की मी  ”मराठी” मधून ब्लॉग लिहिला आहे.
ब्लॉगचे नांव :-  ”ब्रह्मांडाचे रहस्य “.
ह्या मध्ये माझ्या ” टोटल हेल्थ ” वरील पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे.
ब्लॉग बघण्यासाठी लिंक :- http://brahmandrahasya.blogspot.com/
कृपया आपण माझा ब्लॉग बघावा व आपले मत,विचार,अभिप्राय कळवावेत.
हा ब्लॉग करण्यासठी मला, श्री.पेठेकाका(पुणे), श्री.अनिकेत समुद्र( पुणे ) व श्री. तुषार जोशी(नागपूर) यांची खूप खूप मदत झाली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद व मनःपूर्वक आभार.
कळावे,
.
आपला,
.
प्रशांत प्र. देगांवकर, पुणे.
http://brahmandrahasya.blogspot.com/, www.solvetotalhealthproblems.com
.
.

नमस्कार पेठे काका (आणि समस्त मराठी ब्लॉगर्स मंडळी),
सर्वप्रथम आपणां सर्वांचे अभिनंदन, समस्त मराठी ब्लॉगर्सना आपण एका छ्त्राखाली आणण्याचा घाट घातलात आणि तो सत्यात आणलात. अभूतपूर्व अशी ब्लॉगर्स मीट पुण्यात घडवून आणलीत. त्यामागे नक्कीच आपले योगदान फार मोठे आहे. नाहीतर पन्नास मराठी माणसे जमवणे हे काही खायचे काम नाही. मी इकडे रशियामध्ये एका मोठ्या स्टील प्लांटवर सेल्स मध्ये नोकरी करतो. आणि फुटकळ लेखन करतो. अर्थात ते सर्व फक्त माझ्यासाठीच असते. मी स्वतःची इ-डायरी मराठीमध्ये लिहितो. खरं तर जेव्हा मी इ-सकाळवर ही बातमी वाचली तेव्हाच मला असे वाटले की लगेचच्या विमानाने पुण्याला निघावे. तिकीट बुकही केले होते. पण कामाच्या अचानक आलेल्या गडबडीमुळे यायला जमले नाही. पण पुढला मेळावा जेव्हा होईल तेव्हा मला नक्की कळवा. थोडे आधी कळवलेत तर बरे होईल, म्हणजे कामांची सोय लावून येता येईल.
मराठी भाषेच्या साहित्यात आपल्या मराठी ब्लॉगर्सकडून खरंच तोलामोलाची भर पडत आहे. आणि त्यासाठी साहित्य संमेलनाबाबत जो ठराव झालाय तो अगदी योग्यच आहे. तुम्हां सर्वांना माझ्या शुभेच्छा. मी खरं तर कधी ऑनलाईन लिहिले नाही. पण आपणांपासून प्रेरणा घेऊन आता (आता म्हणजे या क्षणीच) एक ब्लॉग सुरु करत आहे. “मनाच्या धुंदीत”… म्हणून त्या ब्लॉगला नाव पण तेच ठेवणार “”मनाच्या धुंदीत”. सध्या तरी माझी ओळख आणि माझ्याबद्दल अशीच एक पोस्ट टाकतो. पण लवकरच हा ब्लॉग ओसंडून वाहायला लागेल याची खात्री बाळगा. मी नियमितपणे आपला ये रे मना… वाचतो, स्केचिंग पाहतो. दोन्ही भुंग्यांचे ब्लॉगही माझे आवडते आहेत. आणि तन्वीचा पण ब्लॉग खूप आवडतो मला. मला लिहायला प्रेरणा देणारे फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात. मी नेहमीच कामासंदर्भात संपूर्ण रशियामध्ये कायम फिरत असतो. आजवर तिथेले जीवन, संस्कृती, लोक यांबद्दल डायरीत लिहिले आता ब्लॉगवर पण लिहिणार.
ब्लॉगची लिंक: http://manachya-dhundit.blogspot.com/
याचे सर्व श्रेय आपलेच आहे. पुढील माहितीची आणि उपक्रमांची मी आतुरतेने वाट पाहत आहे. आपण माझ्या भावना सर्व मराठी ब्लॉगर्स संयोजकांपर्यंत नक्की पोचवा. आणि सर्वांना धन्यवाद सांगा.
माझ्यालायकीचे काही काम असेल तर अवश्य सांगा.
धन्यवाद!!!
अजित
.
.
हे आहेत श्रीयुत  अजित रायकर ह्यांचॆ  रशियन जीवनावरील रसरशित लेख वाचण्याच्या तयारीत रहा.

’ मराठी ब्लॉगर्स ’ चा डंका सिडनीत

03/02/2010 3 comments

’ दावणगिरी ’ पासून सुरू झालेला आपल्या ’ मराठी ब्लॉगर्स ’ चा डंका सिडनीतही पोचलाय ! माझी अशी ’ श्रध्दा ’ आहे की ही चळवळ आता थांबणे नाही कारण नवीन नवीन मराठी ब्लॉगर्स आपल्याला येऊन मिळणारच !

नमस्कार काका,
मी श्रद्धा कुलकर्णी -मोकाशी. मुळची मुंबई ची आणि संगणक अभियन्ति. तुमचे ब्लोग्स बर्याच दिवसा पासून वाचत आहे. मी स्वत ब्लोग्स लिहित नाही पण इंग्लिश मध्ये काही लेख लिहिले आहेत गेले २ वर्ष पासून. कारण मी कामा निम्मित्त भारताहून अमेरिका दुबई बहरैन तुर्की आणि आता ऑस्ट्रेलिया असा प्रवास करत आहे . सध्या sydney  मध्ये IT  क्षेत्रात काम करत आहे.
पण तुमचे ब्लोग आणि विचार एकून आता मराठी मध्ये वाचनप्रमाणे  लेखन करायचा प्रयत्न चालू करणार आहे. तुमच्या सर्व ब्लोग्गेर्स मुले प्रेरणा आली आहे मना मध्ये.
मी  तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देण्या करता इमेल लिहित आहे. ब्लोग मीटिंग ची कल्पना खुपच आवडली आणि खूप आनंद झाला कि असाही प्रयोग एकदम सफल झालेला आहे
मी पुढच्या भेटीत तुम्हा सर्वाना नक्की भेटीन म्हणजे खूप इच्छा आहे भेटायची. काही ठराविक ब्लोग (उदाहरणार्थ तुमचा अनिकेतचा ,तन्वी चा)मी नियमित पणे वाचते. जणू काही दिवसाची सुरुवात त्यानेच होते आणि मग online  वृत्त पत्र वाचते.
असेच लिहित राहा आणि नवीन गोष्टी उपक्रम पोस्ट करत जा हीच विनंती.
माझा हे पत्र इतर ब्लोग लेखाका बरोबर जरूर share  करा. त्याच प्रमाणे ह्या सगळ्या ब्लोग्गेर्स ची contact लिस्ट म्हणजे इमेल आणि नाव किवा number  कुठे उपलब्ध आहे का?
असस्ल्यास जरूर कळवा
आपली एक वाचक आणि fan
श्रद्धा
Follow

Get every new post delivered to your Inbox.