मेळाव्याची कार्यक्रम पत्रिका
http://manatale.wordpress.com/
कार्यक्रमाची रुपरेषा अशी राहील -
दिनांक – १७ जानेवारी, २०१०
वेळ – सायंकाळी ठिक ४ वाजता
स्थळ – पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, बिग बाझार जवळ, पुणे ४११ ०३९.
(राजाराम पुलावरुन सिंहगड रोडवर डावीकडे वळावे)
४ ते ४.१५ – सर्व ब्लॉगर मित्र-मैत्रीणींनी उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी जमणे
४.१५ ते ४.३० – उद्यान प्रवेश. तेथून डाव्या बाजूने धबधब्या जवळ असलेल्या गोल झोपडीत जमणे. येथे एक रजिस्टर ठेवले जाईल. त्यात प्रत्येकाने पुढील क्रमाने माहिती देणे अपेक्षित आहे..१)संपूर्ण नाव २) पत्ता ३) दूरध्वनी क्रमांक ४) ब्लॉग चे नाव ५ ) ब्लॉगचा पत्ता URL ६) ई-मेलचा पत्ता इत्यादी.
४.३० ते ५ – श्री. अनिकेत समुद्र, श्री. सुरेश पेठे आणि श्री. दिपक शिंदे आलेल्या मित्र-मैत्रिणींचे स्वागत आणि प्रास्ताविक करतील. नुकत्याच पार पडलेल्या संक्रांतीच्या पार्श्वभुमीवर (१४ जानेवारी) छोटेखानी तिळगुळ समारंभ पार पडेल.
५ ते ५.३० – प्रत्येकजण आपली ओळख, आपल्या ब्लॉगची ओळख करुन देतील.
५.३० ते ६.०० – चर्चा. ब्लॉगबद्दलच्या अपेक्षा, मराठीब्लॉग्सच्या श्रुंखलेत जोडल्या गेलेल्या ब्लॉग्समधील घडामोडी, त्यातील चांगले वाईट मुद्दे, ब्लॉग्सबद्दलच्या शंका त्यांची उत्तरे वगैरे
६ ते ६.३० – श्री प्रसन्न जोशी आणि मिडीया-हाईट कंपनीमधील त्यांचे सहकारी ब्लॉग्सबद्दलचे त्यांचे अनुभव सांगतील तसेच सर्व ब्लॉगर्सना मराठी ब्लॉग्स अधीकाधीक समृध्द होण्यासाठी मार्गदर्शन करतील.
६.३० ते ७ – पुढे काय? सर्व जण एकत्र येऊन काही चांगल्या योजना राबवु शकतो का त्याबद्दलची चर्चा. अश्या गाठी-भेटी कधी करायच्या याबद्दलचा आराखडा मांडुन हा स्नेहमेळावा समाप्त होईल.
स्नेहमेळाव्याची औपचारीकता संपली असली तरी ७ ते ७.३० पर्यंत सर्वजण (ज्यांना शक्य आहे त्यांना) एकत्र थांबुन अनौपचारीक गप्पा मारण्यासाठी वेळ.
पेठे काका, मेळाव्याला येऊ इच्छिणाऱ्या ब्लॉगलेखकांची संख्या बघितली, तर ३० मिनिटात सगळ्यांची स्वतःची आणि ब्लॉगची ओळख संपणं जरा अवघड वाटतंय.
गौरी ,
तुझा मुद्दा बरोबर आहे, आपण त्यासाठी वेळ वाढवून घेऊ व दुसरा कमी महत्वाचा मुद्दा बाजूला ठेवू.